Thursday, 4 September 2025

गडचिरोलीसह q किरण मॉडेल”च्या आधारे सेवा राबवली जाणार आहे. या मॉडेलमध्ये आशा सेविकांमार्फत

 जागतिक आरोग्य संघटनेमार्फत गडचिरोलीसह q किरण मॉडेलच्या आधारे सेवा राबवली जाणार आहे. या मॉडेलमध्ये आशा सेविकांमार्फत घराघरात प्राथमिक नेत्रतपासणीप्राथमिक आरोग्य केंद्रांवर रेफ्रॅक्शन व चष्म्यांचे वितरण तसेच शासकीय रुग्णालयांत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अशा सर्व टप्प्यांवर नेत्रआरोग्यसेवा पुरवली जाणार आहे.

            या कार्यक्रमांतर्गत स्थानिक आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण व क्षमता वृद्धीसमुदायामध्ये जनजागृती मोहीमशाळा व ग्रामपंचायत पातळीवर आरोग्यविषयक संवादस्थानिक स्वयंसेवी संस्था व माध्यमांद्वारे प्रचार-प्रसार तसेच कार्यक्षमता व परिणामकारकता मोजण्यासाठी डेटा संकलन व विश्लेषण अशा विविध उपक्रमांची अंमलबजावणी केली जाणार आहे.

000

गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुका आता डोळ्यांसंदर्भातील आरोग्यसेवेच्या दृष्टीने देशभरात आदर्श

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागतिक आरोग्य संघटनेमार्फत राबविण्यात येणारा हा उपक्रम महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात राबविण्यात यावाअसे आवाहन केले. जागतिक आरोग्य संघटनेमार्फत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुका आता डोळ्यांसंदर्भातील आरोग्यसेवेच्या दृष्टीने देशभरात आदर्श ठरणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेचा स्पेक्स २०३०- वन साईट कार्यक्रम राज्य सरकारच्या आरोग्य विभाग आणि वन साईट एसीलॉर लक्सोटिका फाऊंडेशन यांच्या सहकार्याने गडचिरोलीसह देशातील पाच मागास जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणार आहे. हा उपक्रम राष्ट्रीय अंधत्व निवारण व दृष्टिदोष नियंत्रण कार्यक्रम (NPCBVI) अंतर्गत राबविला जाणार आहे.

गडचिरोलीतील नागरिकांना आता ‘स्पेक्स २०३०’ उपक्रमाद्वारे नेत्रसेवा

 गडचिरोलीतील नागरिकांना 

आता स्पेक्स २०३०’ उपक्रमाद्वारे नेत्रसेवा

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·         सार्वजनिक आरोग्य विभाग आणि जागतिक आरोग्य संघटनेचा उपक्रम

            मुंबईदि. ४ : गडचिरोलीसारख्या आदिवासी व मागास जिल्ह्यांमध्ये डोळ्यांच्या आरोग्याविषयी जनजागृती व उपचार पोहोचविण्यासाठी तसेच तेथील नागरिकांना परवडणाऱ्या व गुणवत्तापूर्ण नेत्रसेवा उपलब्ध करुन देण्यावर भर देण्यात येत आहे. राज्याचा सार्वजनिक आरोग्य विभाग आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्या "स्पेक्स २०३०"  या प्रकल्पामुळे मुलांचे शिक्षणतरुणांसाठी रोजगार व संपूर्ण समाजाच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडेलअसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

            मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागतिक आरोग्य संघटनेमार्फत राबविण्यात येणारा हा उपक्रम महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात राबविण्यात यावाअसे आवाहन केले. जागतिक आरोग्य संघटनेमार्फत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुका आता डोळ्यांसंदर्भातील आरोग्यसेवेच्या दृष्टीने देशभरात आदर्श ठरणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेचा स्पेक्स २०३०- वन साईट कार्यक्रम राज्य सरकारच्या आरोग्य विभाग आणि वन साईट एसीलॉर लक्सोटिका फाऊंडेशन यांच्या सहकार्याने गडचिरोलीसह देशातील पाच मागास जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणार आहे. हा उपक्रम राष्ट्रीय अंधत्व निवारण व दृष्टिदोष नियंत्रण कार्यक्रम (NPCBVI) अंतर्गत राबविला जाणार आहे.

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी बीड येणार रेल्वेच्या नकाशावर बीड ते परळी रेल्वे मार्ग कामाला गती देऊन रेल्वे मार्ग पूर्ण करा

 वृत्त क्र. 3542

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी बीड येणार रेल्वेच्या नकाशावर

बीड ते परळी रेल्वे मार्ग कामाला गती देऊन रेल्वे मार्ग पूर्ण करा

- उपमुख्यमंत्री अजित पवार

बीड ते अहिल्यानगर मार्गावर सुरू होणार रेल्वे

 

मुंबईदि. ३ : रेल्वेमार्गापासून कोसो दूर असलेले बीड शहर लवकरच रेल्वेच्या नकाशावर येणार आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी बीड ते अहिल्यानगर रेल्वे गाडी सुरू करण्यात येणार असून यामुळे अनेक वर्षापासूनचे बीडवासियांचे रेल्वेसेवेचे स्वप्न पूर्ण होणार आहे. येत्या १७ सप्टेंबर रोजी बीड ते अहिल्यानगर रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. उर्वरित बीड ते परळी वैजनाथ या रेल्वे मार्गातील अडथळे दूर करून गतीने काम पूर्ण करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिल्या.

बैठकीला महापारेषण कंपनीचे महाव्यवस्थापक संजीव कुमारसार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव श्री दशपुतेसचिव (वित्तीय सुधारणा) शैला एउपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. राजेश देशमुखसहसचिव (परिवहन) राजेंद्र होळकररेल्वेचे मुख्य विद्युत अभियंता विनीत कुमाररेल्वेच्या पुणे विभागाचे अप्पर विभागीय व्यवस्थापक पद्मसिंह जाधवमुख्य प्रवासी वाहतूक व्यवस्थापक मिलिंद हिरवेमुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीलामुख्य अभियंता प्रशांत भेगडे आदी उपस्थित होते. तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकरबीड जिल्हाधिकारी विवेक जॉन्सनजिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी बैठकीत सहभाग घेतला.

महाराष्ट्र सदनात उभारण्यात आलेल्या या हस्तकौशल्य दालनाला दिल्लीतील नागरिकांचा उत्स्फूर्त

 महाराष्ट्र सदन येथे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते २७ ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात श्री गणपतीची प्राणप्रतिष्ठा झाली. यावेळी निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांच्या मार्गदर्शनाखालीग स्वयंसहाय्यता गटांच्या हस्तकौशल्य दालनाचेही उद्घाटन करण्यात आले.

महाराष्ट्र सदनात उभारण्यात आलेल्या या हस्तकौशल्य दालनाला दिल्लीतील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्र शासनाच्या या उपक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून विशेष पाठिंबा मिळत असूनश्री गणेशाच्या दर्शनासाठी अनेकांनी भेट दिली आहे. यामध्ये उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार तसेच महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णनमाजी राज्यपाल रमेश बैसकेंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेप्रधान सचिव आणि राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम तसेच दिल्लीतील विविध राज्यांचे निवासी आयुक्त यांच्यासह अनेक मान्यवरांनी श्री गणेशाचे दर्शन घेतले. 

गणेशोत्सवादरम्यान महाराष्ट्र सदनात श्रीमती दिपाली काळे यांचा कलारंग’, श्री. देवू मुखर्जी यांचा हिंदी गीतांचा कार्यक्रमडॉ. पं. संजय गरुड यांचा संतवाणी’, आदिलीला फाउंडेशन आणि रचनात्मक सेवा संगठन यांचा मराठी-हिंदी गीतांवर आधारित नृत्य विष्कार तसेच सचिन ठोंबरे आणि  सुरभी ठोंबर  यांचा सूर-संगमचा संगीतमय कार्यक्रम रंगले. या सोहळ्यांमुळे दिल्लीतील नागरिकांना महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक आणि हस्तकौशल्य परंपरांचे दर्शन घडले. हा उत्सव मराठी संस्कृतीचा जागर ठरला आहे.

0000
--

महाराष्ट्र सदनात सूर-संगम संगीतमय कार्यक्रम गणेशोत्सवात मराठी संस्कृतीचा जागर

 महाराष्ट्र सदनात सूर-संगम संगीतमय कार्यक्रम

  • गणेशोत्सवात मराठी संस्कृतीचा जागर

 

            नवी दिल्ली2 :- गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा प्राप्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्य विभागातर्फे महाराष्ट्र आणि राज्याबाहेरील मराठीबहुल भागांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात येत आहे. मराठी कलासंस्कृती आणि संगीताचा ठसा देशभर उमटवण्यासाठी तसेच कलाकारांना राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी या कार्यक्रमांची संकल्पना मांडली आहे. सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली या सांस्कृतिक सोहळ्यांचे यशस्वीपणे आयोजन करण्यात येत आहे. दिल्लीसह डेहराडूनबडोदाबेळगाव आणि गोवा येथे गणेशोत्सवाच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

याचाच भाग म्हणून १ सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदन येथे नागपूर येथील सूर-संगम या संस्थेने गणेशोत्सवानिमित्त संगीतमय प्रस्तुती दिली. सचिन ठोंबरे आणि सुरभी ठोंबर  यांनी संयोजित केलेल्या या कार्यक्रमाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

या कार्यक्रमात सुरभी ढोमणे (Zee सारेगम फेमआंतरराष्ट्रीय गायिका) आणि अंबरीश  जोगळेकर यांनी आपल्या मधुर गायनाने रसिकांची मने जिंकली. आंतरराष्ट्रीय स्तरावरील वादक सचिन ढोमणे यांनी संगीत संयोजनाची जबाबदारी सांभाळली. तर परिमल जोशीमनोजसुभाष आणि नविन यांनी उत्कृष्ट संगीत साथ दिली. डॉ. मनोज साल्पेकर यांनी निवेदनाची धुरा सांभाळलीतर ऋषभ ढोमणे  यांनी ध्वनी व्यवस्था यशस्वीपणे हाताळली. विविध गाण्यांना प्रेक्षकांनी  दाद दिली.

याशिवायसांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे गणेशोत्सवानिमित्त राज्याबाहेर पाच ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. २७ ते २९ ऑगस्ट २०२५ दरम्यान वन संशोधन केंद्रडेहराडून येथे कार्यक्रम यशस्वीपणे पार पडले. ३ सप्टेंबर २०२५ रोजी के. एम. गिरी सभागृहबेळगाव४ सप्टेंबर २०२५ रोजी सर सयाजीराव नगरवडोदरागुजरात आणि ५ सप्टेंबर २०२५ रोजी गोवा येथे मराठी बांधवांसाठी सांस्कृतिक सोहळ्यांचे आयोजन करण्यात येणार आ

चिपी - मुंबई विमानसेवा तातडीने सुरू करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी

  

चिपी - मुंबई विमानसेवा तातडीने सुरू करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी

- मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

 

मुंबईदि. 3 : मुंबई - चिपी विमानसेवा सुरू करण्यासाठीची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी. ही विमानसेवा सुरू करण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असून यासाठी शासनाने उडानच्या धर्तीवर आरसीएस’ फंडिंगचा निर्णय घेतला आहे. ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी संबंधित यंत्रणांना दिले.

   मंत्रालयात चिपी - मुंबई विमानसेवा विषयी बैठक झाली. त्यावेळी मंत्री श्री. राणे बोलत होते. बैठकीस विमानतळ प्राधिकरण आणि विमानतळ ऑपरेटर कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

              चिपी - मुंबई विमानसेवा सुरू होणे ही सिंधुदुर्गसाठी भावनिक बाब असल्याचे सांगून मंत्री श्री. राणे म्हणाले कीया विमानतळासाठीच्या पायाभूत सुविधाही लवकरात लवकर पूर्ण कराव्यात. सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असल्याने चिपी विमानतळास वेगळे महत्व आहे. चिपी - मुंबई विमानसेवा सुरू करण्यासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या एक महिन्यात घेण्यात याव्यात. विमानतळ प्राधिकरण आणि विमानतळ ऑपरेटर कंपनी यांनी समन्वयाने काम करावे. भविष्यात या विमानतळाला मोठे महत्त्व येणार असल्याने यासंदर्भातील कामे प्राधान्याने करावीतअसे निर्देशही मंत्री श्री. राणे यांनी दिले.

0000

Featured post

Lakshvedhi