Wednesday, 2 July 2025

वारकऱ्यांना मिळणार विम्याचा लाभ · याहीवर्षी वैद्यकीय सुविधा पुरवणार · वारीत सहभागी होणाऱ्या वाहनांना मिळणार टोल माफी ·

 वारकऱ्यांना मिळणार विम्याचा लाभ

·         याहीवर्षी वैद्यकीय सुविधा पुरवणार

·         वारीत सहभागी होणाऱ्या वाहनांना मिळणार टोल माफी

·         उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून वारकऱ्यांना दिलासा

 

मुंबई, दि. 29 :- आषाढी वारीनिमित्त वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी त्यांचा समूह विमा काढण्यात येईलतसेच त्यांना दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वैद्यकीय सेवा पुरवण्यात येतील, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. आषाढी वारीनिमित्त केलेल्या उपाययोजना आणि वारकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल सह्याद्री अतिथीगृहात विशेष बैठक पार पडली होती. त्याविषयीची अधिक माहिती प्रसार माध्यमांना देतांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.

नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे वारी मार्ग कुठेही खराब झाला असल्यास मुरूमखडी आणि डांबरीकरण करून त्याची तातडीने डागडुजी करावीवारकऱ्यांना मुबलक पाणीविजेची जोडणीपालखी तळावर वॉटरप्रूफ तंबू उपलब्ध करून घ्यावे तसेच वारीसाठी जाणाऱ्या गाड्यांना दरवर्षीप्रमाणे टोल मध्ये सवलत दिली जाईल, असेही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

गडचिरोली जिल्ह्यातील 100 अंगणवाड्यांचे ‘नंदघर’ मध्ये रूपांतर अंगणवाड्यांचे ई-लर्निंग सुविधांसह अद्ययावतीकरण

 गडचिरोली जिल्ह्यातील 100 अंगणवाड्यांचे नंदघर’ मध्ये रूपांतर

अंगणवाड्यांचे ई-लर्निंग सुविधांसह अद्ययावतीकरण

गडचिरोली जिल्हा परिषद आणि वेदांत ग्रुप यांच्यात सामंजस्य करार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून गडचिरोलीत अभिनव उपक्रम

मुंबईदि. 29  : गडचिरोली जिल्ह्यातील 100 अंगणवाड्यांचे नंदघर’ मध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. त्यात ई-लर्निंग ची सुविधा उपलब्ध असणार आहे. या केंद्रात सकाळच्या सत्रात बालकांना शिक्षण व पोषण साहाय्य दिले जाईल. तर दुपारच्या सत्रात महिलांसाठी आरोग्य व सूक्ष्म उद्योजकता  जनजागृती कार्यक्रम राबविले जातील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून हा अभिनव उपक्रम  गडचिरोलीत राबविण्यात येत आहे.

हा अभिनव उपक्रम राबविण्यासाठी महिला व बालविकास विभागाच्यावतीने जिल्हा परिषद गडचिरोली व वेदांत ग्रुपच्या अनिल अग्रवाल फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार (MoU) झाला आहे.  मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे आणि नंदघरचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी अरोरा यांच्या स्वाक्षरीने हा करार करण्यात आला आहे.

या कराराअंतर्गत अंगणवाड्यांना आधुनिक सुविधा देऊन त्यांचे नंदघर’ मध्ये रूपांतर केले जाईल. या प्रकल्पानुसार नंदघर’ मध्ये तीन ते सहा वर्षे वयोगटासाठी मुलांना  बालशिक्षण तसेच आरोग्य व पोषण साहाय्य देण्यात येणार आहे. तर दुपारी महिलांसाठी आरोग्य व सूक्ष्म उद्योग विषयक जनजागृती कार्यक्रम घेतले जातील.

उपक्रम राज्यात राबविण्याचा मानस

या 100 अंगणवाड्यांमध्ये एकूण शून्य ते सहा वर्षाची 3 हजार 867  बालके व 602 गरोदर व स्तनदा मातांना लाभ मिळणार आहे. याचबरोबर 1,134 किशोरी मुलींना दुपारच्या सत्रात उद्योग पूरक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामुळे गडचिरोलीतील दुर्गम भागातील महिला व बालकांच्या आरोग्याच्या समस्यांचे निराकरण करण्यास व महिलांना रोजगारभिमुख प्रशिक्षण दिल्याने त्यांना आर्थिकरित्या सक्षम करण्यास मदत होणार आहे. हा उपक्रम राज्यभर राबविण्याचा शासनाचा मानस आहे.

या उपक्रमांतर्गत अंगणवाड्यांची रंगरंगोटीबालमैत्रीय सजावट,  ई-लर्निंगसाठी एलईडी टीव्ही/टॅबलेट यासह मूलभूत सुविधांचा समावेश आहे. तसेच अंगणवाडी सेविकांसाठी ई-लर्निंग व आरोग्यसेवांसाठी आशावर्कर्स व एएनएम चे प्रशिक्षणही दिले जाणार आहे.

जिल्हा परिषद  या प्रकल्पासाठी समन्वयक म्हणून काम करणार असून जिल्ह्यातील अंगणवाड्यांची यादी देणेजिल्हास्तरावर नोडल अधिकारी नियुक्त करणेब्रँडिंग व देखभाल करणे आदी कामे करण्यात येणार आहे. अंगणवाड्यांमध्ये पाणीस्वच्छतागृहवीजपुरवठा आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.  प्रकल्पाची अंमलबजावणी व त्यावरील देखरेख करण्यासाठी संयुक्त कार्यगट स्थापन करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने गडचिरोली जिल्ह्याचा सर्वांगीण विकास गतीने होत आहे. त्यांच्या संकल्पनेतून गडचिरोलीत विविध अभिनव उपक्रम राबविण्यात येत असून मुख्यमंत्र्यांचा संवेदनशीलपणा  या उपक्रमातून अधोरेखित होत आहे.

000

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे ई-भुमिपुजन

 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे ई-भुमिपुजन

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते परभणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या प्रस्तावित नविन इमारतीचे ई-भूमिपुजन करण्यात आले.

महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग यांच्या शासन निर्णयानुसार १०० विद्यार्थी क्षमतेचे प्रवेश शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परभणी येथे सुरु करण्यात आले आहे. या संस्थेकरिता शासनाकडून गंगाखेड रोड वरील ब्राम्हणगाव व ब्रम्हपुरी या गावाच्या शिवारात एकूण २०.०० हेक्टर जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या जागेवर ४३० खाटांचे रुग्णालय व १०० विद्यार्थी क्षमतेचे एम.बी.बी.एस महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. तसेच हे महाविद्यालय व रुग्णालयासाठी लागणारे हॉस्टेलडॉक्टरांना राहण्यासाठी निवासस्थानगेस्टहाऊस बांधण्यात येणार आहे. या बांधकामासाठी ४०३.९८ कोटी रुपये राज्य शासनाने मंजूर केले आहेत. 

सेलू उपकेंद्राचे ई-भूमीपूजन

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते 132/33 के.व्ही. सेलू उपकेंद्राचे ई-भूमीपूजन करण्यात आले. या प्रकल्पामुळे सेलू तालुक्यातील जिनिंगप्रेसिंगहातमाग उद्योग व सेलू औद्योगिक क्षेत्रातील अस्तित्वात असलेले तसेच भविष्यात येणाऱ्या उद्योगांसाठी योग्य  दाबाने व अखंडित वीज पुरवठा करणे सहज शक्य होणार आहे. या बरोबरच सेलु तालुक्यातील शेतकरी व वीज ग्राहकांना फायदा होणार आहे.

महाराष्ट्र शेती क्षेत्रात पथदर्शी काम करेल -

 महाराष्ट्र शेती क्षेत्रात पथदर्शी काम करेल - राज्यमंत्री आशिष जयस्वाल

भविष्यातील कृषि क्षेत्राची दिशा व शेतकऱ्यांसाठी किफायतशीर वाण विकसित करण्याबाबत संयुक्‍त कृषि संशोधन आणि विकास समिती परिषदेत मंथन होईल. राज्यातील शेती व शेतकरी यांच्या प्रगतीचा वेग अधिक वाढविण्यासाठी ही परिषद उपयुक्त ठरेल. शेती क्षेत्रात कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर  महत्त्वाचा आहे. आगामी पाच वर्षात महाराष्ट्र शेती क्षेत्रात नक्कीच पथदर्शी काम करेलअसा विश्वास राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी व्यक्त केला.

            यावेळी राज्यातील चारही कृषि विद्यापिठांच्या स्मरणिका व विविध कृषि विद्यापीठांच्या पुस्तिकांचे प्रकाशन करण्यात आले.

उत्कृष्ट कृषि संशोधन पुरस्कार-2025 पुरस्काराने गौरव

राज्यातील चारही कृषि विद्यापीठांच्या उत्कृष्ट कृषि संशोधन शास्त्रज्ञांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापिठाचे डॉ. मदन पेंडकेडॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे डॉ. संतोष गहुकरबाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापिठाचे डॉ. विजय दळवीमहात्मा फुले कृषि विद्यापिठाचे डॉ. सुनील कदम यांचा उत्कृष्ट कृषि संशोधन पुरस्कार-2025 देवून गौरव करण्यात आला.

संयुक्‍त कृषि संशोधन आणि विकास समिती बैठक-2025 कृषि विद्यापीठांनी पिकांच्या उत्पादन वाढीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता वापराचे मॉडेल तयार करावे

 संयुक्‍त कृषि संशोधन आणि विकास समिती बैठक-2025

कृषि विद्यापीठांनी पिकांच्या उत्पादन वाढीसाठी

कृत्रिम बुद्धिमत्ता वापराचे मॉडेल तयार करावे

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

परभणी दि. 29 (जिमाका) : शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सुरू झाला आहे. राज्यातील कृषि विद्यापिठांनी प्रमुख पिकांच्या उत्पन्न वाढीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रभावी वापराचे मॉडेल तयार करण्याबाबत संशोधन करावेअसे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. वातावरणीय बदलकीड व्यवस्थापनतसेच पावसाचा खंड पडल्यानंतरही तग धरू शकणारे वाण शेतकरी बांधवांना उपलब्ध देण्याबाबतचे संशोधन अपेक्षित असल्याचेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेच्यावतीने आयोजित संयुक्त कृषि संशोधन आणि विकास समितीच्या 53 व्या बैठकीचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाले. कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटेकृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वालपालकमंत्री मेघना बोर्डीकरखासदार संजय जाधवआमदार सर्वश्री सतीश चव्हाणराहुल पाटीलरत्नाकर गुट्टेराजेश विटेकर यांच्यासह कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तुषार पवारकृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगीकृषि आयुक्त सुरज मांढरेवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. इंन्द्र मणिडॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाखबाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. संजय भावेजिल्हाधिकारी रघुनाथ गावडेसंशोधक संचालक डॉ. खिजर बेगडॉ. किशोर शिंदे उपस्थित होते. प्रारंभी स्वर्गीय वसंतराव नाईकमहाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेकेंद्र शासनाने राज्यात आयसीआरच्या माध्यमातून सुरु केलेल्या नव्या योजनेत शेतीशी सबंधित विविध शास्त्रज्ञया क्षेत्रात कार्यरत संस्थाअधिकारी एकत्रितपणे शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाणार आहेत. संशोधक आणि शेतकरी यांच्यामध्ये या माध्यमातून एक नवीन नाते निर्माण होईल. या अंतर्गत पुढील पंधरा ते वीस दिवस एकात्मिक कार्यक्रम संपूर्ण देशामध्ये राबविण्यात येत असूनया कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्रापासून होत आहे ही महत्त्वाची बाब आहे. या माध्यमातून संशोधक एका दिवशी तीन ते चार गावांमध्ये जातील व शेतकऱ्यांशी बांधावर जाऊन संवाद साधतील. या संवादातून शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यास मदत होणार आहे. केंद्र शासनाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात शेती क्षेत्राच्या विकासासाठी हाती घेतलेला हा उपक्रम नक्कीच उपयुक्त ठरेलअसा विश्वास मुखमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

वातावरणीय बदलामुळे शेतीसमोर अनेक आव्हाने उभा राहिली आहेत. बदलत्या तंत्राचा वापर करत गुंतवणूक आधारित शेती आपल्याला करावी लागणार आहे. संरक्षित शेतीसाठी शेतीमध्ये गुंतवणूक वाढवावी लागेल. शासनाच्या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांसमोरील अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. वातावरणीय बदलामुळे निर्माण होणाऱ्या पावसातील खंड सारख्या संकटात तग धरू शकेलअसे वाण विकसित करावे लागणार आहेत. पावसाचा खंडकीड व्यवस्थापनवातावरणीय बदलात पावसाचा खंड आदी संकटात तग धरू शकणारे वाण विकसित करण्यासाठी कृषि विद्यापीठांमध्ये संशोधन होणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी आपल्याला कामे करावे लागेल तसेच शेती क्षेत्रात संशोधन करणाऱ्या शेतकऱ्यांना कृषि विद्यापीठांनी प्रोत्साहन देण्याची गरज आहे. शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सुरू झाला आहे. हा वापर वाढविण्यासाठी कृषि विद्यापीठांनी मिशन कृत्रिम बुद्धिमत्ता’ सुरु करावे. या माध्यमातून प्रमुख पिकांच्या उत्पादन वाढीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता वापराचे नवे मॉडेल विकसित करावे. यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातून अभियानाचा शुभारंभ विकसित कृषि संकल्प अभियान

 विकसित कृषि संकल्प अभियाना’चे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातून अभियानाचा शुभारंभ

परभणीदि. 29 (जिमाका) : राष्ट्रव्यापी ‘विकसित कृषि संकल्प अभियाना’चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन झाले.

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ येथे या अभियानाच्या चित्ररथाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी हिरवा झेंडा दाखवून या अभियानाचा शुभारंभ केला.

यावेळी कृषि मंत्री ॲड. माणिकराव कोकाटेसार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणपाणी पुरवठा व स्वच्छता,उर्जामहिला व बालकल्याणसार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री तथा परभणी जिल्हयाच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकरकृषिवित्तनियोजनमदत व पुनर्वसनविधी व न्यायकामगार राज्यमंत्री  अॅड. आशिष जयस्वाल यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारताच्या संकल्पनेला गती देण्यासाठी आधुनिक कृषि पद्धतीसमृद्ध शेतकरी आणि विज्ञानाधिष्ठित शेती आवश्यक आहे. कृषि क्षेत्र हे देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून अन्नसुरक्षेसोबतच देशाच्या अर्ध्याहून अधिक लोकसंख्येला रोजगार पुरवते. याकरिता केंद्र सरकारच्या कृषि व शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्रालयाच्यावतीने केंद्रीय कृषि व शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वात दि. 29 मे ते 12 जून 2025 या कालावधीत देशभरात विकसित कृषि संकल्प अभियान राबविण्यात येत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे अभियान यशस्वी होवून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना या माध्यमातून खरीप पिकाच्या नियोजनासाठी अचूक मार्गदर्शन मिळेल, शेतकऱ्यांना आधुनिक कृषि तंत्रज्ञान आत्मसात करण्याची सुवर्णसंधी यानिमित्ताने लाभणार असून त्यांना शाश्वत उत्पादन घेता येईलअसे नमूद करून शुभेच्छा दिल्या.

यावेळी खासदार संजय जाधवआमदार, कार्यकारी परिषद सदस्य सतीश चव्हाणआमदार व कार्यकारी परिषद सदस्य आमदार डॉ. राहुल पाटीलआमदार रत्नाकर गुट्टेआमदार राजेश विटेकरप्रधान सचिव (कृषि) विकासचंद्र रस्तोगीपुणे येथील कृषि परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडेकृषि आयुक्त सूरज मांढरे (भाप्रसे)‘पोकरा’चे प्रकल्प संचालक परिमल सिंहकृषी विद्यापीठाचे कुलगुरू  प्रा. डॉ. इन्द्र मणि‘पिडीकेव्ही’ अकोला आणि ‘एमपीकेव्ही’ राहुरीचे कुलगुरू डॉ. शरद गडाख‘बीएसकेकेव्ही’ दापोलीचे  कुलगुरू डॉ. संजय भावेजिल्हाधिकारी रघुनाथ गावडेपोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशीजिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी  नतिशा माथुरमनपा आयुक्त धैर्यशील जाधव आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

विकसित कृषि संकल्प अभियानाच्या माध्यमातून  शेतकऱ्यांचे कल्याण साधण्यासाठी कृषि क्षेत्रात कार्य करणारी देशाची सर्वोच्च संस्था भारतीय कृषि अनुसंधान परिषद परिश्रम घेत आहे. या अभियानामध्ये देशातील 723 जिल्ह्यांमधील 65 हजारपेक्षा जास्त गावांना भेट देणारी दोन हजार 170 तज्ज्ञ पथके सहभागी होणार आहेत. प्रत्येक पथकात किमान चार वैज्ञानिक असतील. या पथकांमध्ये कृषि विद्यापीठांचे वैज्ञानिकसंशोधन संस्थांचे तज्ज्ञशासकीय विभागांचे अधिकारीनाविन्यपूर्ण कार्य करणारे शेतकरी आणि एफपीओचे कर्मचारी यांचा समावेश असेल. या अभियानाद्वारे देशातील 1.3 कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्यात हे अभियान कृषि विभाग आणि 50 कृषि विज्ञान केंद्रांच्या माध्यमातून 4 हजार 500 गावांत राबविले जाणार आहे. मराठवाडा विभागासाठी  कुलगुरू प्रा.डॉ. इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनखाली वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील आठ जिल्ह्यांतील 12 कृषि विज्ञान केंद्रे आणि सर्व विस्तार यंत्रणा सक्रिय सहभागी होणार आहेत. या उपक्रमासाठी विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे आणि मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांनी विद्यापीठस्तरीय सूक्ष्म नियोजन केले आहे. यासाठी शास्त्रज्ञांचे चमू तयार केले असून याद्वारे प्रत्येक गावात 200 शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. जवळपास दोन लाख 1 हजार 600 शेतकऱ्यांना खरीप पिकाचे अचूक नियोजन करण्यासाठी तंत्रज्ञान पोहचविण्यात येणार असून त्याद्वारे संपूर्ण परिसरात तंत्रज्ञान पोहोचले जाईल.

*-*-*-*

पंढरपूर शहर महास्वच्छता अभियान 2025..... महास्वच्छता अभियानातून स्वच्छतेचा संदेश घरोघरी पोहोचवण्याचे कार्य झाले

 पंढरपूर शहर महास्वच्छता अभियान 2025.....

महास्वच्छता अभियानातून स्वच्छतेचा संदेश घरोघरी पोहोचवण्याचे कार्य झाले

- पालकमंत्री जयकुमार गोरे

आषाढी सोहळ्यात पंढरपूर येथे सर्व पालख्यादिंड्यावारकरी व भाविक यांची सर्व व्यवस्था करणार, पंढरपूरचा कॉरिडॉर सर्वांच्या संमतीनेच होणार..

 

पंढरपूर/सोलापूरदिनांक 22(जिमाका):- पंढरपूर शहर महास्वच्छता अभियान 2025 अंतर्गत एकाच वेळी सकाळी सात ते दहा या कालावधीत 42 ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून 148 टन कचरा गोळा करण्यात आला. या मोहिमेत सोलापूर जिल्हा प्रशासनातील अधिकारीकर्मचारीसामाजिक संस्थांचे स्वयंसेवकविविध सामाजिक संघटनापंढरपूर शहरातील नागरिक यांनी सक्रिय सहभाग घेऊन विठुरायाची नगरी स्वच्छ केली. या मोहिमेतून पंढरपूर शहर व येथे येणाऱ्या हजारो भाविकांच्या घरोघरी स्वच्छतेचा संदेश पोहोचविण्याचे कार्य घडले असल्याचे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.

            पंढरपूर शहर महास्वच्छता अभियान 2025 चा समारोप कार्यक्रम प्रसंगी पालकमंत्री जयकुमार गोरे मार्गदर्शन करत होते. यावेळी आमदार समाधान आवताडेआमदार सचिन कल्याणशेट्टीआमदार देवेंद्र कोठेजिल्हाधिकारी कुमार आशीर्वादमुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगमसोलापूर महापालिकेचे आयुक्त सचिन ओम्बासेमाजी आमदार प्रशांत परिचारकपंढरपूरचे उपविभागीय अधिकारी सचिन इथापेकार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके,नगरपालिका प्रशासन अधिकारी वीणा पवारपंढरपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख व मान्यवर उपस्थित होते.

        पालकमंत्री श्री गोरे म्हणाले कीया स्वच्छता अभियानातून श्री विठुरायाची नगरी स्वच्छ करण्याचे काम आपल्या सर्वांच्या श्रमातून झालेले आहे. ही वारी पूर्वीची स्वच्छता असून वारीनंतरही स्वच्छता करण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी सोलापूर जिल्ह्यासह सातारा जिल्ह्यातील ही सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला असून आजच्या मोहिमेत सात ते आठ हजार स्वयंसेवक नागरिकांनी सहभाग घेतला. यामध्ये तरुणांचा सहभाग ही महत्त्वपूर्ण बाब होती व पुढील काळात या स्वच्छतेच्या संदेशाबाबत नागरिकांमध्ये प्रबोधन करतील व स्वतःही क्रियाशीलपणे राबवतील असे त्यांनी सांगितले.

            पंढरपूर शहरातील सर्व नागरिक व्यापारी,  व्यावसायिक यांनी आपापल्या दुकानासमोर कचरा टाकण्यासाठी छोट्या छोट्या कचरा पेट्या ठेवाव्यात व त्यामध्येच कचरा टाकून तो नगरपालिकेच्या कचरा संकलन टीम कडे द्यावा. त्याप्रमाणेच विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूर नगरीत येणाऱ्या वारकरी भावी यांनीही कचरा कोठेही रस्त्यावर टाकू नये नगरपरिषदेने उपलब्ध करून दिलेल्या जवळपासच्या कचराकुंड्यामध्येच कचरा टाकावा, स्वच्छ पंढरपूरस्वच्छ चंद्रभागानमामी चंद्रभागा यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे पालकमंत्री यांनी सांगितले.

            पंढरपूर हे राज्यासाठी महत्त्वाचे व पवित्र धार्मिक ठिकाण असून या विठुरायाच्या नगरीचा सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. पंढरपूरच्या कॉरिडॉरच्या विषयी सर्वांच्या संमतीनेच पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री गोरे यांनी दिली. तसेच सर्व मानाच्या पालख्या सह अन्य पालख्यादिंड्या यांचे प्रस्थान पंढरपूरसाठी झालेले आहे. आषाढी यात्रा सोहळ्यासाठी पंढरपूर येथे आल्यानंतर या सर्वांना व्यवस्था प्रदान केली जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच या मोहिमेत सहभाग घेतल्याबद्दल जिल्हाधिकारीमुख्य कार्यकारी अधिकारीमहापालिका आयुक्त यांच्यासह सर्व विभाग प्रमुखसामाजिक संस्थानागरिक व स्वयंसेवक यांचे त्यांनी कौतुक केले.

            आमदार सचिन आवताडे यांनी पालकमंत्री महोदयांनी त्यांच्या संकल्पनेतून वारी पूर्वी पंढरपूर शहर स्वच्छ करण्यासाठी राबवलेल्या महा स्वच्छता अभियानाचे कौतुक केले व वारी संपल्यानंतर ही अशी मोहीम राबवण्याची मागणी केली.

            प्रारंभी उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांनी प्रास्ताविकात स्वच्छता अभियानाचे महत्त्व सांगून प्रशासनाच्या वतीने येथे येणाऱ्या भाविकांना चांगल्या सुविधा देण्याबरोबरच शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सर्वोत्तपरी प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगितले. तर मोहिमेत सर्वांनी सहभाग घेतल्याबद्दल मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी आभार मानले.

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते सफाई मित्रांचा सन्मान

            आजच्या महास्वच्छता अभियानात सहभाग घेऊन स्वच्छता मोहीम राबवलेल्या काही सफाई मित्रांचा प्रतिनिधी स्वरूपात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये लक्ष्मण गोविंद सोनवणेरविकिरण दोडियाश्रीमती शांता विठ्ठल वाघमारे ,अजय शंकर तावरेओंकार जनार्दन वाघमारे यांच्यासह कोळगाव ग्रामपंचायत तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. तसेच लायन्स क्लब पंढरपूरवृक्षप्रेमी ग्रुप पंढरपूरएव्हर ग्रीन क्लबक्रीडाई संस्था व लोकमान्य विद्यालय पंढरपूर यांचाही सत्कार करण्यात आला.

महास्वच्छता अभियानाचा शुभारंभ

         पंढरपूर शहर महास्वच्छता अभियान 2025 चा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पालकमंत्रीजिल्हाधिकारीमुख्य कार्यकारी अधिकारी व अन्य मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात स्वच्छता केली.

Featured post

Lakshvedhi