Friday, 31 October 2025

शासकीय रुग्णालयातील मृत्यूदर कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजना करा

 शासकीय रुग्णालयातील मृत्यूदर कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजना करा

-         वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबईदि. 30 : राज्यातील शासकीय रुग्णालयातील मृत्यूदर कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. सेंट जॉर्ज रुग्णालयात मृत्यूदर वाढीची वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ यांनी गांभीर्याने दखल घेऊन याविषयी तातडीच्या बैठकीचे आयोजन केले. यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमारसंचालक डॉ. अजय चंदनवालेजे.जे. रुग्णालय आणि सेंट जॉर्ज रुग्णालयाचे अधिष्ठाता आणि वैद्यकीय अधीक्षक आदींसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले कीशासकीय रुग्णालयातील मृत्यूदर कमी करण्यासाठी रुग्णालयात वैद्यकीय सेवेत तत्काळ सुधारणा घडवून आणण्यासाठी आवश्यक मनुष्यबळनिधी आणि उपकरणांची उपलब्धता प्राधान्याने सुनिश्चित करावी. अतीदक्षता विभागातील खाटांची संख्यामनुष्यबळ वाढविणेऔषधे व आधुनिक उपकरणे पुरविणे आणि दीर्घकालीन सुधारणा आराखडा तयार करण्याचेही त्यांनी निर्देश दिले. अनेक रुग्ण खासगी रुग्णालयातून शेवटच्या टप्प्यात शासकीय रुग्णालयात स्थलांतरित होत असल्यानेही आयसीयूतील मृत्यूदर तुलनेने अधिक दिसत असल्याचे स्पष्ट करण्यात आले असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

२०२२ ते २०२५ दरम्यान एकूण मृत्यूदरात सातत्याने घट होत आहे. २०२२ मध्ये २०४० रुग्ण तर २०२५ मध्ये ७४०७ रुग्ण यशस्वीरीत्या उपचारानंतर घरी परतले.

यासंदर्भात वैद्यकीय शिक्षण विभागाने तातडीने कार्यवाही करत पारदर्शक चौकशी आणि मजबुत सुधारणा आराखडा आखला आहे. रुग्णालयातील सेवांची गुणवत्ता वाढण्यासाठी ठोस उपाययोजना अमलात आणण्यात येत आहेत.

तत्काळ उपाययोजना

१. ‘आयसीयू’मध्ये आवश्यक तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी व महत्त्वाची औषधे तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश

२. अतिगंभीर रुग्णांना आवश्यकतेनुसार सर जे.जे. रुग्णालयात सुसज्ज रुग्णवाहिकेतून स्थलांतर करण्याच्या सूचना

दीर्घकालीन उपाययोजना

१. सेंट जॉर्जेस रुग्णालयात मनुष्यबळऔषधसाठा आणि आयसीयू बेड्स वाढवण्याचे आदेश

२. मुंबईसह राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचा सखोल आढावा घेऊन सेवा गुणवत्ता उंचावणे

३. सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचा मृत्यूदराचा मासिक आढावा घेण्याचा निर्णय

४. आवश्यक निधीमानव संसाधन व औषध पुरवठा शासनातर्फे प्राधान्याने उपलब्ध करून देण्याची हमी यासारख्या उपाययोजना करण्यात येत असल्याची माहितीही वैद्यकीय शिक्षण विभागाने दिली आहे.

आदिवासी विकास विभाग व असुदे फाऊंडेशनमध्ये सामंजस्य करार‘industryconnect.app’

 आदिवासी विकास विभाग व असुदे फाऊंडेशनमध्ये सामंजस्य करार

मुंबईदि. ३० : आदिवासी विद्यार्थ्यांच्या भविष्याला आकार देण्यासाठी आदिवासी विकास विभागाने असुदे फाऊंडेशनसोबत सामंजस्य करार केला. या कराराअंतर्गत industryconnect.app’ या तंत्रज्ञान आधारित प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अनुभवाधारित करिअर मार्गदर्शन उपक्रम ठाणे अपर आयुक्त कार्यालय अंतर्गत येणाऱ्या १११ शासकीय आश्रमशाळांमध्ये राबवण्यात येणार आहे. हा उपक्रम पुढील तीन वर्षे चालणार असूनइयत्ता नववी ते बारावीतील सुमारे २० हजार विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार असल्याचे अपर आयुक्त गोपीचंद कदम यांनी सांगितले.

 आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे आणि आयुक्त लीना बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली हा सामंजस्य करार केला असून यावेळी असुदे फाऊंडेशनचे व्यंकटेश खारगेसहाय्यक प्रकल्प अधिकारी लोणारीयूएनडीपीच्या अमृता भालेरावतसेच असुदे फाऊंडेशनचे अनमोल सब्बानीस्नेहल यादवसिद्धांत जगतापअपर्णा शाम उपस्थित होते.

करिअर मार्गदर्शन उपक्रमाची सुरुवात ठाणेपालघररायगड आणि पुणे या चार जिल्ह्यांतील आश्रमशाळांमधून होणार आहे. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्राशी जोडण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थी केवळ वर्गखोलीपुरते मर्यादित राहणार नाहीततर त्यांना प्रत्यक्ष उद्योगभेटीमेंटर्सशी संवाद आणि वास्तवाधारित शिक्षणाची संधी मिळेल. या प्लॅटफॉर्मद्वारे शाळा स्थानिक उद्योग क्षेत्राशी जोडल्या जाणार असूनविद्यार्थ्यांना करिअरच्या विविध पर्यायांबाबत तसेच उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभवउच्च शिक्षणाच्या संधी आणि रोजगार तयारीसाठी मार्गदर्शन मिळेल अशी माहिती यावेळी देण्यात आली

क्रीडाशौर्याबद्दल रौप्यकन्या शौर्याचे क्रीडामंत्र्यांकडून कौतुक आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत हर्डल्स शर्यतीत मिळवले

 क्रीडाशौर्याबद्दल रौप्यकन्या शौर्याचे क्रीडामंत्र्यांकडून कौतुक

आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत हर्डल्स शर्यतीत मिळवले

अंबुरे कुटुंबीयांशी फोनवरून संवाद साधत केले अभिनंदन

मुंबईदि. ३० :  बहारीन येथे नुकत्याच पार पडलेल्या तिसऱ्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत ठाणे जिल्ह्याची  शौर्या अंबुरे हिने उल्लेखनीय कामगिरी करत देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. तिने 100 मीटर हर्डल्स शर्यतीत 13.73 सेकंदांची वेळ नोंदवत रौप्यपदक पटकावले.

            क्रीडा मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी शौर्या अंबुरे हिच्या या यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन केले असून पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अंबुरे कुटुंबियांशी संवाद साधत त्यांचेही अभिनंदन केले.

ठाण्याची शौर्या अंबुरे हिने महाराष्ट्राचा क्रीडागौरव वाढविला आहे. मुंबई विमानतळावर आगमनानंतर क्रीडा मंत्री ॲड.कोकाटे यांच्या निर्देशानुसार क्रीडा विभागाच्या वतीने तिचे उत्साहात स्वागत करण्यात आले.

महाराष्ट्र सागरी मंडळाचे २६० कोटींचे सामंजस्य करार हरित बं

 महाराष्ट्र सागरी मंडळाचे २६० कोटींचे सामंजस्य करार

हरित बंदर विकासा बाबत डेन्मार्कच्या कंपनीसोबत चर्चा

 

मुंबईदि. ३० : नेस्को गोरेगाव येथे सुरू असलेल्या इंडिया मेरीटाईम वीक मध्ये मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत २६० कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले.

महाराष्ट्र सागरी मंडळाचे हे करार इचइंडिया आणि नॉलेज मरीन या कंपन्यांसोबत करण्यात आले. या करारांमध्ये यामुळे हरित टगबोटीसाठी बॅटरी निर्मिती आणि जहाज बांधणी व दुरुस्ती, बंदर उभारणी या प्रकल्पांचा समावेश आहे.

यावेळी बंदरे मंत्री नितेश राणे यांनी ग्रीन जहाज बांधणी आणि बंदर उभारणीविषयी डेन्मार्क येथील कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत सविस्तर चर्चा केली. तसेच करंजादिघी बंदरांच्या विकासाविषयीही गुंतवणुकीस उत्सुक असलेल्या कंपन्यांसोबत चर्चा केली.

यावेळी बंदर विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठीमहाराष्ट्र सागरी महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी प्रदीपमुख्य बंदर अधिकारी कॅप्टन खारा यांच्यासह संबंधित अधिकारी व कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

इंडिया मेरीटाईम वीक २०२५ या कार्यक्रमातील मेरिटाईम एक्सलन्स आचीव्हर्स-२०२५ एक्झीबेशन ॲवार्ड या विशेष सत्रामध्ये महाराष्ट्र राज्याला शोकेस डायव्हर्सिटी अँड इम्पॅक्ट या कॅटेगिरीमध्ये पुरस्कार प्राप्त झाला.

ही गौरवपूर्ण कामगिरी महाराष्ट्र राज्यासाठी अत्यंत अभिमानास्पद असूनगेल्या दहा वर्षांत महाराष्ट्र शासनाला इंडिया मेरीटाईम वीक मध्ये मिळालेला हा पहिला पुरस्कार आहे. राज्य शासनाने सागरी क्षेत्रात केलेले विविध उपक्रमनाविन्यपूर्ण प्रकल्प आणि प्रभावी सादरीकरण याची दखल या पुरस्काराद्वारे घेण्यात आली असल्याची माहिती यावेळी विभागामार्फत देण्यात आली.

सहकारी बँकेमुळे तळागाळातील नागरिकांचा विकास होतो. शेतकरी व लघु उद्योगांना

 मुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस म्हणालेसहकारी बँकेमुळे तळागाळातील नागरिकांचा विकास होतो. शेतकरी व लघु उद्योगांना त्वरित कर्ज व बचत सुविधा मिळते. ज्यांना व्यवसायउद्योग स्थापन करावयाचा आहेत्यांना सुरुवातीला कर्ज लागते. त्यावेळी बँकेंचे प्रोत्साहन व सहकार्य महत्त्वपूर्ण ठरते. राज्यात सहकारी बँकांनी कालानुरुप बदल केले आहेत. त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकांच्या स्पर्धेत त्या उत्तम स्थान टिकवून आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सहकाराचे महत्व जाणून 'सहकारिता मंत्रालय स्थापन केले आहे. यामुळे सहकार क्षेत्रात मोठे बदल होत आहे .यातून 'सहकारातून समृद्धीकडेहा मार्ग आहे. गुणवत्तापूर्ण कार्य करून 'अभिनंदन  सहकारी बँकसहकार क्षेत्रात चांगले योगदान देत असल्याचे ते यावेळी म्हणाले.

            मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते बँकेचे संस्थापक हुकुमचंद डागा यांना शाल -श्रीफळ तसेच सन्मानचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले.

बँकेचे अध्यक्ष विजय बोथरा यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे संचालन प्राजक्ता चौधरी यांनी तर आभार संचालक मंडळाचे अध्यक्ष सुदर्शन गांग यांनी मानले.

 

सहकारी बँकेमुळे स्थानिक भांडवल निर्मिती व विकास

 सहकारी बँकेमुळे स्थानिक भांडवल निर्मिती व विकास

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

अमरावतीदि. ३०: ज्या ठिकाणी चांगल्या बँका निर्माण होतातत्या ठिकाणी आर्थिक सक्षमता वाढते. नव उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी या बँक महत्त्वपूर्ण ठरतात. सहकारी बँकेमुळे स्थानिक भांडवल निर्मिती व विकास साध्य होतोअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अमरावती येथील अभिनंदन अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे करण्यात आलेत्यावेळी ते बोलत होते. तत्पूर्वी त्यांनी 'अभिनंदन हाईट्सया इमारतीची प्रत्यक्ष पाहणी केली. नागरिकांच्या सुविधेसाठी स्थापन करण्यात आलेल्या अत्याधुनिक सेवा-सुविधेबाबत त्यांनी बँकेचे अभिनंदन केले.

स्मारक, संदर्भग्रंथाने रा. सू. गवईं यांच्या कार्याचा गौरव

 स्मारकसंदर्भग्रंथाने रा. सू. गवईं यांच्या कार्याचा गौरव

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

दिवंगत नेते रा. सू. (दादासाहेब) गवई स्मारकाचे उद्घाटन

अमरावतीदि. ३० : रा. सू. उपाख्य दादासाहेब गवई यांचे कार्य मार्गदर्शक ठरावेतसेच त्यांच्या कार्याची ओळख नव्या पिढीला व्हावीयासाठी स्मारक आणि सर्वंकष वाटचालीचा दस्तावेज तयार करण्यासाठी संदर्भग्रंथ प्रकाशित करण्याचा निर्णय शासनाने घेतला. या दोन्ही प्रकल्पातून त्यांच्या कार्याचा गौरव राज्य शासनाने केला आहेअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  केले.

अमरावती येथे राज्य शासनाने उभारलेल्या दिवंगत नेते रा. सू. गवई यांच्या स्मारकाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवारपालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेराज्यमंत्री डॉ. पंकज भोयरॲड. आशिष जयस्वालन्या. भूषण गवई यांच्या मातोश्री कमलताई गवईखासदार डॉ. अनिल बोंडेबळवंत वानखडेआमदार किरण सरनाईकसंजय खोडकेरवी राणासुलभा खोडकेप्रताप अडसडकेवलराम काळेप्रवीण तायडेराजेश वानखडेउमेश उर्फ चंदू यावलकरगजानन लवटेचरणसिंग ठाकूरचैनसूख संचेतीविभागीय आयुक्त श्वेता सिंघलजिल्हाधिकारी आशिष येरेकरमहानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा-चांडकमुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र आदी मान्यवर उपस्थित होते.

Featured post

Lakshvedhi