Monday, 3 November 2025

संतांचे विचार आणि वारकरी परंपरा ही समाजाला ऊर्जा देणारी आहे

 संतांचे विचार आणि वारकरी परंपरा ही समाजाला ऊर्जा देणारी आहे

            - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

शेगाव दुमाला येथे श्री संत ज्ञानेश्वर मोरे माऊली महाराज समाधी

मंदिराचे उद्घाटन व भक्तनिवासाचे लोकार्पण

 

       पंढरपूरदिनांक 2: - वारकऱ्यांची सेवा हीच खरी विठ्ठल सेवा आहे. आषाढी आणि कार्तिकी वारीत येणारा वारकरी हा आमचा प्रथम व्हीआयपी आहे. संतांचे विचार आणि वारकरी परंपरा ही समाजाला ऊर्जा देणारी आहेअसे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

    शेगाव दुमाला येथे श्री संत ज्ञानेश्वर मोरे माऊली महाराज यांच्या समाधी मंदिराचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालेत्याप्रसंगी ते मार्गदर्शन करत होते. यावेळी रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री भरत गोगावलेमहसूल राज्यमंत्री योगेश कदममाजी मंत्री  व मोठ्या संख्येने वारकरी उपस्थित होते.


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅटच्या वापराबाबत कायद्यांत तरतूद नाही

 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये

व्हीव्हीपॅटच्या वापराबाबत कायद्यांत तरतूद नाही

मुंबईदि. 29 (रानिआ): स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांशी संबंधित कायदे किंवा नियमांमध्ये व्हीव्हीपॅटचा वापर करण्याबाबत तरतूद नाही. शिवाय काही अपवाद वगळता जवळपास सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार घेण्यात येतात. त्यासाठी व्हीव्हीपॅट जोडणीची सुविधा असलेले मतदान यंत्र विकसित करण्याबाबत देशातील सर्व राज्य निवडणूक आयोगांची टेक्निकल इव्हॅल्यूएशन कमिटी’ (टीईसी) अभ्यास करीत असून त्यांचा अद्याप अंतिम अहवाल सादर झालेला नाही. त्यामुळे सद्य:स्थितीत या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅटचा वापर करणे शक्य नाहीअसे स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयोगाने केले आहे.

संभाव्य दुबार नाव असलेल्या मतदाराकडून

 संभाव्य दुबार नाव असलेल्या मतदाराकडून प्रतिसाद न मिळाल्यास असा मतदार मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी आल्यास त्या मतदाराकडून त्याचे नाव असलेल्या इतर कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान केले नसल्याबाबत विहित नमुन्यातील हमीपत्र लिहून घेण्यात येईल. अशा मतदाराची काटेकोरपणे ओळख पटल्यानंतरच त्याला मतदान करण्याची मुभा देण्यात येईल.

0-0-0

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रारुप अथवा अंतिम मतदार यादीतील संभाव्य दुबार मतदाराच्या नावासमोर (*

 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रारुप अथवा अंतिम मतदार यादीतील संभाव्य दुबार मतदाराच्या नावासमोर (**) असे चिन्ह नमूद करण्यात येते. ही संभाव्य दुबार मतदारांबाबत स्थानिकरित्या तपासणी करून ती खरोखरच एकाच व्यक्तीची आहे किंवा वेगळ्या व्यक्तींची आहेयाबाबत तपासणी/ खात्री केली जाईल. मतदाराचे नावलिंगपत्ता व छायाचित्र याची प्राथमिक तपासणीनंतर त्यांत साम्य आढळून त्या मतदाराकडून तो नेमका कोणत्या प्रभागातीलजिल्हा परिषद निवडणूक विभागातील/पंचायत समितीच्या गणातील मतदान केंद्रावर मतदान करणार आहेयाबाबत विहित नमुन्यात अर्ज घेतला जाईल. अशा मतदारास उर्वरित कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान करता येणार नाही. 

मतदार यादीतील संभाव्य दुबार नावांबाबत उपाययोजना करण्याचे राज्य निवडणूक आयोगाचे आदेश

 मतदार यादीतील संभाव्य दुबार नावांबाबत

उपाययोजना करण्याचे राज्य निवडणूक आयोगाचे आदेश

 

मुंबईदि. 29 (रानिआ): राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पारदर्शकता आणि अचूकता राखण्यासाठी मतदार याद्यांमधील संभाव्य दुबार नावांची तपासणी करून योग्य ती दक्षता घ्यावी व दिलेल्या आदेशानुसार कार्यवाही करावीअसे निर्देश सर्व संबंधितांना राज्य निवडणूक आयोगाने आज दिले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी लागू असलेल्या अधिनियमांच्या तरतुदीनुसार भारत निवडणूक आयोगाने तयार केलेली विधानसभा मतदारसंघाची मतदार यादी स्थानिक स्वराज्‍य संस्थांच्या सर्व निवडणुकांसाठी जशीच्या तशी वापरली जाते. तिचे केवळ महानगरपालिकानगरपरिषदानगरपंचायती व ग्रामंपचायतींच्या निवडणुकासाठी प्रभागनिहायतसेच जिल्हा परिषद निवडणूक विभाग आणि पंचायत समिती निर्वाचक गणनिहाय विभाजीत केली जाते. या मतदार याद्यांचे विभाजन करताना विधानसभा मतदारसंघाच्या मूळ यादीप्रमाणेच मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात.

शासनाच्या सकारात्मक भूमिकेचे

 आमदार  गोपीचंद पडळकर आणि सरपंच प्रतिनिधींनी शासनाच्या सकारात्मक भूमिकेचे स्वागत केले. नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने  घेतल्या जाणाऱ्या या निर्णयाबद्दल सर्वांनी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानले.

 

 जत तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांची अंमलबजावणी गतीमान करण्यासाठी आवश्यक निधीतांत्रिक साहाय्य देण्यात येणार असल्याचे मंत्री गुलाबराव पाटील यावेळी सांगितले.

जत तालुक्यातील २९ गावांना स्वच्छ आणि पुरेसा पाणी पुरवठा करावा

 जत तालुक्यातील २९ गावांना स्वच्छ आणि पुरेसा पाणी पुरवठा करावा

-         पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

 

मुंबईदि. २९ : जत तालुक्यातील प्रत्येक गावापर्यंत स्वच्छ आणि पुरेशा पाण्याचा पुरवठा करण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे जत तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांबाबत सविस्तर आढावा बैठक झाली.

 

बैठकीस आमदार गोपीचंद पडळकरपाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारेमंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी तसेच जत तालुक्यातील संबंधित अधिकारीसरपंचप्रतिनिधी उपस्थित होते.

 

 पाटबंधारे विभागाच्या विस्तारित म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचा आढावा यावेळी घेण्यात आला. १५ लघुपाटबंधारे तलावांची कामे प्रगतीपथावर आहेत. २९ गावांसाठी स्वतंत्र नळ पाणीपुरवठा योजना राबविण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल. या योजनेमुळे प्रत्येक गावाला स्वतंत्र व स्थिर जलपुरवठा उपलब्ध होईल आणि नागरिकांवरील पाणी बिलाचा भारही कमी होईल.

Featured post

Lakshvedhi