Wednesday, 18 March 2026

परवानगीशिवाय हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये मद्य आढळल्यास परवाने रद्द

 परवानगीशिवाय हॉटेलरेस्टॉरंटमध्ये मद्य आढळल्यास परवाने रद्द

-         गृह राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर

 

मुंबईदि. १८ :  परवानगीशिवाय हॉटेल व रेस्टॉरंटमध्ये मद्य आढळल्यास संबंधितांचे परवाने रद्द करण्यात येतील. अशी घटना ज्या क्षेत्रामध्ये घडेल त्या क्षेत्रातील पोलीस व प्रशासनातील अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावरही आवश्यक  कारवाई करण्यात येईलअसे गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधान परिषदेत सांगितले.

सदस्य दादाराव केचे यांनी आर्वी (जि.वर्धा) तालुक्यातील हॉटेलमधील अवैध व्यवसायबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य शशिकांत शिंदे यांनीही सहभाग घेतला.

गृह राज्यमंत्री डॉ.भोयर म्हणालेआर्वी (जि.वर्धा) तालुक्यातील हॉटेलमधील अवैध व्यवसाय तक्रारींच्या अनुषंगाने सखोल चौकशी करण्यात आली असून कोणताही गैरप्रकार आढळला नसल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. तरीही लोकप्रतिनिधींच्या सूचनांची पुन्हा दखल घेत या प्रकरणाची पुन्हा एकदा चौकशी करण्यात येईल. ही चौकशी अतिरिक्त पोलिस अधीक्षकांमार्फत केली जाईल. या चौकशीत कोणीही दोषी आढळल्यास  त्यांच्यावर कारवाई केली जाईलअशी ग्वाही गृह राज्यमंत्री डॉ.भोयर यांनी दिली.

पर्यावरण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या उद्योगांना नोटिस

 पर्यावरण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या उद्योगांना नोटिस

-मंत्री पंकजा मुंडे

 

मुंबईदि. १८ : चंद्रपूर जिल्ह्यात वाढत्या औद्योगिक प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर विविध उद्योगांवर कारवाई करण्यात आली आहे. पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन करणाऱ्या उद्योगांना नोटिसा बजावण्यात आल्या असल्याची माहिती पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

याबाबत सदस्य अभिजीत वंजारी यांनी प्रश्न उपस्थित केला.

मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्याप्रदूषण कमी करण्यासाठी तांत्रिक सुधारणाधूळ नियंत्रणस्वच्छता उपाययोजना आणि पर्यावरणपूरक पद्धतींचा अवलंब करण्यावर शासनाचा भर आहे. चंद्रपूरमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मी स्वतः भेट देणार असल्याचेही मंत्री मुंडे यांनी स्पष्ट केले.

राज्यातील उद्योगांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत नियमित पाहणी करण्यात येत असूनपाहणीदरम्यान आढळलेल्या त्रुटींवर नियमांनुसार कडक कारवाई केली जाते.

मंडळाकडून उद्योगांची वेळोवेळी तपासणी करून पर्यावरणीय नियमांचे पालन होत आहे की नाहीयाची पडताळणी केली जाते. नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित उद्योगांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाते. तसेच आवश्यकतेनुसार अंतरिम निर्देश व प्रस्तावित निर्देश जारी करण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

0000

सातारा जिल्ह्यात गुन्हेगारीच्या प्रमाणात घट; पोलीस प्रशासन सजग, सतर्क

 सातारा जिल्ह्यात गुन्हेगारीच्या प्रमाणात घटपोलीस प्रशासन सजगसतर्क

-         गृह राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर

 

मुंबईदि. १८ : सातारा जिल्ह्यात गंभीर गुन्हेगारीच्या प्रमाणात घट होत आहे. सन २०२४ च्या तुलनेत २०२५ मध्ये  गंभीर गुन्ह्यांमध्ये घट झाली आहे. गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन सजग असून या विषयी सतर्कतेने काम करत असल्याचे गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधानपरिषदेत सांगितले.

सदस्य शशिकांत शिंदे यांनी सातारा जिल्ह्यातील गुन्हेगारीतील वाढ या विषयी विधान परिषदेत उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य सचिन अहिर यांनी उपप्रश्न विचारत सहभाग घेतला.

गृह राज्यमंत्री डॉ.भोयर म्हणाले,  सातारा  शहर व जिल्ह्यात सन २०२४ मध्ये ३१८ गंभीर गुन्ह्यांची नोंद झाली होती तर २०२५ मध्ये १९४ गंभीर गुन्ह्यांची नोंद झाली आहे. सातारा शहरात २२ जानेवारी २०२६  रोजी घडलेल्या हत्या घटना प्रकरणातील १५ आरोपींपैकी ११ जणांना अटक करण्यात आली असून उर्वरित चार आरोपींचा शोध सुरू आहे.

सातारा जिल्ह्यातील ज्या पोलीस अधिकाऱ्यांविरोधात  तक्रार करण्यात आली होती त्या तक्रारींची पोलीस महासंचालक कार्यालयामार्फत चौकशी करण्यात आली होती. तथापिविधिमंडळ सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार पुन्हा चौकशी सुरू करण्यात आली आहे. या चौकशीत जे अधिकारी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईलअसेही गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले.

केईएम, नायर, कूपरमध्ये जैववैद्यकीय कचऱ्याचे योग्य विभाजन

 केईएमनायरकूपरमध्ये जैववैद्यकीय कचऱ्याचे योग्य विभाजन

-         पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे

मुंबईदि.१८ : मुंबईतील केईएमनायर आणि कूपर रुग्णालयात जैववैद्यकीय कचऱ्याचे योग्य विभाजन (सेग्रिगेशन) व प्रक्रिया यावर भर देण्यात आला असून या रुग्णालयात सेग्रिगेशनची प्रक्रिया व्यवस्थित सुरू असल्याची माहिती पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेत दिली.

सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी या विषयी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला होता.

पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्याशासकीय रुग्णालयांमध्ये पर्यावरणपूरक आणि आधुनिक सांडपाणी व्यवस्थापन प्रणाली उभारण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. मुंबईतील प्रमुख शासकीय रुग्णालयांमध्ये सांडपाणी व्यवस्थापन व पर्यावरणीय निकषांचे पालन होण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जात आहे. 

महापालिकेच्या रुग्णालयात ईटीपीएसटीपी प्रकल उभारणीबाबत प्रशासनाकडून सर्वेक्षण सुरू आहे. सर्वेक्षणाच्या अहवालानंतर याबाबत पुढील निर्णय घेतला जाईल असेही पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी या प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

टाकळी ढोकेश्वर सौर ऊर्जा प्रकल्पामुळे २,०३३ शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा

 टाकळी ढोकेश्वर सौर ऊर्जा प्रकल्पामुळे २,०३३ शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा

-         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबईदि.१८ : टाकळी ढोकेश्वर (ता. पारनेर जि. अहिल्यानगर) येथे सौर ऊर्जा प्रकल्पासाठी टाकण्यात आलेल्या लाईनचा लाभ या परिसरातील शेतकऱ्यांना होत असून या प्रकल्पामुळे २०३३ शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा उपलब्ध होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासावेळी दिली.

सदस्य सत्यजित तांबे यांनी या विषयी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला होता.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेपारेषणच्या लाईन्सखाली शेती करणे अवघड ठरत असल्याने संबंधित शेतकऱ्यांची परवानगी घेऊन त्यांना जोखमीच्या मोबदल्यापोटी सुमारे ३० टक्क्यांपर्यंत भरपाई दिली जात आहे. वितरण लाईन्स बाबत मात्र वेगळी तरतूद असून ही लाइन टाकताना स्वतंत्र परवानगीची आवश्यकता नसल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेपारगाव परिसरातील जमिनीबाबतही प्रशासनास सूचना देण्यात येत असून आवश्यकतेपेक्षा अधिक घेतलेली जमीन परत देण्याबाबत आदेश दिले जातील. तसेच सामाजिक वनीकरण विभाग आणि ग्रामपंचायत यांच्या समन्वयातून या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबविण्यात येईल.

आराजी वर्ग २ च्या जमिनींचे वर्ग १ मध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय

 आराजी वर्ग २ च्या जमिनींचे वर्ग १ मध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय

-       मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबईदि. १८ :  आराजी असलेल्या शेत जमिनीबाबत शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी आराजी असलेली वर्ग २ ची जमीन वर्ग १ मध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासावेळी दिली.

सदस्य सचिन अहिर यांनी या विषयी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला होता.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,  मौजा भिवी ( ता. भिवापूर जि.नागपूर) येथील सर्वोदय सहकारी सामुदायिक शेती सोसायटीच्या नावावर असलेल्या आराजी जमिनीचे वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये रूपांतरण  व्यवहार प्रकरण २०२२ मध्ये घडले. या प्रकरणाची तक्रार २०२५ मध्ये करण्यात आली.  तक्रारीनुसार या व्यवहाराची चौकशी करण्यात येत असून कायदेशीर मार्गाने रक्कम वसूल करून संबंधित शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

या प्रश्नाच्या उत्तरात अधिक माहिती देताना गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणालेनागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यात आराजी असलेली शेत जमीन  वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये रूपांतरित करणे या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेमार्फत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  न्यायालयात आरोपपत्रही दाखल करण्यात आले असून सुमारे १३ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे दिसत आहे. या  प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. अशा प्रकारे शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर  कारवाई करण्यात येईलअसेही गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले.

महावितरण कामांतील गैरप्रकारांची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात येणार

 महावितरण कामांतील गैरप्रकारांची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत

 चौकशी करण्यात येणार

-       मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबईदि.18 : नाशिक येथे महावितरणच्या कामांमध्ये तसेच खासगी कंत्राटदारांच्या संदर्भात गैरप्रकार झाल्याच्या तक्रारींची दखल घेण्यात आली असूनयाप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

याबाबत सदस्य अनिल परब यांनी प्रश्न उपस्थित केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेमहावितरणची अधिकृत कामे आणि खासगी कंत्राटदारांकडून केली जाणारी कामे यामध्ये स्पष्ट फरक आहे. संबंधित कंत्राटदार महावितरणच्या यादीत नाही तसेच त्याला महावितरणकडून कोणतेही अधिकृत काम देण्यात आलेले नाही. मात्रखासगी कामांच्या संदर्भात पदाचा गैरवापर करून कामे मिळवून देणे किंवा परवानग्यांमध्ये अनियमितता होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. विजेच्या चोरीसंदर्भात प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली असूनपुढेही गरज भासल्यास गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई केली जाईल असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

Featured post

Lakshvedhi