Sunday, 4 May 2025

‘प्राईम फोकस' सोबतच्या तीन हजार कोटींच्या करारामुळे मुंबईत जागतिक दर्जाच्या स्टुडिओची इकोसिस्टिम तयार होणार

 प्राईम फोकससोबतच्या तीन हजार कोटींच्या करारामुळे

मुंबईत जागतिक दर्जाच्या स्टुडिओची इकोसिस्टिम तयार होणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबई, दि. २ : जागतिक दर्जाच्या स्टुडिओची इकोसिस्टिम तयार करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकण्यात आले आहे. चित्रपट सृष्टीत नविन्यपूर्ण संकल्पनाक्रिएटिव्हिटीचा गुणवत्तापूर्ण वापर होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्राईम फोकस’ सोबत ३००० कोटी रुपयांचा सामंजस्य करार करण्यात आला.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अनबलगन यांनी तर प्राईम फोकस च्या वतीने संचालक नमित मल्होत्रा यांनी करारावर सह्या केल्या. यावेळी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिकसिडकोचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघलएमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.वेलारासूउद्योग विकास आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह आदी उपस्थित होते.

            मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये झालेल्या कराराद्वारे ३००० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून त्यातून सुमारे २५०० लोकांना थेट रोजगार उपलब्ध होईल. हा प्रकल्प २०२५-२६ मध्ये सुरू होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

मुंबतील खार येथे कार्यालय असणाऱ्यातसेच जगभरात आपल्या शाखा असणाऱ्या प्राईम फोकस कंपनीचे जगभरात काम चालते. या कंपनीसह तिच्या सहयोगी कंपन्यांना आवश्यक त्या परवानग्या / नोंदणी प्रक्रिया / मान्यता / क्लिअरन्स / आर्थिक प्रोत्साहने इत्यादी मिळविण्यासाठी राज्य शासनाच्या विविध विभागांकडून सहकार्य करण्यात येणार आहे. त्यांना विद्यमान धोरणेनियम व नियमावलींनुसार आवश्यक ते सहकार्य करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

---०००-

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क’सोबत ,एज्यूकेशन सिटी’ मध्ये जगभरातील सर्वोत्तम विद्यापीठे एकत्रित येतील

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत

युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्कसोबत सामंजस्य करार

----

एज्यूकेशन सिटी’ मध्ये जगभरातील सर्वोत्तम विद्यापीठे एकत्रित येतील

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास

 

मुंबईदि. २ : नवीन शैक्षणिक धोरणामुळे भारताचे दरवाजे जगासाठी खुले झाले आहेत. यामुळे सिडकोमार्फत नवी मुंबईत सुरू होत असलेल्या एज्यूकेशन सिटी’ मध्ये जगभरातील सर्वोत्तम विद्यापीठे एकत्रित येतीलअसा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. आज झालेल्या करारांमुळे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विद्यापीठांत शिकण्याचे येथील युवकांचे स्वप्न पूर्ण होईलअसे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वेव्हज २०२५ परिषदेमध्ये आज आठ हजार कोटी रुपयांचे विविध सामंजस्य करार करण्यात आले. यापैकी सिडको आणि इंग्लंडच्या युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क’ यांच्यादरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिकउद्योग विभागाचे सचिव डॉ. पी.अन्बलगनसिडकोचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघलएमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.वेलारासूउद्योग विकास आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह आदी उपस्थित होते.

परदेशी विद्यापीठांना भारतात आणून जागतिक दर्जाचे शिक्षण केंद्र उभारण्याच्या उद्देशाने वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) २०२५ मध्ये सिडकोच्या इंटरनॅशनल एज्युसिटी प्रोजेक्टची घोषणा करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर वेव्हज परिषदेत सिडको आणि इंग्लंडच्या युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क (University of York) यांच्यादरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. हे विद्यापीठ नवी मुंबई येथे सिडकोमार्फत उभारण्यात येणाऱ्या एज्युसिटी’ प्रकल्पामध्ये आपले कॅंपस उभारून जागतिक दर्जाचे शैक्षणिक केंद्र निर्माण करणार आहे. यासाठी युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्कच्या वतीने १५०० कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे.

सिडकोच्या वतीने अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगल आणि युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्कच्या वतीने कुलगुरू व अध्यक्ष चार्ली जेफ्री यांनी स्वाक्षरी केली.

युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्कला राज्य शासनाच्या वतीने आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईलअसे मुख्यमंत्र्यांनी यावेळी आश्वस्त केले.

0000

कम्युनिटी रेडिओच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाला व्यासपीठ देण्याचे काम - माहिती व प्रसारण राज्यमंत्री एल. मुरुगन

 कम्युनिटी रेडिओच्या माध्यमातून

समाजातील प्रत्येक घटकाला व्यासपीठ देण्याचे काम

-  माहिती व प्रसारण राज्यमंत्री एल. मुरुगन

 

मुंबईदि. ३ : समाजाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्यासाठी कम्युनिटी रेडिओ हे अत्यंत महत्त्वाचे माध्यम आहे. या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाला व्यासपीठ देण्याचे काम देशातील कम्युनिटी रेडिओ यांनी करावेअसे आवाहन माहिती व प्रसारण राज्यमंत्री एल. मुरुगन यांनी केले.

 

मुंबईत सुरू असलेल्या 'वेव्हज २०२५या जागतिक परिषदेच्या निमित्ताने आठव्या राष्ट्रीय कम्युनिटी रेडिओ संमेलनाचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी श्री. मुरुगन यांनी मार्गदर्शन केले. यावेळी माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजूसहसचिव पृथुल कुमारइंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशनच्या कुलगुरु डॉ. अनुपमा भटनागर आदी उपस्थित होते. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कम्युनिटी रेडिओ यांना इनोव्हेटिव्ह कम्युनिकेशनप्रमोटिंग लोकल कल्चरसस्टेनेबिलिटी मॉडेल अवॉर्ड्स यासारखे विविध पुरस्कार देऊन यावेळी सन्मानित करण्यात आले.

 

माहिती व प्रसारण राज्यमंत्री श्री मुरुगन म्हणालेकम्युनिटी रेडिओच्या कार्यक्रमांमध्ये स्थानिक समाजाच्या भावनातेथील संस्कृतीकलासाहित्यखानपान यांचे प्रतिबिंब पाहायला मिळते. वेव्हजच्या पार्श्वभूमीवर हे संमेलन होत असल्याने त्याला एक वेगळा आयाम प्राप्त झाला आहे. कम्युनिटी रेडिओच्या माध्यमातून माहिती व मनोरंजनाबरोबरच महिला सक्षमीकरणसंस्कृतीवर्धनग्रामीण विकासासाठी काम होत आहे याचे समाधान वाटते. यापुढील काळात तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून जास्तीत जास्त समुदायापर्यंत पोहोचण्यासाठी कम्युनिटी रेडिओ यांनी प्रयत्न करावेतअसे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले.

 

उद्घाटनाच्या मुख्य सोहळ्यानंतर कम्युनिटी रेडिओशी संबंधित विविध विषयांवर दिवसभर चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले. या चर्चासत्रांमध्ये कम्युनिटी रेडिओच्या आर्थिकदृष्ट्या विकासाबरोबरच त्यांच्या सक्षमीकरणाबाबत चर्चा करण्यात आली. या चर्चासत्रामध्ये देशातील विविध विद्यापीठातील विषयतज्ज्ञांनी तसेच विविध कम्युनिटी रेडिओच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला.

----- ०००-----

डिजिटल माध्यमांसाठी नाविन्यता आणि सातत्य आवश्यक

 डिजिटल माध्यमांसाठी नाविन्यता आणि सातत्य आवश्यक

- डॉली सिंग

·         "Connecting Creators, Connecting Countries" चर्चासत्र

 

मुंबईदि. ३ : स्पर्धात्मक डिजिटल युगात स्वतःचे वेगळेपण जपण्यासाठी चांगली संहिताविषयांची प्रभावी मांडणीव्हिज्युअलचा योग्य वापर याबरोबरच  नाविन्यता आणि सातत्य असणे आवश्यक असतेअसे मत सोशल मीडिया इन्फ्लुएंसर व कंटेंट क्रिएटर डॉली सिंग यांनी व्यक्त केले.

बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ वर्ल्ड सेंटर येथे जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन परिषदेत "Connecting Creators, Connecting Countries" या चर्चासत्रात त्या बोलत होत्या. यावेळी देश-विदेशातील नामवंत सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि लोकप्रिय कंटेंट क्रिएटर सहभागी झाले होते.

डिजिटल माध्यमात आपली ओळख निर्माण करण्यासाठी करण्यासाठी प्रेक्षकांशी संवाद साधणे आणि त्यांच्या प्रतिसादाला उत्तर देणे तेवढेच महत्वाचे आहे. यामध्ये नाविन्यता आणि नियमित  दर्जेदार मजकूर अपलोड  करणे गरजेचे असते,असे श्रीमती सिंग यांनी यावेळी सांगितले.

सोशल मीडियावरील पोस्टसाठी आवश्यक व्हिडिओमजकूर,विषय मांडण्याची पद्धतसंपादनाची शैली आणि सादरीकरणाची पद्धत हे सर्व घटक वेगळेपण सिद्ध करतात. तसेच कोणतीही प्रसिद्धी करण्यापूर्वी सोशल मीडियावर शॉर्ट व्हिडिओटीझर किंवा ट्रेलर प्रसिद्ध करणे आवश्यक असते तरच त्या इव्हेंटबाबत उत्सुकता निर्माण होते आणि प्रेक्षक जोडले जातात असे सांगून डॉली सिंग यांनी स्वतःच्या अनुभवातून कंटेंट निर्मितीच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला.

0000

ओटीटी क्रांती ; वैयक्तिकरण, तंत्रज्ञान आणि कथांवर स्ट्रीमिंगचे भविष्य नेटफ्लिक्स, सोनी, जिओ हॉटस्टारचे वरिष्ठ अधिकारी, तज्ज्ञांचे मत

 ओटीटी क्रांती ; वैयक्तिकरणतंत्रज्ञान आणि कथांवर स्ट्रीमिंगचे भविष्य

नेटफ्लिक्ससोनीजिओ हॉटस्टारचे वरिष्ठ अधिकारी, तज्ज्ञांचे मत

·         'ओटीटी रिव्होल्युशन: हाऊ एआयपर्सनलिझेशन अँड इंट्रॅक्टिवे कंटेंट अ चेंजिंग स्ट्रीमिंग लॅन्डस्केप'  विषयावर चर्चासत्र

 

मुंबईदि. ३ : ओटीटी विश्वात तंत्रज्ञानवैयक्तिकरण आणि सर्जनशीलता यांचा संगम आता प्रेक्षकांच्या सवयी आणि पसंती बदलतो आहेअसे मत वेव्हज परिषदेत सहभागी झालेल्या आघाडीच्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

जिओ वर्ल्ड सेंटर येथील जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद - २०२५ मध्ये 'ओटीटी रिव्होल्युशन: हाऊ एआयपर्सनलिझेशन अँड इंट्रॅक्टिवे कंटेंट अ चेंजिंग स्ट्रीमिंग लॅन्डस्केप'  या विषयावर पॅनल चर्चा आयोजित करण्यात आली होती. यावेळी लायनस्गेट प्ले एशियाचे अध्यक्ष रोहित जैन यांच्या सूत्रसंचालनाखाली झालेल्या या चर्चेत जिओ हॉटस्टारचे चीफ प्रोडक्ट ऑफिसर भरत रामसोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव बॅनर्जीनेटफ्लिएक्स इंडियाचे उपाध्यक्ष (कन्टेन्ट) मोनिका शेरगिलएशिया पॅसिफिक आणि मिनी प्राइम व्हिडिओचे उपाध्यक्ष गौरव गांधीहंगामा डिजिटल मीडिया एंटरटेनमेंट लिमिटचे व्यवस्थापकीय संचालक नीरज रॉय यांनी सहभाग घेतला.

प्रेक्षकासाठी योग्य कंटेंट

गौरव बॅनर्जी यांनी सांगितले कीग्राहक काय पाहतोकाय शोधतोत्याच्या आवडीवरुनच आम्ही पुढील कंटेंट सुचवतो. प्राईम व्हिडिओमिनी टीव्ही यासारख्या प्लॅटफॉर्म्सवर ग्राहकांचा प्रवास एकसंध ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येतो. भाषेच्या विविधतेतून प्रेक्षकांची रुची वाढवण्यासाठी सबटायटल्सडब्स महत्त्वाच्या ठरतात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नेटफ्लिक्सचार आधुनिक तंत्रज्ञान आणि सर्जनशीलता यावर भर

नेटफ्लिक्सवरील प्रत्येक वापरकर्त्याचा अनुभव वेगळा असतोकारण आमचे उत्पादन सतत प्रेक्षकांच्या वर्तनावर अवलंबून असते. वैयक्तिकीकरण आणि कंटेंट डिस्कवरी यामध्ये समतोल राखतनवीन शैली आणि ट्रेंड्स प्रेक्षकांसमोर ठेवण्याचे काम अल्गोरिदम करत असते. हे एक सर्जनशील माध्यम आहेअसे मत नेटफ्लिक्सच्या कंटेंट उपाध्यक्षा मोनिका शेरगिल यांनी मांडले.

जिओहॉटस्टारचा अनोखा क्रिकेट टू कंटेंट’ फॉर्म्युला

जिओहॉटस्टारचे भरत राम यांनी आयपीएलसारख्या मोठ्या इव्हेंटनंतर प्रेक्षकांना इतर कंटेंटकडे वळवण्याची रणनीती मांडली. जर कोणी तमिळ कमेंट्री निवडलीतर त्याच्या होमपेजवर तमिळ कंटेंट जास्त दिसतेअसे त्यांनी सांगितले. वापरकर्त्याचे डिवाइसभाषा आणि लोकेशन यावरून वैयक्तिक शिफारसी केल्या जातात. यामागे प्रेक्षक वर्षभर टिकून राहावाहेच अंतिम उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सोनीचा भर कथांवर

सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव बॅनर्जी यांनी सांगितले कीवैयक्तिकरणाबरोबरच कथांवर आपला सहज विश्वास बसतो. आपण कथा सांगणाऱ्या संस्कृतीतून आलो आहोत. ज्या भाषावेळ आणि प्रदेश यांच्या सीमा पार करतात. पुष्पा २ आणि छावा सारख्या यशस्वी चित्रपटांचा दाखला देतत्यांनी हे चित्रपट ब्लॉकबस्टर ठरवून बनवत नाहीतती वेळभावना आणि सर्जनशील दृष्टी ठरवत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

नव्या ओटीटी पर्वाची सुरुवात

या चर्चेतून स्पष्ट झाले कीओटीटी क्षेत्र आता केवळ कंटेंट तयार करणारे राहिलेले नाहीतर एक स्मार्टगुंतवणूक करणारेआणि सांस्कृतिकदृष्ट्या सजग माध्यम बनले आहे. वैयक्तिक अनुभवभाषिक विविधता आणि कथांची सार्वत्रिक शक्ती हाच या नव्या ओटीटी पर्वाचा मूलमंत्र ठरत आहेत.

स्पर्धात्मक युगात ‘ए.आय.’चा वापर गरजेचा चर्चासत्रात तज्ज्ञांचा सूर ·

 स्पर्धात्मक युगात ‘ए.आय.’चा वापर गरजेचा

चर्चासत्रात तज्ज्ञांचा सूर

·         ए.आय. कसे परिवर्तन घडवित आहे’ विषयावर चर्चासत्र

 

मुंबईदि. ३ : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (ए.आय.) टूल्सचा आता प्रत्येक क्षेत्रात वापर होत आहे. ए.आय. टूल्स शिकण्यास अतिशय सोपे असून यापुढे प्रत्येक क्षेत्रात ‘ए.आय.’चा वापर केल्यास आपल्या क्षेत्रात काम करणे सोपे जाईलअसे मत चित्रपट निर्मितीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणाऱ्या निर्मात्यांच्या चर्चासत्रामधे व्यक्त करण्यात आले.

जिओ वर्ल्ड सेंटर येथे आयोजित वेव्हज् परिषदेमध्ये चित्रपट निर्मितीमध्ये ए.आय. कसे परिवर्तन घडवित आहे’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या चर्चासत्रात व्हिसलिंग वूड्स इंटरनॅशनलचे उपाध्यक्ष चैतन्य चिंचलीकरन्यूरल गॅरेजचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार नाटेकरचित्रपट निर्माता राघवेंद्र नाईक यांनी सहभाग घेतला.

या चर्चासत्रात ‘ए.आय.’चा चित्रपट निर्मितीतील वापराबाबत चर्चा करण्यात आली. ‘ए.आय.’च्या सहाय्याने पटकथासंवाद लिहिणे अधिक वेगवान बनले आहे. या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने व्हिज्युअल इफेक्ट्स अधिक वास्तवदर्शी आणि कमी खर्चात तयार करता येतात. ‘ए.आय.’ च्या मदतीने संपादन प्रक्रियाऑडिओ आणि व्हिज्युअल डबिंग अतिशय सुलभ झाले असून अधिक भाषांमध्ये डबिंग करणे सुद्धा सहज शक्य झाले असल्याचे सहभागी निर्मात्यांनी सांगितले.

‘ए.आय.’च्या कोणत्या टूलचा वापर करावायाबाबत श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना श्री.चिंचलीकर यांनी अनेक टूल्स उपलब्ध असून ‘ए.आय.’चा वापर करताना सुरुवातीला मोफत उपलब्ध असलेल्या विविध टूल्सचा वापर करावा त्यातून आपल्याला सुलभ असणारी टूल्स विकत घ्यावेअसा सल्ला दिला.

 

आशय निर्मितीत भारत जागतिक स्तरावर उत्कृष्ट व्यावसायिक भागीदार बनण्यास सज्ज · ‘लाईट्स, कॅमेरा, एक्सआर: व्हर्च्युअल प्रॉडक्शन इज रिशेपिंग ग्लोबल सिनेमा’ परिसंवाद

 आशय निर्मितीत भारत जागतिक स्तरावर

उत्कृष्ट व्यावसायिक भागीदार बनण्यास सज्ज

·        ‘लाईट्सकॅमेराएक्सआर: व्हर्च्युअल प्रॉडक्शन इज रिशेपिंग ग्लोबल सिनेमा’ परिसंवाद

 

मुंबई, दि ३ : जागतिक स्तरावर आशय निर्मितीच्या क्षेत्रात भारत एक उत्कृष्ट व्यावसायिक भागीदार म्हणून सज्ज असल्याचे प्रतिपादन  एव्हीजीसी-एक्सआर मंचफिक्कीचे माजी अध्यक्ष,  अशिष कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आयोजित "वेव्हज २०२५दृकश्राव्य मनोरंजन समिट" मध्ये ‘लाईट्सकॅमेराएक्सआर: व्हर्च्युअल प्रॉडक्शन इज रिशेपिंग ग्लोबल सिनेमा’  (Lights, camera,xr how virtual production is reshaping global cinema ) या विषयावर आयोजित परिसंवादात श्री.कुलकर्णी बोलत होते.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात जागतिक सिनेमा  कशा पद्धतीने बदलत आहे या विषयावर  चित्रपट दिग्दर्शक केतन मेहताअशिष कुलकर्णी माजी अध्यक्षएव्हीजीसी-एक्सआर मंचफिक्की यांच्या सह  लायटस स्टुडिओ आणि ओटीटी अमेरिकाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रागीव खेऱोर आणि ब्रायन निट्झकिन – सह-संस्थापकऑर्बिटल स्टुडिओज या तज्ञांनी आपली मते मांडली. सत्राचे सूत्रसंचालन मीडिया तंत्रज्ञान नवोपक्रमक,  लोनाकोचे संस्थापक सायमन इंग्रॅम यांनी केले.

सिनेसृष्टीत तंत्रज्ञानाचा झपाट्याने होणारा वापर सिनेमा निर्मितीच्या प्रत्येक टप्प्याला नवे वळण देत आहे. व्हर्च्युअल प्रॉडक्शन ही केवळ एक संकल्पना राहिली नसूनती आता सर्जनशीलताकार्यक्षमता आणि जागतिक सहकार्याचा नवा मार्ग ठरत असल्याचा सूर व्यक्त करत या विशेष सत्रातजगभरातील तंत्रज्ञान आणि सिनेसृष्टीतील अग्रणी तज्ज्ञ रागीव खेऱोरब्रायन निट्झकिनआणि सायमन इंग्रॅम  या वक्त्यांनी चर्चासत्रात सहभाग घेतला . यावेळी हे  तंत्रज्ञान प्रत्यक्षात कसे कार्य करते आणि ते सिनेमा निर्मितीला कशी दिशा देत आहे  यादृष्टीने व्हर्च्युअल प्रॉडक्शनच्या भविष्याच्या अनुषंगाने वक्त्यांनी आपले म्हणणे मांडले.

आशिष कुलकर्णीम्हणाले की चित्रपट आणि इतर सर्व प्रकारच्या आशय निर्मितीसाठी भारत सर्वार्थाने सुयोग्य ठिकाण आहे. भारतीय हवामानामुळे जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतात  विविध सिनेमा व संलग्न क्षेत्रात निर्मिती साठी उत्कृष्ट संधी आहे. भविष्यात येत्या पाच दहा वर्षांत भारत  व्हर्चुअल निर्मिती मधील एक महासत्ता बनेल. केंद्र सरकार यासाठी पाठिंबा देत आवश्यक सहकार्य करत आहेत, त्यामुळे गेल्या दहा वर्षांत भारतात निर्मिती प्रकल्पाच्या प्रमाणात वाढ होत आहे.

चित्रपट दिग्दर्शक केतन मेहता म्हणाले कीगोष्ट, कथा सांगण्याची समृद्ध परंपरा भारतात आहे. सकस आशय हा भारतीय सिनेमाचे वैशिष्ट्य राहिला आहे. त्यामुळे बदल्यात आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात आपल्या सृजनशीलतेला मोठे अवकाश प्राप्त होईल. त्याचा लाभ भारतीय कलाकारतंत्रज्ञ यांनी अवश्य घेतला पाहिजे. हा आपल्या क्षमता सिद्ध करून त्या जागतिक पातळीवर पोहचवण्याचा काळ आहे. यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची उपयुक्तता सर्वाधिक प्रभावी ठरत आहे.

 सृजनशीलतावास्तव आणि कल्पना शक्ती यामध्ये खूप सूक्ष्म फरक आहे. त्या खूप सुंदर पद्धतीने एकत्रितपणे आशय निर्मितीसाठी सक्रिय आहेत. यामध्ये आधुनिक तंत्रज्ञान निश्चितच मोठा प्रभाव टाकत असल्याचे मत श्री. मेहता यांनी व्यक्त केले.

0000

Featured post

Lakshvedhi