महाराष्ट्र शेती क्षेत्रात पथदर्शी काम करेल - राज्यमंत्री आशिष जयस्वाल
भविष्यातील कृषि क्षेत्राची दिशा व शेतकऱ्यांसाठी किफायतशीर वाण विकसित करण्याबाबत संयुक्त कृषि संशोधन आणि विकास समिती परिषदेत मंथन होईल. राज्यातील शेती व शेतकरी यांच्या प्रगतीचा वेग अधिक वाढविण्यासाठी ही परिषद उपयुक्त ठरेल. शेती क्षेत्रात कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर महत्त्वाचा आहे. आगामी पाच वर्षात महाराष्ट्र शेती क्षेत्रात नक्कीच पथदर्शी काम करेल, असा विश्वास राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी व्यक्त केला.
यावेळी राज्यातील चारही कृषि विद्यापिठांच्या स्मरणिका व विविध कृषि विद्यापीठांच्या पुस्तिकांचे प्रकाशन करण्यात आले.
उत्कृष्ट कृषि संशोधन पुरस्कार-2025 पुरस्काराने गौरव
राज्यातील चारही कृषि विद्यापीठांच्या उत्कृष्ट कृषि संशोधन शास्त्रज्ञांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापिठाचे डॉ. मदन पेंडके, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे डॉ. संतोष गहुकर, बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापिठाचे डॉ. विजय दळवी, महात्मा फुले कृषि विद्यापिठाचे डॉ. सुनील कदम यांचा उत्कृष्ट कृषि संशोधन पुरस्कार-2025 देवून गौरव करण्यात आला.
No comments:
Post a Comment