Sunday, 4 May 2025

सिनेमाच्या प्रभावी मांडणीत दिग्दर्शकाची जबाबदारी महत्वाची

 सिनेमाच्या प्रभावी मांडणीत दिग्दर्शकाची जबाबदारी महत्वाची

- रिची मेहता

‘बिहाइंड द फ्रेम : मास्टरिंग द आर्ट ऑफ द सिनेमा’ चर्चासत्र

 

मुंबई, दि. ४ : सिनेमामध्ये एखाद्या  विषयावर मांडणी करताना दिग्दर्शकाचा दृष्टीकोन जसा आहे त्याच पद्धतीच्या फ्रेममधून दिग्दर्शक सिनेम प्रेक्षकापर्यंत नेतो. आपल्या सिनेमातून नेमका काय संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचा आहे याची जबाबदारी दिग्दर्शक म्हणून खूप महत्वाची असतेअसे प्रतिपादन रिची मेहता यांनी केले.

 

बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटर मध्ये आयोजित वेव्हज २०२५ दृकश्राव्य आणि मनोरंजन समिट मध्ये ‘बिहाइंड द फ्रेम : मास्टरिंग द आर्ट ऑफ द सिनेमा’ या विषयावर आयोजित मास्टरक्लासमध्ये रिची मेहता मध्ये बोलत होते.

 

रिची मेहता म्हणाल्या की, सिनेमा अत्यंत प्रभावी माध्यम असून त्याचा योग्य वापर करून दिग्दर्शक आपल्या विषयाला निश्चितच परिणामकारक पद्धतीने एकाचवेळी देश-विदेशात पोहचवू शकतो. स्वानुभवातून निर्माण झालेले कथानकविषयसूत्र हे अधिक सशक्तपणे मांडता येतात, जे प्रेक्षकांनाही सहजतेने भावतात. नाटककाल्पनिक कथानक यावर आधारित सिनेमा कोणत्याही माध्यमातून व्यक्त केल्या जाणाऱ्या आशयाची प्रामाणिकतासत्यता ही ठळकपणे  बघणाऱ्यांच्या लक्षात येते,  हे लक्षात घेऊन अधिक संवेदनशीलतेने भोवतालच्या घटनाप्रसंग यांच्याकडे बघता आले पाहिजे.

 

सिनेमा आणि वेबसिरीज यांच्या विषयांच्या मांडणीमध्ये तसेच प्रेक्षकवर्गामध्ये फरक असतो.  सिनेमामध्ये विषयपात्र आणि त्याची मांडणी यांचा प्राधान्यक्रम वेगळा असतो आणि वेबसिरीजमध्ये हे घटक  सिनेमासारख्या क्रमाने येत नाही तर तिथे ते  वेगळ्या पद्धतीने येतातदोन्ही माध्यमे प्रभावी असून त्याचा सुयोग्य वापर करून दिग्दर्शक आपल्या विषयाला निश्चितच परिणामकारक पद्धतीने व्यापक प्रमाणात समाजापर्यंत पोहचवू शकतोअसे रिची मेहता यांनी सांगितले.

 

समाजमाध्यमांतील ‘इन्फ्लुएंसर’ने स्वतः ची खरी ओळख जपणे गरजेचे ‘बेस्ट प्रॅक्टिसेस फॉर सोशल मीडिया ॲडव्हर्टायझिंग फॉर इन्फ्लुएंसर’ परिसंवाद

 समाजमाध्यमांतील ‘इन्फ्लुएंसर’ने

स्वतः ची खरी ओळख जपणे गरजेचे

‘बेस्ट प्रॅक्टिसेस फॉर सोशल मीडिया ॲडव्हर्टायझिंग फॉर इन्फ्लुएंसर’ परिसंवाद

 

मुंबई दि. ४ : समाजमाध्यमांतील इनफ्लुएसंर्सने स्वतः ची खरी ओळख जपणे गरजेचे असल्याचे मत ‘बेस्ट प्रॅक्टिसेस फॉर सोशल मीडिया ॲडव्हर्टायझिंग फॉर इन्फ्लुएंसर’ या परिसंवादात व्यक्त करण्यात आले.

             बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आयोजित वेव्हज २०२५  दृकश्राव्य आणि मनोरंजन समिटमध्ये या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले.

 यामध्ये सहभागी सहेली सिन्हा म्हणाल्या, इन्फ्लुएंसरने जबाबदारीने विविध ब्रँडसोबतची भागीदारी केली पाहिजे. ब्रँडसोबत केलेली भागीदारी ही केवळ जाहिरात करणे एवढेच नसून ती  एक मोठी जबाबदारी आहे. कारण ग्राहक प्रभावी व्यक्तींवर विश्वास ठेवून त्यांनी जाहिरात केलेल्या गोष्टी विकत घेत असतात. त्यामुळे इन्फ्लुएंसरने स्वतः त्या गोष्टीची माहिती, अनुभव घेऊन मगच त्याबाबत इतरांना सांगण्याची पारदर्शकता जोपासणे आवश्यक आहे. जाहिरात करताना नेहमी अटी व शर्ती आणि त्या-त्या समाज माध्यमांचा वापर करण्यासाठीच्या सूचनानियमावली पाळण्यास प्राधान्य दिले पाहिजेअसेही त्यांनी सांगितले.

शिबानी अख्तर यांनी समाजमाध्यमांतील इन्फ्लुएंसरने प्रामाणिकपणास महत्त्व द्यावे. प्रामाणिक कंटेंट दीर्घकाळ टिकतो आणि विश्वास निर्माण करतो. आरोग्यासारख्या संवेदनशील विषयांवर ब्रँडिंग करताना विशेष सतर्कता बाळगली पाहिजेअसेही यावेळी सांगितले.

विनय पिल्लई म्हणाले, कोणत्याही माध्यमातून व्यक्त होताना त्या प्लॅटफॉर्मची कार्यपद्धती नीट समजून घेऊन त्या चौकटीत आपले सादरीकरण करावे. कारण प्रत्येक सोशल मिडिया प्लॅटफॉर्मचा उपयोग वेगळ्या कारणासाठी केला जातो. हे लक्षात घेऊन आपल्याकडील वैशिष्ट्यांची ओळख करून त्यानुसारच कंटेंट बनवावा. स्वतःची विशिष्ट ओळख  विकसित करावी. सोशल मिडिया प्रभावी असले तरी दूरचित्रवाणी आजही प्रभावी माध्यम असल्याचे त्यांनी सांगितले.

मयंक शेखर यांनी विश्वास व विश्‍वासार्हता निर्माण करण्याची गरज असून  सातत्याने अधिकृत माहिती मांडणे म्हणजे विश्‍वासार्हतेची गुरुकिल्ली असल्याचे सांगितले. प्रभावी व्यक्तींनी केवळ ट्रेंड फॉलो न करतायोग्य आवश्यक बाबी मांडल्या पाहिजेतअसेही त्यांनी सांगितले.

तनू बॅनर्जीं यांनी माध्यमे सतत बदलत आहेतत्यामुळे इन्फ्लुएंसरनेही आपल्या कार्यपद्धती बदलायला हवी. ग्राहकांना शिक्षित करणे व सजग ठेवणे देखील प्रभावी व्यक्तींची जबाबदारी आहेअसे सांगितले.

भवताल मासिका’चा एप्रिल २०२५ चा अंक प्रसिद्ध झाला असून, त्यात पुढील विषयांचा समावेश आहे.

 नमस्कार,

‘भवताल मासिका’चा एप्रिल २०२५ चा अंक प्रसिद्ध झाला असून, त्यात पुढील विषयांचा समावेश आहे.

• लोकसहभागातून देवडोहांचे पुनरुज्जीवन
-सुनील भोईटे

• अनसुऱ्यातील गोगलगायीची गोष्ट!
-प्रा. डॉ. अमृत भोसले
 
• वन वनवे टाळता येतील का?
-सुनील लिमये

• महाबळेश्वर : शिकाऱ्यांचा स्वर्ग
-डॉ. संजीव बा. नलावडे

• भवताल बुलेटिन
# बायकांना कमी लेखू नका, रुसल्या तर उंचावर येऊन बसतात...!
# माणसाच्या जन्माची रोमांचक गोष्ट!

• इको अपडेट्स
# गंध ओळखणारा संवेदनशील रोबो!
# इजिप्तमध्ये आढळले तब्बल 3,400 वर्षांपूर्वीचे शहर!
# रॉकेट नव्हे, चक्क तोफेने उपग्रह झेपावणार अंतराळात!
...

सोबत अंकाची पीडीएफ प्रत, नावनोंदणी करण्यासाठीची लिंक शेअर करत आहोत. आपल्या संपर्कात मासिकासाठी नावनोंदणी करण्याचे आवाहन करावे.

मासिकाच्या नावनोंदणीसाठी लिंक:
https://bhavatal.com/connectus/masik-nondani-information

(आपण 'भवताल मासिका'ची रु. ७९० इतकी वर्गणी भरावी, जेणेकरून आम्हाला त्याचा दर्जा टिकवण्यास मदत होईल.)

वर्गणी भरण्यासाठी बँक तपशील:
AC name : Bhavatal Foundation
AC no : 033805009849
IFS Code : ICIC0000338

(वर्गणी भरण्यासाठी सोबत QR code शेअर करत आहोत.)

संपर्क:
8421603929
Bhavatalfoundation@gmail.com

• संपादक

कृत्रिम बुद्धिमत्ता युगातील एव्हीजीसीएक्सआर क्षेत्रातील बदलता प्रवाह या परिसंवादातील सूर

 कृत्रिम बुद्धिमत्ता युगातील एव्हीजीसीएक्सआर क्षेत्रातील

बदलता प्रवाह या परिसंवादातील सूर

 

मुंबईदि. 4 : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) नवीन तंत्रज्ञानामुळे शिक्षणउद्योग क्षेत्रात नवनवीन संशोधन सुरू झाले आहे.अ‍ॅनिमेशनव्हिज्युअल इफेक्ट्सगेमिंगकॉमिक्स आणि एक्स्टेंडेड रिअॅलिटी क्षेत्रात मोठे बदल होत आहेत. ऍनिमेशन क्षेत्रात एआयचा वापर वाढला असला तरी सर्जनशीलता येणार नाहीते कृत्रिम दिसेलनैसर्गिक हे नैसर्गिकच राहणार असल्याच या परिसंवादात तज्ज्ञांनी मत मांडले.

बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ वर्ल्ड सेंटर येथे पार पडलेल्या जागतिक दृकश्राव्य मनोरंजन परिषदेत 'चेंजिंग डायनामिक्स ऑफ एव्हीजीसी एक्सआर इन एआय एरा : हाऊ टू ब्रिज इंडस्ट्री अँड अकॅडमीया विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यामध्ये अमेरिकन शिक्षणतज्ज्ञ ब्रियना याऱ्हौसेअमेरिकेतील ऍनिमेशन तज्ञ प्रमिता मुखर्जीअस्पाचे संचालक संजय खिमेसरा सहभागी झाले होते. तर समन्वयक म्हणून विनिता बच्चानी यांनी काम पाहिले.

कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे सर्जनशीलतेचा नवा अध्याय- ब्रियना याऱ्हौसे

विद्यार्थ्यांनी एक एआयचा वापर नवीन कल्पनासंशोधन आणि कलेतील नव्या कल्पकता शोधण्यासाठी करावा. विद्यार्थ्यांना शाळा,महाविद्यालयातसुद्धा नवीन तंत्रज्ञान याचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थी तंत्रज्ञानासोबत लवकर जुळवून घेऊन सर्जनशीलतेसह नेतृत्व करतीलअसे श्रीमती याऱ्हौसे यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख शिक्षण आवश्यक - संजय खिमेसरा

देशाच्या अर्थव्यवस्थेत शिक्षणाचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. कुशल मनुष्यबळ निर्माण करणेनवसंशोधनाला चालना देणे आणि उद्योगांच्या गरजा पूर्ण करणे महत्वाचे आहे. यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) प्रभावीपणे राबवण्यासाठी विविध अभिनव आणि परिवर्तनशील उपक्रम हाती घेतले पाहिजे. विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे महत्वाचे आहे त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी कौशल्यवृद्धीप्रत्यक्ष औद्योगिक अनुभव आणि रोजगारक्षमतेच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरेलअसे अस्पाचे संचालक संजय खिमेसरा यांनी सांगितले.

कृत्रिम बुद्धिमत्ता ही संधी आहेधोका नाही - प्रमिता मुखर्जी

अ‍ॅनिमेशन हे सर्जनशील क्षेत्र आहे. एआय हे रिपिटेटिव्हप्रक्रियात्मक कामेडेटा ट्रान्सफरप्लगइन लेखन या गोष्टींसाठी उपयुक्त आहेपण सर्जनशील क्षेत्र अजूनही मानवकेंद्रित राहील. सर्जनशील कलाकारांसाठी संधी कमी होणार नाहीत. कृत्रिम बुद्धिमत्तेकडे आपल्या कौशल्यात वाढ करून देणारी संधी म्हणून बघायला हवेअसे मत अ‍ॅनिमेशन क्षेत्रातील अमेरिकेतील अ‍ॅनिमेशन तज्ज्ञ प्रमिता मुखर्जी यांनी व्यक्त केले.


टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक" चे


 टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक" चे


उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्या उद्घाटन


शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी


५ ते ९ मे दरम्यान प्रशिक्षणाची टेकवारी


- अपर मुख्य सचिव व्ही.राधा


 


              मुंबई, दि. ४ : प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्या कौशल्य विकासासाठी, प्रशिक्षण संस्कृती निर्माण करण्यासाठी "टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक" दि. ५ ते ९ मे दरम्यान मंत्रालयात साजरा करण्यात येणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता(AI), ब्लॉकचेन, सायबर सुरक्षा, कार्यशाळा व विचारमंथनाच्या प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाच्या


 अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी दिली आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ सोमवार दिनांक दि.५ मे २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ९ मे रोजी दुपारी ३.०० या कार्यक्रमाचा समारोप होणार आहे.


            'टेक वारी' म्हणजे महाराष्ट्र शासन आयोजित पहिली डिजिटल वारी होय. आधुनिक तंत्रज्ञान व नवीन कल्पनांचा संगम असून 'टेक वारी' ही मंत्रालयातून सुरू होऊन महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांच्या कानाकोपऱ्यात तंत्रज्ञानाचा प्रसार करुन त्यामधून आधुनिक तंत्रस्नेही महाराष्ट्र घडविण्याची सुरुवात आहे. या 'टेक वारी' मध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, ब्लॉकचेन, सायबर सुरक्षा इत्यादी तंत्रज्ञानाबाबत सत्रे तसेच तणाव व्यवस्थापन, आरोग्यदायी जीवनशैली, ध्यानधारणा याबाबतच्या कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत. हे सर्व कार्यक्रम टेक वारीच्या


https://www.youtube.com/@TECH-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80


या यू ट्यूब चॅनलवर तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या फेसबुक पेजवर (https://www.facebook.com/MahaDGIPR) पाहता येतील.


पहिल्या दिवशी दि. ५ मे रोजी मंत्रालयातील त्रिमुर्ती येथे 'प्रभावी व तणावमुक्त जीवन' या विषयावर श्री.प्रभु गौर गोपाल दास मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी २:०० ते ३:०० या वेळेत मंत्रालयातील परिषद सभागृह, ६ वा मजला येथे "विकसित महाराष्ट्रासाठी फ्रंटियर तंत्रज्ञान" या विषयावर केंद्र शासनाच्या निती आयोगाच्या श्रीमती देबजानी घोष यांचे व्याख्यान होणार आहे. दुपारी ३:०० ते ४:०० या वेळेत मंत्रालयातील समिती सभागृह (कक्ष ३), ७ वा मजला येथे"शासकीय कामकाज डिजिटल पद्धतीने कसे करावे" या विषयावर मायक्रोसॉफ्ट,नॅसकॉमचे श्री. मंदार कुलकर्णी यांचे व्याख्यान होणार आहे. दुपारी ४:०० ते ५:०० या वेळेत मंत्रालयातील परिषद सभागृह, ६ वा मजला "कृत्रिम बुद्धिमत्ता" याविषयी नवी दिल्लीचे माहिती तंत्रज्ञान विभागाचे अतिरिक्त सचिव अभिषेक सिंग यांचे व्याख्यान होणार आहे.


             मंगळवारी दि.६ मे २०२५ सकाळी ११:३० ते १२:३० परिषद सभागृह, ६ वा मजला येथे 'तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर' या विषयावर परिषद सभागृह सहावा मजला येथे कृषी आयुक्त सुरज मांढरे आणि सह मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विकास नाईक यांचे व्याख्यान होणार आहे. दुपारी २:०० ते ३:०० या वेळेत परिषद सभागृह, ६ वा मजला येथे "भाषिणी-भाषेचा अडसर दूर करणे" या विषयावर डिजिटल इंडिया भाषिणी विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ नाग यांचे व्याख्यान होणार आहे. तसेच २:०० ते ३:०० त्रिमुर्ती प्रांगण येथे "प्रवास पाककृतींचा" या विषयावर डिजिटल जगातील महाराष्ट्रीयन पाककृतींची प्रणेती श्रीमती मधुरा बाचल यांचे व्याख्यान होणार आहे.दुपारी ३:०० ते ४:०० या वेळेत मंत्रालयातील सातवा मजला येथे समिती क्रमांक ३ मध्ये "इंटरनेट ऑफ थींग्ज (Internet of Things)" या विषयावर व्याख्यान होणार आहे.दुपारी ४:०० ते ५:०० या वेळेत परिषद सभागृह, ६ वा मजला येथे "ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी" नेसकॉमचे लौकिक रग्जी यांचे व्याख्यान होणार आहे.


            बुधवार दि.७ मे २०२५ तिसऱ्या दिवशी सकाळी ११:३० ते १२:३० या वेळेत परिषद सभागृह, ६ वा मजला येथे 'सायबर सुरक्षा: या विषयावर नेस्कॉमचे प्रसाद देवरे आणि सुकृत घोष यांचे व्याख्यान होणार आहे. दुपारी २.०० ते ३.०० या वेळेत त्रिमूर्ती प्रांगण मंत्रालय येथे आहार तज्ञ ऋतुजा दिवेकर यांचे 'आरोग्यदायी जीवनशैली'या विषयावर व्याख्यान होणार आहे. सह्याद्री अतिथिगृह येथे दुपारी ३.०० ते ४.०० या वेळेत 'फ्रंटियर तंत्रज्ञानाद्वारे प्रशासन नव्याने परिभाषित करणे' या विषयावर केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव एस. कृष्णन यांचे व्याख्यान होणार आहे. दुपारी ३ ते ४ या वेळेत मंत्रालयातील सातवा मजला समिती सभागृह क्रमांक तीन येथे 'स्मार्ट बैठक आयोजित करणे'या विषयावर झूम नेस्कॉमचे शैलेश रंगारी, मेहेर उल्ली पालेम यांचे व्याख्यान होणार आहे.


            गुरुवार दि.८ मे २०२५ – चौथ्या दिवशी सकाळी ११.३० ते दुपारी १२.३० या वेळेत "शासकीय कामकाजात फ्रंटियर तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर" या विषयावर परिषद सभागृह सहावा मजला मंत्रालय विस्तार येथे महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार, विभागीय आयुक्त नागपूरच्या विजयालक्ष्मी बिदरी, नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंग यांचे या विषयावर व्याख्यान होणार आहे. दुपारी २ ते ३ या वेळेत त्रिमुर्ती प्रांगण येथे"जीवन संगीत" या विषयावर जीवन संगीत समर्थक संतोष बोराडे यांचे व्याख्यान होणार आहे.दुपारी ३:०० ते ४:०० या वेळेत समिती सभागृह सातवा मजला, समिती कक्ष क्रमांक ३ येथे 'कृत्रिम बुद्धिमत्ता'या विषयावर नेस्कॉमचे मनीष पोतदार,सरस्वती गोल्लेरकरी यांचे व्याख्यान होणार आहे. दुपारी ४:०० ते ५:०० परिषद सभागृह सहावा मजला येथे 'डब्यासाठीच्या आरोग्यदायी पदार्थांच्या पाककृती'या विषयावरती केटरिंग टेक्नॉलॉजी न्यूट्रिशन, इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या अन्वेषा पात्रा यांचे व्याख्यान होणार आहे.


            शुक्रवार दि. ९ मे २०२५ पाचव्या दिवशी सकाळी १०:३० ते १:३० समिती सभागृह सातवा मजला समिती कक्ष क्रमांक ३ येथे वेळेत कौशल्य विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा वर्मा यांचे "स्टार्टअप डेमो डे" या विषयी व्याख्यान होणार आहे.सकाळी ११:३० ते १२:३० या वेळेत समिती सभागृह सातवा मजला समिती कक्ष क्रमांक ३ येथे नॅसकॉमचे श्रीमती प्राजक्ता तळवेलकर, सुची गुप्ता, राहुल मुलाने यांचे "डिजिटली सजग बना" या विषयी व्याख्यान होणार आहे. महाराष्ट्राच्या संत परंपरां आणि भक्तिभावाला उजाळा देणाऱ्या “ज्ञानाची वारी” या सांस्कृतिक कार्यक्रमाने 'टेक वारीचा' समारोप होणार आहे दुपारी १२.३० ते २.३० या वेळेत हा कार्यक्रम त्रिमूर्ती प्रांगण येथे होणार आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत टेक वारी या कार्यक्रमाचा समारोप दुपारी ३.०० वाजता होणार आहे.


            ‘फूड दॅट हील्स’ या उपक्रमांतर्गत पौष्टिक व पारंपरिक पाककृतींचे दररोज मेनू तयार केले जातील. तसेच विविध क्षेत्रातील २४ स्टार्टअप्सचे सादरीकरण होणार आहे.


०००


संध्या

 गरवारे/विसंअ/


 


परिवर्तनशील ‘ईट राईट स्ट्रीट फूड हब’उपक्रमात महाराष्ट्राकडून देशाचे नेतृत्व

 परिवर्तनशील ईट राईट स्ट्रीट फूड हबउपक्रमात

महाराष्ट्राकडून देशाचे नेतृत्व

- अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम

  • देशातील पहिले संपूर्णपणे महिलांकडून संचालित ‘ईट राईट स्ट्रीट फूड हब’ मुंबईत सुरू

 

मुंबई, दि. 4 : प्राप्त संधी आणि प्रशिक्षण यांच्या आधारे तळागाळातील सक्षमीत महिला स्वयं सहायता गटातील महिला देशातील अन्न सुरक्षा मानकांना परिभाषित करू शकतातयाचे माहिम सीफूड प्लाझा हे एक उत्तम उदाहरण आहे.  महाराष्ट्र ईट राईट स्ट्रीट फूड हब या परिवर्तनशील उपक्रमात महाराष्ट्र देशाचे नेतृत्व करत असल्याचा अभिमान आहे,  अशा शब्दात अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

देशातील पहिले संपूर्णपणे महिलांकडून संचलित ‘ईट राईट स्ट्रीट फूड हब’ मुंबईत सुरू करण्यात आले आहे. अन्न आणि औषध प्रशासनबृहन्मुंबई विभाग यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्यानेमाहिम रेतीबंदर येथे स्वयं सहायता गटाच्या सदस्य असलेल्या महिलांकडून भारतातील पहिले संपूर्णपणे महिलाकडून संचालित ईट राईट स्ट्रीट फूड हबसुरू करण्यात आले आहे. या उपक्रमाचा प्रमाणपत्र वितरण समारंभ 2 मे रोजी माहिम येथे आयोजित करण्यात आला. राज्यमंत्री श्री. कदम यांच्याहस्ते महिला स्वयं सहायता गटांच्या एकूण 153 महिलांना  प्रमाणपत्रे  प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाला अन्न व औषध प्रशासन आयुक्त राजेश नार्वेकरबृहन्मुंबई विभागाचे सह आयुक्त (अन्न)  मंगेश माने उपस्थित होते.

येथील महिलांकडून तयार अन्नपदार्थ हे फक्त स्वच्छ व चविष्ट नसून त्यामध्ये  कोकणची पारंपरिक खाद्य संस्कृती खोलवर रुजलेले असल्याचे सांगत राज्यमंत्री कदम यांनी स्वयं सहायता गटांच्या सर्व महिलांचे स्वच्छतेची उच्च मानके राखल्याबद्दल गौरवोद्गार काढले. माहिम सीफूड प्लाझामधील खाद्यपदार्थ स्टॉल्सना राज्यमंत्री श्री. कदम यांनी भेटी दिल्या.  तसेच अस्सल कोळी पदार्थांचा आस्वाद घेत महिला उद्योजकांशी संवाद साधला.

माहिम सीफूड प्लाझा दर बुधवारशुक्रवारशनिवार आणि रविवार सायंकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत सुरू असतो. स्वयं सहायता महिला बचत गटाच्या 153 महिलांद्वारे पूर्णपणे व्यवस्थापितप्रत्येक स्टॉलवर कठोर स्वच्छता नियमांचे पालन केले जाते. येथील महिलांनी ईट राईट इंडिया उपक्रमांतर्गत अन्न सुरक्षा प्रशिक्षण आणि प्रमाणन (FoSTaC) कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण केला आहेज्यामध्ये ऑडिट आणि तपासणीद्वारे अन्न सुरक्षा मानकांचे संपूर्ण पालन सुनिश्चित केले जातात.

राज्यमंत्री श्री.कदम यांनी यावेळी हबच्या यशस्वी प्रमाणीकरणासाठी योगदान दिलेल्या प्रमुख व्यक्तींना देखील सन्मानित केले. ज्यामध्ये बीएमसी जी-उत्तर वॉर्डचे समुदाय संघटक दक्षिता पवार आणि अनिकेत पाटेरेसमुदाय विकास अधिकारी अनिकेत पाच्छरकर आणि अजिंक्य पाच्छरकरसहाय्यक आयुक्त (अन्न) अनुपमा बाळासाहेब पाटील यांचा समावेश आहे.

बारावीच्या परीक्षेचा निकाल ५ मे रोजी जाहीर होणार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माहिती,https://mahahsscboard.in (in college login) या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना

 बारावीच्या परीक्षेचा निकाल ५ मे रोजी जाहीर होणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माहिती

 

मुंबईदि. ४ :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपद्धतीनुसार सोमवार दि. ५ मे२०२५ रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे, असे मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी जाहीर केले आहे.

 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणेनागपूरछत्रपती संभाजीनगरमुंबईकोल्हापूरअमरावतीनाशिकलातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. या संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत.

 

१) https://results.digilocker.gov.in २) https://mahahsscboard.in ३) http://hscresult.mkcl.org ४) https://results.targetpublications.org ५) https://results.navneet.com ६) https://www.tv9hindi.com/education/board-exams/maharashtra-board-exams ७) https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-hse-12-results ८) https://www.indiatoday.in/education-today/results आणि ९) https://www.aajtak.in/education/board-exam-results

 

परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण वरील संकेतस्थळांवर उपलब्ध होतील व माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल. त्याचप्रमाणे Digilocker app मध्ये Digital गुणपत्रिका संग्रहीत करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच https://mahahsscboard.in (in college login) या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईलअशी माहिती मंडळाच्या प्रकटनामध्ये देण्यात आली आहे.

Featured post

Lakshvedhi