Monday, 2 March 2026

सीमेवर उभारण्यात येणारा हा पुतळा जवानांना आणि देशवासीयांसाठी प्रेरणादायी ठरेल.

 भारतीय सेना सीमेवर शौर्याने कार्यरत आहे. सीमेवर उभारण्यात येणारा हा पुतळा जवानांना आणि देशवासीयांसाठी प्रेरणादायी ठरेल.

            मराठ्यांच्या देदिप्यमान इतिहासाची साक्ष देणारा हा पुतळा पुणे येथून रवाना झाला असूनत्याने पुणे - मुंबई - बडोदा - अहमदाबाद - उदयपूर - जयपूर असा प्रवास करत दिल्ली गाठली आहे. इथून पुढे हा रथ पानिपत आणि पठाणकोट मार्गे पुंछ येथे पोहोचणार आहे. या प्रवासात ठिकठिकाणी शिवप्रेमींकडून रथाचे स्वागत करण्यात येत आहे. विशेष म्हणजेया स्मारकाच्या भूमिपूजनासाठी महाराष्ट्रातील साल्हेरशिवनेरीलोहगडरायगडप्रतापगड यांसह युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट असलेल्या 11 किल्ल्यांची आणि तमिळनाडूतील जिंजी अशा एकूण 12 किल्ल्यांची माती आणि पवित्र पाणी नेण्यात येत आहे.

            या स्मारकाचे आणि पुतळ्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे पुण्याचे ज्येष्ठ शिल्पकार विवेक खटावकर आणि त्यांच्या तिसऱ्या पिढीतील कलाकार विपुल आणि विराज खटावकर यांनी या नऊ फूट उंच पुतळ्याची निर्मिती केली आहे. हा पुतळा उच्च दर्जाच्या फायबरपासून तयार करण्यात आला असूनत्याची रचना अत्यंत देखणी आणि प्रेरणादायी आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर 2023 मध्ये जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे अशाच प्रकारे पुतळा उभारण्यात आला होता. त्यानंतर आता पुंछ येथे अधिक भव्य पुतळा बसवून परिसराचा कायापालट करण्यात येणार आहे.

            या ऐतिहासिक उपक्रमाचे आयोजन 'आम्ही पुणेकरसंस्था, 'श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळआणि 'श्री शिवशंभू विचार मंचयांच्या वतीने करण्यात आले आहे. 'आम्ही पुणेकरसंस्थेचे अध्यक्ष हेमंत जाधवविश्वस्त अखिल झांजलेविपुल कांबळे आणि संदीप मते यांनी या मोहिमेचे नियोजन केले आहे. या कार्यासाठी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आणि सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे विशेष सहकार्य लाभले आहे

भारत-पाक सीमेवरील पुंछ येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणार

 भारत-पाक सीमेवरील पुंछ येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा

अश्वारूढ पुतळा उभारणार

·         शिवस्वराज्य यात्रेचे दिल्लीतील महाराष्ट्र सदनात जंगी स्वागत

 

नवी दिल्ली, 2 : भारतीय शौर्याचे प्रतीक आणि कोट्यवधी भारतीयांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य अश्वारूढ पुतळा आता जम्मू-काश्मीरमधील भारत-पाकिस्तान सीमेवर असलेल्या पुंछ येथे दिमाखात उभा राहणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त पुणे येथून निघालेली भव्य  'शिवस्वराज्य यात्राराजधानी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात दाखल झाली. यावेळी  'जय भवानीजय शिवाजी'च्या जयघोषात या रथाचे आणि शिवरायांच्या पुतळ्याचे अत्यंत उत्साहात जंगी स्वागत करण्यात आले.

            या गौरवशाली सोहळ्याप्रसंगी महाराष्ट्र सदनच्या निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला, ,महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुलसहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार आणि जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळेआम्ही पुणेकरसंस्थेचे अध्यक्ष हेमंत जाधव यांनी उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे विधिवत पूजन केले. यावेळी दिल्लीतील विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि मोठ्या संख्येने मराठी बांधव उपस्थित होते.

शेतकरी केंद्रस्थानी ठेऊन शेतमाल मूल्यसाखळीचे बळकटीकरण करावे

 शेतकरी केंद्रस्थानी ठेऊन शेतमाल मूल्यसाखळीचे बळकटीकरण करावे

- पणन मंत्री जयकुमार रावल

·                     केळीची साठवण  व मूल्यवर्धन क्षमता वाढवून 'बनाना हबम्हणून विकसित करणार

·                     मॅग्नेटची १८ व्या गव्हर्निंग कौन्सिलची बैठक

मुंबईदि. २६ : मॅग्नेट प्रकल्पाच्या माध्यमातून  कृषी उत्पादन आणि विपणन व्यवस्थेला अधिक सक्षमअत्याधुनिकलोकाभिमुख आणि परिणामकारक होण्यासाठी नियोजन करावे. मॅग्नेटचे सर्व उपक्रम हे गुणवत्तापूर्ण आणि जागतिक तंत्रज्ञानाची सांगड घालून सर्वोत्कृष्ट असावेत. वर्तमान आवश्यकता लक्षात घेता अत्याधुनिक साठवणूक क्षमता वाढवण्यात यावी यातून शेतकरी आणि उद्योजकांचे दीर्घकालीन व्यापक हित साधावे आणि मॅग्नेट प्रकल्पातील योजनांची व्यापक प्रसिद्धी करून सक्षम लाभार्थ्यांपर्यंत पोहोचाव्यातयासाठी आणखी प्रभावी पद्धतीने प्रयत्न करावे असे निर्देश पणन मंत्री जयकुमार रावल यांनी महाराष्ट्र ॲग्रिबिझनेस नेटवर्क प्रकल्प (मॅग्नेट) च्या १८व्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत दिले.

प्रशासनिक सुधारणा आणि डिजिटायझेशनवर भर

 प्रशासनिक सुधारणा आणि डिजिटायझेशनवर भर

राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवा व प्रशिक्षण विषयक धोरण तयार करण्यात आले आहे. अनेक विभागांचे सेवाप्रवेश नियम कालबाह्य झाले होतेते बदलण्यात आले आहेत. राज्यात ई एचआरएमएस प्रणाली सुरू करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तिकाविभागीय चौकशी आदी सर्व गोष्टी आता ऑनलाईन करण्यात येत आहेत. १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत अनेक विभागांनी उल्लेखनीय कामगिरी केली. १९६० पासून एकाच विषयावर काढलेल्या शासन निर्णयांचे एकत्रिकरण सुरू आहे. सेवापुस्तिकांचे डिजिटायझेशन आणि प्रशासन सुलभ करण्याचे काम सुरू आहे.

भाषणाच्या शेवटी मुख्यमंत्र्यांनी खुदसे जितने की जिद है मेरीमुझे खुदको ही हराना है

मै भीड नहीं हू दुनिया कीमेरे अंदर भी जमाना है या कवितेच्या ओळी उद्धृत करून सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याचे काम शासन करेल, असा निर्धार व्यक्त केला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी ४०० कोटी

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी ४०० कोटी


महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिल येथील स्मारकासाठी यावर्षी ४०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. स्ट्रक्चरलचे काम शंभर टक्के पूर्ण झाले असून प्रवेशद्वार इमारतीचे काम ९६ टक्के झाले आहे. स्मारकाचे काम लवकर पूर्ण केले जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.


शिवस्मारकाबाबत उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयातील सुनावण्यांचा आढावा घेत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने प्रकरण पुन्हा उच्च न्यायालयाकडे पाठवले आहे. सुनावणी पूर्ण होईपर्यंत ‘स्टेटस को’ ठेवण्याचे निर्देश आहेत. राज्य शासन सातत्याने पाठपुरावा करत आहे.

प्रशासनिक सुधारणा आणि डिजिटायझेशनवर भर

 प्रशासनिक सुधारणा आणि डिजिटायझेशनवर भर

राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवा व प्रशिक्षण विषयक धोरण तयार करण्यात आले आहे. अनेक विभागांचे सेवाप्रवेश नियम कालबाह्य झाले होतेते बदलण्यात आले आहेत. राज्यात ई एचआरएमएस प्रणाली सुरू करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तिकाविभागीय चौकशी आदी सर्व गोष्टी आता ऑनलाईन करण्यात येत आहेत. १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत अनेक विभागांनी उल्लेखनीय कामगिरी केली. १९६० पासून एकाच विषयावर काढलेल्या शासन निर्णयांचे एकत्रिकरण सुरू आहे. सेवापुस्तिकांचे डिजिटायझेशन आणि प्रशासन सुलभ करण्याचे काम सुरू आहे.

भाषणाच्या शेवटी मुख्यमंत्र्यांनी खुदसे जितने की जिद है मेरीमुझे खुदको ही हराना है

मै भीड नहीं हू दुनिया कीमेरे अंदर भी जमाना है या कवितेच्या ओळी उद्धृत करून सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याचे काम शासन करेल, असा निर्धार व्यक्त केला.

००००

कर्करोग उपचारासाठी त्रिस्तरीय प्रणाली

 कर्करोग उपचारासाठी त्रिस्तरीय प्रणाली

राज्यात त्रिस्तरीय कर्करोग उपचार व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. महाकेअर फाऊंडेशनच्या माध्यमातून कॅन्सरवरील उपचाराची व्यवस्था उभारण्यात येणार आहे.

Featured post

Lakshvedhi