प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची राज्यात यशस्वी वाटचाल
मुंबई, दि. २६ : गर्भवती महिला व स्तनदा मातेचे पोषण आणि आरोग्य जपल्यास पुढील पिढी सुदृढ होईल. तसेच मुलींच्या जन्माबाबत सकारात्मकता वाढावी या उद्देशाने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येते. एकात्मिक बाल विकास प्रकल्पामार्फत या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत असून, प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या यशस्वी वाटचालीतून मातांचे आरोग्य, कुटुंबाचा आनंद आणि समाजाचा विकास साधत राज्याचा विकास साधता येणार आहे.
प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत ३६ जिल्ह्यांचे जिल्हा नोडल अधिकारी आणि बालविकास प्रकल्प अधिकारी तसेच क्षेत्रीय स्तरावरच्या मुख्य सेविकांचे मॅपिंग १०० टक्के पूर्ण झाले आहे. या वर्षासाठी ४० हजार नोंदणी करण्यात आली आहे. उर्वरित उद्दीष्ट लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने २०२५-२६ वर्षासाठी ५ लाख ७० हजार उद्दिष्ट दिले असून, ते कालमर्यादेत नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यात येत आहे. यासाठी योजनेअंतर्गत असेलल्या नियमांची पूर्तता आणि प्रलंबित महिला लाभार्थ्यांना त्यांचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच २०१७ पासून ज्या महिला योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढे आल्या नाहीत, अशा महिलांपर्यंत अंगणवाडी महिला अथवा आशा वर्कर यांच्या सहायाने लाभ पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment