Monday, 3 November 2025

शेती महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी १५ दिवसात घराचा आराखडा तयार करा

 शेती महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी १५ दिवसात घराचा आराखडा तयार करा

-महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

·         संचालक मंडळाच्या बैठकीत १८ विषयांना मान्यतानवीन वेबसाईटचेही उद्घाटन

मुंबईदि. २९:- महाराष्ट्र राज्य शेती विकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल देण्यासाठीचा सविस्तर आराखडा येत्या १५ दिवसांत तयार करण्याचे निर्देश देत महामंडळाने मळ्यानुसार कर्मचाऱ्यांची यादी अंतिम करावी आणि याबाबतचा सविस्तर अहवाल पुढील बैठकीत सादर करावाअशा सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या.

महसूल मंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य शेती विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची ३२९ वी बैठक झाली. या बैठकीत १८ विषयांना मान्यता देण्यात आली. मंत्रालयात झालेल्या या बैठकीस शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसेमहसूल राज्यमंत्री योगेश कदममहसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगेमहामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक मंजिरी मनोलकरउपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मल आदी उपस्थित होते.

या बैठकीत महामंडळाच्या जमिनींच्या वापरासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. सौर ऊर्जा प्रकल्पासाठी महामंडळाकडील जमिनीची मागणी असल्याससंबंधित प्रस्ताव 'महाऊर्जामार्फतच सादर केले जावेतअसे निर्देश महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिले. तसेच गावठाण विस्ताराव्यतिरिक्त अन्य कारणांसाठी जमिनीची मागणी आल्यासअशा प्रकरणी जागा भाडेतत्वावर देणे किंवा सामंजस्य करार करण्यास प्राधान्य द्यावे. यामुळे शेती महामंडळाकडील जमिनीचा ताबा महामंडळाकडेच कायम राहीलअसेही महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi