Saturday, 3 January 2026

सावित्रीबाई फुले थोडक्यात जीवनपट

 सावित्रीबाई फुले यांचे विचार आणि कार्य आजही तितकेच समर्पक आणि प्रेरणादायी आहेत. शिक्षणसमानता आणि मानवता या मूल्यांवर आधारित समाजनिर्मितीसाठी त्यांचे जीवन प्रत्येक पिढीसाठी मार्गदर्शक दीपस्तंभ ठरते.

सावित्रीबाई फुले थोडक्यात जीवनपट

पूर्ण नाव : सावित्रीबाई जोतिराव फुले

जन्मतारीख : ३ जानेवारी १८३१

जन्मगाव : नायगावतालुका खंडाळाजिल्हा सातारामहाराष्ट्र

वडिलांचे नाव : खंडोजी नेवसे पाटील

कार्य / योगदान :

भारतातील पहिल्या महिला शिक्षिका

पुणे येथे पहिली मुलींची शाळा (१८४८) सुरू केली

स्त्री शिक्षणबहुजन समाजाच्या उन्नतीसाठी कार्य

बालहत्या प्रतिबंधविधवाविवाहस्त्री-पुरुष समानता यांसाठी समाजसुधारणा

सत्यशोधक समाजाच्या कार्यात सक्रिय सहभाग

प्लेग साथीच्या काळात रुग्णसेवा

मृत्यू :

१० मार्च १८९७

पुणेमहाराष्ट्र (प्लेगग्रस्त रुग्णांची सेवा करताना संसर्गामुळे निधन)

ओळख :

भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका

थोर समाजसुधारिकाकवयित्री व शिक्षणतज्ज्ञ

सातारा येथे पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यासाठी उभारण्यात आलेल्या वृंदावन पोलीस टाऊनशीपमध्ये ६९८ सदनिका

 सातारा येथे पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यासाठी उभारण्यात आलेल्या वृंदावन पोलीस टाऊनशीपमध्ये ६९८ सदनिका असून यामध्ये निवासस्थानेव्यायामशाळावाचनालयबहुउद्देशिय सभागृहपॉवर हाऊस अशा अनेक सुविधा आहेत. या प्रक्रल्पाचे अतिशय सुंदर काम केल्याबद्दल पोलीस हाऊसिंग कार्पोरेशनला शुभेच्छा देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले२०१४ ला मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर पोलिसांना उत्तम घरे मिळाली पाहिजेत हा संकल्प केला होता. यासाठी पोलीस हाऊसिंग कार्पोरेशनला प्राधिकृत केले. त्यांना निधी उपलब्ध करून दिला आणि मोठ्या प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये घरांची निर्मिती सुरू केली. जुन्या पोलीस लाईनमध्ये राहणाऱ्या पोलिसांना व त्यांच्या कुटुंबीयांना अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये रहावे लागत होते. पोलीस कुटुंबीयांच्या जीवनात आनंद निर्माण करुन त्यांना राहण्यायोग्य घरे निर्माण व्हावीत यासाठी आपण ही जबाबदारी पोलीस गृह निर्माण आणि कल्याण महामंडळाला दिली.  पोलिसांच्या मुलांना व त्यांच्या कुटुंबाला आनंदी वातावरण मिळावे आणि अनेकवेळा तासंतास सेवा बजावणाऱ्या पोलीस बांधवांना घरी गेल्यानंतर सुखाने जगता यावेयादृष्टीने या सदनिकांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यातून अशाच प्रकारे पोलिसांना उत्तम घर आम्ही देत राहू असा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला.

या प्रकल्पाचे उत्तम प्रकारे काम केल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुख्य अभियंता राजाराम पुरीगोसावीविलास बिरारी यांचे अभिनंदन केले.  यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी गृह प्रकल्पाची पाहणी करुन प्रातिनिधीक स्वरुपात पोलीस कर्मचाऱ्यांना सदनिकांच्या चाव्यांचे वितरण केले. यावेळी पोलीस कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

गृहनिर्माण प्रकल्पांमुळे पोलिसांच्या जीवनात सकारात्मक बदल

 गृहनिर्माण प्रकल्पांमुळे पोलिसांच्या जीवनात सकारात्मक बदल

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सातारा, दि. २ : राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांच्या कुटुंबीयांसाठी अत्यंत सुंदर व दर्जेदार गृहनिर्माण प्रकल्प उभे राहत आहेत. त्यामध्ये विविध सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. यापुढेही पोलीसांसाठी अशाच दर्जेदार सदनिका निर्मितींचे काम अखंडपणे सुरु राहील. या दर्जेदार सदनिकांमुळे पोलीस व त्यांच्या कुटुंबीयांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येईलअसा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

सातारा येथील वृंदावन पोलीस टाऊनशिप आणि शाहूपुरी पोलीस ठाणे या नवीन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी पर्यटनमंत्री व पालकमंत्री शंभूराज देसाईसार्वजनिक बांधकाम मंत्री  शिवेंद्रसिंहराजे भोसलेग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेआमदार शशिकांत शिंदेमहेश शिंदेअतुल भोसलेमनोज घोरपडेपोलीस महासंचालक तथा महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अर्चना त्यागीविभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवारकोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारीजिल्हाधिकारी संतोष पाटीलपोलीस अधीक्षक तुषार दोशीमुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजनअतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकरपोलीस उपाधिक्षक अतुल सबनीस यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

मराठी साहित्य क्षेत्रात कोणताही हस्तक्षेप होऊ दिला जाणार नाही,

 मराठी साहित्य क्षेत्रात कोणताही हस्तक्षेप होऊ दिला जाणार नाहीअशी ग्वाही देत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कीसाहित्य निर्मिती ही समाजाच्या जाणिवा विस्तारण्यासाठी असते. त्यामुळे टीका आणि गौरव या दोन्हींतून सुधारण्याचा मार्ग शोधला पाहिजेअसे त्यांनी नमूद केले.

साताऱ्याच्या साहित्यिक परंपरेचा गौरव करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कीआजवर झालेल्या ९८ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांपैकी सर्वाधिक सहा संमेलनांचे आयोजन सातारा जिल्ह्यात झाले असूनसर्वाधिक १७ संमेलनाध्यक्ष हे सातारा जिल्ह्याचे भूमीपुत्र होते.

संमेलनाच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल महाराष्ट्र साहित्य परिषदशाहूपुरी शाखामावळा फाउंडेशनसातारा तसेच सहभागी सर्व संस्थांचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आभार मानले. या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून मराठी साहित्याला नवी ऊर्जा आणि दिशा मिळेलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला

राज्यात शालेय शिक्षणात मराठी हीच अनिवार्य भाषा

 राज्यात शालेय शिक्षणात मराठी हीच अनिवार्य भाषा

– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·         ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे साताऱ्यात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्घाटन

·         डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अहवालानंतरच इतर ऐच्छिक भाषांबाबत निर्णय

सातारादि. २ : राज्यात शालेय शिक्षणात मराठी हीच अनिवार्य भाषा राहील. इतर कोणतीही भारतीय भाषा अनिवार्य नसेलती ऐच्छिक स्वरूपात राहील. इतर भाषा कोणत्या इयत्तेपासून सुरू करायच्या याबाबतचा निर्णय डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर घेतला जाईलअसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. मराठी भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून ती महाराष्ट्राचा आत्मा आहेअसे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी सातारा येथील शाहू स्टेडियममध्ये आयोजित ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी केले.

भाषाविषयक धोरण स्पष्ट करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कीराज्यात मराठी भाषेची सक्ती असेलमात्र इतर कोणत्याही भारतीय भाषेची सक्ती केली जाणार नाही. इतर भाषा ऐच्छिक असतील. यासंदर्भात अभ्यासासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली असूनतिचा अहवाल अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी सांगितले.

शासकीय जनआरोग्य योजनांतून कोणालाही उपचार नाकारू नयेत

 शासकीय जनआरोग्य योजनांतून कोणालाही उपचार नाकारू नयेत

     सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

मुंबईदि. 2 : राज्यातील प्रत्येक गरजू रुग्णाला शासकीय आरोग्य योजनांतून विनासायासमोफत आणि प्रभावी उपचार मिळालेच पाहिजेत. प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत अंगीकृत असलेल्या कोणत्याही खासगी अथवा शासकीय रुग्णालयाने कोणत्याही कारणास्तव रुग्णाला उपचार नाकारू नयेतअसे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.

प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत अंगीकृत असलेल्या खासगी व शासकीय रुग्णालयांचे प्रतिनिधी आणि कर्मचाऱ्यांची आढावा बैठक मंत्रालयात झाली. त्यावेळी आरोग्यमंत्री आबिटकर बोलत होते. बैठकीस महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अण्णासाहेब चव्हाणठाणे जिल्हा परिमंडळाचे उपसंचालक डॉ. अशोक नांदापूरकर यांच्यासह विविध खाजगी व शासकीय रुग्णालयांचे प्रतिनिधी तसेच दोन्ही जनआरोग्य योजनांचे कर्मचारी उपस्थित होते.

Friday, 2 January 2026

सातारा येथे पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यासाठी

 सातारा येथे पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यासाठी उभारण्यात आलेल्या वृंदावन पोलीस टाऊनशीपमध्ये ६९८ सदनिका असून यामध्ये निवासस्थानेव्यायामशाळावाचनालयबहुउद्देशिय सभागृहपॉवर हाऊस अशा अनेक सुविधा आहेत. या प्रक्रल्पाचे अतिशय सुंदर काम केल्याबद्दल पोलीस हाऊसिंग कार्पोरेशनला शुभेच्छा देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले२०१४ ला मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर पोलिसांना उत्तम घरे मिळाली पाहिजेत हा संकल्प केला होता. यासाठी पोलीस हाऊसिंग कार्पोरेशनला प्राधिकृत केले. त्यांना निधी उपलब्ध करून दिला आणि मोठ्या प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये घरांची निर्मिती सुरू केली. जुन्या पोलीस लाईनमध्ये राहणाऱ्या पोलिसांना व त्यांच्या कुटुंबीयांना अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये रहावे लागत होते. पोलीस कुटुंबीयांच्या जीवनात आनंद निर्माण करुन त्यांना राहण्यायोग्य घरे निर्माण व्हावीत यासाठी आपण ही जबाबदारी पोलीस गृह निर्माण आणि कल्याण महामंडळाला दिली.  पोलिसांच्या मुलांना व त्यांच्या कुटुंबाला आनंदी वातावरण मिळावे आणि अनेकवेळा तासंतास सेवा बजावणाऱ्या पोलीस बांधवांना घरी गेल्यानंतर सुखाने जगता यावेयादृष्टीने या सदनिकांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यातून अशाच प्रकारे पोलिसांना उत्तम घर आम्ही देत राहू असा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला.

या प्रकल्पाचे उत्तम प्रकारे काम केल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुख्य अभियंता राजाराम पुरीगोसावीविलास बिरारी यांचे अभिनंदन केले.  यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी गृह प्रकल्पाची पाहणी करुन प्रातिनिधीक स्वरुपात पोलीस कर्मचाऱ्यांना सदनिकांच्या चाव्यांचे वितरण केले. यावेळी पोलीस कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

Featured post

Lakshvedhi