मानसिक आरोग्य शिक्षणाच्या पुनर्रचनेवर वैद्यकीय परिषदेतील परिसंवादात चर्चा
मुंबई, दि. २८- आधुनिक काळातील मानसिक आरोग्याच्या वाढत्या गरजा लक्षात घेता “आधुनिक काळातील प्रॅक्टिससाठी मानसिक आरोग्य शिक्षणाचे पुनर्रचना करणे, नैतिक आणि संदर्भाधारित व्यावसायिक घडवणे” या विषयावर आयोजित सत्रात तज्ज्ञांनी मानसिक आरोग्य क्षेत्रात व्यापक सुधारणा करण्याची गरज अधोरेखित केली. जिओ वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे आयोजीत दोन दिवसीय वैद्यकीय परिषदेत विविध परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.
या सत्रात NIMHANS च्या क्लिनिकल सायकोलॉजी विभागाच्या प्रा. पूर्णिमा भोला, क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ तसेच न्यूरोडायव्हर्जंट मुलाचे पालक डॉ. राधिका बापट आणि ऑक्युपेशनल थेरपिस्ट सुश्री इशा सोनी यांनी सहभाग घेतला. सत्राचे समन्वयन सौरभ द्विवेदी यांनी केले.