बाप्पा तुझे येणे, बाप्पा तुझे जाणे,
आमचे मात्र उगाचच मिरवणे...
आम्ही बाप्पा आणला...
आम्ही बाप्पा बसवला...
आम्ही नैवेद्य दाखवला...
आम्ही बाप्पा विसर्जन केला...
अनादी अनंत तो एक...
त्यास कोण बनवेल/बुडवेल?...
अनंत पिढ्याआल्या...
अनंत पिढ्या गेल्या...
बाप्पा तरीही ऊरला...
आपल्या आधीही तोच एक ...
आपल्या नंतरही तोच एक...
त्यास काय कोणाची गरज?...
काळ कधी का थांबेल?...
बाप्पा पण कधी न संपेल...
मग काय हा उत्सव पांच दहा दिवसांचा?....
का न करावा तो रोजचा?...
आपुले येणे, आपुले जाणे...
त्या मधले हे क्षणभंगुर जगणे...
जगण्याचाच या उत्सव करावा...
आणि बाप्पा रोजच मनी बसवावा...
सजावट करावी विचारांची...
आणि रोषणाई मनातल्या प्रेमाची...
नैवेद्य दाखवावा सत्याचा...
फुले दया,क्षमा, शांतीची...
अन् आरती सुंदर शब्दांची...
रोजच क्रोध, मोह,मत्सर विसर्जित
व्हावा...
हिशोब आजच्या भावनांचा,
आजच पूर्ण व्हावा..
असा बाप्पा रोजच का न पुजावा?
रोज नव्याने बाप्पा मनी असा जागवावा...
अन् उत्सव आयुष्याचा रोज नव्याने साजरा व्हावा...
🙏🌹"गणपती बाप्पा मोरया"🌹🙏
No comments:
Post a Comment