दिव्यांग विशेष शाळांच्या थकीत अनुदानासाठी सुधारित तपासणी सूची
- सचिव तुकाराम मुंढे
मुंबई, दि. २ : राज्यातील दिव्यांगांच्या विशेष शाळा, कार्यशाळा व बालगृहांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन तसेच वेतनेतर थकीत अनुदान अदा करण्यापूर्वी संबंधित रक्कम नियमाप्रमाणे देय आहे की नाही, याची खातरजमा करण्यासाठी सुधारित तपासणी सूची निश्चित करण्यात आली असल्याची माहिती दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी दिली.
सचिव मुंढे म्हणाले, थकीत वेतन व वेतनेतर अनुदानाचे प्रस्ताव शासनाकडे सादर करताना अनेक वेळा आवश्यक कागदपत्रांची कमतरता, अपूर्ण आकडेवारी तसेच थकबाकीची कारणे स्पष्ट नमूद केल्याचे आढळून येत होते. तसेच सर्व शाळा, कार्यशाळा व बालगृहांचे प्रस्ताव सादर करताना एकसमान पद्धतीचा अभाव दिसून येत होता. या पार्श्वभूमीवर सुधारित व एकसमान तपासणी सूची तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment