Tuesday, 2 December 2025

प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या हस्ते उद्घाटन; पाककृतींची मेजवानी

 प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या हस्ते उद्घाटनपाककृतींची मेजवानी

या खाद्य महोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय शेफ विष्णू मनोहर यांच्या हस्ते होणार आहे. खाद्य महोत्सवामध्ये महाराष्ट्रातील विविध भागांतील वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ उपलब्ध असतील. नागपूर विभागातील सावजी चिकन, मटण रस्सातर्री पोहा आणि संत्री-आधारित मिठाईपुणे भागातील मिसळ-पाववडा पाव आणि पुरणपोळी, जळगावातील शेव भाजीभरित (वांग्याचे भरित) आणि केळीशी संबंधित पदार्थमालवणातील मालवणी सीफूडकोंबडी वडे आणि सोलकढीछत्रपती संभाजी नगरमधील  नान कालियाडालिंबी उसळ आणि स्थानिक बिर्याणीतसेच कोल्हापुरी नॉन-व्हेजमधील तांबडा रस्सापांढरा रस्सा आणि कोल्हापुरी चिकन किंवा मटण यांचा समावेश असेल. हे पदार्थ महाराष्ट्राच्या समृद्ध पाककृती परंपरेचे प्रतिनिधित्व करतील.

या खाद्य महोत्सवात साताराकोल्हापूरजळगाव,पुणे अमरावतीरायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेतर्गत असलेले महिला स्वयंम सहायता समूह सहभागी होणार असून त्यांच्याकडील रुचकर पदार्थांचा देखील गरमागरम आस्वाद घेता येणार आहे.

महाराष्ट्र सदन येथे 12 ते 14 डिसेंबर दरम्यान महाराष्ट्र खाद्य महोत्सवाचे आयोजन दिल्लीकर खवय्यांसाठी मराठमोळी मेजवानी

 महाराष्ट्र सदन येथे 12 ते 14 डिसेंबर दरम्यान

 महाराष्ट्र खाद्य महोत्सवाचे आयोजन

दिल्लीकर खवय्यांसाठी मराठमोळी मेजवानी

नवी दिल्ली, 2 : महाराष्ट्राच्या खमंग खाद्य पदार्थांचा आस्वाद दिल्लीकरांना मिळावा या उद्देशाने  राजधानी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात  महाराष्ट्र खाद्य महोत्सवाचे आयोजन 12 ते 14 डिसेंबर 2025 दरम्यान करण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त आणि सचिव आर. विमला यांनी दिली.

कस्तुरबा मार्गांवरील महाराष्ट्र सदनात आयोजित या महोत्सवात महाराष्ट्राच्या विविध प्रादेशिक खाद्यसंस्कृतीचा आणि कलेचा संगम पाहायला मिळणार आहे. चवदार पदार्थांची रेलचेल दिल्लीकरांना या निमित्ताने अनुभवायला मिळणार आहे.

महापरिनिर्वाण दिना निमित्त

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेचैत्यभूमी परिसरात योग्य मंडप व्यवस्थापिण्याच्या पाण्याची सोयतसेच इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. दादर व आसपासच्या परिसरात वाहतूक पोलीस यंत्रणांनी रहदारीचे योग्य नियोजन आणि नियंत्रण करावे. अनुयायांना मार्गदर्शन मिळावे यासाठी जागोजागी सूचनाफलक लावावेत. तसेचनागरिकांना सुलभ प्रवासासाठी बेस्टतर्फे अतिरिक्त बससेवा उपलब्ध ठेवावी. या बैठकीच्या निमित्ताने अनेक चांगल्या व उपयुक्त सूचना प्राप्त होतात. यामुळे मूलभूत बाबींवर लक्ष देत दरवर्षी अधिक चांगले काम करता येतेतसेच काही उणीवा राहिल्या असतील तर त्या दूर करण्याचा प्रयत्न करता येतो. उत्तम नियोजन आणि समन्वयासाठी ही बैठक आयोजित केली जात असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त पूर्वतयारीच्या अनुषंगाने

 महापरिनिर्वाण दिनानिमित्त पूर्वतयारीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा बैठक झाली. या बैठकीस सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळमाजी मंत्री विजय गिरकरमुख्य सचिव राजेश अग्रवालपोलीस महासंचालक रश्मी शुक्लामुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीमाहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंहबेस्ट'च्या महाव्यवस्थापक सोनिया सेठीमुंबई पोलीस आयुक्त देवेन भारतीमुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल गोयलतसेच विविध विभागाचे अपर मुख्य सचिवप्रधान सचिवसचिव तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जागरूकतेला अधिक बळकटी देण्याचा तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला ज्ञान दिले आणि जागरूक केले. या जागरूकतेला अधिक बळकटी देण्याचा तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पुढे नेण्याचा प्रयत्न महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने आपण सर्वजण करुयाअसेही आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले

महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवासुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा

 महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवासुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा

-         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·         इंदू मिल येथील पुतळ्यासंदर्भात समन्वय समिती स्थापन करण्यात येणार

 

मुंबईदि. 2 : देशभरातून महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी परिसर तसेच मुंबईत लाखोंच्या संख्येने अनुयायी येतात. येणाऱ्या अनुयायांची सुरक्षितता आणि सोयीसुविधांसाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. चैत्यभूमी येथे उभारल्या जाणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासंदर्भात विविध सूचना प्राप्त झाल्या असून याबाबत समन्वय समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला ज्ञान दिले आणि जागरूक केले. या जागरूकतेला अधिक बळकटी देण्याचा तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पुढे नेण्याचा प्रयत्न महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने आपण सर्वजण करुयाअसेही आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.

ऊर्जा क्षेत्रातील कंपन्या नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध करणार

 ऊर्जा क्षेत्रातील कंपन्या नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध करणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,ऊर्जा क्षेत्रातील महत्त्वाच्या कंपन्यांच्या क्षमतेस चालना देण्यासाठी नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या माध्यमातून व्यापक प्रमाणात निधी उपलब्ध होईल. पहिल्या टप्प्यात महापारेषण (एमएसईटीसीएल), त्यानंतर महावितरण आणि महानिर्मिती या देशातील मोठ्या वीज कंपन्या सूचीबद्ध करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. या प्रक्रियेसाठी नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या अनुभवाची मोठी मदत ठरेलअसेही त्यांनी स्पष्ट केले.

Featured post

Lakshvedhi