जत तालुक्यातील २९ गावांना स्वच्छ आणि पुरेसा पाणी पुरवठा करावा
- पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील
मुंबई, दि. २९ : जत तालुक्यातील प्रत्येक गावापर्यंत स्वच्छ आणि पुरेशा पाण्याचा पुरवठा करण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे जत तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांबाबत सविस्तर आढावा बैठक झाली.
बैठकीस आमदार गोपीचंद पडळकर, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी तसेच जत तालुक्यातील संबंधित अधिकारी, सरपंच, प्रतिनिधी उपस्थित होते.
पाटबंधारे विभागाच्या विस्तारित म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचा आढावा यावेळी घेण्यात आला. १५ लघुपाटबंधारे तलावांची कामे प्रगतीपथावर आहेत. २९ गावांसाठी स्वतंत्र नळ पाणीपुरवठा योजना राबविण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल. या योजनेमुळे प्रत्येक गावाला स्वतंत्र व स्थिर जलपुरवठा उपलब्ध होईल आणि नागरिकांवरील पाणी बिलाचा भारही कमी होईल.
No comments:
Post a Comment