Tuesday, 2 December 2025

प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या हस्ते उद्घाटन; पाककृतींची मेजवानी

 प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या हस्ते उद्घाटनपाककृतींची मेजवानी

या खाद्य महोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय शेफ विष्णू मनोहर यांच्या हस्ते होणार आहे. खाद्य महोत्सवामध्ये महाराष्ट्रातील विविध भागांतील वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ उपलब्ध असतील. नागपूर विभागातील सावजी चिकन, मटण रस्सातर्री पोहा आणि संत्री-आधारित मिठाईपुणे भागातील मिसळ-पाववडा पाव आणि पुरणपोळी, जळगावातील शेव भाजीभरित (वांग्याचे भरित) आणि केळीशी संबंधित पदार्थमालवणातील मालवणी सीफूडकोंबडी वडे आणि सोलकढीछत्रपती संभाजी नगरमधील  नान कालियाडालिंबी उसळ आणि स्थानिक बिर्याणीतसेच कोल्हापुरी नॉन-व्हेजमधील तांबडा रस्सापांढरा रस्सा आणि कोल्हापुरी चिकन किंवा मटण यांचा समावेश असेल. हे पदार्थ महाराष्ट्राच्या समृद्ध पाककृती परंपरेचे प्रतिनिधित्व करतील.

या खाद्य महोत्सवात साताराकोल्हापूरजळगाव,पुणे अमरावतीरायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेतर्गत असलेले महिला स्वयंम सहायता समूह सहभागी होणार असून त्यांच्याकडील रुचकर पदार्थांचा देखील गरमागरम आस्वाद घेता येणार आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi