Friday, 3 October 2025

टपाली मतपत्रिकांच्या मोजणी प्रक्रियेत आणखी सुधारणा

 टपाली मतपत्रिकांच्या मोजणी प्रक्रियेत आणखी सुधारणा

 

मुंबईदि. २५ : निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने गेल्या सहा महिन्यांत विविध उपक्रम राबवले आहेत. त्याचाच पुढचा टप्पा म्हणून आयोगाने टपाली मतपत्रिकांच्या मोजणीची प्रक्रिया अधिक सुलभ व स्पष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.

मतपत्रिका / इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील टपाल मतपत्रिका यांची मोजणी आणि ईव्हीएमद्वारे मोजणी ह्या आयोगाच्या मतमोजणी प्रक्रियेतील दोन प्रमुख टप्पे आहेत. मतमोजणीच्या दिवशी सकाळी 8 वाजता टपाली मतपत्रिकांची मोजणी सुरू होतेतर सकाळी ८.३० वाजल्यापासून ईव्हीएमची मोजणी सुरू होते. पूर्वीच्या निर्देशांनुसारईव्हीएमची मोजणी टपाली मतपत्रिकांच्या मोजणीपासून स्वतंत्रपणे सुरू राहू शकत होतीत्यामुळे काहीवेळा ईव्हीएमची मोजणी टपाल मतपत्रिकांपूर्वी पूर्ण होण्याची शक्यता निर्माण होत असे.

अलीकडेच दिव्यांग मतदार व ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना घरबसल्या मतदानाची सोय उपलब्ध करून दिल्यामुळे टपाली मतपत्रिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे संपूर्ण प्रक्रियेत सुसंगती आणि स्पष्टता राखण्यासाठी ईव्हीएम/व्हीव्हीपॅटच्या मोजणीतील शेवटून दुसरी फेरी  टपाल मतपत्रिकांची मोजणी पूर्ण झाल्यानंतरच सुरू करण्याचा आयोगाने निर्णय घेतला आहे.

याशिवायज्या मतदारसंघांमध्ये टपाल मतपत्रिकांची संख्या मोठी आहेतिथे पुरेशा संख्येने टेबल्स आणि मोजणी कर्मचारी उपलब्ध करून देण्याचे निर्देश आयोगाने संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले आहेतजेणेकरून मतमोजणीची गती आणि पारदर्शकता कायम राहीलअसे भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

राज्य महोत्सव गणेशोत्सवाची व्यापकता राष्ट्रीय आतंरराष्ट्रीय स्तरावर वाढवणार

 राज्य महोत्सव गणेशोत्सवाची व्यापकता

राष्ट्रीय आतंरराष्ट्रीय स्तरावर वाढवणार

- सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या पारितोषिकांचे वितरण

मुंबई, दि. २५ : महाराष्ट्राची परंपरा असेलल्या गणेशोत्सवाला राज्य शासनाने राज्य महोत्सवाचा दर्जा दिला असून सामाजिक सौहार्दकला संस्कृतीचे  प्रतिक असलेल्या  गणेशोत्सवाची व्यापकता येत्या काळात राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढवणार असल्याचे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य, माहिती व तंत्रज्ञान मंत्री  ॲड.आशिष शेलार यांनी केले.

प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिरात आयोजित महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या राज्य व जिल्हास्तरीय  पारितोषिक वितरण  कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार बोलत होते. 

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.शेलार म्हणाले कीराज्यातील ऐतिहासिक बारा गडकिल्ल्यांना युनेस्कोद्वारा जागतिक वारसा मानांकन प्राप्त झाले आहे. महाराष्ट्रात गणेशोत्सवाला शंभर वर्षांची  प्रदिर्घ परंपरा लाभलेली आहे. आज देशविदेशात विविध ठिकाणी हा उत्सव उल्हासात साजरा केला जातो. सामजिक एकोपाराष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढीस लावणारा आणि लोककलालोकसंस्कृतीलोकसंवाद यांना बळ देणारा गणेशोत्सव  हा सर्वधर्मीयसौहार्द जोपासणारा महत्त्वाचा उत्सव आहे. त्याची व्यापकता ही राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत वाढवण्याचा शासनाचा मानस असून यादृष्टीने देशातील विविध राज्यात तसेच विदेशांमध्येही विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहे. या उत्सवात सक्रियपणे सहभागी होणाऱ्या गणेशमंडळांच्या कामांची दखल घेत नाविन्यपूर्ण आणि सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या गणेशोत्सव मंडळाच्या कामांना प्रोत्साहन देण्याच्या व्यापक उद्देशाने शासनाने महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या राज्यस्तरीय तसेच जिल्हास्तरापर्यंत असलेल्या स्पर्धां तालुकास्तरापर्यंत घेण्याचा निर्णय घेऊन यावर्षीपासून स्पर्धेत तालुकास्तराचा समावेश केला. या स्पर्धांमध्ये मोठ्या संख्येने गणेशमंडळानी सहभाग घेत उत्तम प्रतिसाद दिल्याबद्दल तसेच सर्व विजेत्या मंडळांचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. शेलार यांनी अभिनंदन केले.

स्‍वच्‍छतेबरोबरच पर्यावरण संवर्धनासाठी बृहन्‍मुंबई महानगरपालिकेने एक लाखापेक्षा....

 उपमुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे म्‍हणालेस्‍वच्‍छतेबरोबरच पर्यावरण संवर्धनासाठी बृहन्‍मुंबई महानगरपालिकेने एक लाखापेक्षा अधिक वृक्षारोपण केले आहे. नागरी वनेउद्यानांची देखभाल केली जात आहे. 'हरित क्षेत्रवाढवण्‍यावर भर दिला जात आहे. महालक्ष्‍मी रेसकोर्सची जागा उद्यानासाठी घेण्‍यात आली आहे. मुंबई किनारी मार्ग आणि महालक्ष्‍मी रेसकोर्स मैदान मिळून सुमारे ३०० एकर जागेवर 'मुंबई सेंट्रल पार्कचे काम लवकरच सुरु होईल. जागतिक दर्जाच्‍या सेंट्रल पार्कचा सविस्‍तर प्रकल्‍प अहवाल (डीपीआर) तयार झाला आहे. खड्डेमुक्‍त रस्‍त्‍यांसाठी रस्ते काँक्रिटीकरण करण्‍यात येत आहे. पुढील दीड - दोन वर्षात मुंबईतील संपूर्ण रस्‍त्‍यांचे काँक्रिटीकरण पूर्ण करण्‍याचे उद्दिष्‍ट असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आयुक्त भूषण गगराणी यांनी देखील मनोगत व्यक्त केले.

संपूर्ण देशात तसेच राज्यात आज 'एक तास स्वच्छतेसाठी' अभियान सुरु

 उपमुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे म्‍हणाले कीसंपूर्ण देशात तसेच राज्यात आज 'एक तास स्वच्छतेसाठीअभियान सुरु आहे. हे अभियान वर्षभर सातत्याने सुरु ठेवायचे आहे. प्रत्येक नागरिकाने स्‍वच्‍छतेसाठी पुढाकार घेतल्‍यास देशामध्ये क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. स्वच्छ भारत अभियानाच्या निमित्ताने देशात कोट्यवधी स्वच्छतागृहे उभी राहिली. पिण्‍याचे शुद्ध पाणी कोट्यवधी लोकांच्या घरापर्यंत पोहोचले आहे. स्वच्छतेचे महत्व पटवून देणारे महाराष्‍ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. नगरविकास विभागाने घनकचरा टाकण्‍यात येणारी सुमारे १९ हजार ९४० ठिकाणे शोधून काढली आहेत. त्‍यांच्‍या स्‍वच्‍छतेचे लक्ष्‍य निश्चित करण्‍यात आले आहे. राज्यभर स्‍वच्‍छताविषयक लोकसहभागाचे ६ हजार ३१७ कार्यक्रम होणार आहेत. स्‍वच्‍छता मित्रांसाठी आरोग्‍य शिबिरे घेण्यात येणार आहेत. त्याचबरोबर स्वच्छ हरित महोत्सवदेखील घेण्‍यात येणार आहे. यासमवेतच प्रभात फेरीस्वच्छता कामगार सन्मानपायाभूत सुविधांचे लोकार्पणसर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा सन्मानसर्वोत्कृष्ट नागरी स्वयंसेवक सन्मान असे विविध उपक्रम स्वच्छता ही सेवा’ या अभियानामध्ये राबविले जाणार आहेतअसे देखील एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कार्याची दखल घेऊन बृहन्‍मुंबई महानगरपालिकेने स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या ज्या वसाहती आहेतत्‍या ठिकाणी अधिकाधिक सुविधा पुरविण्‍याचे काम हाती घेतले आहे. त्यांच्या मुलांना गुणवत्‍तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी अनेक योजना राबविल्‍या जात आहेत. स्वच्‍छता कर्मचारी आणि त्‍यांच्‍या कुटुंबीयांसाठी महानगरपालिका आरोग्‍य शिबिरे घेत आहेहे निश्चितच कौतुकास्‍पद आहे. बृहन्‍मुंबई महानगरपालिकेने यापूर्वी 'डीप क्लीन ड्राईव्हअभियान राबविले. अभियानाच्या माध्यमातून मोठे काम झाले. त्याचा मोठा परिणाम झाला. अशाच प्रकारचे स्‍वच्‍छता अभियान पुन्‍हा राबवायचे आहेअसेही त्यांनी सांगितले.

मुंबईकरांच्या निरोगी आरोग्यासाठी स्वच्छता मोहीम निरंतर सुरू राहणार

 मुंबईकरांच्या निरोगी आरोग्यासाठी 

स्वच्छता मोहीम निरंतर सुरू राहणार

-         उपमुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई महानगरपालिकेच्या ए विभागात 'स्वच्छता ही सेवा २०२५या अभियानांतर्गत श्रमदान

 

मुंबईदि. २५ : मुंबई महापालिकेच्या सफाई कामगार आणि कर्मचाऱ्यांमुळे मुंबई स्वच्छसुंदर आणि हिरवीगार आहे. मुंबईकरांचे आरोग्य सुदृढ आहे. स्वच्छता कर्मचारी हे स्वच्छतेचे दूतवास्‍तवातील 'हिरोआहेत. मुंबईकरांच्या आरोग्यासाठी आणि स्वच्छ-सुंदर शहरासाठी सखोल स्वच्छता मोहीम (डीप क्लीन ड्राईव्‍ह) सातत्याने सुरू राहीलअशी ग्वाही उपमुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. स्‍वच्‍छतेबरोबरच पर्यावरण संवर्धनासाठी बृहन्‍मुंबई महानगरपालिका विविध उपाययोजना राबवित असून त्‍याचे अनुकरण राज्‍यातील इतर महानगरपालिकांनी करावेअसे आवाहन उपमख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

'स्वच्छता ही सेवा २०२५या अभियानांतर्गत 'स्‍वच्‍छोत्‍सवउपक्रम राबविण्‍यात येत आहे. त्‍याचाच एक भाग म्‍हणून उपमुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्‍ते आणि कौशल्‍यरोजगारउद्योजकता आणि नाविन्‍यता मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्ह्याचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्‍या प्रमुख उपस्थितीत सामूहिक श्रमदान करण्यात आले.

थॅलेसेमियामुक्त महाराष्ट्रासाठी सामाजिक संस्थांच्या सहकार्याने मोहीम राबविणार -

 थॅलेसेमियामुक्त महाराष्ट्रासाठी सामाजिक संस्थांच्या

 सहकार्याने मोहीम राबविणार

-         राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

 

   मुंबईदि. 01 : राज्यातील थॅलेसेमिया रुग्णसंख्या वाढू नये तसेच सध्या असलेल्या रुग्णांचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने शासनाने थॅलेसेमियामुक्त महाराष्ट्र मोहीम राबविण्याचा संकल्प केला आहे. या उपक्रमात सामाजिक संस्थांचे सहकार्य महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर यांनी म्हटले.

 

    राज्यमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली निर्मल भवन येथे एक पाऊल थॅलेसेमियाकडे या बाबत आढावा बैठक झाली. या बैठकीस सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपसचिव विलास बेद्रेसंकल्प इंडिया फाउंडेशनचे रजत अग्रवालथॅलेसेमिया ग्रुपचे राज्य समन्वयक डॉ. लक्ष्मीकांत पिंपळगावकररोटरी क्लबच्या रेखा पटवर्धन तसेच विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 

राज्यमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर म्हणाल्याथॅलेसेमिया हा अनुवंशिक आजार असून वेळेवर तपासणी व काळजी घेतल्यास या आजारावर नियंत्रण मिळवणे शक्य आहे. थॅलेसेमियाच्या निदानासाठी रुग्णालयामध्ये काही विशिष्ट तपासण्या अनिवार्य केल्या आहेत. यामुळे वेळेवर निदान होऊन पुढील पिढीत हा आजार पसरण्या

*पुणे जिल्हा परिषदेची जालिंदरनगर शाळा जागतिक क्रमवारीत प्रथम*

 *पुणे जिल्हा परिषदेची जालिंदरनगर शाळा जागतिक क्रमवारीत प्रथम*

*शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची माहिती*

 

मुंबईदि. 1 - भारतीय शाळा जगात सर्वोत्कृष्ट ठरणे हे जागतिक पातळीवर भारतीय शिक्षण पद्धतीला जगमान्यता मिळण्यासारखे आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या शाळेचे जगात सर्वोत्कृष्ट ठरणे हा क्षण देश आणि राज्याच्या शासकीय शिक्षण व्यवस्थेसाठी कलाटणी देणारा क्षण आहेअसे गौरवोद्गार शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी काढले.

 

पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील जालिंदरनगर येथील जिल्हा परिषद शाळा, एज्युकेशन या इंग्लंड येथे मुख्यालय असणाऱ्या जागतिक संस्थेने आयोजित केलेल्या वर्ल्ड बेस्ट स्कूल कॉम्पिटिशन’ स्पर्धेमध्ये जगभरातील समुदायाने पसंती क्रमानुसार केलेल्या मतदानानुसार सर्वाधिक मते मिळवून कम्युनिटी चॉइस ॲवॉर्ड’ या मानाच्या विभागात सर्वोत्कृष्ट ठरली. लोकसहभागातून विकसित जिल्हा परिषदेची ही शाळा आहे. या शाळेला एक कोटी रुपयांचा पुरस्कार मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री दादाजी भुसे यांनी आज मालेगाव येथे पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

 

मंत्री दादाजी भुसे यांनी या शाळेतील शिक्षक दत्तात्रय वारे यांच्यासह मुख्याध्यापकसर्व शिक्षकव्यवस्थापन समितीविद्यार्थी व ग्रामस्थांना शुभेच्छा देत अभिनंदन केले. ते म्हणालेआपण केवळ एका शाळेला जिंकवण्यासाठी प्रयत्न केला नसून संपूर्ण शासकीय शाळा व भारतीय शिक्षण पद्धतीला जगमान्य व सक्षम करण्याचे काम केले आहे. आपल्याला समाजाचे आणि देशाचे गतवैभव परत आणायचे असेलतर भारतातील एका शासकीय शाळेचे जगात सर्वोत्कृष्ट होण्यासाठी हे घडणे गरजेचे होते. त्यासाठी आपण सर्वांनी आपले कर्तव्य समजून या चळवळीचे नेतृत्व केले व एका भारतीय व शासकीय शाळेला जगात सर्वोत्तम बनवले.

 

विद्यार्थ्यांना आनंददायी व गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या जालिंदरनगर शाळेचे उपक्रम शिक्षण विभागाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात राबविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतीलजालिंदरनगर शाळा ही एकमेव भारतीय व जिल्हा परिषदेची शासकीय शाळा असून लोकसहभागातून विकास करत शाळेने अव्वल स्थान मिळविले आहे. प्रगत देशातील व खासगी क्षेत्रातील लाखो शाळांना मागे सोडून सरकारी शाळा इथपर्यंत पोहोचलेली आहे. शासकीय शाळांची क्षमता सिद्ध करणारा आणि सर्वांचा आत्मविश्वास वाढवणारा हा निकाल आहे.

Featured post

Lakshvedhi