मालेगाव तालुक्यातील काष्टी येथे शिवसृष्टी उभारण्यासाठी जागेच्या मागणीसंदर्भातही बैठकीत चर्चा झाली. या शिवसृष्टी संदर्भातील सविस्तर प्रकल्प अहवाल घेण्याचे निर्देश देऊन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी स्वतः या जागेची पाहणी करावी असे त्यांनी सांगितले. तसेच जागा देण्यासंदर्भात महामंडळ, शासन आणि मालेगाव नगरपालिका यांच्यात सामंजस्य करार करण्याबाबतची शक्यता पडताळून पाहावी. तसेच महामंडळाच्या विविध उपक्रमांसाठी सल्लागाराची नियुक्ती करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
बैठकीत महाराष्ट्र राज्य शेती विकास महामंडळाच्या नवीन वेबसाइटचे उद्घाटनही महसूल मंत्री बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले.
0000
No comments:
Post a Comment