Saturday, 3 January 2026

गृहनिर्माण प्रकल्पांमुळे पोलिसांच्या जीवनात सकारात्मक बदल

 गृहनिर्माण प्रकल्पांमुळे पोलिसांच्या जीवनात सकारात्मक बदल

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

सातारा, दि. २ : राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांच्या कुटुंबीयांसाठी अत्यंत सुंदर व दर्जेदार गृहनिर्माण प्रकल्प उभे राहत आहेत. त्यामध्ये विविध सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. यापुढेही पोलीसांसाठी अशाच दर्जेदार सदनिका निर्मितींचे काम अखंडपणे सुरु राहील. या दर्जेदार सदनिकांमुळे पोलीस व त्यांच्या कुटुंबीयांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येईलअसा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

सातारा येथील वृंदावन पोलीस टाऊनशिप आणि शाहूपुरी पोलीस ठाणे या नवीन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी पर्यटनमंत्री व पालकमंत्री शंभूराज देसाईसार्वजनिक बांधकाम मंत्री  शिवेंद्रसिंहराजे भोसलेग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेआमदार शशिकांत शिंदेमहेश शिंदेअतुल भोसलेमनोज घोरपडेपोलीस महासंचालक तथा महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अर्चना त्यागीविभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवारकोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारीजिल्हाधिकारी संतोष पाटीलपोलीस अधीक्षक तुषार दोशीमुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजनअतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकरपोलीस उपाधिक्षक अतुल सबनीस यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi