Tuesday, 30 September 2025

मुंबईकरांच्या निरोगी आरोग्यासाठी स्वच्छता मोहीम निरंतर सुरू राहणार

 मुंबईकरांच्या निरोगी आरोग्यासाठी 

स्वच्छता मोहीम निरंतर सुरू राहणार

-         उपमुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई महानगरपालिकेच्या ए विभागात 'स्वच्छता ही सेवा २०२५या अभियानांतर्गत श्रमदान

 

मुंबईदि. २५ : मुंबई महापालिकेच्या सफाई कामगार आणि कर्मचाऱ्यांमुळे मुंबई स्वच्छसुंदर आणि हिरवीगार आहे. मुंबईकरांचे आरोग्य सुदृढ आहे. स्वच्छता कर्मचारी हे स्वच्छतेचे दूतवास्‍तवातील 'हिरोआहेत. मुंबईकरांच्या आरोग्यासाठी आणि स्वच्छ-सुंदर शहरासाठी सखोल स्वच्छता मोहीम (डीप क्लीन ड्राईव्‍ह) सातत्याने सुरू राहीलअशी ग्वाही उपमुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. स्‍वच्‍छतेबरोबरच पर्यावरण संवर्धनासाठी बृहन्‍मुंबई महानगरपालिका विविध उपाययोजना राबवित असून त्‍याचे अनुकरण राज्‍यातील इतर महानगरपालिकांनी करावेअसे आवाहन उपमख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

'स्वच्छता ही सेवा २०२५या अभियानांतर्गत 'स्‍वच्‍छोत्‍सवउपक्रम राबविण्‍यात येत आहे. त्‍याचाच एक भाग म्‍हणून उपमुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्‍ते आणि कौशल्‍यरोजगारउद्योजकता आणि नाविन्‍यता मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्ह्याचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्‍या प्रमुख उपस्थितीत सामूहिक श्रमदान करण्यात आले.

महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणीनगरविकास विभागाचे प्रधान सचिव के. एच. गोविंद राजउपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीन सोनामहानगरपालिका उपायुक्तसहायक आयुक्‍तअधिकारीकर्मचारीकामगार शाळा आणि महाविद्यालयांचे विद्यार्थीस्‍वयंसेवी संस्‍थांचे प्रतिनिधीनागरिक या मोहिमेत सहभागी झाले होते.

महानगरपालिकेच्या ए विभागातील महात्मा गांधी मार्ग (मेट्रो चित्रपटगृह ते फॅशन स्ट्रीट) परिसरात लोकसहभागातून सामूहिक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. रस्‍तेपदपथ स्‍वच्‍छ करत पाण्‍याने धुवून काढण्‍यात आले. यावेळी स्‍वच्‍छतेविषयक सामूहिक शपथ घेण्‍यात आली

नवरात्रोत्सवात तीन दिवस सकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापरास परवानगी

 नवरात्रोत्सवात तीन दिवस सकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक

वापरास परवानगी

मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

मात्र ध्वनी मर्यादेचे पालन बंधनकारक

 

मुंबईदि. 27 : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी ध्वनिक्षेपक व ध्वनीवर्धक वापराबाबत आदेश जारी केला आहे. नवरात्रातील सप्तमी (२९ सप्टेंबर)अष्टमी (३० सप्टेंबर) आणि नवमी (१ ऑक्टोबर) या तीन दिवसांमध्ये सकाळी सहा वाजेपासून रात्री बारा वाजेपर्यंत धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक यांचा वापर करता येणार आहे.

अटी व बंधने

·         परवानगी मिळालेल्या कालावधीत ध्वनी मर्यादांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक असेल.

·         उच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक आदेशांचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी.

·         शासनाने घोषित केलेल्या शांतता क्षेत्रात ही परवानगी लागू होणार नाही.

·         ध्वनी प्रदूषण नियम२००० मधील नियम ३ व ४ चे पालन करणे आवश्यक राहील.

·         तक्रारी आल्यास ध्वनी प्राधिकरणाला पर्यावरण संरक्षण कायदा१९८६ अंतर्गत कार्यवाही करण्याचा अधिकार राहील.

·         आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल.

हा आदेश मुंबई उपनगर जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर (mumbaisuburban.gov.inप्रसिद्ध करण्यात आला आहे.

नवरात्रोत्सवातील सप्तमीअष्टमी व नवमी या तीन दिवसांसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक रात्री बारा वाजेपर्यंत सुरु ठेवता येणार आहेमात्र ठरवलेल्या मर्यादा आणि अटींचे पालन करणे बंधनकारक असेलअसे मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आदेशाद्वारे कळविले आहे.

डिजिटल भारत निधी '४जी' प्रकल्पांतर्गत 2 हजार 174 टॉवर्सचा समावेश

 प्रास्ताविकात हरिंदर कुमार यांनी महाराष्ट्रात 9 हजार 30 टॉवर्सचे उद्घाटन होत असून त्यात डिजिटल भारत निधी '४जीप्रकल्पांतर्गत 2 हजार 174 टॉवर्सचा समावेश आहे. राज्य शासनाने 2 हजार 751 टॉवर्ससाठी विनामूल्य जमीन उपलब्ध करून दिली असून वीजेची व्यवस्थाटॉवर्सपर्यंत पोहोचण्याचा रस्त्यांचा अधिकार (राईट ऑफ वे) आदी सुविधांद्वारे सहकार्य केले आहे. आगामी काळात 930 अतिरिक्त टॉवर्सद्वारे जोडणी नसलेल्या गावांपर्यंत पोहणार असल्याची माहिती दिली.

स्वप्न बीएसएनएलच्या माध्यमातून पूर्ण होताना दिसत

 केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे म्हणाल्याप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आत्मनिर्भरतेचे स्वप्न बीएसएनएलच्या माध्यमातून पूर्ण होताना दिसत आहे. स्वदेशी '४जी' तंत्रज्ञान फक्त 22 महिन्यात विकसित करून भारताने जगात नवी ओळख निर्माण केली आहे. नेटवर्किंगसंरक्षण क्षेत्रअवकाश विज्ञानमाहिती तंत्रज्ञान आदी क्षेत्रात भारताची क्षमता जगासमोर येऊ लागली आहे. पुढील काळात आपण '५जी' आणि '६जी' कडे जाणार आहोत. या नेटवर्कच्या माध्यमातून ग्रामीणआदिवासी भागात जाणार असून 25 हजार ठिकाणी पोहोचणार आहोत. स्वतःचे तंत्रज्ञान विकसित झाल्याने राष्ट्रीय सुरक्षेसाठी हे अत्यंत महत्वाचे पाऊल आहेअसेही त्यांनी यावेळी सांगितले.

बीएसएनएलची स्वदेशी '४जी' ची यशोगाथा जगात उल्लेखनीय ठरेल

 बीएसएनएलची स्वदेशी '४जीची यशोगाथा जगात उल्लेखनीय ठरेल

- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणालेआत्मनिर्भर सशक्त भारताच्या दृष्टीने आजचा क्षण अत्यंत महत्वाचा आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताने आपली ओळख निर्माण केली आहे. औद्योगिक क्रांतीच्या नंतरचे हे सर्वात मोठे अभियान आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात भारताने एक महासत्ता म्हणून आपले स्थान पक्के केले आहे.

बीएसएनएल आता नफ्यात आले असून पुढे जात असल्याचा आनंद आहे. स्वदेशी '४जीतंत्रज्ञान विकसित करून डिजिटल भारताकडे आपली वाटचाल सुरू आहे. बीएसएनएल पुढे जाण्यासाठी हे तंत्रज्ञान म्हणजे महत्वाचे पाऊल आहे. जे अमेरिकेला साध्य झाले नाही ते भारताने करून दाखविले आहे. ग्रामीण भागालाग्रामीण भागात शिक्षणदूरस्थ आरोग्य सेवा (टेलिमिडेसिन)पर्यटन आदीला याचा फायदा होईल. बीएसएनएलची स्वदेशी '४जी'ची यशोगाथा जगात उल्लेखनीय ठरेल. या तंत्रज्ञानामुळे बीएसएनएलचा नवा प्रवास सुरू होत आहे. 2047 पर्यंत विकसित भारताचे प्रधानमंत्री श्री. मोदी यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जे जे साहाय्य लागेल ते महाराष्ट्र करेलअसेही उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

सी-डॉट, तेजस, आयआयटी, टीएसएस आणि बीएसएनएल यांनी शुद्ध, देशी तंत्रज्ञानावर

 सुरूवातीला स्वतःचे '४जी' तंत्रज्ञान फिनलँडस्वीडनचीन आणि दक्षिण कोरिया या चार देशांकडे होते. चीन हे तंत्रज्ञान देण्यासाठी सहकार्य करणार नव्हते. त्यामुळे आत्मनिर्भर भारत करण्यासाठी तंत्रज्ञान निर्मितीसाठी देशातील कंपन्यांना एकत्रित करून प्रयत्न सुरू झाले. सी-डॉटतेजसआयआयटी,  टीएसएस आणि बीएसएनएल यांनी शुद्धदेशी तंत्रज्ञानावर आधारित '४जी' तंत्रज्ञानाची निर्मिती करून भारत या क्षेत्रातील पाचवा देश बनला आहे. भारताला ज्या-ज्यावेळी कोणी आव्हान दिले त्यावेळी भारताने आपली क्षमता दाखवून दिली आहे. भारतातील ज्ञानतेजकर्मण्यते्द्वारे आपण जगाला उत्तर देऊ शकतो आणि आजचा कार्यक्रम त्याचाच एक भाग आहेअसे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

गावात इंटरनेट पोहोचते तेव्हा आपण गावाला जगाशी जोडत असतो. आरोग्यशिक्षण क्षेत्रासाठी कनेक्टीव्हीटी महत्वाची आहे. शेतकऱ्यांना हवामानाचीवातावरण बदलाची माहिती देऊन त्यांचे नुकसान टाळता येते. स्मार्ट व्हिलेजच्या सहाय्याने गावातील सर्व व्यवस्था उत्तम करता येतात. उद्योगशेतीबाजारासाठी कनेक्टीव्हीटी महत्वाची आहे. कनेक्टीव्हीटीमुळे व्यवस्थेत परिवर्तन होण्यासोबत पारदर्शकता येते. तंत्रज्ञान ही भेदरहित व्यवस्था आहे. ते गावापर्यंत पोहोचविण्याचे साधन म्हणजे ही '४जी' कनेक्टिव्हिटी आहे. या टॉवर्समध्ये '५जी' मध्ये अद्ययावत होण्याची क्षमता आहे. तंत्रज्ञान निर्माण करण्यात यश आल्याने जगाच्या एक पाऊल पुढे जाण्याची आपली तयारी आहेअसे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

महाराष्ट्रात राज्य शासनाकडून नागरिकांना दिल्या जाणाऱ्या अकराशे सेवा ऑनलाईन आणि व्हॉट्सॲपवर उपलब्ध

 मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेमहाराष्ट्रात राज्य शासनाकडून नागरिकांना दिल्या जाणाऱ्या अकराशे सेवा ऑनलाईन आणि व्हॉट्सॲपवर उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यातील 90 टक्के सेवा एन्ड टू एन्ड डिजिटल करण्यात येत आहेत. त्यामुळे नागरिकांना बसल्या जागी त्याच्या अर्जाची माहिती मिळणार आहे. सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी खऱ्या अर्थाने करण्यात येत आहे. नागरिकांना मोबाईलवरून सेवा उपलब्ध करून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. यासाठी कनेक्टिव्हिटी असणे आवश्यक आहे. गावोगावी भारतनेटच्या माध्यमातून फायबर सेवा उपलब्ध करून देण्यात येत असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना धन्यवाद दिले आणि बीएसएनएलचे अभिनंदन केले.

बीएसएनएलच्या 92 हजार 633 टॉवर्सचे लोकार्पण होणे ही आनंदाची बाब असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेयातील 9 हजार 30 टॉवर्स महाराष्ट्रातील आहे. देशातील 24 हजार 680 हजार गावांना या टावर्सच्या माध्यमातून '४जीनेटवर्क उपलब्ध होणार आहे. देशाला विकसित करण्यासाठी परस्पर दळणवळण (कम्युनिकेशन) महत्वाचे आहे. 21 व्या शतकाच्या सुरुवातीला तत्कालीन प्रधानमंत्री स्व. अटलबिहारी वाजपेयी यांनी विकासाचा मार्ग हा दळणवळण असल्याचे म्हटले होते. त्यांनी दळणवळणाच्या दृष्टीने देशाला आणि गावांना रस्त्यांच्या माध्यमातून जोडण्यासाठी सुवर्ण चतुष्कोन योजना आणि प्रधानमंत्री ग्राम सडक योजना सुरू केल्या. आता 21 व्या शतकात विकासासाठी केवळ रस्तेच नाही तर कनेक्टिव्हिटी महत्वाची असल्याचे लक्षात आले. मोबाईल कनेक्टीव्हीटी आणि इंटरनेट गावात पोहोचविल्याशिवाय या शतकातील विकास गावापर्यंत पोहोचविता येत नाही. त्यामुळे गावागावात हे तंत्रज्ञान पोहोचविण्यासाठी '४जी' टॉवर्सची निर्मिती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात झाली.

Featured post

Lakshvedhi