Tuesday, 6 May 2025

मीरा-भाईंदर महापालिकेकडील विकासकामांचा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

 मीरा-भाईंदर महापालिकेकडील विकासकामांचा

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला आढावा

 

मुंबईदि. 5 :- मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रात  सुरू असलेल्या विविध विकासकामांचा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आढावा घेऊन विकासकामे गतीने करण्याच्या सूचना  यंत्रणेला दिल्या.

मंत्रालय येथे परिवहन मंत्री सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीस मीरा-भाईंदर महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांच्यासह पुरातत्वपरिवहनमहसूलपर्यावरण आणि पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

परिवहन मंत्री सरनाईक म्हणालेमीरा-भाईंदर महापालिकेकडील विकासकामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. विकासकामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करण्याबरोबरच ती विहित कालमर्यादेत करावीत. महसूल विभागाने बी.एस.यू.पी. योजनेंतर्गत यापुर्वी हस्तांतर केलेल्या जागेपैकी सद्यस्थितीत झोपडपट्टी असलेल्या जागेत पीपीपी तत्त्वावर इमारती बांधकामांसाठी जागा मीरा भाईंदर महापालिकेला हस्तांतर करण्यासाठी प्रस्ताव सादर करावा.

विकासकामांचा आढावा घेताना परिवहन मंत्री सरनाईक यांनी सांगितले कीशिवसृष्टीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम सुरू करावेखाडी किनारा विकसित करणे व स्काय वॉकची जागा रिकामी करून काम सुरू करावेचेना रिव्हर फ्रंट 18 मीटर जागेचे भूसंपादन करावेमहापालिका मुख्यालय भूसंपादनासाठी आवश्यक असलेला निधी वर्ग करावापर्यटन स्थळ विकासशिवसृष्टी प्रकल्पकांदळवन उद्यान या कामांचाही यावेळी आढावा घेण्यात आला. घोडबंदर किल्ला व परिसरात कामे करण्याबाबत महापालिकेस परवानगी देण्याबाबतही परिवहन मंत्री श्री. सरनाईक यांनी निर्देश दिले.


रस्ता सुरक्षा निधीतील कामांसह निधी वापराबाबत नियमावली करावी

 रस्ता सुरक्षा निधीतील कामांसह निधी वापराबाबत नियमावली करावी

- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

 

मुंबईदि. 5 :-  रस्त्यावरील होणारे अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी रस्ता सुरक्षेला अधिक महत्त्व देणे गरजेचे आहे. यासाठी  रस्ता  सुरक्षा  निधीतून  प्राधान्याने घेण्यात येणाऱ्या कामांसह निधी वापराबाबत नियमावली तयार करावीअसे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील समिती कक्षात रस्ता सुरक्षा निधीबाबतऑटो-रिक्षा व मिटर्स टॅक्सी भाडे नाकारण्याच्या तक्रारीसंदर्भात उपाययोजना करणेमोटार वाहन विभागातील ऑनलाईन बदली धोरण आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या जाहिरात धोरणाबाबत बैठक झाली. या बैठकीस परिवहन आयुक्त विवेक भीमनवारसहसचिव राजेंद्र  होळकरएस. टी. महामंडळाचे अधिकारी श्री. देशमुख यांच्यासह संबधित अधिकारी उपस्थित होते.

रस्ता सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश देत परिवहन मंत्री श्री. सरनाईक म्हणालेयासाठी व्यापक जनजागृती करण्यात यावी. जनजागृतीसाठी ब्रँड अँबेसिडरची नियुक्ती करावी. सर्व रस्त्यांवर दिशादर्शक फलक लावण्यात यावेत. याबरोबरच रस्त्यावर झेब्रा क्रॉस यासह आवश्यक मार्किंग चिन्हे करण्यात यावीत.

एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढावे यासाठी जाहिरात धोरणाचा मसुदा तयार करावा. जाहिरात व पार्सल सेवेतून एस. टी. महामंडळास अधिकचे उत्पन्न मिळाले पाहिजे याचे नियोजन करावे. उत्पन्न वाढीसाठी कोल्ड स्टोरेज सारखा प्रकल्प राबविण्याचा महामंडळाने विचार करावा. तसेच प्रवाशांना ऊनवारा पाऊस याचा त्रास होऊ नये म्हणून या पुढील काळात नवीन एस.टी निवारे बांधतांना ते बंदिस्त पद्धतीचे  बांधावेत तसेच एस.टी निवारे पी.पी.पी. तत्वावर करण्याबाबतचाही अभ्यास करण्यात यावा.

सर्व मीटर रिक्षांना इंडिकेटर लावण्याच्या सूचना परिवहन प्राधिकरणाला दिल्या जातील तसेच बाईक टॅक्सी मधून रोजगार निर्माण होणार असल्याने या योजनेमध्ये काही सुधारणांबाबत आवश्यक मार्ग काढला जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

मोटार वाहन विभागात राबविण्यात येणारे ऑनलाईन बदली धोरण सर्वसमावेशक असावे. राज्य शासनाच्या अन्य विभागात ऑनलाइन बदली धोरण कशा प्रकारे राबवले जाते याची माहिती घेण्यात यावीअसे निर्देश परिवहन मंत्री श्री. सरनाईक यांनी दिले.


कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे शासकीय कामकाजात पारदर्शकता व गतिमानता

 कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे शासकीय कामकाजात

पारदर्शकता व गतिमानता

- एनआयसीचे महासंचालक अभिषेक सिंग

 

मुंबईदि. 25 : तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता हा जीवनाचा भाग होत असून शासकीय कामकाजातही कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सुरू झाला आहे. ‘एआय’च्या वापरामुळे शासकीय कामकाजात पारदर्शकता व गतिमानता येते. मात्र एआयचा वापर करताना सावधानता बाळगावीअसे प्रतिपादन राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राचे महासंचालक तथा इंडिया एआय मिशनचे अभिषेक सिंग यांनी केले.

            महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागातर्फे प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्यामध्ये प्रशिक्षण संस्कृती निर्माण करण्यासाठी "टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक" हा उपक्रम सुरू झाला. या उपक्रमाअंतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर श्री. सिंग यांनी माहिती दिली. यावेळी वस्तू व सेवा कर विभागाचे आयुक्त आशिष शर्मामहाराष्ट्र परिचय केंद्राच्या निवासी आयुक्त आर. विमला आदी उपस्थित होते.

            केंद्र शासनाने सुरू केलेल्या मिशन ‘एआय’संबंधीची माहिती देऊन श्री. सिंग यांनी शासकीय कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्तेचा कशा प्रकारे वापर होत आहे याविषयी सविस्तर विवरण केले. 

अभिषेक सिंग म्हणाले कीबँकिंगआरोग्यशेतीन्यायदान अशा सर्वच क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होत आहे. हे तंत्रज्ञान परिवर्तनशील असून सातत्याने त्यात बदल होत आहेत. शासकीय कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे एकाच माहितीचा विविध योजनाउपक्रमांसाठी वापर करता येतो. जगभरातील मोठमोठ्या कंपन्यांमध्ये भारतीय मनुष्यबळच ‘एआय’वर काम करत आहे. भारतात ‘एआय’ वापरासंबंधीचे कौशल्यपूर्ण मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. या मनुष्यबळाचा वापर भारतातील शासकीय कामकाजात ‘एआय’च्या वापरासाठी करण्याचे केंद्र शासनाने ठरविले आहे. त्यासाठी केंद्र शासन एआय कोश तयार करत असून राज्याकडून डेटा गोळा करण्याचे काम सुरू आहे. त्याचप्रमाणे भाषिणीभारत जेनइंडिया ‘एआय’ अशी ‘एआय’वर आधारित अँप्लिकेशनही केंद्र शासनाने तयार केली आहेत.

महाराष्ट्रातील विस्तार प्रकल्प हा सुद्धा कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित असून याद्वारे कृषि क्षेत्राशी संबंधित प्रश्नांची उत्तरे चॅटबॉटच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अतिशय सोप्या पद्धतीने मिळत आहेत. तसेच अनेक स्टार्टअपही एआयच्या क्षेत्रात काम करत असून महाराष्ट्र त्यामध्ये आघाडीवर असल्याचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला.

अचूक व दर्जेदार डेटा मिळणे हे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामधील आव्हान आहे. अनेकदा कृत्रिम बुद्धिमत्ता ही त्याला पुरविण्यात आलेल्या माहितीवर आधारित उत्तरे देतो. मात्रती माहिती अचूक आहे का याचा विचार मानवी बुद्धिमत्तेद्वारेच केला जाऊ शकते. त्यामुळे शासकीय कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित टूलचा वापर करताना प्रत्येकाने सावधानता बाळगायला हवीअसेही श्री. सिंग यांनी यावेळी सांगितले

वेव्हजचा समारोप – सर्जनशील अर्थव्यवस्थेच्या उज्ज्वल भविष्याचा संकल्प

 वेव्हजचा समारोप – सर्जनशील अर्थव्यवस्थेच्या उज्ज्वल भविष्याचा संकल्प

वेव्हज 2025 ने सर्जनशीलताव्यापार आणि सहयोग यांना एकत्र आणणारे जागतिक व्यासपीठ म्हणून एक उच्च दर्जा प्रस्थापित केला. दूरदृष्टीपूर्ण धोरणात्मक घोषणाआंतरराष्ट्रीय करारमजबूत व्यावसायिक व्यवहार आणि नवोपक्रम गुंतवणुकीच्या पार्श्वभूमीवर वेव्हजने भारताच्या जागतिक सर्जनशील नेतृत्वाची भूमिका अधोरेखित केली. 77 देशांनी वेव्हज जाहीरनाम्याला पाठिंबा दिला. वेव्हज बाजार आणि वेव्हेक्स अॅक्सलरेटरचे यश यामुळे स्पष्ट झाले की,  भारत नावीन्यसमावेश आणि आंतरराष्ट्रीय भागीदारी यांच्या आधारावर भविष्य घडवत आहे. या ऐतिहासिक पहिल्या आवृत्तीच्या समारोपानंतरवेव्हजने केवळ भारताची सर्जनशील क्षमता जगासमोर मांडली नाहीतर एक जागतिक चळवळ सुरू केली आहे — जी जगभरातील सर्जकांच्या आवाजाला प्रेरणागुंतवणूक आणि  संधी देत राहील.


भारत मंडप– ‘कला ते कोड’ प्रवास,वेव्हज 2025 मध्ये भारताची कथाकथन परंपरा

 भारत मंडप– ‘कला ते कोड’ प्रवास

वेव्हज 2025 मध्ये भारताची कथाकथन परंपरा कला ते कोड’ या संकल्पनेतून उलगडणाऱ्या भारत मंडप’ या अनुभवात्मक विभागाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मंडपामध्ये भारताच्या माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील तोंडी आणि दृश्य परंपरांपासून ते आधुनिक डिजिटल नवप्रवर्तनापर्यंतच्या उत्क्रांतीचे दर्शन घडवले गेले.

भारत मंडपने आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा आणि नव्या तंत्रज्ञान लाटेचा समतोल साधत भारताचा आत्मा उलगडला. वेव्हज 2025 च्या उद्घाटनाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मंडपाला भेट दिली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीसपरराष्ट्र मंत्री  एस. जयशंकरकेंद्रीय मंत्री  अश्विनी वैष्णव तसेच अनेक मान्यवरांनीही भेट देऊन या मंडपाच्या सादरीकरणाचे कौतुक केले. मंडपामध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळली आणि लोक भारताच्या सांस्कृतिक खजिन्यांच्या शोधामुळे आ‍श्‍चर्यचकित  झाले.

 

भारताच्या सर्जनशील प्रवासाचा गौरव करणारे हा मंडप केवळ एक प्रदर्शन नव्हतेतर भारताला एका सर्जक राष्ट्राच्या रूपात मांडणारे प्रभावी माध्यम होते. या मंडपाने भारताची सांस्कृतिक खोलीकलात्मक उत्कर्ष आणि जागतिक कथाकथनात उद्योन्मुख नेतृत्व दाखवून दिले.

राष्ट्रीय सामुदायिक नभोवाणी संमेलन आणि राष्ट्रीय सामुदायिक नभोवाणी पुरस्कार

 राष्ट्रीय सामुदायिक नभोवाणी संमेलन आणि राष्ट्रीय सामुदायिक नभोवाणी पुरस्कार

वेव्हजचा एक भाग म्हणून आयोजित करण्यात आलेल्या आठव्या राष्ट्रीय सामुदायिक नभोवाणी संमेलनात केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी देशभरातील 12 उत्कृष्ट सामुदायिक नभोवाणी केंद्रांना राष्ट्रीय सामुदायिक नभोवाणी पुरस्कार’ देऊन गौरवले. डॉ. मुरुगन यांनी विजेत्यांचे अभिनंदन करताना सांगितले कीहे राष्ट्रीय संमेलन भारतातील सामुदायिक माध्यमाच्या क्षेत्राला नवप्रवर्तनसमावेश आणि प्रभावाच्या माध्यमातून अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात विचारमंथन आणि  सहकार्याची संधी निर्माण व्हावी या उद्देशाने देशभरातील 400 पेक्षा अधिक सामुदायिक नभोवाणी (सीआर) केंद्रांचे प्रतिनिधी एकाच मंचावर आले होते. सध्या देशात एकूण 531 सामुदायिक नभोवाणी केंद्र कार्यरत आहेत.


क्रिएट इन इंडिया चॅलेंज आणि क्रिएटोस्फीअर: सर्जनशील प्रतिभेचा जागतिक उत्सव

 क्रिएट इन इंडिया चॅलेंज आणि क्रिएटोस्फीअर: सर्जनशील  प्रतिभेचा जागतिक उत्सव

वेव्हज 2025 चे एक प्रमुख आकर्षण म्हणजे क्रिएट इन इंडिया चॅलेंज (सीआयसी) पर्व  1 चा भव्य समारोप होता. या स्पर्धेत 60 हून अधिक देशांमधून सुमारे एक लाख जणांनी नोंदणी केली होती. वेव्हज अंतर्गत एक प्रमुख उपक्रम म्हणून सुरू करण्यात आलेल्या क्रिएट इन इंडिया चॅलेंजने (सीआयसी) ॲनिमेशनएक्सआरगेमिंगकृत्रिम बुद्धिमत्ताचित्रपट निर्मितीडिजिटल संगीत आणि इतर क्षेत्रातील निर्मात्यांना वयोगटभौगोलिक आणि विषयांच्या सीमा ओलांडून एकत्र आणले होते. या उपक्रमाने यात सहभागी झालेल्या प्रत्येक क्रिएटरला  स्टार बनवले आहे.

32 कल्पक आणि भविष्यवेधी आव्हानांमधून 750 हून अधिक स्पर्धक अंतिम फेरीत पोहोचले होते. या स्पर्धेत 1100 हून अधिक आंतरराष्ट्रीय सहभागींचा समावेश होता. या प्रतिभावान व्यक्तींनी वेव्हजमधील समर्पित नवोन्मेषी विभाग असलेल्या क्रिएटोस्फीअरमध्ये आपले सृजन सादर केले. या व्यासपीठावर त्यांनी आपले प्रकल्प सादर केले तसेच संभाव्य सहयोगासाठी उद्योगातील धुरीणांशी ते  संपर्क  करू शकले.

क्रिएट इन इंडिया चॅलेंज केवळ एक स्पर्धा न राहताविविधतायुवा ऊर्जा तसेच परंपरा आणि तंत्रज्ञानात रुजलेली कथाकथन साजरे करणारी एक चळवळ बनली आहे. 12 ते 66 वर्षे वयोगटातील अंतिम स्पर्धक तसेच सर्व भारतीय राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील लोकांच्या जोरदार सहभाग असलेल्या या उपक्रमात समावेशकता आणि आकांक्षा प्रतीत झाली होती.  होती. क्रिएटोस्फीअर हे तळागाळातील नवोन्मेषड्रोन स्टोरीटेलिंग आणि भविष्यासाठी सज्ज आशय यासारख्या संकल्पनांसाठी  जगासमोर येण्याची एक संधी  देखील होती. क्रिएटोस्फीअर हे व्यासपीठ उद्याच्या सर्जनशील भारताची झलक दाखवणारे होते. "प्रवास आता सुरू झाला आहे, हे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सीआयसीच्या पुरस्कार सोहळ्यात उच्चारलेले शब्द सार्थ आहेत आणि क्षितीजावरील भारतीय सर्जनशील तंत्रज्ञान संस्थेसारख्या उपक्रमांनी या गतीला अधिकच बळ मिळत आहे.

Featured post

Lakshvedhi