Tuesday, 2 September 2025

शाश्वत विकासाची दूरदृष्टीपूर्ण लोकचळवळ; "मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान"

 शाश्वत विकासाची दूरदृष्टीपूर्ण लोकचळवळ;

"मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान"

 

आपला भारत देश हा कृषिप्रधान आहे आणि गाव हे त्याचे प्राणकेंद्र आहे. त्यामुळे गावांचे प्रश्न सोडविल्याशिवाय आणि त्यांचा शाश्वत विकास साधल्याशिवाय देशाचा सर्वांगीण विकास शक्य नाही. शाश्वत विकास हा असा विकास आहेजो सध्याच्या पिढीच्या गरजा भागविताना पुढील पिढ्यांसाठी साधन संपत्तीचे सातत्याने संवर्धन करत राहतो. म्हणूनच गावांचा शाश्वत विकास हा आपल्या राज्याच्या व राष्ट्राच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.

आज अनेक गावांमध्ये शिक्षणआरोग्यरोजगाररस्तेपिण्याचे पाणीवीजपुरवठा या मूलभूत गरजांसह रोजगारमाहिती तंत्रज्ञानशाळांमध्ये शिक्षणाचा उच्च दर्जाशिक्षक व विद्यार्थ्यांसाठी सर्वांगीण सुविधाप्राथमिक आरोग्य केंद्रे तेथे औषधांची उपलब्धतातज्ञ डॉक्टरांची सेवा अशा प्राथमिक चांगल्या सुविधा उपलब्ध करणे यासाठी शासन मोठ्या प्रमाणात काम करते.

            या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ग्रामीण विकासासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. अभियानाचा शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी १७ सप्टेंबर २०२५ रोजी होणार आहे. ही अंमलबजावणी केवळ स्पर्धात्मक राहणार नसून ग्रामविकास अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप देणारी ठरेल.

हे अभियान राबविण्याची संकल्पना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे. २९ जुलै २०२५ रोजी राज्य मंत्रिमंडळाची यास मंजुरी मिळाली व अभियानाच्या अंमलबजावणीसाठी महत्वाचे पाऊल टाकले गेले. अभियान राबविण्यासाठी ₹२९०.३३ कोटींची तरतूद करण्यात आलीत्यापैकी ₹२४५.२० कोटी पुरस्कारांसाठीतर उर्वरित निधी प्रचारप्रशिक्षण आणि मार्गदर्शनासाठी वापरण्यात येणार आहे.


नरडाणा-बोरविहीर रेल्वेमार्ग भूसंपादनप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी लवाद स्थापन करुन प्रकरणनिहाय फेरसर्वेक्षण करावे

 नरडाणा-बोरविहीर रेल्वेमार्ग भूसंपादनप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी

 लवाद स्थापन करुन प्रकरणनिहाय फेरसर्वेक्षण करावे

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना जमिनीचा न्याय्य मोबदला मिळण्यावर भर देणार

पालकमंत्री जयकुमार रावल

मुंबईदि. 25 : मनमाड-इंदौर प्रकल्पाचा भाग असलेल्या नरडाणा- बोरविहीर रेल्वेमार्गासाठी शेतजमीन देण्याची स्थानिक शेतकऱ्यांची तयारी आहे. धुळे जिल्हाधिकाऱ्यांनी लवाद स्थापन करुन प्रकरणनिहाय फेरसर्वेक्षण करावे आणि शेतकऱ्यांना न्याय दर मिळवून द्यावाअसे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. तरया प्रकल्पासाठी जागा दिलेल्या शेतकऱ्यांना जमिनीचा न्याय्य दर मिळावा यावर भर देण्यात येईल, असे पणन मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.

नरडाणा-बोरविहीर रेल्वेमार्ग भूसंपादनाबाबत स्थानिक शेतकऱ्यांच्या समस्यांसंदर्भात श्री.बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली. धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल तसेच प्रकल्प बाधित शेतकरी उपस्थित होते

ज्या कुटुबाचे उत्पन्न प्रतिवर्ष आठ लाख पेक्षा कमी असेल, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती

 गर्भवती व स्तनदा मातांना सकस आहार देणेगरोदरपणात काम थांबल्यामुळे आर्थिक नुकसानीसाठी मजुरी भरपाई देणेदुसरे मूल हे मुलगी जन्मास आले असेल तर अतिरिक्त आर्थिक प्रोत्साहन देऊन मुलीबद्दल सकारात्मक दृष्टीकोनास प्रोत्साहन देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. मुलीच्या जन्माबद्दल सकारात्मक दृष्टीकोन वाढावा यासाठी गर्भधारणेच्या नोंदणीपासून सहा महिन्याच्या आत प्रसूतीपूर्व तपासणीसाठी महिलेला ३ हजार रूपये देण्यात येतात. तर बाळाच्या जन्मानोंदणी नंतर दोन हजार रूपये देण्यात येतात. म्हणजेच पहिल्या अपत्यासाठी पाच हजार रूपये देण्यात येतात. दुसरे अपत्य मुलगी असल्यास तिच्या जन्मानंतर सहा हजार रूपये देण्यात येतात.

            ज्या कुटुबाचे उत्पन्न प्रतिवर्ष आठ लाख पेक्षा कमी असेलअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीअंशत्: ४० टक्के किंवा पूर्ण अपंगबीपीएल शिधापत्रिकाधारकआयुष्यमान भारत अंतर्गत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत लाभार्थी ई-श्रम कार्ड धारककिसान सन्मान निधी अंतर्गत लाभार्थी शेतकरीमनरेगा जॉब कार्डधारकगर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या अंगणवाडी सेविकामदतनीसआशा कार्यकर्तीअन्नसुरक्षा कायदा २०१३ अंतर्गत रेशनींग कार्डधारक यापैकी किमान एक दस्ताऐवज असल्यास या योजनेचा लाभ घेता येतो. महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी जवळच्या अंगणवाडी केंद्रात संपर्क साधायचा आहे किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रकिंवा उपजिल्हा किंवा जिल्हा रूग्णालयात अर्ज करू शकतात.

महिला व बाला विभाग

 केंद्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयाकडून राज्यात ही योजना राबविण्यात येत होती. त्यांनतर २०१७ पासून ही योजना सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबविली जात होती. २०१७ पासून आजतागायत ४६ लाख २९ हजार ११९ महिलांनी या  योजनेचा लाभ घेतला.

जिल्ह्यांच्या नोडल अधिकाऱ्यांमार्फत ३६ जिल्ह्यात५५३ प्रकल्पाचे बाल विकास प्रकल्प अधिकारी,८९९ बीट लेवलच्या मुख्य सेविकांचे प्रशिक्षण घेण्यात आले.  मॅपिंगचे १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले आहे. लवकरच अंगणवाडी स्तरावरील मॅपिंग पूर्ण करण्यात येणार आहे.

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची राज्यात यशस्वी वाटचाल

 प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची राज्यात यशस्वी वाटचाल

मुंबई, दि. २६ : गर्भवती महिला व स्तनदा मातेचे पोषण आणि आरोग्य जपल्यास पुढील पिढी सुदृढ होईल. तसेच मुलींच्या जन्माबाबत सकारात्मकता वाढावी या उद्देशाने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येते. एकात्मिक बाल विकास प्रकल्पामार्फत या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत असून, प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या यशस्वी वाटचालीतून मातांचे आरोग्य, कुटुंबाचा आनंद आणि समाजाचा विकास साधत राज्याचा विकास साधता येणार आहे.


प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत ३६ जिल्ह्यांचे जिल्हा नोडल अधिकारी आणि बालविकास प्रकल्प अधिकारी तसेच क्षेत्रीय स्तरावरच्या मुख्य सेविकांचे मॅपिंग १०० टक्के पूर्ण झाले आहे. या वर्षासाठी ४० हजार नोंदणी करण्यात आली आहे. उर्वरित उद्दीष्ट लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने २०२५-२६ वर्षासाठी ५ लाख ७० हजार उद्दिष्ट दिले असून, ते कालमर्यादेत नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यात येत आहे. यासाठी योजनेअंतर्गत असेलल्या नियमांची पूर्तता आणि प्रलंबित महिला लाभार्थ्यांना त्यांचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच २०१७ पासून ज्या महिला योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढे आल्या नाहीत, अशा महिलांपर्यंत अंगणवाडी महिला अथवा आशा वर्कर यांच्या सहायाने लाभ पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

अंबाजोगाई येथे १ हजार १५० खाटांचे रुग्णालय उभारावे

 अंबाजोगाई येथे १ हजार १५० खाटांचे रुग्णालय उभारावे

स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाचे काम दर्जेदार पद्धतीने करावे

- उपमुख्यमंत्री अजित पवार

 

मुंबईदि. २६ : मराठवाड्यातील ग्रामीण भागासाठी वैद्यकीय शिक्षण व आरोग्यसेवा अधिक सक्षम व्हावी, यासाठी बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे १ हजार १५० खाटांचे सुसज्ज शासकीय रुग्णालय उभारण्यात यावे. तसेच स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाचे काम दर्जेदार पद्धतीने करावेअशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

 

स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाबाबत उपमुख्यमंत्री श्री.पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आज बैठक झाली. या बैठकीस वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफवित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्तानियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरावैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमारवित्त विभागाच्या सचिव शैला एसंचालक डॉ. अजय चंदनवालेअधिष्ठाता डॉ.शंकर धपाटेउपमुख्यमंत्र्यांचे सचिव राजेश देशमुख यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

देशातील पहिले ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय म्हणून ओळख असलेल्या अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाचे रूपांतर आदर्श शासकीय संस्थेमध्ये करण्यात यावे असे सांगून उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले कीया महाविद्यालयासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. महाविद्यालयाच्या आधीच सुरू असलेल्या व पूर्ण झालेल्या कामांचा समावेश करून नवीन मास्टर प्लॅन तयार करावा. नवीन रुग्णालयात आधुनिक सुविधासुपर स्पेशालिटी सेवा यांचा समावेश असावाउत्कृष्ट सुविधा असाव्यात. मराठवाड्यासाठी हे महाविद्यालय महत्वाचे असून येथे येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यामुळे येथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याचा प्रस्ताव सादर करावा. हे काम लवकरात लवकर पूर्ण करावेसध्या अस्तित्वातील इमारतींचा नियोजनपूर्वक वापर करावाअशा सूचना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिल्या.

 

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले कीअंबाजोगाईतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा दर्जा उंचावण्यासाठी कार्यवाही वेगाने करावी. महाविद्यालयाचा आराखडा तयार करूनकार्यवाही करावी.

नांदेड - मुंबई वंदे भारत एक्सप्रेस विषयी थोडेसे

 नांदेड - मुंबई वंदे भारत एक्सप्रेस विषयी थोडेसे

·         मराठवाड्यातील नांदेडला राज्याची राजधानी मुंबईशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्सप्रेस.

·         नांदेड ते मुंबई असा 610 कि. मी. चा प्रवास फक्त 09 तास 30 मिनिटांत पूर्णइतर गाड्यांच्या तुलनेत प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी.

·         महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटनस्थळे व धार्मिक स्थळांदरम्यान वेगवानसुरक्षित आणि आरामदायी दिवसभरातील वातानुकूलित प्रवासाची सुविधा.

·         हुजूर साहिब नांदेड हून बुधवार व मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हून गुरुवार वगळता आठवड्यातून सहा दिवस गाडीची सुविधा प्रवाशांना मिळणार आहे.

·         नियमित प्रवास करणारे प्रवासीभाविकअधिकारी व व्यापारी यांच्यासाठी ही गाडी अत्यंत उपयुक्त.

·         पर्यटनस्थळे व तीर्थक्षेत्रांना जाणाऱ्या प्रवाशांसाठी प्रवास आणखी सोपा.

Featured post

Lakshvedhi