हिंद-दी-चादर’ श्री गुरू तेग बहादुर ३५० वा शहीदी समागम कार्यक्रम
२५ जानेवारीला नांदेडमध्ये; मान्यवरांच्या उपस्थितीत मुख्य कार्यक्रम
मुंबई, दि. २ :- “हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे २५ जानेवारी रोजी कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाची सुरूवात ३ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता आरंभता की अरदास या विधीने असर्जन परिसर मामा चौक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मोदी मैदान येथे होणार आहे.
आरंभता की अरदास विधी तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वाराचे पंचप्यारे यांच्या हस्ते आणि सिख, सिकलीगर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल,वाल्मीकि, भगत नामदेव व उदासीन समाज-संप्रदाय या नऊ समाजाच्या संतांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
या विधीच्या माध्यमातून “हिंद-दी-चादर” उपक्रमास औपचारिक व प्रारंभ तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारा अबचलनगर नांदेड, मुख्य जथ्थेदार संत बाबा कुलवंत सिंघजी, भाई जोसिंदर सिंघजी, भाई राम सिंघजी, भाई कश्मिर सिंघजी, भाई गुरमीत सिंघजी, गुरुद्वारा लंगर साहिबचे संतबाबा बलविंदर सिंघ यांच्या हस्ते होणार आहे.
No comments:
Post a Comment