मुंबईकरांच्या निरोगी आरोग्यासाठी
स्वच्छता मोहीम निरंतर सुरू राहणार
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई महानगरपालिकेच्या ए विभागात 'स्वच्छता ही सेवा २०२५' या अभियानांतर्गत श्रमदान
मुंबई, दि. २५ : मुंबई महापालिकेच्या सफाई कामगार आणि कर्मचाऱ्यांमुळे मुंबई स्वच्छ, सुंदर आणि हिरवीगार आहे. मुंबईकरांचे आरोग्य सुदृढ आहे. स्वच्छता कर्मचारी हे स्वच्छतेचे दूत, वास्तवातील 'हिरो' आहेत. मुंबईकरांच्या आरोग्यासाठी आणि स्वच्छ-सुंदर शहरासाठी सखोल स्वच्छता मोहीम (डीप क्लीन ड्राईव्ह) सातत्याने सुरू राहील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. स्वच्छतेबरोबरच पर्यावरण संवर्धनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका विविध उपाययोजना राबवित असून त्याचे अनुकरण राज्यातील इतर महानगरपालिकांनी करावे, असे आवाहन उपमख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
'स्वच्छता ही सेवा २०२५' या अभियानांतर्गत 'स्वच्छोत्सव' उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्ह्याचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत सामूहिक श्रमदान करण्यात आले.
महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव के. एच. गोविंद राज, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीन सोना, महानगरपालिका उपायुक्त, सहायक आयुक्त, अधिकारी, कर्मचारी, कामगार शाळा आणि महाविद्यालयांचे विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, नागरिक या मोहिमेत सहभागी झाले होते.
महानगरपालिकेच्या ए विभागातील महात्मा गांधी मार्ग (मेट्रो चित्रपटगृह ते फॅशन स्ट्रीट) परिसरात लोकसहभागातून सामूहिक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. रस्ते, पदपथ स्वच्छ करत पाण्याने धुवून काढण्यात आले. यावेळी स्वच्छतेविषयक सामूहिक शपथ घेण्यात आली
No comments:
Post a Comment