Tuesday, 11 November 2025

पत्रकारांनी एआय जनरेटेड कंटेंट वापरताना पडताळणी करणे आवश्यक

 पत्रकारांनी एआय जनरेटेड कंटेंट वापरताना पडताळणी करणे आवश्यक

प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह

मुंबईदि. ११ : एआय-जनरेटेड कंटेंटची पडताळणी आता आवश्यक असून डीपफेक तपासासाठी आता १५२० पॅरामीटर्सवर आधारित विशेष टूल्स तयार झाली आहेत. त्याचबरोबरफॅक्ट-चेकिंग संस्थांही सर्व फॅक्ट्स पडताळत नाहीत. त्यामुळे पूर्वग्रह असू शकतो. ‘एआय’मधील बायस हा आज जागतिक पातळीवरील मोठा प्रश्न आहेअसे मत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी व्यक्त केले.

रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ तसेच मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मंत्रालयात आयोजित वृत्तपत्र तसेच डिजिटल माध्यम पत्रकारांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षण कार्यशाळेत ते बोलत होते.

प्रधान सचिव ब्रिजेश सिंह म्हणाले की‘एआय’ हे सत्याचा स्रोत नाही. ते माहितीचे स्वरूप बदलू शकतातसारांश देऊ शकतातपण ते सत्य ठरवू शकत नाही. नव्या पिढीचे टूल्स (उदा. रिअल-टाइम सर्च करणारी AI) अनेक स्रोतांमधून माहिती गोळा करून त्वरित सारांश देऊ शकतात. हे पत्रकारांना त्वरित संदर्भ देऊन रिपोर्टिंग सोपे करतातपरंतु या माहितीचे स्रोत तपासणे आवश्यक असल्याचेही त्यांनी आर्वजून सांगितले. कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे मिळालेल्या संदर्भांवर मानवी पडताळणी नसतानाही निष्कर्ष देणे धोकादायक ठरू शकते. म्हणूनच मानवी नियमन आणि पडताळणी अनिवार्य असावीअसे त्यांनी ठळकपणे नमूद केले.

महाराष्ट्र राज्यातील गुंतवणुक संधीबाबत निवासी गुंतवणूक आयुक्त यांनी घेतली पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्री आणि फिक्कीच्या पदाधिकाऱ्यांची भेट

 महाराष्ट्र राज्यातील गुंतवणुक संधीबाबत निवासी गुंतवणूक आयुक्त यांनी घेतली

पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्री आणि फिक्कीच्या पदाधिकाऱ्यांची भेट

 

नवी दिल्ली, दि. 11 : महाराष्ट्र राज्यातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी तसेच उपलब्ध असलेल्या संधीबाबत महाराष्ट्र राज्याचे दिल्ली येथील  निवासी गुंतवणूक आयुक्त सुशील गायकवाड यांनी पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्री आणि फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री(फिक्की) च्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्रीच्या मुख्यालयात मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सरचिटणीस डॉ. रणजित मेहता यांच्यासोबत झालेल्या बैठकीत वेगाने बदलणाऱ्या महाराष्ट्रातील गुंतवणूक संधी तसेच त्याला अधिक चालना देण्यासाठी करावयाच्या योजना आणि अन्य अनुषंगाने सविस्तर चर्चा झाली. गायकवाड यांनी महाराष्ट्र शासनाचे उद्योग धोरणदेण्यात येणाऱ्या सेवासुविधा याबाबत सविस्तर माहिती दिली.

कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील निवासी गुंतवणूक आयुक्त यांच्या दालनात फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे (फिक्की)राज्य गुंतवणूक विभाग संचालक तरुण जैन आणि शिवम मोहले यांच्यासोबत महाराष्ट्रातील गुंतवणूक संधी याविषयी सविस्तर चर्चा झाली. यावेळी गायकवाड यांनी महाराष्ट्रातील वेगाने बदलणाऱ्या पायाभूत सुविधागुंतवणूक संधी आणि राज्याच्या जागतिक स्तरावरील प्रगतीविषयी सविस्तर माहिती दिली.

पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्री आणि फिक्कीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी चर्चे दरम्यान महाराष्ट्र राज्याच्या गुंतवणुकीला चालना देण्यासाठी सकारात्मकता दर्शविली.

0000000

अमृत दुर्गोत्सव २०२५’ या उपक्रमाद्वारे युनेस्को मान्यताप्राप्त १२ ऐतिहासिक गड-दुर्गांच्या प्रतिकृतींसोबत

 मुख्यमंत्री फडणवीस यांनी या यशाबद्दल अमृत’ संस्थेचे अभिनंदन केले. महाराष्ट्राची दुर्गसंस्कृती ही आपल्या इतिहासाचे प्रतीक आहे. अमृत दुर्गोत्सव’ या उपक्रमाद्वारे नव्या पिढीला या ऐतिहासिक वारशाशी जोडण्याचे उल्लेखनीय कार्य अमृत संस्थेने केले आहेअशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.

 

अमृत दुर्गोत्सव २०२५’ या उपक्रमाद्वारे युनेस्को मान्यताप्राप्त १२ ऐतिहासिक गड-दुर्गांच्या प्रतिकृतींसोबत सेल्फी काढून ते दुर्गोत्सवाच्या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करण्याचे आवाहन करण्यात आले होते. महाराष्ट्रासह देशातील विविध राज्ये आणि इतर देशातील नागरिकांनीही या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या उपक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येक नागरिकाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे डिजिटल अभिनंदनपत्र देण्यात आले.

अमृत दुर्गोत्सव २०२५’ला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा बहुमान ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रमाणपत्र केले सुपुर्द · महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी संस्थेच्या कार्याची जागतिक स्तरावर दखल

 अमृत दुर्गोत्सव २०२५ला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा बहुमान ;

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रमाणपत्र केले सुपुर्द

·         महाराष्ट्र संशोधनउन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी संस्थेच्या कार्याची जागतिक स्तरावर दखल

 

मुंबईदि. ११ : इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत कार्यरत असलेल्या महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) संस्थेच्या कार्याची जागतिक स्तरावर दखल घेण्यात आली आहे. संस्थेच्या अमृत दुर्गोत्सव २०२५’ या उपक्रमाने 'मानवी हातांनी तयार केलेल्या प्रतिकृतींचा सर्वात मोठा डिजिटल फोटो अल्बमया श्रेणीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नोंदविला आहे. या विक्रमाचे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रमाणपत्र देऊन अमृत संस्थेला सन्मानित करण्यात आले. या विक्रमाचे प्रमाणपत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सह्याद्री अतिथीगृहमुंबई येथे सुपुर्द करण्यात आले. 

 

हिंगोलीतील सुकळी साठवण तलावासाठी १२४ कोटींचा निधी

 हिंगोलीतील सुकळी साठवण तलावासाठी १२४ कोटींचा निधी

हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव तालुक्यातील सुकळी साठवण तलाव प्रकल्पास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.  या प्रकल्पासाठी १२४ कोटी ३६ लाख रुपयांची तरतूद करण्यास देखील मान्यता देण्यात आली.

            सुकळी साठवण तलाव लघु प्रकल्प आहे. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या अखत्यारित सुकळी गावाजवळील नाल्यावर ४.०७ द.ल.घ.मी. क्षमतेचे मातीचे धरण बांधण्यात येणार आहे. या प्रकल्पातून सेनगांव तालुक्यातील सुकळीआणि दाताळा गावातील एकूण ६७७ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.  तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. या प्रकल्पामुळे हिंगोली जिल्ह्यातील औद्योगिकरणशाश्वत शेती आणि इतर विकास कामांना चालना मिळणार आहे.

हिंगोलीतील डिग्रस साठवण तलावासाठी ९० कोटी ६१ लाखांचा निधी

 (जलसंपदा विभाग)

हिंगोलीतील डिग्रस साठवण तलावासाठी ९० कोटी ६१ लाखांचा निधी

हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली तालुक्यातील डिग्रस साठवण तलाव प्रकल्प आणि त्यासाठीच्या ९० कोटी ६१ लाख रुपयांच्या तरतुदीस मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. 

            डिग्रस साठवण तलाव लघु प्रकल्प आहे. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या अखत्यारितील हिंगोली जिल्ह्यातील डिग्रस गावाजवळील नाल्यावर ३.७१ द.ल.घ.मी. क्षमतेचे मातीचे धरण बांधण्यात येणार आहे. या प्रकल्पातून हिंगोली तालुक्यातील डिग्रसलोहगाव आणि दाटेगांव या गावातील ६०३ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.  तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. या प्रकल्पामुळे हिंगोली जिल्ह्यातील औद्योगिकरणशाश्वत शेती आणि इतर विकास कामांना चालना मिळणार आहे.

000

सहावा वित्त आयोग २७ मार्च २०२५ ला स्थापन करण्यात आला. या आयोगाला अहवाल व शिफारशी सादर करण्याची ३१ डिसेंबर २०२५ ही मुदत

  सहावा वित्त आयोग २७ मार्च २०२५ ला स्थापन करण्यात आला. या आयोगाला अहवाल व शिफारशी सादर करण्याची ३१ डिसेंबर २०२५ ही मुदत देण्यात आली होती. या दरम्यान आयोगाचे अध्यक्ष मुकेश खुल्लर यांचे अकाली निधन झाले. आता या सहाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी डॉ. नितीन करीर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हा आयोग १ एप्रिल २०२६ पासून सुरु होणाऱ्या पुढील पाच वर्षांच्या कालावधीसाठी अहवाल सादर करणार आहे.

त्यामुळे पाचव्या आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणीचा कालावधी आता १६ डिंसेबर २०२० ते ३१ मार्च २०२६ असा राहणार आहे. याबाबत वित्त विभागाला विधिमंडळाच्या मान्यतेसह आवश्यक त्या कार्यवाहीसाठी मान्यता देण्यात आली.

000

Featured post

Lakshvedhi