Monday, 3 November 2025

सुधारित अनुदान योजनेसाठी 14 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 सुधारित अनुदान योजनेसाठी 14 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई,दि.३ : अल्पसंख्याक विकास विभागामार्फत  अल्पसंख्याक बहुल शासनमान्य प्राप्त खासगी शाळाकनिष्ठ महाविद्यालयेऔद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी सुधारीत अनुदान योजना सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या अटी व शर्तींची पूर्तता करून विहित नमुन्यातील अर्जासह संपूर्ण प्रस्ताव जिल्हाधिकारि, मुंबई शहर (जुने जकात घरशहीद भगतसिंग मार्गफोर्टमुंबई – ४००००१) येथे १४ नोव्हेंबर२०२५ पर्यंत सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे.

अर्जाचा नमुना  https://mdd.maharashtra.gov.in यावर उपलब्ध आहे. निर्धारित दिनांकानंतर प्राप्त होणारे प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत. प्रस्ताव सादर करण्याचा अंतिम दिनांक  १४ नोव्हेंबर असूनजिल्हाधिकारी कार्यालयाने प्राप्त प्रस्तावांची छाननी करूनत्रुटींची पूर्तता करूनअंतिम पात्र प्रस्ताव शासनास सादर करण्याचा अंतिम दिनांक – १५ डिसेंबर२०२५ पर्यंत आहे.  अधिक माहितीसाठी जिल्हा नियोजन समितीजिल्हाधिकारी कार्यालयमुंबई शहर येथे अथवा  दूरध्वनी: ०२२-२२६६०१६७ई-मेल: dpomumbaicity@gmail.com  यावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

0000

झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठी 14 नोव्हेंबर पर्यंत प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

 . झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण  योजनेसाठी

14 नोव्हेंबर पर्यंत प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

 

मुंबई,दि.३ :अल्पसंख्याक विकास विभागामार्फत डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात राबविण्यात येत आहे.  राज्यातील धर्मादाय आयुक्त अथवा वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत आणि मुंबई शहर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील मदरसांनी या योजनेंतर्गत सुधारित प्रस्ताव सादर करण्यासाठी विहित अटी व शर्तींची पूर्तता करून विहित नमुन्यातील अर्जासह पूर्ण प्रस्ताव जिल्हाधिकारीमुंबई शहर (जुने जकात घरशहीद भगतसिंग मार्गफोर्टमुंबई – ४००००१) येथे १४ नोव्हेंबर२०२५ पर्यंत सादर करावे असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

 

अधिक माहिती  https://mdd.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. निर्धारित दिनांकानंतर प्राप्त होणारे प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीतयाची संबंधित मदरसांनी नोंद घ्यावी. मदरसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करण्याचा अंतिम दिनांक – १४ नोव्हेंबर२०२५

जिल्हाधिकारी कार्यालयाने शासनास प्रस्ताव सादर करण्याचा अंतिम दिनांक  १५ डिसेंबर२०२५ आहे. अधिक माहितीसाठी  जिल्हा नियोजन समितीजिल्हाधिकारी कार्यालयमुंबई शहर येथे अथवा,

दूरध्वनी: ०२२-२२६६०१६७ई-मेल: dpomumbaicity@gmail.com यावर संपर्क साधावा असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

 

0000


 


आदिवासी युवकांना मुख्य प्रवाहात आणणे, त्यांच्यात नेतृत्वगुण विकसित करणे

 या उपक्रमाचा उद्देश आदिवासी युवकांना मुख्य प्रवाहात आणणेत्यांच्यात नेतृत्वगुण विकसित करणे आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ करणे हा आहे. कार्यक्रमाचे आयोजन आणि संचालन अनुप इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत करण्यात आले. निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त फुलसिंग पवार यांनी प्रेरणादायी व्याख्यान दिले. या वेळी गृह मंत्रालयाच्या अवर सचिव पिंकी राणीतसेच पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सहभागी युवक-युवतींनी अभिप्राय सत्रात आपले अनुभव सांगितले. यावेळी सांस्कृतिक व भाषण स्पर्धेतील विजेत्यांचा चषक देऊन सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम आदिवासी युवकांमध्ये राष्ट्रीय एकतानेतृत्व व सांस्कृतिक जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने यशस्वीरीत्या संपन्न झालाअशी माहिती जिल्हा युवा अधिकारी अनुप इंगोले यांनी दिली.

0000

श्रद्धा मेश्राम/विसंअ

माय भारत ॲपद्वारे युवकांना रोजगाराच्या संधी

 माय भारत ॲपद्वारे युवकांना रोजगाराच्या संधी

-केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया

 १७ वा आदिवासी युवा आदान-प्रदान कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न

 

मुंबई,दि.३ : युवकांनी २०४७ पर्यंत विकसित भारत घडविण्यासाठी योगदान द्यावे. तसेचयुवकांना रोजगाराच्या संधी मिळण्यासाठी माय भारत पोर्टल मार्गदर्शक ठरणार आहे. या पोर्टलद्वारे युवकांना नोकरीच्या संधीकौशल्य विकासऑनलान स्पर्धा तसेच काम आणि विचारांची देवाणघेवाण यासंबंधीची सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होईल. युवकांनी डिजिटल उपस्थिती वाढवून या पोर्टलचा सक्रिय वापर करावाअसे आवाहन  केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी केले.

गृह मंत्रालयाच्या सहकार्याने युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालय आणि महाराष्ट्र राज्य पोलीस यांच्या समन्वयाने पोलीस प्रशिक्षण केंद्रमरोळ, येथे १७ वा आदिवासी युवा आदान-प्रदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमात विशेष पोलीस महानिरीक्षक (प्रशिक्षण विभाग) प्रवीण कुमार पडवळजिल्हा युवा अधिकारी (माय भारतमुंबई) अनुप इंगोलेपोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य रवींद्र दळवी आणि ज्युडो कार्यक्रम समन्वयक यतिन बांगरा आदी मान्यवर उपस्थित होते.

या उपक्रमाचा उद्देश आदिवासी युवकांना मुख्य प्रवाहात आणणेत्यांच्यात नेतृत्वगुण विकसित करणे आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ करणे हा आहे. कार्यक्रमाचे आयोजन आणि संचालन अनुप इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत करण्यात आले. निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त फुलसिंग पवार यांनी प्रेरणादायी व्याख्यान दिले. या वेळी गृह मंत्रालयाच्या अवर सचिव पिंकी राणीतसेच पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सहभागी युवक-युवतींनी अभिप्राय सत्रात आपले अनुभव सांगितले. यावेळी सांस्कृतिक व भाषण स्पर्धेतील विजेत्यांचा चषक देऊन सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम आदिवासी युवकांमध्ये राष्ट्रीय एकतानेतृत्व व सांस्कृतिक जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने यशस्वीरीत्या संपन्न झालाअशी माहिती जिल्हा युवा अधिकारी अनुप इंगोले यांनी दिली.

राष्ट्रीय सागरी मत्स्यव्यवसाय जनगणना २०२५चा नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ

 राष्ट्रीय सागरी मत्स्यव्यवसाय जनगणना २०२५चा नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ

 

मुंबई,दि.३ : भारतातील सागरी मत्स्यव्यवसाय क्षेत्र अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय सागरी मत्स्यव्यवसाय जनगणना २०२५ ला आज औपचारिक सुरुवात झाली. मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते मंत्रालय मुंबई येथे या जनगणनेचा शुभारंभ करण्यात आला. देशातील ही पाचवी सागरी मत्स्य जनगणना असून ती ३ नोव्हेंबर ते १८ डिसेंबर २०२५ दरम्यान पार पडणार आहे. केंद्रीय सागरी मात्स्यिकी संशोधन संस्था (सीएमएफआरआय)आणि मत्स्यव्यवसाय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबविली जात आहे.

जनगणनेची उद्दिष्टे व वैशिष्ट्ये

या मोहिमेचा उद्देश केवळ आकडेवारी गोळा करणे नसून देशातील सुमारे १२ लाख मत्स्यव्यवसायिक कुटुंबांची माहिती५६८ मासेमारी गावे आणि १७३ मत्स्य उतरण केंद्रे यांचा तपशीलवार अभ्यास करून सागरी क्षेत्रातील धोरणनिर्मिती व नियोजनाला दिशा देणे आहे. या अंतर्गत मच्छीमारांची सामाजिक-आर्थिक स्थितीपायाभूत सुविधाउपजीविका साधने आणि शासकीय योजनांच्या लाभांबाबतची माहिती संकलित केली जाणार आहे.

जनगणनेचे डिजिटायझेशन — व्यासएनव्ही प्रणालीद्वारे नवे युग प्रथमच ही जनगणना पूर्णतः डिजिटल प्लॅटफॉर्मवर राबवली जात आहे.

सीएमएफआरआय ने विकसित केलेल्या व्यासएनव्ही’ अॅप प्रणालीद्वारे गणकांना टॅबलेट पीसी वितरित करण्यात आले आहेत. या अत्याधुनिक प्रणालीमुळे डेटा संकलनात अचूकतापारदर्शकता आणि वेग येणार असून शासनाला धोरणनिर्मितीसाठी विश्वसनीय माहिती उपलब्ध होईल.


सर्वसामान्य नागरिकांना माफक दरात दंत विषयक आरोग्य सुविधा उपलब्ध

उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले कीहा सामंजस्य करार राज्याच्या सार्वजनिक आरोग्य सेवेतील नवा अध्याय आहे. या केंद्राच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना माफक दरात दंत विषयक आरोग्य सुविधा उपलब्ध होतील. आरोग्य म्हणजे केवळ कोणत्याही आजारावर उपचार नसून प्रतिबंधजनजागृतीशिक्षण आणि सेवा या चार घटकांचा योग्य समन्वय आहे. या केंद्राच्या स्थापनेतून हे ध्येय साध्य होईलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

इंडियन डेंटल असोसिएशन (आयडीए) ही संस्था देशभरातल्या दंतवैद्यांच्या सशक्त नेटवर्कमुळे अगदी गावखेड्यात दातांच्या आरोग्याविषयी जागृती करत आहे,असे सांगत उपमुख्यमंत्री पवार यांनी डेंटल असोसिएशनच्या कार्याचे कौतुक केले.

आरोग्य क्षेत्रात पायाभूत सुविधा उभारण्यास प्राधान्य

 आरोग्य क्षेत्रात पायाभूत सुविधा उभारण्यास प्राधान्य

-उपमुख्यमंत्री अजित पवार

 

औंध येथे बहुउद्देशीय दंत रुग्णालयसंशोधन केंद्र स्थापनेबाबत सामंजस्य करार

 

मुंबई दि.३ : कोरोनाच्या काळात आपल्याला आरोग्य विभाग वैद्यकीय शिक्षण विभागतेथील पायाभूत सुविधांचे महत्त्व लक्षात आले. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय तसेच त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यास राज्य शासनाने प्राधान्य दिले असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत इंडियन डेंटल असोसिएशनपुणे जिल्हा परिषद आणि जिल्हा शासकीय रुग्णालयऔंध यांच्यात औंध येथे बहुउद्देशीय दंत रुग्णालय आणि संशोधन केंद्र स्थापनेबाबत सामंजस्य करार करण्यात आला.

Featured post

Lakshvedhi