Friday, 2 January 2026

गृहनिर्माण प्रकल्पांमुळे पोलिसांच्या जीवनात सकारात्मक बदल

 गृहनिर्माण प्रकल्पांमुळे पोलिसांच्या जीवनात सकारात्मक बदल

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

सातारा, दि. २ : राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांच्या कुटुंबीयांसाठी अत्यंत सुंदर व दर्जेदार गृहनिर्माण प्रकल्प उभे राहत आहेत. त्यामध्ये विविध सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. यापुढेही पोलीसांसाठी अशाच दर्जेदार सदनिका निर्मितींचे काम अखंडपणे सुरु राहील. या दर्जेदार सदनिकांमुळे पोलीस व त्यांच्या कुटुंबीयांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येईलअसा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

सातारा येथील वृंदावन पोलीस टाऊनशिप आणि शाहूपुरी पोलीस ठाणे या नवीन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी पर्यटनमंत्री व पालकमंत्री शंभूराज देसाईसार्वजनिक बांधकाम मंत्री  शिवेंद्रसिंहराजे भोसलेग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेआमदार शशिकांत शिंदेमहेश शिंदेअतुल भोसलेमनोज घोरपडेपोलीस महासंचालक तथा महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अर्चना त्यागीविभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवारकोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारीजिल्हाधिकारी संतोष पाटीलपोलीस अधीक्षक तुषार दोशीमुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजनअतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकरपोलीस उपाधिक्षक अतुल सबनीस यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे रविवार दिनांक २५ जानेवारी २०२६ रोजी

 यावेळी महेंद्रजी रायचुराविधान परिषद सदस्य बाबुसिंग महाराजक्षेत्रीय समिती अध्यक्ष डॉ. विजय सतबीर सिंगहिंद दी चादर श्री गुरू तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम समितीचे समन्वयक रामेश्वर नाईकसरजीत सिंघ गिल आणि जिल्हाधिकारी राहूल कर्डीलेपोलीस अधीक्षक अबीनाश कुमारक्षेत्रीय समिती पदाधिकारीइतर वरिष्ठ अधिकारी व राज्यस्तरीय समिती सदस्य इतर अधिकारी  यांची उपस्थिती राहणार आहे.

 

हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे रविवार दिनांक २५ जानेवारी २०२६ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे. मुख्य कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक पूर्वतयारी व नियोजनाला वेग देण्यात आला असून सुरक्षावाहतूक तसेच कार्यक्रमस्थळ व्यवस्थापनाबाबत सर्व संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. 

०००

 

 


 


हिंद-दी-चादर’ श्री गुरू तेग बहादुर ३५० वा शहीदी समागम कार्यक्रम २५ जानेवारीला नांदेडमध्ये; मान्यवरांच्या उपस्थितीत मुख्य कार्यक्रम

 हिंद-दी-चादर’ श्री गुरू तेग बहादुर ३५० वा शहीदी समागम कार्यक्रम

२५ जानेवारीला नांदेडमध्ये; मान्यवरांच्या उपस्थितीत मुख्य कार्यक्रम

 

मुंबईदि. २ :-  हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे २५ जानेवारी रोजी कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाची सुरूवात ३ जानेवारी  रोजी दुपारी १२ वाजता आरंभता की अरदास या विधीने असर्जन परिसर मामा चौकसार्वजनिक बांधकाम विभागाचे मोदी मैदान येथे होणार आहे.

 

आरंभता की अरदास विधी तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वाराचे पंचप्यारे यांच्या हस्ते आणि सिखसिकलीगरबंजारालबानासिंधीमोहयाल,वाल्मीकिभगत नामदेव व उदासीन समाज-संप्रदाय या नऊ समाजाच्या संतांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. 

 

या  विधीच्या माध्यमातून हिंद-दी-चादर उपक्रमास औपचारिक व  प्रारंभ तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारा अबचलनगर नांदेडमुख्य जथ्थेदार संत बाबा कुलवंत सिंघजीभाई जोसिंदर सिंघजीभाई राम सिंघजीभाई कश्मिर सिंघजीभाई गुरमीत सिंघजीगुरुद्वारा लंगर साहिबचे संतबाबा बलविंदर सिंघ यांच्या हस्ते होणार आहे.

दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ नुसार

 मुख्य कार्यकारी अधिकारीजिल्हा परिषद यांनी संस्थांचे वेतन व वेतनेतर अनुदानाचे प्रस्ताव तपासणी सूचीप्रमाणे तपासून आयुक्तदिव्यांग कल्याणपुणे यांच्याकडे सादर करावयाचे आहेत. तसेच आयुक्तदिव्यांग कल्याण यांनी या प्रस्तावांची सखोल पडताळणी करून तपासणी सूचीसह व स्वयंस्पष्ट अभिप्रायासह शासनाकडे प्रस्ताव सादर करावयाचे आहेत.

            दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ नुसार राज्यात दिव्यांग कल्याणासाठी कार्य करणाऱ्या अशासकीय अनुदानित मतिमंदअंधअस्थिव्यंग व मकबधीर प्रवर्गातील ९३२ शाळाकार्यशाळा व बालगृहे कार्यरत आहेत. या संस्थांना वेतन अनुदान तसेच परिपोषणइमारत भाडे आणि कार्यालयीन खर्चासाठी वेतनेतर अनुदान दिले जात असल्याचे सचिव मुंढे यांनी सांगितले.

याबाबतचा शासन निर्णय दिव्यांग कल्याण विभागाने निर्गमित केला असून महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

0000

दिव्यांग विशेष शाळांच्या थकीत अनुदानासाठी सुधारित तपासणी सूची

  

दिव्यांग विशेष शाळांच्या थकीत अनुदानासाठी सुधारित तपासणी सूची

-         सचिव तुकाराम मुंढे

 

मुंबईदि. २ : राज्यातील दिव्यांगांच्या विशेष शाळाकार्यशाळा व बालगृहांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन तसेच वेतनेतर थकीत अनुदान अदा करण्यापूर्वी संबंधित रक्कम नियमाप्रमाणे देय आहे की नाहीयाची खातरजमा करण्यासाठी सुधारित तपासणी सूची निश्चित करण्यात आली असल्याची माहिती दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी दिली.

सचिव मुंढे म्हणालेथकीत वेतन व वेतनेतर अनुदानाचे प्रस्ताव शासनाकडे सादर करताना अनेक वेळा आवश्यक कागदपत्रांची कमतरताअपूर्ण आकडेवारी तसेच थकबाकीची कारणे स्पष्ट नमूद केल्याचे आढळून येत होते. तसेच सर्व शाळाकार्यशाळा व बालगृहांचे प्रस्ताव सादर करताना एकसमान पद्धतीचा अभाव दिसून येत होता. या पार्श्वभूमीवर सुधारित व एकसमान तपासणी सूची तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

भाषाविषयक धोरण स्पष्ट करताना

 भाषाविषयक धोरण स्पष्ट करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कीराज्यात मराठी भाषेची सक्ती असेलमात्र इतर कोणत्याही भारतीय भाषेची सक्ती केली जाणार नाही. इतर भाषा ऐच्छिक असतील. यासंदर्भात अभ्यासासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली असूनतिचा अहवाल अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी संमेलनाच्या उद्घाटक ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ. मृदुला गर्गस्वागताध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसलेग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे९९ व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील९८ व्या संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. ताराबाई भवाळकरआमदार अतुल भोसलेमनोज घोरपडेपुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवारनगराध्यक्ष अमोल मोहितेअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशीसंमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णीभारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदमउद्योजक व संमेलनाचे संरक्षक फरोख कूपरजिल्हाधिकारी संतोष पाटील तसेच साहित्य महामंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

राज्यात शालेय शिक्षणात मराठी हीच अनिवार्य भाषा

 राज्यात शालेय शिक्षणात मराठी हीच अनिवार्य भाषा

– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·         ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे साताऱ्यात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्घाटन

·         डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अहवालानंतरच इतर ऐच्छिक भाषांबाबत निर्णय

 

सातारादि. २ : राज्यात शालेय शिक्षणात मराठी हीच अनिवार्य भाषा राहील. इतर कोणतीही भारतीय भाषा अनिवार्य नसेलती ऐच्छिक स्वरूपात राहील. इतर भाषा कोणत्या इयत्तेपासून सुरू करायच्या याबाबतचा निर्णय डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर घेतला जाईलअसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. मराठी भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून ती महाराष्ट्राचा आत्मा आहेअसे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी सातारा येथील शाहू स्टेडियममध्ये आयोजित ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी केले.

Featured post

Lakshvedhi