Tuesday, 2 September 2025

नरडाणा-बोरविहीर रेल्वेमार्ग भूसंपादनप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी लवाद स्थापन करुन प्रकरणनिहाय फेरसर्वेक्षण करावे

 नरडाणा-बोरविहीर रेल्वेमार्ग भूसंपादनप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी

 लवाद स्थापन करुन प्रकरणनिहाय फेरसर्वेक्षण करावे

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना जमिनीचा न्याय्य मोबदला मिळण्यावर भर देणार

पालकमंत्री जयकुमार रावल

मुंबईदि. 25 : मनमाड-इंदौर प्रकल्पाचा भाग असलेल्या नरडाणा- बोरविहीर रेल्वेमार्गासाठी शेतजमीन देण्याची स्थानिक शेतकऱ्यांची तयारी आहे. धुळे जिल्हाधिकाऱ्यांनी लवाद स्थापन करुन प्रकरणनिहाय फेरसर्वेक्षण करावे आणि शेतकऱ्यांना न्याय दर मिळवून द्यावाअसे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. तरया प्रकल्पासाठी जागा दिलेल्या शेतकऱ्यांना जमिनीचा न्याय्य दर मिळावा यावर भर देण्यात येईल, असे पणन मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.

नरडाणा-बोरविहीर रेल्वेमार्ग भूसंपादनाबाबत स्थानिक शेतकऱ्यांच्या समस्यांसंदर्भात श्री.बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली. धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल तसेच प्रकल्प बाधित शेतकरी उपस्थित होते

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi