Friday, 5 September 2025

बालकांचे पाचव्या वर्षी व पुन्हा पंधराव्या वर्षी आधार बायोमेट्रिक अद्ययावत करणे आवश्यक असल्याने

 बालकांचे पाचव्या वर्षी व पुन्हा पंधराव्या वर्षी आधार बायोमेट्रिक अद्ययावत करणे आवश्यक असल्याने भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढण्याकरिता विशेष मोहीम राबविण्याची सूचना केली आहे. तसेच सर्व शाळांनाही आवाहन करण्यात आले आहे. याकरिता प्राधिकरण व शिक्षण मंत्रालयाने संयुक्त उपक्रम राबवत युनिफाइड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टीम फॉर एज्युकेशन प्लस’ (UDISE+) या प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांच्या आधार बायोमेट्रिक अपडेटची स्थिती उपलब्ध करून दिली आहे. या प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांची आधार प्रमाणित माहिती यापुढे बंधनकारक असून त्याचा उपयोग विविध योजना व विद्यार्थी लाभांशी जोडण्यात येणार आहे. तसेच NEET, JEE, CUFT यासारख्या स्पर्धा व विद्यापीठ परीक्षांमध्ये नोंदणी करताना विद्यार्थी व त्यांच्या पालकांना अडचणी येऊ नयेत याकरिता वेळेत बायोमेट्रिक अपडेट करणे महत्त्वाचे असल्याचे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.

आधार अद्ययावत करणे ही प्रक्रिया शाळांमधून शिबिरांच्या माध्यमातून अधिक वेगाने पूर्ण होऊ शकते. या अनुषंगाने शालेय शिक्षण विभागामार्फत शालेय शिक्षण आयुक्तांना आधार प्राधिकरणाच्या मदतीने राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात शिबिरे आयोजित करण्यात यावीत आणि आधारची नोंदणी व आधार अद्ययावत करणे याबाबत सर्व संबंधितांना आवाहन करण्यात यावे असे कळविले आहे. यामुळे राज्यातील उर्वरित विद्यार्थ्यांची आधारशी संबंधित माहिती संलग्नित करण्यासाठीविद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाच्या माहितीमधील विसंगतीत्यामधील त्रुटी/ तफावत दूर करून आधार क्रमांक वैध करण्यासाठी व त्याकरिता येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी या विशेष मोहिमांमध्ये आधार प्राधिकरणाची नक्कीच मदत होणार आहे.

००००

राज्यातील 93.51 टक्के विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण; उर्वरित विद्यार्थ्यांच्या आधार पडताळणीसाठी विशेष शिबिरे

 राज्यातील 93.51 टक्के विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण;

उर्वरित विद्यार्थ्यांच्या आधार पडताळणीसाठी विशेष शिबिरे

मुंबईदि. : राज्यातील दोन कोटी चार लाखांहून अधिक विद्यार्थ्यांपैकी 93.51 टक्के विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण शालेय शिक्षण विभागामार्फत पूर्ण झाले आहे. राज्यातील सर्व विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढणे आणि आधार क्रमांकाच्या प्रमाणीकरणाकरीता विभागामार्फत आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. आता उर्वरित विद्यार्थ्यांची प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या (आधार)(UIDAI) सहकार्याने विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे.

राज्यामध्ये इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची आधार नोंदणी करुन अशा आधारधारक मुलांची नोंद संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांमार्फत सरल प्रणालीअंतर्गत करण्यात येते. शिक्षण विभागाकडील विविध लाभाच्या योजनांचा लाभ सर्व पात्र विद्यार्थ्यांना देण्यासाठी देखील आधार क्रमांक प्रमाणीकरण आवश्यक आहे.

‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून आतापर्यंत ३.२६ लाख नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी · ६,८६२ नागरिकांनी केले रक्तदान

 

श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून

आतापर्यंत ३.२६ लाख नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी

·         ,८६२ नागरिकांनी केले रक्तदान

 

मुंबई, दि. ५ : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कल्पनेतून राबविण्यात आलेल्या ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ या विशेष उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर दरम्यान ७१५९ आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांतून तब्बल ३ लाख २६ हजार नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने आणि विविध आरोग्य संस्थांच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे लाखो नागरिकांपर्यंत मोफत आरोग्यसेवेचा लाभ पोहोचला.

तपासणीदरम्यान आजार आढळलेल्या ९,९६० रुग्णांना तज्ज्ञांकडे पुढील उपचाराकरिता पाठविण्यात आले. तसेचनागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करून सामाजिक जबाबदारी पार पाडली असून ९५ रक्तदान शिबिरांतून एकूण ६,८६२ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

परराज्यातील विदेशी मद्य वाहतूकप्रकरणी कारवाई

 परराज्यातील विदेशी मद्य वाहतूकप्रकरणी कारवाई

 

मुंबईदि. ५ ठाणे जिल्ह्यातील खारेगांव - ठाणे रस्त्यावर गोवा राज्यातील मद्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर खारेगांव येथे ३ सप्टेंबर रोजी कारवाई करण्यात आली. या कारवाईत गोवा राज्यात निर्मित भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याच्या १४०० बॉक्स दारूबंदी कायद्यातंर्गत जप्त करण्यात आले. टाटा कंपनीच्या डीडी ०१ ए ९०१७ क्रमांक असलेल्या चारचाकी टेम्पो वाहनासह  एकूण १ कोटी ५६ लाख ६३ हजार ८०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच आरोपी मोहम्मद समशाद सलमानी (वाहनचालक) यास अटक करण्यात आली आहे.

            राज्य उत्पादन शुल्कचे आयुक्त डॉ. राजेश देशमुखसहआयुक्त प्रसाद सुर्वेकोकण विभागाचे विभागीय उपआयुक्त प्रदीप पवारठाणे अधीक्षक प्रवीण तांबेउपअधीक्षक श्री. पोकळेश्री. वैद्य, नवी मुंबईचे उपअधीक्षक ए. डी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.  ही कारवाई भरारी पथकाचे निरीक्षक एम. पी धनशेट्टीदुय्यम निरीक्षक एन. आर. महाले,  सहा. दुय्यम निरीक्षक बी. जी थोरात,  तसेच जवान पी. एस नागरेपी. ए महाजनव्ही. के पाटीलश्रीमती एस.एस यादवएम. जी शेख  यांचा सहभाग होता.

 या गुन्ह्याचा पुढील तपास अधीक्षक प्रवीण तांबेनिरीक्षक श्री. धनशेट्टी करीत आहेत, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाने कळविले आहे.

0000

युवतींना रोबोटिक, सौर ऊर्जा तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय, व्यक्तिमत्व आणि सामाजिक

 .

राज्यातील आयटीआयमध्ये सध्या प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसोबतच  अतिशय अल्पदरात युवक आणि युवतींना रोबोटिकसौर ऊर्जा तंत्रज्ञानकृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय, व्यक्तिमत्व आणि सामाजिक विकासासंदर्भात अत्याधुनिक अभ्यासक्रम चालवले जाणार आहेत. स्थानिक उद्योग आस्थापनांमध्ये रोजगारासाठी आवश्यक असलेले ज्ञान आणि प्रशिक्षण त्याच जिल्ह्यात मिळाल्याने तरुणांना आपला जिल्हा सोडून अन्य ठिकाणी रोजगारासाठी जावे लागणार नाही.

उद्योगांना पूरक स्वयंरोजगाराच्या संधी या अल्पकालीन अभ्याक्रमाच्या माध्यमाने तरुणांना उपलब्ध होणार आहेत. विशेष म्हणजे सध्या आयटीआयचे प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थींकडून या अभ्यासक्रमांसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. https://admission.dvet.gov.in या  संकेतस्थळावर नोंदणी करून विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमास प्रवेश देण्यात येणार आहे. या संकेतस्थळावर राज्यातल्या प्रत्येक  जिल्ह्यात सुरु होत असलेल्या अभ्यासक्रमांची सविस्तर माहिती तसेच प्रवेश प्रक्रियेची माहिती देण्यात आली आहे. अल्पकालीन अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर युवकांना रोजगाराच्या संधीबाबत आणि स्वयंरोजगाराची माहितीही संबंधित आयटीआय संस्थेत दिली जाणार आहे. उपलब्ध जागांचा विचार करता प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाणार असून युवक आणि युवतींनी त्वरित या अभ्यासक्रमांसाठी नोंदणी करावी, असे आवाहनही मंत्री श्री. लोढा यांनी केले आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ हजार युवक-युवतींना रोजगाराभिमुख प्रशिक्षणाची संधी

 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त

७५ हजार युवक-युवतींना रोजगाराभिमुख प्रशिक्षणाची संधी

- मंत्री मंगलप्रभात लोढा

 

मुंबईदि. ५ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा १७ सप्टेंबर रोजी ७५ वा वाढदिवस असून हा दिवस अविस्मरणीय व्हावा यासाठी कौशल्य विभाग रोजगार आणि स्वयंरोजगार सेवा पंधरवडा साजरा करत आहे. या अनुषंगाने राज्यातल्या सुमारे ७५ हजार युवक आणि युवतींना कौशल्यविषयक प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली आहे. येत्या १७ सप्टेंबर पासून २ ऑक्टोबर पर्यंत हा पंधरवडा सुरु राहणार असून १ ऑक्टोबर २०२५ रोजी राज्यातील ४१९ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) अभ्यासक्रमांचा शुभारंभ केला जाणार आहे.

केंद्र सरकारच्या जीएसटीबाबतच्या ऐतिहासिक निर्णयामुळे सर्वसामान्य माणसाचे जीवनमान सुलभ होईल

 केंद्र सरकारच्या जीएसटीबाबतच्या ऐतिहासिक निर्णयामुळे

सर्वसामान्य माणसाचे जीवनमान सुलभ होईल

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विश्वास

 

            मुंबई दि. ५ :- केंद्र आणि राज्यांचा समावेश असलेल्या जीएसटी परिषदेने जीएसटी दर कपात आणि सुधारणांबाबत केंद्र सरकारने सादर केलेल्या प्रस्तावांना एकमताने संमती दिल्याबद्दल आनंद व्यक्त करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार मानले आहेत.

         उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले कीजीएसटी परिषदेच्या ५६ व्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार जीएसटी स्लॅब १२ टक्के आणि २८ टक्के रद्द करून केवळ ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच स्लॅब ठेवण्याचा निर्णय तसेच दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंवरील कर कमी करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय स्वागतार्ह आहे. नवरात्रीपासून हे नवे दर लागू होतील. त्यामुळे सणासुदीच्या काळात जनतेला दिलासा मिळेल. सामान्य नागरिकशेतकरीमध्यमवर्गीय आणि लघुमध्यम उद्योजकांना या निर्णयामुळे फायदा होणार आहे. या सुधारणांमुळे व्यापार सुलभ होईलबाजारपेठेतील मागणी वाढेल आणि अर्थव्यवस्थेला नवी गती मिळेल. विशेषतः छोट्या व्यापाऱ्यांना याचा मोठा फायदा होईलअसा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

0000

Featured post

Lakshvedhi