Thursday, 30 April 2026

§ मिसिंग लिंकमुळे भारतातील पहिला एक्सप्रेस-वे आता अधिक वेगवान आणि सुरक्षित


महाराष्ट्र दिनी मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा


§ मिसिंग लिंकमुळे भारतातील पहिला एक्सप्रेस-वे आता अधिक वेगवान आणि सुरक्षित

            मुंबई, दि.२९ : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (मर्या.) यांच्या वतीने यशवंतराव चव्हाण मुंबई–पुणे द्रुतगती मार्गाच्या क्षमता वाढीअंतर्गत उभारण्यात आलेल्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र दिनी १ मे रोजी पार पडणार आहे. राज्यातील वाहतूक व्यवस्थेला नवे बळ देणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ होणार आहे.


या ‘मिसिंग लिंक’ चे उद्घाटन शुक्रवार, दि. १ मे २०२६ रोजी दु. १२:३० वाजता मिसिंग लिंक वरील पूल क्र.१, खोपाली एक्झिटजवळ, यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग, जि. रायगड या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून, केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार उपस्थिती राहणार आहे.


कार्यक्रमाला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

बार्टीमार्फत विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांना आर्थिक साहाय्य

 बार्टीमार्फत विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांना आर्थिक साहाय्य

 

मुंबईदि. ३० : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) च्या वतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकीसेवा पूर्व परीक्षा २०२५ उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षा तयारीसाठी एकरक्कमी आर्थिक साहाय्य देण्यात येणार आहे. या परीक्षेस पात्र असलेल्या राज्यातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांना मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी प्रती विद्यार्थी १५ हजार रुपये आर्थिक साहाय्य देण्यात येणार आहे. जास्तीत जास्त पात्र उमेदवारांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन बार्टी संस्थेमार्फत करण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत राज्यातील अनुसूचित जातीचे जे उमेदवार विद्युत अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०२५ उत्तीर्ण झाले आहेत त्यांना मुख्य परीक्षेच्या अभ्यासासाठी १५ हजार रुपये आर्थिक साहाय्य दिले जाणार आहे. मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी लागणारे शैक्षणिक साहित्य आणि इतर खर्च पूर्ण करण्यासाठी उमेदवारांना प्रोत्साहन मिळावे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. याबाबत सविस्तर जाहिरात व ऑनलाईन फॉर्म बार्टी संस्थेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अधिक माहिती http://barti.maharashtragov.in या संकेतस्थळावरील NOTICEBOARD विभागातील Maharashtra Public Service Commission Electrical Engineering Services Mains Examination 2025 या लिंकवर उपलब्ध आहे.

0000

बार्टी' 'कडून यूपीएससी-सीएपीएफ मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांना २५ हजारांचे आर्थिक साहाय्य

 बार्टी' 'कडून यूपीएससी-सीएपीएफ मुलाखतीसाठी

पात्र उमेदवारांना २५ हजारांचे आर्थिक साहाय्य

 

मुंबईदि. ३० : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या माध्यमातून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ) परीक्षेत यश मिळवून मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी आर्थिक साहाय्य योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत मुलाखत परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी प्रती विद्यार्थी २५ हजार रुपये आर्थिक साहाय्य देण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील जास्तीत जास्त पात्र उमेदवारांनी या योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन 'बार्टी'ने केले आहे.

संघ लोकसेवा आयोगाने १७ एप्रिल रोजी केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ) मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर केला असून या निकालात राज्यातील मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या अनुसूचित जातीच्या उमेदवारांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. या योजनेंतर्गत पात्र उमेदवारांना मुलाखती पूर्वतयारीसाठी प्रवासखर्चनिवासभोजन तसेच इतर शैक्षणिक साहित्याचा खर्च भागविण्यासाठी प्रति विद्यार्थी २५ हजार रुपये एकरकमी आर्थिक साहाय्य देण्यात येणार आहे. योजनेचा सविस्तर तपशीलजाहिरात व अर्जाचा नमुना 'बार्टी'च्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावा. अधिक माहितीसाठी 'बार्टी'च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

पात्र उमेदवारानी अधिक माहितीसाठी आणि ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी बार्टीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. अधिक माहिती http://barti.maharashtra.gov या संकेतस्थळावरील NOTICE BOARD > UPSC CAPF Assistant Commandant Service-Personality Test Examination 2026 Financial assistance Scheme या लिंकवर क्लिक करावे.

लंदन की लेडी मेयर डेम सुसान लैंगली ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस से की शिष्टाचार भेंट

 लंदन की लेडी मेयर डेम सुसान लैंगली ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस से की शिष्टाचार भेंट

·         उत्पादन क्षेत्र के साथ-साथ एज्युसिटी’ और मेडीसिटी’ जैसी अवधारणाओं में अवसरों पर विशेष जोर

• मुंबईलंदन सहयोग को मिलेगा बढ़ावा

 

मुंबई, 29 अप्रैल : सिटी ऑफ लंदन कॉपोरेशन की लेडी मेयर डेम सुसान लैंगली तथा यूके के प्रतिनिधिमंडल ने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस से उनके आधिकारिक निवास वर्षा’ पर शिष्टाचार भेंट की। इस मुलाकात के दौरान मुंबई और महाराष्ट्र में निवेश के अवसरों पर विस्तृत चर्चा हुई।

 

बैठक में यह रेखांकित किया गया कि महाराष्ट्र निवेश के लिए एक अग्रणी केंद्र है। उत्पादन क्षेत्र के साथ-साथ एज्युसिटी’ और मेडीसिटी’ जैसी नई अवधारणाओं में अवसरों पर विशेष ध्यान दिया जाएगा।

 

डेम सुसान लैंगली ने कहा कि लंदन वैश्विक स्तर पर पूंजी जुटाने का एक महत्वपूर्ण केंद्र है और महाराष्ट्र के उद्योगों के लिए अंतरराष्ट्रीय विस्तार हेतु एक विश्वसनीय मंच बन सकता है।

 

उन्होंने यह भी विश्वास व्यक्त किया कि भारतयूके मुक्त व्यापार समझौता दोनों देशों के बीच दीर्घकालिक आर्थिक साझेदारी को और मजबूत करेगा।

 

इस अवसर पर यह भी बताया गया कि यूके के प्रधानमंत्री कीर स्टार्मर की हाल ही में मुंबई यात्रा के दौरान उद्योग जगत के प्रमुख व्यक्तियों के साथ हुई चर्चाओं का सकारात्मक प्रभाव अब निवेश प्रस्तावों के रूप में दिखाई देने लगा है।

 

वैश्विक शहरों मुंबई और लंदन के बीच सहयोग को और मजबूत करने के लिए एक संरचित संवाद तंत्र स्थापित करने पर भी चर्चा हुई। भारतयूके मुक्त व्यापार समझौते की पृष्ठभूमि में उद्योगबुनियादी ढांचा और सतत वित्तीय क्षेत्र में सहयोग बढ़ाने पर जोर दिया गया।

 

दोनों पक्षों ने भविष्य में और व्यापक सहयोग के अवसर तलाशने के प्रति सकारात्मक रुख व्यक्त किया।

Lady Mayor of London Dame Susan Langley Pays Courtesy Visit to Chief Minister Devendra Fadnavis

 Lady Mayor of London Dame Susan Langley Pays Courtesy Visit to Chief Minister Devendra Fadnavis

·         Special focus to be given on opportunities in concepts like ‘Educity’ and ‘Medicity’ along with the manufacturing sector

• Boost to Mumbai–London cooperation

 

Mumbai, April 29: The Lady Mayor of the City of London Corporation, Dame Susan Langley, along with a UK delegation, paid a courtesy visit to Chief Minister Devendra Fadnavis today at his official residence ‘Varsha’. During the meeting, detailed discussions were held on investment opportunities in Mumbai and Maharashtra.

 

During the meeting, it was emphasized that Maharashtra is a leading destination for investment. Along with the manufacturing sector, special focus will be given to opportunities in emerging concepts such as ‘Educity’ and ‘Medicity’.

 

लंडनच्या लेडी मेयर डेम ससून लँगली यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट

 लंडनच्या लेडी मेयर डेम ससून लँगली यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट


उत्पादन क्षेत्रासोबतच ‘एज्युसिटी’ आणि ‘मेडीसिटी’ सारख्या संकल्पनांमधील संधींवर विशेष भर देण्यात येणार


• मुंबई–लंडन सहकार्याला चालना


मुंबई, दि. 29 : सिटी ऑफ लंडनच्या लेडी मेयर डेम सूसन लँगली तसेच यूकेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांची आज वर्षा निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीत मुंबई व महाराष्ट्रातील गुंतवणुकीच्या संधींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.या बैठकीत महाराष्ट्र हे गुंतवणुकीसाठी अग्रगण्य केंद्र असल्याचे अधोरेखित करत उत्पादन क्षेत्रासोबतच ‘एज्युसिटी’ आणि ‘मेडीसिटी’ सारख्या नव्या संकल्पनांमधील संधींवर विशेष भर देण्यात आला.


लेडी मेयर डेम सुसन लँगली यांनी लंडन हे जागतिक भांडवल उभारणीसाठी महत्त्वाचे केंद्र असल्याचे सांगत महाराष्ट्रातील उद्योगांना आंतरराष्ट्रीय स्तरावर विस्तारासाठी लंडन एक विश्वासार्ह व्यासपीठ ठरू शकते, असे मत व्यक्त केले.


भारत–यूके मुक्त व्यापार करारामुळे दोन्ही देशांमध्ये दीर्घकालीन आर्थिक भागीदारीस चालना मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यूकेचे प्रधानमंत्री केयर स्ट्रामेर यांच्या अलीकडील मुंबई भेटीदरम्यान उद्योग क्षेत्रातील दिग्गजांशी झालेल्या चर्चेचा सकारात्मक परिणाम आता गुंतवणूक प्रस्तावांमध्ये दिसून येत असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.


‘मुंबई’ आणि ‘लंडन’ या जागतिक शहरांमधील सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी संरचित संवाद यंत्रणा उभारण्याबाबतही चर्चा झाली. भारत–यूके मुक्त व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर उद्योग, पायाभूत सुविधा व शाश्वत वित्तीय क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर भर देण्यात आला.

या भेटीत भविष्यात अधिक व्यापक सहकार्याच्या संधी शोधण्याबाबत दोन्ही बाजूंनी सकारात्मक भूमिका व्यक्त करण्यात आली.


0000

Wednesday, 29 April 2026

महाराष्ट्र राज्य वर्धापन दिनाच्या मुख्य शासकीय समारंभाची रंगीत तालीम

 महाराष्ट्र राज्य वर्धापन दिनाच्या मुख्य शासकीय समारंभाची रंगीत तालीम

 

मुंबईदि. २९ : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६७ व्या वर्धापन दिनानिमित्त दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर शुक्रवार,  १ मे २०२६ रोजी मुख्य शासकीय समारंभ आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची रंगीत तालीम याच मैदानावर घेण्यात आली. यावेळी ध्वजवंदन राजशिष्टाचार विभागाचे उपसचिव चंद्रकांत मोरे  यांनी केले. राष्ट्रीय गीतराष्ट्रगीत आणि राज्यगीताने  ध्वजाला सलामी देण्यात आली.

शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग (राजशिष्टाचार) यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी गृह विभागाचे अपर पोलीस महासंचालक (प्रशासन) मधुकर पांडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या कार्यक्रमात २६ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या प्रजासत्ताक दिन समारोहात उत्कृष्ट संचलन केलेल्या पथकांना अपर पोलीस महासंचालक मधुकर पांडे यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. यामध्ये सशस्त्र दलनि:शस्त्र दल आणि शालेय पथकास पारितोषिक देण्यात आले. सशस्त्र दलांमध्ये प्रथम पारितोषिक राज्य राखीव पोलीस पथक,  द्वितीय पारितोषिक बृहन्मुंबई पोलीस सशस्त्र पुरुष पथक आणि तृतीय पारितोषिक संयुक्तपणे बृहन्मुंबई दंगल नियंत्रण पथकगोंदिया व गडचिरोली जिल्ह्याचे सी ६० पथक यांनी पटकाविला. निःशस्त्र दलांमध्ये प्रथम पुरस्कार मुंबई अग्निशमन दलद्वितीय पुरस्कार सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई आणि ठाणे जिल्हा,  तृतीय क्रमांक राज्य उत्पादन शुल्क यांनी पटकाविला.

            या संचलनामध्ये शालेय पथके सहभागी झाली होती. शालेय पथकांमध्ये  प्रथम पुरस्कार रोड सेफ्टी पेट्रोल मुलींच्या रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूलदहिसर यांच्या पथकासद्वितीय पुरस्कार रोड सेफ्टी पेट्रोल मुलांच्या डॉ. ॲन्टोनियो डा सिल्वा हायस्कूलदादर यांच्या पथकास  आणि तृतीय पुरस्कार रोड सेफ्टी पेट्रोल मुले सेंट पॉल हायस्कूलदादर यांच्या पथकाने पटकाविला.

Featured post

Lakshvedhi