शेतकऱ्यांना 30 जूनपर्यंत कर्जमाफी
-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
मुंबई दि. 30 : - राज्यातील शेतकऱ्यांना 30 जून 2026 पूर्वी कर्जमाफीचा निर्णय घेणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रात्री येथे केली.
"कर्जमाफीच्या अनुषंगाने एक समिती आम्ही गठीत केली आहे. एप्रिलपर्यंत या समितीने शिफारस करायची आहेत. त्या आधारावर पुढची प्रक्रिया करून तीन महिन्यात म्हणजे 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफी करण्यात येईल" असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले.
No comments:
Post a Comment