लहान असतांना बाळासाहेबांनी प्रबोधनकारांना विचारलेले कि, तात्या श्रीमंती कशात आहे ?? तेव्हा प्रबोधनकार त्यांना हाथ धरून दारा पाशी घेऊन आले आणि घरा बाहेर च्या चपलांचा ढीग दाखवला आणि म्हणाले, हे बघ श्रीमंती याच्यात आहे. अजून कधी माणसाची श्रीमंती पाहायची असेल तर त्यांची अंतयात्रा बघ. त्याला जमा झालेली गर्दी आणि लोकांच्या डोळ्यांमधून वाहणारे अश्रू यावरून माणूस किती श्रीमंत आहे ते समझते.
जे स्वतःपुरते जगतात ते पैशाने कदाचित श्रीमंत असतील, पण जे इतरांच्या हाकेला धावून जातात. माणसं कमावतात, ती लोक खरी श्रीमंत असतात. अन्यथा जगात रोज हजारो लोक जन्माला येतात आणि हज्जारो मरतात. पण हाताच्या बोटावर मोजण्या इतकी लोक स्मरणात राहतात, अमर होतात.
प्रबोधनकारांना तेव्हा काय माहित कि, त्यांचा पुत्र त्यांचे बोलणे इतके मनावर घेईल आणि जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस बनेल.🙏
No comments:
Post a Comment