Monday, 30 March 2026

मानसिक आरोग्य शिक्षणाच्या पुनर्रचनेवर वैद्यकीय परिषदेतील परिसंवादात चर्चा

 मानसिक आरोग्य शिक्षणाच्या पुनर्रचनेवर वैद्यकीय परिषदेतील परिसंवादात चर्चा

मुंबई, दि. २८- आधुनिक काळातील मानसिक आरोग्याच्या वाढत्या गरजा लक्षात घेता आधुनिक काळातील प्रॅक्टिससाठी मानसिक आरोग्य शिक्षणाचे पुनर्रचना करणे, नैतिक आणि संदर्भाधारित व्यावसायिक घडवणे” या विषयावर आयोजित सत्रात तज्ज्ञांनी मानसिक आरोग्य क्षेत्रात व्यापक सुधारणा करण्याची गरज अधोरेखित केली. जिओ वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे आयोजीत दोन दिवसीय वैद्यकीय परिषदेत विविध परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.

या सत्रात NIMHANS च्या क्लिनिकल सायकोलॉजी विभागाच्या प्रा. पूर्णिमा भोला, क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ तसेच न्यूरोडायव्हर्जंट मुलाचे पालक डॉ. राधिका बापट आणि ऑक्युपेशनल थेरपिस्ट सुश्री इशा सोनी यांनी सहभाग घेतला. सत्राचे समन्वयन सौरभ द्विवेदी यांनी केले.

त्वचारोग क्षेत्रातील AI चा वापर स्पष्ट करताना भारतीय संदर्भातील मजबूत डेटा तयार करण्याची गरज

 एआर इंटरनॅशनल च्या संस्थापक डॉ. अलका मेहता  यांनी त्वचारोग क्षेत्रातील AI चा वापर स्पष्ट करताना भारतीय संदर्भातील मजबूत डेटा तयार करण्याची गरज व्यक्त केली. चुकीच्या निदानाचे धोके लक्षात घेता AI चा वापर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करावा, असे त्यांनी नमूद केले.

शुगरफिट चे सह-संस्थापक शिवतोष कुमार  यांनी लाइफस्टाइल आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी डेटा-आधारित कृतीशील उपायांची आवश्यकता अधोरेखित केली. त्यांनी सांगितले की, फक्त डेटा गोळा करून उपयोग नाही, तर त्यावर आधारित योग्य जीवनशैली बदल आवश्यक आहेत.

क्षेत्रात तंत्रज्ञान, योग, ध्यान आणि पारंपरिक ज्ञान यांचे एकत्रीकरण आवश्यक

 हॉलिस्टिक वेलनेसचे अध्यक्ष, संस्थापक व कोच डॉ. मिकी मेहता  यांनी सांगितले की, आरोग्य क्षेत्रात तंत्रज्ञान, योग, ध्यान आणि पारंपरिक ज्ञान यांचे एकत्रीकरण आवश्यक आहे. मानवी अंतर्ज्ञान आणि जैविक प्रणालींचे महत्त्व कायम राहणार असून AI ही फक्त सहाय्यक साधन आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

हेल्थ इनोव्हेशन एक्स्चेंज चे सह-संस्थापक प्रदीप कक्कतील यांनी आरोग्य क्षेत्रातील वाढत्या बाजारपेठेचा आणि AI, वेअरेबल्स व डेटा-आधारित उपाययोजनांचा वेगाने होत असलेला विकास अधोरेखित केला. शासन खाजगी क्षेत्र, गुंतवणूकदार आणि तज्ज्ञ यांनी एकत्र येऊन दीर्घकालीन भांडवल व शाश्वत मॉडेल तयार करणे गरजेचे आहे. केवळ नफा किंवा युनिकॉर्न होण्यावर लक्ष केंद्रित न करता सर्वसामान्यांसाठी उपयुक्त उपाय विकसित करणे महत्त्वाचे आहे.

            हार्वर्ड मेडिकल स्कूल च्या शस्त्रक्रिया विषयातील व्याख्याता, कॅनोमिक्स इंक च्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) व सह-संस्थापक डॉ लीना प्रधान यांनी आयुर्वेदिक वनस्पती आणि घटकांच्या वैज्ञानिक पडताळणीवर भर दिला. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने वनस्पतींचा मानवी शरीरावर होणारा परिणाम जनुकीय (gene level) पातळीवर समजून घेणे आणि ग्राहकांना वैज्ञानिक माहिती देणे अत्यंत आवश्यक असे त्या म्हणाल्या.

एआय, डेटा आणि पारंपरिक ज्ञानाच्या समन्वयातून प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेला नवी दिशा

 एआय, डेटा आणि पारंपरिक ज्ञानाच्या समन्वयातून प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेला नवी दिशा

 

मुंबई दि.  - 'वेलनेस आणि प्रतिबंधात्मक वैद्यकशास्त्रातील उदयोन्मुख तंत्रज्ञान कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित अचूक वेलनेसद्वारे अधिक लवकर आणि स्मार्ट प्रतिबंध' या विषयावर वैद्यकीय परिषद २०२६ मध्ये परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. पल्स वैद्यकीय दोन परिषदेचे जिओ वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.

या सत्रात तज्ज्ञांनी स्पष्ट केले की, आरोग्य क्षेत्रात AI, डेटा आणि पारंपरिक ज्ञान यांचे एकत्रित व जबाबदारीने वापर केल्यास अधिक प्रभावी, अचूक आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा विकसित होऊ शकते. ज्ज्ञांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), डेटा आणि पारंपरिक वैद्यकीय ज्ञान यांच्या एकत्रित वापरावर भर दिला.

भारतामध्ये तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत असून

 नागपूर डेंटल कॉलेजचे माजी अधिष्ठाता डॉ. विनय हजारे यांनी भारतामध्ये तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत असून, तंबाखू व निकोटीनचे सेवन हे यामागील प्रमुख कारण असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. क्रीडा क्षेत्रातून व्यसनमुक्तीचा संदेश देण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.

महाराष्ट्रात क्रीडा वैद्यक आणि दंतचिकित्सा यांचा समन्वय साधून एक प्रभावी व सर्वसमावेशक मॉडेल उभारण्याबाबत सत्रात चर्चा झाली. हे मॉडेल केवळ खेळाडूंसाठीच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठीही उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. या सत्रात विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी सहभाग नोंदवून आपले अनुभव मांडले. कार्यक्रमाचे समन्वयन इंडियन अकॅडमी ऑफ स्पोर्ट्स डेंटिस्ट्रीचे संचालक डॉ. अतुल सुर्वे आणि नेशनल हेल्थ सर्विसचे वरिष्ठ सल्लागार अस्थीरोग शल्य चिकित्सक डॉ रवी बेडगे यांनी केले.

00000

लहान वयापासून माउथ गार्डचा वापर, नियमित तपासणी आणि योग्य दातांची जुळणी (bite) यामुळे खेळाडूंची कामगिरी सुधार

 दंतचिकित्सेच्या संदर्भात बोलताना, डॉ. संदेश मयेकर ओरल केयर सेंटरचे दंतचिकित्सक डॉ. संदेश मयेकर लहान वयापासून माउथ गार्डचा वापर, नियमित तपासणी आणि योग्य दातांची जुळणी (bite) यामुळे खेळाडूंची कामगिरी सुधारते, असे सांगण्यात आले. तसेच,   तोंडातील आजारांचा परिणाम हृदयविकार, मधुमेह, किडनी विकार यांसारख्या गंभीर आजारांवर होऊ शकतो, त्यामुळे दंत आरोग्याला आरोग्य व्यवस्थेत समान महत्त्व देणे गरजेचे असल्याचे नमूद करण्यात आले.

क्रीडा व व्यायाम वैद्यकशास्त्राचा विकास हा दीर्घकालीन नियोजन, शासकीय पाठबळ आणि संरचित प्रशिक्षण व्यवस्थेवर आधारित

 इंग्लंड क्रिकेट बोर्ड च्या सल्लागार डॉ. अनिता बिस्वास यांनी जागतिक अनुभवांच्या आधारे सांगितले की, क्रीडा व व्यायाम वैद्यकशास्त्राचा विकास हा दीर्घकालीन नियोजन, शासकीय पाठबळ आणि संरचित प्रशिक्षण व्यवस्थेवर आधारित असतो. विशेषतः २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर उभारलेल्या एकात्मिक प्रणालीमुळे क्रीडा क्षेत्रात मोठे यश मिळाल्याचे उदाहरण देण्यात आले.

यावेळी युनिव्हर्सिटी ऑफ लीड्स चे सल्लागार डॉ क्रेग झालेकी यांनी यूकेमधील प्रशिक्षण पद्धतीचा उल्लेख करताना क्रीडा वैद्यकशास्त्रातील तज्ज्ञ होण्यासाठी ८ ते ९ वर्षांचे सखोल प्रशिक्षण आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले. यामध्ये वैद्यकीय शिक्षण, विविध विभागांतील अनुभव व विशेष परीक्षा यांचा समावेश असतो.

Featured post

Lakshvedhi