Tuesday, 5 April 2022

 पर्यायी इंधनाच्या उपयोगात महाराष्ट्र आदर्श राज्य ठरेल - ऊर्जामंत्री

            ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत म्हणालेराज्यात पारंपरिक इंधनाऐवजी हायड्रोजन इंधनाचा वापर करून विजनिर्मिती करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येत असून या क्षेत्रात महाराष्ट्र लवकरच आदर्श राज्य असेल. इलेक्ट्रिक वाहनांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन राज्यात ईव्ही चार्जिंग स्टेशन्स स्थापन करण्यासाठी महावितरण कंपनी सक्रिय पुढाकार घेत आहे.

            महावितरणमहापारेषण आणि महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीने पेट्रोल पंपांच्या आवारात ईव्ही चार्जिंग स्टेशन उभे करण्यासाठी पेट्रोल कंपन्यांसोबत संयुक्त उपक्रम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. हे मॉडेल यशस्वी झाल्यास पुढील टप्प्यात विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात चार्जिंग स्टेशनची संख्या वाढविण्यावर भर दिला जाईल. येत्या काही दिवसात नवी मुंबईमध्ये ६०नाशिक आणि ठाणेमध्ये प्रत्येकी २५नागपूर ३४ चार्जिंग स्टेशन्स उभारण्याचे निश्चित केले आहे. या अभियानास भागधारक घटकांचा चांगला प्रतिसाद मिळावा यासाठी महावितरणने 'पॉवरअपईव्ही'  हे ॲप विकसित केले आहेअसेही ते म्हणाले.

ई-वाहनांच्या विक्रीत महाराष्ट्र आघाडीवर - पर्यावरणमंत्री

            पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे म्हणालेपारंपरिक इंधनाच्या वापरामुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होत असून यामध्ये वाहनांद्वारे होणाऱ्या प्रदुषणाचा मोठा वाटा आहे. त्याबाबत जनजागृती तसेच उपाययोजनांसाठी ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. राज्यात गेल्या दोन वर्षात इलेक्ट्रॉनिक वाहनांविषयी मोठी जनजागृती झाली असून या वाहनांच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. दुचाकी आणि चारचाकी इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या विक्रीत महाराष्ट्र देशात अग्रेसर असून राज्यात ई-रिक्शालाही प्रोत्साहन देण्यावर पुढील काळात भर दिला जाईल.

            राज्यात पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाच्या माध्यमातून पुढील काळात मुंबई किंवा नाशिक येथे नागरी नियोजनबाबत जागतिक परिषद आयोजित करण्यात येणार आहे. कोल्हापूर येथे कृषी क्षेत्रातील पर्यावरणाच्या अनुषंगाने परिषद आयोजित करण्यात येणार आहे. नागपूर येथे हरित ऊर्जा परिषद घेण्यात येईल. हरित इकोसिस्टीमसाठी हरित इंधनाद्वारे वीजनिर्मिती याबाबत विचार केला जाईलअसेही ते म्हणाले.

हरित मोबिलिटीला राज्यात प्रोत्साहन - अदिती तटकरे

            राज्यमंत्री कु. आदिती तटकरे म्हणाल्याहरित मोबिलिटीला राज्यात प्रोत्साहन देण्यात येत असून राज्याच्या औद्योगिक क्षेत्रात या क्षेत्रातील उद्योगांना प्राधान्याने जागा उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या विक्रीतील वाढ ही पर्यावरणाच्या विकासासाठी तसेच राज्यातील नैसर्गिक संपदेच्या शाश्वत जपणुकीसाठी महत्त्वाची आहे. पर्यावरण विभाग या बाबीसाठी घेत असलेला पुढाकार महत्त्वाचा आहेअसेही त्या म्हणाल्या.

            दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत शून्य उत्सर्जन व्यावसायिक वाहतूक व्यवस्था तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाभविष्यातील वाहतूक व्यवस्था यामध्ये गुंतवणुकीला चालनाया क्षेत्राच्या अनुषंगाने आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभव आणि जाणिवादेशामध्ये इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या निर्मितीला प्रोत्साहनई-मोबिलिटीसाठी अर्थपुरवठावाहन उद्योग तसेच पुणे क्षेत्राचा विचारईव्हीसाठी शुद्ध ऊर्जा निर्मितीसाठी पायाभूत सुविधा निर्मिती आदी विषयावर चर्चासत्रे होणार असून यावेळी विविध देशांचे वाणिज्य दूतउद्योजक भाग घेणार आहेत.

000


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi