महाराष्ट्र चेंबर पत्रिके’चे व्यापार-उद्योग विकासात महत्त्वपूर्ण योगदान : दीपक कपूर
------------------------------ --
*माहिती महासंचालक दीपक कपूर यांच्या हस्ते विशेष अंकाचे प्रकाशन*
------------------------------ --
मुंबई : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री आणि ॲग्रिकल्चरचा एक ज्वलंत इतिहास असून महाराष्ट्रातील उद्योग वृद्धीसाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे मोठे योगदान आहे. मराठी माणसाला उद्योग निर्मितीत प्रोत्साहन देत उद्योगवाढीसाठी महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स यांचे काम अखंडपणे सुरू आहे.राज्याची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र चेंबर तर्फे व्यापार,उद्योग, कृषीपूरक उद्योग यांच्यासाठी अद्ययावत माहिती उपलब्ध करून देणारे मासिक सातत्याने पन्नास वर्ष प्रकाशित करून आपली उपयुक्तता सिद्ध करणाऱ्या ‘महाराष्ट्र चेंबर पत्रिके’च्या 51 व्या वर्षाच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक दीपक कपूर यांच्या हस्ते आज मंत्रालयात करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
या पुस्तक प्रकाशन प्रसंगी 'महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री आणि ॲग्रिकल्चरचे' नवनियुक्त अध्यक्ष ललित गांधी, कार्यकारिणी सदस्य समीर दूधगावकर, तसेच प्रभारी सरकार्यवाह सागर नागरे उपस्थित होते.
भारतीय उद्योजकांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर उद्योग व व्यापारात अग्रेसर ठेवण्यात महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सला 95 वर्षांचा गौरवशाली इतिहास आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण, शहरी, लहान-मोठे, उद्योजक, व्यापारी आणि व्यावसायिकांसाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री आणि ॲग्रिकल्चरच्या माध्यमातून कार्य करीत आहे. याचे कौतुक श्री.कपूर यांनी यावेळी केले.
याप्रसंगी 'महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या' वतीने ललित गांधी यांनी श्री.कपूर यांना ‘भगवतगीता’ हा ग्रंथ भेट तसेच शाल देऊन सत्कार करण्यात आला.
*फोटो कॅप्शन* ::महाराष्ट्र चेंबर पत्रिका च्या 51 व्या वर्षातील पहिल्या अंकाचे प्रकाशन करताना माहिती महासंचालक दीपक कपूर. सोबत अध्यक्ष ललित गांधी, समीर दुधगावकर, सागर नागरे
Thanks and Regards,
Lalit Gandhi | President
Maharashtra Chamber of Commerce, Industry & Agriculture (MACCIA)
Head Office - Oricon House, 6th Flr, Maharashtra Chamber of Commerce Lane, Kala Ghoda, Fort, Mumbai - 400 001, Maharashtra | Tel: +91 22 6739 5811 | Fax: 2285 5861
Nashik Branch - 201, Sarda Sankul, M. G. Road, Nashik 422001, Maharashtra | Phone 0253-2577704 | Mobile: 9225619187 | Email: vini@
No comments:
Post a Comment