महाराष्ट्र सदन येथे 12 ते 14 डिसेंबर दरम्यान
महाराष्ट्र खाद्य महोत्सवाचे आयोजन
दिल्लीकर खवय्यांसाठी मराठमोळी मेजवानी
नवी दिल्ली, 2 : महाराष्ट्राच्या खमंग खाद्य पदार्थांचा आस्वाद दिल्लीकरांना मिळावा या उद्देशाने राजधानी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात महाराष्ट्र खाद्य महोत्सवाचे आयोजन 12 ते 14 डिसेंबर 2025 दरम्यान करण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त आणि सचिव आर. विमला यांनी दिली.
कस्तुरबा मार्गांवरील महाराष्ट्र सदनात आयोजित या महोत्सवात महाराष्ट्राच्या विविध प्रादेशिक खाद्यसंस्कृतीचा आणि कलेचा संगम पाहायला मिळणार आहे. चवदार पदार्थांची रेलचेल दिल्लीकरांना या निमित्ताने अनुभवायला मिळणार आहे.
No comments:
Post a Comment