प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या हस्ते उद्घाटन; पाककृतींची मेजवानी
या खाद्य महोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय शेफ विष्णू मनोहर यांच्या हस्ते होणार आहे. खाद्य महोत्सवामध्ये महाराष्ट्रातील विविध भागांतील वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ उपलब्ध असतील. नागपूर विभागातील सावजी चिकन, मटण रस्सा, तर्री पोहा आणि संत्री-आधारित मिठाई; पुणे भागातील मिसळ-पाव, वडा पाव आणि पुरणपोळी, जळगावातील शेव भाजी, भरित (वांग्याचे भरित) आणि केळीशी संबंधित पदार्थ; मालवणातील मालवणी सीफूड, कोंबडी वडे आणि सोलकढी; छत्रपती संभाजी नगरमधील नान कालिया, डालिंबी उसळ आणि स्थानिक बिर्याणी; तसेच कोल्हापुरी नॉन-व्हेजमधील तांबडा रस्सा, पांढरा रस्सा आणि कोल्हापुरी चिकन किंवा मटण यांचा समावेश असेल. हे पदार्थ महाराष्ट्राच्या समृद्ध पाककृती परंपरेचे प्रतिनिधित्व करतील.
या खाद्य महोत्सवात सातारा, कोल्हापूर, जळगाव,पुणे अमरावती, रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेतर्गत असलेले महिला स्वयंम सहायता समूह सहभागी होणार असून त्यांच्याकडील रुचकर पदार्थांचा देखील गरमागरम आस्वाद घेता येणार आहे.