Monday, 16 February 2026

सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचा पुढाकार

 सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचा पुढाकार

            १ ते १५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत राबविण्यात आलेल्या या अभियानाचे मुख्य घोषवाक्य तेल आणि वायू वाचवाहरित ऊर्जेचा स्वीकार करा’ असे होते. जनसामान्यांमध्ये इंधन बचतीचा संदेश पोहोचवणेपरकीय चलनाची बचत करणे आणि हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करून निसर्गाचे रक्षण करणे. या अभियानात बीपीसीएल, एचपीसीएल, आयओसी आणि गेल इंडिया यासारख्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांनी पुढाकार घेतला.

ऊर्जा सुरक्षा आणि पर्यावरण रक्षण ही लोकचळवळ व्हावी

 ऊर्जा सुरक्षा आणि पर्यावरण रक्षण ही लोकचळवळ व्हावी

मंत्री भरत गोगावले

·         'सक्षम २०२५-२६अभियानाचा समारोप

 

            मुंबईदि. १६ : इंधनाची बचत ही केवळ गरज नसून ती एक देशसेवा आहे. ऊर्जा सुरक्षा आणि पर्यावरण रक्षण ही आता एक लोकचळवळ झाली पाहिजेअसे प्रतिपादन फलोत्पादनरोजगार हमी योजना आणि खार जमीन विकास मंत्री भरत गोगावले यांनी केले.

केंद्र शासनाच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली देशभर राबविण्यात आलेल्या 'संरक्षण क्षमता महोत्सव (सक्षम) २०२५-२६या महाराष्ट्र राज्य स्तरीय अभियानाचा सांगता समारंभ यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडलात्यावेळी ते बोलत होते.

मंत्री गोगावले म्हणाले कीवाढते प्रदूषण ही जागतिक समस्या असून त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी नैसर्गिक आणि हरित इंधनाचा वापर वाढवणे आवश्यक आहे. कच्च्या तेलाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करून देशाचे परकीय चलन वाचवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने इंधन बचतीचे कर्तव्य पार पाडावे.

राज्यातील ७५ पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पर्यटकांसाठी आधुनिक मुलभूत

 पर्यटनमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, राज्यातील ७५ पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पर्यटकांसाठी आधुनिक मुलभूत सोयी-सुविधायुक्त नमो पर्यटन केंद्र व माहिती सुविधा केंद्र स्थापन करण्याबाबत मान्यता देण्यात आली असून पहिल्या टप्प्यातील प्रतापगड, शिवनेरी, साल्हेर व रायगड येथील कामे गतीने करावीत. राज्यात नमो पर्यटन कौशल्य कार्यक्रमासाठी ७५०० प्रशिक्षणार्थ्यांपैकी प्रथम २५०० व उर्वरित ५००० प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण देण्याबाबतच्या कामाला गती देण्यात यावी, असे निर्देशही पर्यटनमंत्री देसाई यांनी दिले.

                                                                   

पर्यटन विभागातंर्गत विविध महोत्सवांचे आयोजन करण्यात

 पर्यटनमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, पर्यटन विभागातंर्गत विविध महोत्सवांचे आयोजन करण्यात येत आहे. आगामी कालावधीत डोंगरी महोत्सवाचे एप्रिल महिन्यात नियोजन करावे. या महोत्सवात स्थानिक संस्कृतीचे दर्शन घडविणारे कार्यक्रम, नामांकित कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम, कृषी पर्यटन, ‘आई’ पर्यटन धोरणावर केंद्रित स्थानिक महिला सशक्तीकरण कार्यक्रमांचे आयोजन, गड-किल्ले दर्शन, विविध साहसी उपक्रम, पॅराग्लायडींग, पॅरामोटरिंग, रॉक क्लायबींग, सीप्लॅन राईड हे उपक्रम आयोजित करण्यात यावेत. स्थानिक ठिकाणी पर्यटनाला चालना देण्यासाठी हे उपक्रम असतील असे पहावे, असे निर्देश त्यांनी दिले.

पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटनस्थळांची प्रचार प्रसिध्दी करावी

 पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटनस्थळांची प्रचार प्रसिध्दी करावी

-         पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

·         यंदा डोंगरी महोत्सव एप्रिल मध्ये

 

मुंबईदि. १६ : राज्यातील पर्यटनस्थळांची प्रचार प्रसिध्दी होण्यासाठी पर्यटन विभागाने काटेकोरपणे प्रसिद्धीचे नियोजन करावे. राज्यात, देशात व आंतरराष्ट्रीय स्तरावर राज्यातील पर्यटनस्थळांची प्रसिध्दी प्रभावीपणे करावी. डोंगरी महोत्सवाचे एप्रिल मध्ये आयोजन करावे, असे निर्देश पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

            सह्याद्री अतिथीगृह येथे पर्यटन विभागाच्या विविध विषयाच्या अनुषंगाने बैठक झाली. त्यावेळी पर्यटनमंत्री शंभूराज देसाई बोलत होते. यावेळी पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे,पर्यटन संचालक डॉ.बी.एन.पाटीलमहाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे उपस्थित होते.

अधिवेशन कालावधीत अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी व कामकाज सुरळीत पार पडावे यासाठी

 अधिवेशन कालावधीत अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी व कामकाज सुरळीत पार पडावे यासाठी कार्यालयीन अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रवेशासाठी पर्यायी प्रवेशद्वाराची व्यवस्था करण्यात आली असून प्रवेश नियंत्रण कडक ठेवावेवाहनतळ व्यवस्था उचित असावी तसेच सुरक्षास्वच्छता व आपत्कालीन सेवा पूर्णतः सज्ज ठेवाव्यातअसे स्पष्ट निर्देश सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले.

 

विधानभवन परिसरात शिस्त आणि सुरक्षेला प्राधान्य; गर्दी नियंत्रणासाठी सुरक्षा यंत्रणेने नियोजन करावे

 विधानभवन परिसरात शिस्त आणि सुरक्षेला प्राधान्य;

गर्दी नियंत्रणासाठी सुरक्षा यंत्रणेने नियोजन करावे

- विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे

 अर्थसंकल्पीय अधिवेशन 2026 पूर्वतयारीसंदर्भात बैठक

 

मुंबईदि. १६ : आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन 2026 सुरळीतसुरक्षित व नियोजनबद्ध पद्धतीने पार पडावेया दृष्टीने सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने कामकाज करावे. विधानभवन परिसरात शिस्त आणि सुरक्षेला प्राधान्य देण्यात येऊन गर्दी नियंत्रित व्हावी यादृष्टीने सुरक्षा यंत्रणेने नियोजन करावेअसे निर्देश विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले.

 

विधानभवनयेथे 2026 च्या पहिल्या (अर्थसंकल्पीय) अधिवेशनाच्या अनुषंगाने पूर्वतयारीसंदर्भात बैठक सभापती प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. अधिवेशन काळात सुव्यवस्था आणि सुरक्षितता याबाबत  दक्षता घेण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.

 

बैठकीत सुरक्षा व्यवस्थेच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या उपाययोजनावाहनतळ व्यवस्थाअधिवेशन कालावधीतील अनुभवी डॉक्टरांची उपलब्धतावैद्यकीय सुविधाउपहारगृहामार्फत पुरविण्यात येणाऱ्या सेवांचा दर्जाउपहारगृहातील स्वच्छता व खाद्यपदार्थांची तपासणीविधानभवन परिसरातील स्वच्छताघनकचरा व्यवस्थापनअखंडित पाणीपुरवठादूरध्वनी व इंटरनेट सुविधारेल्वे आरक्षण तसेच आपत्कालीन व्यवस्था या सर्व विषयांसंदर्भात सविस्तर आढावा घेण्यात आला

Featured post

Lakshvedhi