स्मारक, संदर्भग्रंथाने रा. सू. गवईं यांच्या कार्याचा गौरव
-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
दिवंगत नेते रा. सू. (दादासाहेब) गवई स्मारकाचे उद्घाटन
अमरावती, दि. ३० : रा. सू. उपाख्य दादासाहेब गवई यांचे कार्य मार्गदर्शक ठरावे, तसेच त्यांच्या कार्याची ओळख नव्या पिढीला व्हावी, यासाठी स्मारक आणि सर्वंकष वाटचालीचा दस्तावेज तयार करण्यासाठी संदर्भग्रंथ प्रकाशित करण्याचा निर्णय शासनाने घेतला. या दोन्ही प्रकल्पातून त्यांच्या कार्याचा गौरव राज्य शासनाने केला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
अमरावती येथे राज्य शासनाने उभारलेल्या दिवंगत नेते रा. सू. गवई यांच्या स्मारकाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, ॲड. आशिष जयस्वाल, न्या. भूषण गवई यांच्या मातोश्री कमलताई गवई, खासदार डॉ. अनिल बोंडे, बळवंत वानखडे, आमदार किरण सरनाईक, संजय खोडके, रवी राणा, सुलभा खोडके, प्रताप अडसड, केवलराम काळे, प्रवीण तायडे, राजेश वानखडे, उमेश उर्फ चंदू यावलकर, गजानन लवटे, चरणसिंग ठाकूर, चैनसूख संचेती, विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा-चांडक, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र आदी मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment