Monday, 3 November 2025

गेवराई तालुक्यातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी उपाययोजना करा

 गेवराई तालुक्यातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी

 उपाययोजना करा

– पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

 

मुंबई, दि.29 : बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील पाणीपुरवठा  समस्या तातडीने सोडवाव्यातअसे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

 

सह्याद्री अतिथीगृह  येथे सन २०२५ चे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लक्षवेधी अनुषंगाने बैठक झाली. या बैठकीस आमदार विजयसिंह पंडितपाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारेमंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बीड जिल्ह्यातील अधिकारी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी हे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

 

 गेवराई तालुक्यातील विविध गावांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या टंचाईबाबतजलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या योजनातसेच प्रलंबित कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी पाणीपुरवठा योजनांमध्ये गुणवत्ता राखून कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

मालेगाव तालुक्यातील काष्टी येथे शिवसृष्टी उभारण्यासाठी जागेच्या मागणीसंदर्भातही

 मालेगाव तालुक्यातील काष्टी येथे शिवसृष्टी उभारण्यासाठी जागेच्या मागणीसंदर्भातही बैठकीत चर्चा झाली.  या शिवसृष्टी संदर्भातील सविस्तर प्रकल्प अहवाल घेण्याचे निर्देश देऊन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी स्वतः या जागेची पाहणी करावी असे त्यांनी सांगितले. तसेच जागा देण्यासंदर्भात महामंडळशासन आणि मालेगाव नगरपालिका यांच्यात सामंजस्य करार करण्याबाबतची शक्यता पडताळून पाहावी. तसेच महामंडळाच्या विविध उपक्रमांसाठी सल्लागाराची नियुक्ती करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

बैठकीत महाराष्ट्र राज्य शेती विकास महामंडळाच्या नवीन वेबसाइटचे उद्घाटनही महसूल मंत्री  बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले.

0000

शेती महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी १५ दिवसात घराचा आराखडा तयार करा

 शेती महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी १५ दिवसात घराचा आराखडा तयार करा

-महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

·         संचालक मंडळाच्या बैठकीत १८ विषयांना मान्यतानवीन वेबसाईटचेही उद्घाटन

मुंबईदि. २९:- महाराष्ट्र राज्य शेती विकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल देण्यासाठीचा सविस्तर आराखडा येत्या १५ दिवसांत तयार करण्याचे निर्देश देत महामंडळाने मळ्यानुसार कर्मचाऱ्यांची यादी अंतिम करावी आणि याबाबतचा सविस्तर अहवाल पुढील बैठकीत सादर करावाअशा सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या.

महसूल मंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य शेती विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची ३२९ वी बैठक झाली. या बैठकीत १८ विषयांना मान्यता देण्यात आली. मंत्रालयात झालेल्या या बैठकीस शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसेमहसूल राज्यमंत्री योगेश कदममहसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगेमहामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक मंजिरी मनोलकरउपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मल आदी उपस्थित होते.

या बैठकीत महामंडळाच्या जमिनींच्या वापरासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. सौर ऊर्जा प्रकल्पासाठी महामंडळाकडील जमिनीची मागणी असल्याससंबंधित प्रस्ताव 'महाऊर्जामार्फतच सादर केले जावेतअसे निर्देश महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिले. तसेच गावठाण विस्ताराव्यतिरिक्त अन्य कारणांसाठी जमिनीची मागणी आल्यासअशा प्रकरणी जागा भाडेतत्वावर देणे किंवा सामंजस्य करार करण्यास प्राधान्य द्यावे. यामुळे शेती महामंडळाकडील जमिनीचा ताबा महामंडळाकडेच कायम राहीलअसेही महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केले.

मेरीटाईम वीक मुळे सागरी व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील तंत्रज्ञान नवसंकल्पनांची देवाण घेवाण

 मेरीटाईम वीक मुळे सागरी व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील

तंत्रज्ञान नवसंकल्पनांची देवाण घेवाण

-केंद्रीय बंदरे मंत्री सर्बानंद सोनोवाल

केंद्रीय बंदरेजहाज वाहतूक आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी प्रास्ताविक करताना भारत आता स्वतःची जहाज बांधणारा देश झाला असल्याचे सांगितले. ते म्हणालेजागतिक स्तरावरील सागरी उद्योगातील नेतृत्व या परिषदेच्या निमित्ताने येथे एकत्र आले आहेत. त्यांच्यामुळे सागरी व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील तंत्रज्ञान आणि नवसंकल्पनांची देवाण घेवाण होत आहे. याचा फायदा देशाच्या सागरी उद्योग आणि व्यापार क्षेत्राला होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे देशाच्या सागरी उद्योग आणि व्यापार क्षेत्राने नवी उंची गाठली असून सागरी उद्योग आणि व्यापार क्षेत्रात जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता भारतात निर्माण झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

00000

महाराष्ट्रात सागरी उद्योग क्षेत्रात गुंतवणुकीच्या मोठ्या संधी

 महाराष्ट्रात सागरी उद्योग क्षेत्रात गुंतवणुकीच्या मोठ्या संधी

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीगेल्या तीन दिवसांपासून इंडिया मेरीटाईम वीक २०२५ मध्ये चांगल्या प्रकारे विचार मंथन होत आहे. या माध्यमातून सागरी उद्योग आणि व्यापारातील नवतंत्रज्ञान जगापर्यंत पोहचविण्याचे काम झाले आहे. इंडिया मेरीटाईम वीक २०२५ महाराष्ट्रासाठी फलदायी ठरले असून यामध्ये महाराष्ट्राने विविध देशांसोबत ५६ हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले आहेत. त्यामध्ये जहाज बांधणीजहाज दुरुस्तीपुनर्वापरबंदर उभारणेविकासक्षमतावाढ यासह सागरी उद्योग क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ निर्मितीच्या दृष्टीने कौशल्य विकास या विषयांचा समावेश आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या धोरण आणि दूरदृष्टीमुळे देशाच्या सागरी क्षेत्राचा मोठा विकास झाला आहे. जवाहरलाल नेहरू पोर्टची क्षमतावाढ करण्यात आली आहे. त्यामुळे हे बंदर आज देशातील सर्वात मोठे कंटेनर हँडलिंग पोर्ट म्हणून ओळखले जात आहे. तर वाढवण सारखे जागतिक दर्जाचे बंदर महाराष्ट्रात उभारले जात आहे. यामुळे महाराष्ट्राची जागतिक ओळख निर्माण झाली आहे. सागरी उद्योग आणि व्यापारक्षेत्रातील गुंतवणुकीसाठी भारत हा जागतिक केंद्र आहे. महाराष्ट्रात या क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी मोठ्या संधी उपलब्ध आहेत. जागतिक कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावीअसे आवाहनही त्यांनी केले.

ऊसतोड कामगारांच्या आरोग्य सेवेसाठी

 ऊसतोड कामगारांच्या आरोग्य सेवेसाठी त्यांच्या कामाच्या ठिकाणी  आठवड्यातून फिरता  दवाखाना व  महिला कामगारांसाठी स्त्री रोग तज्ज्ञांची देखील सुविधा उपलब्ध करून द्यावी. तसेच महिला ऊसतोड कामगारांसाठी प्रसूती रजा मातृत्व योजनेचा लाभ देण्याबाबतही विचार करण्यात यावाअसेही उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले.

ऊसतोड कामगार हे राज्याच्या साखर उद्योगाचे कणा आहेत. अवकाळी

 उपसभापती म्हणाल्या डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले कीऊसतोड कामगार हे राज्याच्या साखर उद्योगाचे कणा आहेत. अवकाळी पावसामुळे त्यांचे नुकसान होत असूनत्यांच्या अडचणींचा विचार करून तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्यामुळे गमबूटइलेक्ट्रिक कोयतासॅनिटरी नॅपकिनग्ल्वोहज  या आवश्यक गोष्टी वेळेत मिळण्यासाठी डीबीटीद्वारे मदत देणे सुलभ होईल. त्याचसोबत फिरत्या स्वच्छतागृहांची व्यवस्था ग्रामीण विकास विभागामार्फत व संबंधित विभागामार्फत करण्याच्या न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी गरजेची आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

Featured post

Lakshvedhi