Monday, 2 June 2025

निर्मल वारी, हरित वारी’साठी काम वाढवून आराखडा करा वारी कालावधीमध्ये ‘निर्मल वारी, हरित वारी’ हा उपक्रम अत्यंत महत्वाचा आहे. पालखी मार्गातील जिल्ह्यात प्रशासनाने निर्मल वारीचे अधिक काम होण्यासाठी प्रयत्नशील रहावे. शिवाय हरित वारीने निसर्ग पर्यावरणपूरक आहे. रस्त्याच्यी दुतर्फा देशी, सावली देणारी झाडे लावण्यासाठी आराखडा तयार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिल्या. 36 वॉटरप्रुफ मंडप पुढील काही दिवस राज्यात पावसाचा जोर राहणार असल्याचा अंदाज असल्याने वारकऱ्यांच्या निवाऱ्यासाठी पालखी मुक्काच्या ठिकाणी 36 वॉटरप्रुफ मंडपाची तयारी केली आहे. आवश्यकता भासल्यास आणखी वॉटरप्रुफ मंडप वाढविण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. वारीमध्ये प्रयागराजच्या धर्तीवर महिलांचाही विचार करण्यात आला असून हिरकणी कक्षासह महिलांना स्नानासाठी वेगळ्या स्नानगृहांची सोय उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. वारकऱ्यांची गैरसोय टाळणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस असल्याने विविध मानाच्या पालख्यांच्या सूचना लक्षात घेवून वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता शासन घेणार आहे, असे उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. शुद्ध पिण्याचे पाणी, वीज, वॉटर प्रुफ टेंट, जास्तीत जास्त आरोग्यसुविधा, फिरते शौचालये, पुरविण्यात येणार आहे. अम्ब्युलन्सबाबत कोणतीही अडचण येणार नाही, याची दक्षता आरोग्य विभाग घेईल. महिलांच्या आरोग्याबाबतही विशेष काळजी घेण्यात आली असून वारकऱ्यांना अधिक बसेस, रेल्वे उपलब्ध होण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. रस्त्यावर चिखल होणार नाही, ते सुस्थितीत राहतील याची दखल घेण्यात येत असल्याचेही उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. यावेळी वारकरी, पालख्यांसाठी विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीने केलेल्या सोयीसुविधांबाबतची माहिती सहअध्यक्ष गहिनीनाथ औसेकर यांनी दिली. विविध पालखी संस्थानच्या वतीने योगी निरंजननाथ, चैतन्य कबीर महाराज, जालिंदर मोरे, सोमनाथ घाटेकर, अक्षय महाराज भोसले, श्री. साधू यांनी सूचना मांडल्या.

 निर्मल वारीहरित वारी’साठी काम वाढवून आराखडा करा

वारी कालावधीमध्ये ‘निर्मल वारीहरित वारी’ हा उपक्रम अत्यंत महत्वाचा आहे. पालखी मार्गातील जिल्ह्यात प्रशासनाने निर्मल वारीचे अधिक काम होण्यासाठी प्रयत्नशील रहावे. शिवाय हरित वारीने निसर्ग पर्यावरणपूरक आहे. रस्त्याच्यी दुतर्फा देशीसावली देणारी झाडे लावण्यासाठी आराखडा तयार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिल्या.

36 वॉटरप्रुफ मंडप

पुढील काही दिवस राज्यात पावसाचा जोर राहणार असल्याचा अंदाज असल्याने वारकऱ्यांच्या निवाऱ्यासाठी पालखी मुक्काच्या ठिकाणी 36 वॉटरप्रुफ मंडपाची तयारी केली आहे. आवश्यकता भासल्यास आणखी वॉटरप्रुफ मंडप वाढविण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

वारीमध्ये प्रयागराजच्या धर्तीवर महिलांचाही विचार करण्यात आला असून हिरकणी कक्षासह महिलांना स्नानासाठी वेगळ्या स्नानगृहांची सोय उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

वारकऱ्यांची गैरसोय टाळणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे    

सध्या राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस असल्याने विविध मानाच्या पालख्यांच्या सूचना लक्षात घेवून वारकऱ्यांची गैरसोय होणार नाहीयाची दक्षता शासन घेणार आहेअसे उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. शुद्ध पिण्याचे पाणीवीजवॉटर प्रुफ टेंटजास्तीत जास्त आरोग्यसुविधा, फिरते शौचालये, पुरविण्यात येणार आहे. अम्ब्युलन्सबाबत कोणतीही अडचण येणार नाहीयाची दक्षता आरोग्य विभाग घेईल. महिलांच्या आरोग्याबाबतही विशेष काळजी घेण्यात आली असून वारकऱ्यांना अधिक बसेसरेल्वे उपलब्ध होण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. रस्त्यावर चिखल होणार नाहीते सुस्थितीत राहतील याची दखल घेण्यात येत असल्याचेही उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

यावेळी वारकरीपालख्यांसाठी विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीने केलेल्या सोयीसुविधांबाबतची माहिती सहअध्यक्ष गहिनीनाथ औसेकर यांनी दिली.

विविध पालखी संस्थानच्या वतीने योगी निरंजननाथचैतन्य कबीर महाराजजालिंदर मोरेसोमनाथ घाटेकरअक्षय महाराज भोसलेश्री. साधू यांनी सूचना मांडल्या.

०००००

Sunday, 1 June 2025

ॲग्री हॅकॅथॉन

 कृषी आयुक्त सूरज मांढरे म्हणालेशेतीत उत्पादन जास्त होऊन सुद्धा शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होत नाही यासाठी नविन तंत्रज्ञान स्विकारणे आवश्यक आहे. या ॲग्री हॅकॅथॉनच्या माध्यमातून शेतमालाच्या उत्पादनासोबत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी मदत हाईल. यावेळी माजी कुलगुरू डॉ. राजाराम देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले.

 

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी कार्यक्रम स्थळी उभारण्यात आलेल्या कृषी विषयक विविध स्टॉलला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी विविध कृषी उत्पादकांकडून माहिती जाणून घेतली.

 

प्रास्ताविकात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी ॲग्री हॅकॅथॉन आयोजनाचा उद्देश स्पष्ट करताना म्हणालेशेतकऱ्यांचे उत्पन्न वाढनविन तंत्रज्ञानाची माहितीशेतीविषयक समस्या व त्यावरील तांत्रिक उपायपाणी टंचाईजमीनीचे व्यवस्थान उत्पादनात वाढ या बाबींची माहिती शेतकऱ्यांना ॲग्री हॅकॅथॉन मधून मिळेल. या उपक्रमात १४० जणांची निवड झाली आहे. हे सर्व जण प्रदर्शनात सहभागी होऊन सादरीकरण करणार आहेत. यातून अंतिम १६ जणांची पहिल्या व दुसऱ्या स्थानासाठी निवड होईल. २ व ३ जून रोजी हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून3 जून रोजी समारोप होईल. डॉ. महानंद माने यांनी आभार मानले.

अ‍ॅग्री हॅकॅथॉन’मध्ये सहभागी होणाऱ्या संशोधकांना त्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पना

 शासन शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट मदत व योजनांचा लाभ देऊ शकेल. कोणत्याही चुकीच्या नोंदी टाळल्या जातील आणि खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत योग्य लाभ पोहोचेल. आजपर्यंत या योजनेत महाराष्ट्रातील १ कोटी शेतकऱ्यांनी नोंदणी करुन आपला नंबर प्राप्त करुन घेतला आहे. शेतकऱ्यांनी जवळच्या तलाठीकृषी सहायक किंवा महा ई-सेवा केंद्रात जाऊन लवकरात लवकर नोंदणी करुन घ्यावीअसे आवाहन त्यांनी यावेळी केले.

 

उत्पादनामध्ये प्रचंड वाढ होणे म्हणजे स्वयंपूर्ण झालो असे नाही. उत्पादनाची गुणवत्ता राखली जाणेत्याची व्यवस्थित जाहिरात होणेबाजारपेठ मिळणं आणि त्याला बाजारभाव मिळणे ही मूल्यसाखळी आपल्याला निर्माण करायची आहे.

 

हवामान बदलामुळे शेतीपुढे खूप आव्हाने आहेत. एका क्षणात शेतीचे प्रचंड नुकसान होते. अशा परिस्थितीत शासन म्हणून शेतकऱ्यांच्या मागे उभे राहणंआपला विचारअभ्यासप्रत्यक्षात आणणंत्यातून शेतकऱ्याला ज्ञान देणं ही खरी काळाची गरज आहे.

 

या अ‍ॅग्री हॅकॅथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या संशोधकांना त्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पना मांडण्याची संधी मिळेल. यशस्वी संकल्पनांना वित्तीय आणि तांत्रिक मदतही दिली जाणार आहे. तसेचखासगी कंपन्यांच्या सहकार्यानं हे तंत्रज्ञान प्रत्यक्षात साकारण्यात येईलही बाब महत्वाची आहे. पुणे आंतरराष्ट्रीय अ‍ॅग्री हॅकॅथॉनहे महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राला नवसंजीवनी देणारं ठरेलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

कृषि हॅकॅथॉनच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करुन राज्यातील युवा संशोधकस्टार्टअप्स आणि कृषितज्ज्ञ यांना एकत्र आणून आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतीसंबंधी समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहेअसेही त्यांनी सांगितले.

 

कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यावेळी म्हणालेभविष्यात शेती सुरक्षित व संरक्षित कशी करता येईल यादृष्टीने शासन प्रयत्न करीत आहे. तसेच पुढील काळात शेतीसाठी मनुष्यबळाची कमतरता यादृष्टीने विचार करण्याची आवश्यकता आहे. रासायनिक शेतीमुळे जमिनीची पोत खराब होत असल्याने रासायनिक शेती हळूहळू कमी करुन सेंद्रीय शेतीकडे जाणे आवश्यक आहे. सेंद्रीय शेतीतून उत्पादन कसे वाढवता येईल यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. शेतकऱ्यांचा शेतमाल विक्रीसाठी मार्केट महत्वाचे असूनमार्केट जोडण्याची आवश्यकता आहे. यासाठी देशातील कंपन्या पुढाकार घेण्यास तयार आहेत. राज्यात विभागस्तरीय सहा अद्यावत शेती प्रयोगशाळाशॉपिंग मॉल उभारण्याच्या दृष्टीने कृषी विभाग प्रयत्नशील आहे. उत्तम शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना विविध सुविधा उपलब्ध करुन दिल्यास कृषी क्षेत्रात महाराष्ट्र अधिक प्रगतशील होईलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेती व शेतकरी सक्षम होण्यासाठी शासनामार्फत विविध धोरण राबविण्यात येत असून या कृषी हॅकॅथॉनच्या माध्यमातून शेतीसाठी नवतंत्रज्ञान आत्मसात करुन शेतकऱ्यांनी त्याचा फायदा इतरांनाही होण्यासाठी प्रयत्न करावेत. कृषी हॅकॅथॉनच्या माध्यमातून नवनवीन माहिती शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावेत. यातूनच सर्वसमावेशक व शेतकऱ्यांच्या फायद्याचे कृषी धोरण राबविण्याचा विचार कृषी विभाग करत आहेअसे त्यांनी सांगितले.

Unique Farmer ID) दिला जात आहे. हा नंबर म्हणजे शेतकऱ्याची ओळख ,शेती केवळ अन्न देणारी व्यवस्था नसून, संस्कृती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार

 शेती  केवळ अन्न देणारी व्यवस्था नसून,

 संस्कृतीपर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार

- उपमुख्यमंत्री अजित पवार

·         पुण्यात पहिल्या आंतरराष्ट्रीय ॲग्री हॅकॅथॉनचे उद्घाटन

 

पुणेदि. 1 : शेती ही केवळ अन्न देणारी व्यवस्था नसूनती संस्कृतीपर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार आहे ही समज ठेवून आपण जर एकत्र काम केलेतर महाराष्ट्राची शेती ही डिजिटल युगात जगाला दिशा देणारी शेती बनेलअसा विश्वास उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. कृषी विभागमहात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि कृषी महाविद्यालयपुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सिंचन नगर मैदानकृषी महाविद्यालय येथे आयोजित पुणे ॲग्री हॅकॅथॉन कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

 

कार्यक्रमाला कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटेआमदार बाबाजी काळेआमदार बापूसाहेब पठारेकृषी आयुक्त सूरज मांढरेमहापालिका आयुक्त नवल किशोर रामप्र. विभागीय आयुक्त कविता द्विवेदीमराठा चेबर ऑफ कॉमर्सचे महासंचालक प्रशांत गिरबाणेमहात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजाराम देशमुखमाजी कृषी आयुक्त डॉ. उमाकांत दांगटदापोली कृषी विद्यापीठाचे डॉ. संजय सावंतबॅंक ऑफ महाराष्ट्रचे उपमहाव्यवस्थापक संजय वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.

 

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेशेती फक्त शेतकऱ्यांची जबाबदारी नसून उद्योगशास्त्रज्ञशासन आणि समाज यांचे संयुक्त उत्तरदायित्व आहे. शासनामार्फत ॲग्री स्टॅकडिजिटल क्रॉप सर्व्हेस्मार्ट सिंचनकृषी डेटा मिशनएफ.पी.सी. सक्षमीकरण आणि सेंद्रिय शेती प्रोत्साहन यांसारखे अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. शेतीमधून शाश्वत उपजीविका निर्माण करणे हा शासनाचा प्रमुख उद्देश असूनआत्मनिर्भर महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्याच्या कृषी क्षेत्राच्या प्रगतीची गती वाढविण्यासाठी आपण किती समर्पण भावनेनं काम करतो यावर महाराष्ट्राच्या कृषी विभागाचं भविष्य अवलंबून आहेअसे ते म्हणाले.

 

राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी ॲग्री स्टॅक नावाची योजना सुरू केली आहे. या योजनेत प्रत्येक शेतकऱ्याला एक युनिक फार्मर आयडी (Unique Farmer ID) दिला जात आहे. हा नंबर म्हणजे शेतकऱ्याची ओळख - जशी आपली आधारकार्डवर ओळख असतेतशीच ही शेतीसाठी खास ओळख असेल. या नंबरद्वारे शेतकऱ्याची जमीनघेतलेली पिकेमिळालेली अनुदानंविमाकर्ज याची सर्व माहिती जोडली जाईल. त्यामुळे भविष्यात कुठलीही योजना मिळवण्यासाठी वारंवार कागदपत्रं देण्याची गरज भासणार नाही.

समाजातील प्रत्येक गरजूला उत्तम उपचार मिळण्यासाठी प्रयत्न करा

 समाजातील प्रत्येक गरजूला उत्तम उपचार मिळण्यासाठी प्रयत्न करा

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

नाशिकदि. 1 : रूग्णसेवा ही  ईश्वरसेवा असल्याने मुख्यमंत्री सहाय्यता निधी तथा धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातील सर्वांनी गतीशीलतापारदर्शकता आणि संवेदनशीलतेने काम करुन समाजातील प्रत्येक गरजूला उत्तम उपचार मिळण्यासाठी  प्रयत्न करावेअसे आवाहन मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी केले.

महाराष्ट्र पर्यावरण अभियांत्रिकी प्रशिक्षण तथा संशोधन अकादमी (मित्रा) नाशिक येथे आयोजित मुख्यमंत्री सहाय्यता निधी तथा धर्मादाय रूग्णालय मदत कक्षातील जिल्हास्तरीय अधिकारीकर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास जलसंपदामंत्री गिरीष महाजनआमदार सीमा हिरेआमदार ॲड. राहूल ढिकलेपोलीस उपमहानिरीक्षक दत्तात्रय कराळेजिल्हाधिकारी जलज शर्मामुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक उपस्थित होते. 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेमुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाची रचना विश्वस्त भावनेने केली आहे. परदेशातील औद्योगिक सामाजिक दायित्व निधी प्रमाणपत्र मिळविणारा देशातील हा पहिला कक्ष आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा वापर वैद्यकीय क्षेत्रात करण्याची संकल्पना 2014 पासून राबविण्यास सुरूवात केली. त्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाची संस्थात्मक रचना उभी केली असून सामान्य माणसाला मदत होईल अशी या कक्षाची रचना आहे. आता या कक्षाची जिल्हास्तरावरही स्थापना करण्यात आली आहे. या कक्षाच्या माध्यमातून धर्मादाय रुग्णालयाच्या कामकाजाच्या बाबतीतही पारदर्शकता आणून दुरूपयोग रोखावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी प्रास्ताविक केले.  'रूग्ण मित्रयोजना मतदारसंघनिहाय सुरू करण्यात येत आहे. सामाजिक संस्थांची फंडासाठी मदत घेणार असून केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्य योजनांची माहिती एका प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी पोर्टल सुरू करण्यात येणार आहे. याठिकाणी उपस्थित सर्व अधिकारीकर्मचारी हे आरोग्यदूत म्हणून काम करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी राज्यस्तरीय कक्षाचे प्रशासकीय अधिकारी, मुख्यमंत्री सचिवालय तथा प्रकल्प संचालक महाराष्ट्र एड्स नियंत्रण संस्था डॉ. सुनील भोकरेसहकक्ष प्रमुख शरद घावटेउपकक्ष प्रमुख शेखर नामदासजनसंपर्क अधिकारी डॉ. जगदीश सकवानवैद्यकीय समन्वयक डॉ. सवानंद सोनारप्रशासकीय सल्लागार दत्तात्रय विभुते यांच्यासह राज्यातील सर्व जिल्हास्तरीय कक्षाचे प्रमुख अधिकारीकर्मचारी उपस्थित होते.

आरोग्यदायी कुंभ संकल्पना राबवावी

  आरोग्यदायी कुंभ संकल्पना राबवावी

 

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेनाशिकमध्ये येत्या काळात सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने डिजिटल कुंभ सोबतच आरोग्यदायी कुंभ अशी संकल्पना राबवून यामध्ये योगदान द्यावे. विद्यापीठाच्या प्रत्येक उपक्रमात राज्य शासनाच्यावतीने पूर्ण सहकार्य करण्यात येईलअशी ग्वाही त्यांनी दिली.

 

यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते विद्यापीठाच्या 150 दिवसांच्या कृती आराखडा पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

 

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी  विद्यापीठाने केलेल्या उपक्रमांबाबत आणि चक्र विषयक माहिती प्रदर्शनाला भेट देऊन पाहणी केली.

 

प्रास्ताविकात कुलगुरू लेफ्टनन्ट जनरल श्रीमती कानिटकर यांनी प्रधानमंत्री यांच्या विकसित भारत संकल्पानुसार विद्यापीठाने काम सुरू केले असल्याचे सांगून चक्र आणि उत्कृष्टता केंद्र निर्मितीबाबतची माहिती दिली.

0000

वैद्यकीय संशोधनाला चालना देण्यासाठी विद्यापीठांनी मार्गदर्शन करावे

 वैद्यकीय संशोधनाला चालना देण्यासाठी विद्यापीठांनी मार्गदर्शन करावे

            परदेशी विद्यापीठे ज्याप्रकारे काम करताततसेच काम येथील विद्यापीठांनी करावे. विद्यापीठात संशोधनाला चालना मिळणे गरजेचे आहेवेगवेगळ्या विषयांचे संशोधन केंद्र म्हणून विद्यापीठांनी काम केले पाहिजे.  उत्कृष्टता केंद्रईन्क्यूबेशन  केंद्रस्टार्ट अप आणि विविध क्षेत्रात मार्गदर्शन करणारी केंद्रे म्हणून त्यांनी काम केले पाहिजेअसेही त्यांनी नमूद केले.

 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशात नवीन शिक्षण धोरण आणले. समाजाची गरज आणि रोजगाराभिमुख शिक्षणाचा धोरणात अंतर्भाव करण्यात आला आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठाने सुरू केलेलं 'चक्रहे त्याचेच उदाहरण असल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले

 

सामान्य माणसाचे आरोग्य जपणारे संशोधन व्हावे

'चक्र'सारखे मॉडेल आणि  हब अँड स्पोक ही पद्धती महत्वाची आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठाने नागपूर आयआयएम सोबत आदिवासी आरोग्य क्षेत्रात चांगले काम केले. आताच्या उपक्रमातून सामान्य माणसाला ज्या गोष्टी उपलब्ध होत नाहीत त्या गोष्टी त्यांना उपलब्ध करून देणारी व्यवस्था  निर्माण  होणार असल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले.

 

जगातल्या विद्यापिठाप्रमाणेच आपली विद्यापीठे  स्वयंपूर्ण होत आहेत. त्यासाठी असे प्रयोग गरजेचे आहेत. वैद्यकीय क्षेत्रात तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात आले आहे. मोठे बदल होत आहेत. नवे तंत्रज्ञान येत आहे. अशावेळी  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील पायभूत सुविधांचा  लाभ सामान्य माणसाला झाला पाहिजे. राज्यातील 13 कोटी नागरिकांच्या आरोग्याची काळजी आपण घेत आहोत. त्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि तालुकास्तरीय उपकेंद्रांनी या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात महत्वाची भूमिका पार पाडली पाहिजे. असे केल्यास खऱ्या अर्थाने जिल्हास्तरीय यंत्रणांना संशोधन आणि इतर बाबीकडे लक्ष देता येणे शक्य होईलअसे मत त्यांनी व्यक्त केले.

 

Featured post

Lakshvedhi