Thursday, 24 April 2025

हवामान कृषि विशेष पंचायत पुरस्कार

 इतर पुरस्कार विजेते

हवामान कृषि विशेष पंचायत पुरस्कार अंतर्गत दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार कर्नाटक राज्यातील हसन जिल्ह्यातील बिरदहल्ली ग्रामपंचायतीने मिळवला असून त्यांना 75 लाख रुपयांचे पारितोषिक मिळाले आहे. तर तिसरा क्रमांक बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील मोतीपूर ग्रामपंचायतीला मिळाला असून त्यांना 50 लाख रुपयांचे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

यासोबत आत्मनिर्भर पंचायत विशेष पुरस्कार अंतर्गत तेलंगणाच्या रंगारेड्डी जिल्ह्यातील मल ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकावून एक कोटी रुपयांचे पारितोषिक मिळवले. ओडिशाच्या मयूरभंज जिल्ह्यातील हातबदरा ग्रामपंचायतीने दुसरा क्रमांक मिळवत 75 लाख रुपयांचा पुरस्कार पटकावलातर आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील गोल्लापुडी ग्रामपंचायतीला तिसरा क्रमांक मिळाला असून त्यांना 50 लाख रुपयांचा पुरस्कार मिळाला आहे.

पंचायत क्षमता निर्माण सर्वोत्तम संस्था पुरस्कार अंतर्गतही उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संस्थांचा यावेळी गौरव करण्यात आला. या श्रेणीत प्रथम क्रमांक केरळ इन्स्टिट्यूट ऑफ लोकल ॲडमिनिस्ट्रेशन, केरळ यांना देण्यात आला असून त्यांनी एक कोटी रुपयांचे पारितोषिक पटकावले. दुसरा क्रमांक ओडिशातील राज्य ग्रामीण विकास आणि पंचायती राज संस्थेला मिळाला असून त्यांना 75 लाख रुपयांचा पुरस्कार प्राप्त झाला. तिसऱ्या क्रमांकावर आसाममधील राज्य पंचायत आणि ग्रामीण विकास संस्था असून त्यांना 50 लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.

गोंदिया जिल्ह्यातील डव्वा/स ग्रामपंचायत राष्ट्रीय पंचायत पुरस्काराने सन्मानित हवामान कृती विशेष पुरस्कारात अव्वल

 गोंदिया जिल्ह्यातील डव्वा/स ग्रामपंचायत राष्ट्रीय पंचायत पुरस्काराने सन्मानित

हवामान कृती विशेष पुरस्कारात अव्वल

नवी दिल्ली 24: राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त  देशातील विविध ग्रामपंचायतींना व तसेच संस्थांना  केलेल्या  उत्कृष्ट  कामगिरीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारांमध्ये गोंदिया  जिल्ह्यातील डव्वा/स ग्रामपंचायतीला हवामान कृती  विशेष पंचायत पुरस्कार वर्ष  2023-24 साठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

राष्ट्रीय पंचायत राज दिन-2025 निमित्त मधुबनीबिहार येथे पंचायती राज मंत्रालयाकडून हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या पुरस्कार सोहळ्यात प्रथमच हवामान कृती विशेष पंचायत पुरस्कारआत्मनिर्भर पंचायत विशेष पुरस्कार आणि पंचायत क्षमता निर्माण सर्वोत्तम संस्था पुरस्कार (PKNSSP) या श्रेणींमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आले.  हवामान कृती विशेष पंचायत पुरस्कार श्रेणीत गोंदिया जिल्ह्यातील  डव्वा/स ग्रामपंचायतीने उत्कृष्ट कामगिरी केली असूनसर्वोत्तम स्थान मिळवले आहे. हा पुरस्कार ग्रामपंचायतच्या सरपंच योगेश्वरी चौधरी यांनी प्रधानमंत्री याच्या हस्ते स्वीकारला.  पुरस्काराचे स्वरुप एक कोटी रुपये रोख पारितोषिकमानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे आहे.

हवामान बदलावर मात करणारी डव्वा/स ग्रामपंचायत ठरली देशात आदर्श

गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील डव्वा/स ग्रामपंचायतीने हवामान कृती विशेष पंचायत पुरस्कार मध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासाच्या दिशेने प्रभावी पावले उचलत हवामान बदल विरुद्ध त्यांनी प्रभावीरित्या राबवलेल्या उपाययोजना राष्ट्रीय पातळीवर आदर्श ठरल्या आहेत.

डव्वा/स ग्रामपंचायतीने विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांद्वारे गावात पर्यावरणपूरक जीवनशैली रुजवली आहे. गावातील प्रत्येक घरात सौर ऊर्जेचा वापर वाढावा यासाठी विशेष प्रोत्साहन देण्यात आले असूनप्लास्टिक व फटाक्यांवर संपूर्ण बंदी लागू करण्यात आली आहे. यामुळे गावाचा कार्बन फूटप्रिंट लक्षणीयरित्या कमी झाला आहे.

निसर्गातील पंचतत्त्वांचे – पृथ्वीवायूजलअग्नी आणि आकाश – संवर्धन करण्यासाठी जैवविविधता जपणारे उपक्रम प्रभावीपणे राबविले गेले. ग्रामपंचायतीच्या या यशामागे सरपंच योगेश्वरी चौधरी आणि ग्रामपंचायत अधिकारी सिंधू सूर्यवंशी यांचे नेतृत्व महत्त्वाचे ठरले आहे. गावकऱ्यांनी एकजुटीने या उपक्रमांमध्ये सहभाग घेत पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी घेतली. या सर्व उपक्रमांची दखल घेत 11 एप्रिल 2025 रोजी केंद्र शासनाच्या निरीक्षण पथकाने ग्रामपंचायतीची पाहणी केली.

स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणाचे वेळापत्रक तयार करा

 स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणाचे वेळापत्रक तयार करा

-         मंत्री डॉ. अशोक वुईके

 

मुंबईदि. २४ : आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (टीआरटीआय) विविध स्पर्धा परीक्षांसाठी लाभार्थी विद्यार्थ्यांची निवड तसेच प्रशिक्षण संस्था निवड प्रक्रिया राबविण्यासाठी वेळापत्रक तयार करावे, असे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिले.

मंत्रालयात मंत्री डॉ. वुईके यांच्या अध्यक्षतेखाली आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारेआदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त समीर कुर्तकोटी यांच्यासह विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री डॉ.वुईके म्हणालेप्रशिक्षणासाठी निवड झालेल्या प्रशिक्षण संस्थांची विशेष पथकाद्वारे कार्यक्षमता व गुणवत्ता तपासणी करण्यात यावी. प्रशिक्षण अभ्यासक्रमात आवश्यक बदल करून नवीन कोर्सेसचा समावेश करावा. तसेच पेसा क्षेत्रातील सरपंचउपसरपंच व आदिवासी सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसाठी विविध विषयांवर प्रशिक्षण कार्यक्रम राबवावेत.

आदिवासी समाजाच्या लोककलाबोलीभाषासंस्कृती  व परंपरांचे दृकश्राव्य माध्यमातून संकलन करण्यात यावे. तसेच क्रांतिकारकांची चरित्रे बोलीभाषेत साहित्य स्वरूपात तयार करावीत. याचबरोबर धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत गावांचे आराखडे तयार करावे यासाठीचा आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात येईलअसेही मंत्री डॉ.वुईके यांनी सांगितले.

००००

*उंबर (औंदुंबर) - एक आध्यात्मिक वृक्ष

 *उंबर (औंदुंबर) - एक आध्यात्मिक वृक्ष*

       उंबर जिथे आहे तिथे श्री. दत्तगुरुंचा वास असतो,असे हिंदू धर्मात मानले जाते. याच्या औषधी गुणांमुळेच उंबराच्या वृक्षाला आध्यात्मिक महत्व आहे. तेव्हा हा वृक्ष आपल्याला अमाप अशी निसर्गदत्त, औषध योजना बहाल करतो.


◼️उंबराच्या सालीचा काढा करून , त्यांत, वेलची, खडीसाखर टाकून सरबत करावे, कँसर सारख्या रुग्णाच्या अंगाचा जो दाह होतो, त्यावर आराम पडतो. दिवसांतून तीनदा घ्यावे. औंदुबरावलेह हे प्रसिद्ध औषध पित्तज विकारांवर प्रसिध्द आहे.


◼️जखम झाल्यस याच काढ्याने धुतल्यास, ती वेगाने बरी होते. अतिसाराच्या वेळी रक्त पडल्यास हाच काढा घ्यावा. गर्भाशयाची सूज कमी करण्यासाठी, रक्तप्रदर, श्वेतप्रदर, मासिकधर्म जास्त जात असेल, तर सालिचा काढा, पोटातून देतात. गर्भपात, होउ नये म्हणून, गर्भाचे पोषण निट व्हावे म्हणून, याच्या सालिचा काढा घेतात.


◼️भस्मक नावाचा रोग आहे त्यांत सारखी भूक लागते. पोट भरल्याची जाणीव होत नाही. तेव्हा, उंबराची साल दूधांत घोटून द्यावी. कावीळीत, उंबराचे पिकलेले अर्धे पान विड्यातून देतात. ज्वरदाह, तीव्र तापात, पिकलेले उंबर द्यावे,गोवर, कांजण्या, अतिसार, उन्हाळी, मधुमेह, या सर्व रोगांवर उंबराचे फळ, पाने, फुले उपयोगात आणली जातात.


◼️किटकदंश, विंचूदंश झाल्यास झाडाची पाने वाटून लावल्यास, दाह, वेदना, कमी होतात. तोंडातले अल्सर, व्रण, छाले, यावर उंबराच्या पानावर असे  बुडबडे वर दिसतात. ते काढून  त्याचि चटणी मधातून चाटण म्हणून द्यावे. तोंडाचा दाह कमि होतो..


◼️अंगात उष्णता, कडकी असल्यास उंबराची दोन फळे रोज सकाळी खडीसाखरेसोबत खावीत.


◼️तृष्णेचा आजार बरा होतो. जेव्हा खुप तहान, तहान होते, जीव कासावीस होतो, तेव्हा उंबराची साल, वा कच्ची फळे पाण्यात कुस्करून सरबत करून द्यावे


◼️डांग्या खोकल्यावर उंबराचा चिक टाळूवर लावावा ताबडतोब थांबतो. 


◼️किडनि स्टोन (मूतखडा) - उंबराच्या जुन्या झाडाच्या खोडाला खाच द्यावी व तिथेच एक भांडे अडकावे रात्रभर रस झिरपून भांड्यात गोळा होईल, तो सकाळी  पिण्यास घ्यावा. किडनी स्टोन वितळून मूत्रावाटे बाहेर पडतात.


◼️उंबर फळ दूधांत शिजवून खाल्ल्यास पचनसंस्था मजबूत होते, पोटाचे सर्व विकार बरे होतात. विशेषतः हे थंड गुणधर्माचे असल्यानेच, आम्लपित्त, मळमळ, पोटात दाह, अल्सर, सारखे आजार याच्या सेवनाने बरे होतात.


तेव्हा आपल्या परीसरात याचे झाड असणे आवश्यक आहे. अतिशय, उपयोगी, औषधी गुणधर्माचा हा वृक्ष कायम चिरतरुण ठेवतो.


*विशेष सुचना :- हा मेसेज वेळात वेळ काढून ईतरांच्या माहीतीत भर पडावी म्हणून पुढे शेअर करावा*


*ह्या व अशा निशुल्क माहीती साठी आरोग्य मधुमेह मुक्ती  हा ग्रुप जॉईन करा*


*

 *

खडवलीतील अनधिकृत बालगृह प्रकरणावर उपसभापती यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न अनधिकृत संस्थांची ओळख पटवण्यासाठी ‘डिस्ट्रिक्ट मॅपिंग’ करणे आवश्यक -

 खडवलीतील अनधिकृत बालगृह प्रकरणावर उपसभापती यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

अनधिकृत संस्थांची ओळख पटवण्यासाठी डिस्ट्रिक्ट मॅपिंग’ करणे आवश्यक

- विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

 

मुंबई दि. २४ : राज्यात पोलीस ठाण्याच्या अखत्यारितील निवासी गृहांवर लक्ष ठेवण्यासाठी महिला दक्षता समितीच्या उपसमित्या स्थापन कराव्यात. अशा समित्यांद्वारे संबंधित बालगृहांवर सातत्याने लक्ष ठेऊन छेडछाडमारहाण किंवा अन्य तक्रारींची तत्काळ दखल घ्यावी. अनधिकृत संस्थांची ओळख पटवण्यासाठी समाजकल्याणआदिवासी विकासशिक्षण विभाग आदींच्या कागदपत्रांचे एकत्रिकरण करून डिस्ट्रिक्ट मॅपिंग’ करणे आवश्यक असल्याचे  विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

खडवली ता. कल्याणजि. ठाणे येथील अनधिकृत खासगी बालगृहात ११ एप्रिल २०२५ रोजी उघडकीस आलेल्या अत्याचारप्रकरणी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन येथे विशेष आढावा बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी महिला व बाल विकास विभागाचे अवर सचिव प्रसाद कुलकर्णीउपायुक्त सुवर्णा पवार तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडेतपास अधिकारी सुरेश कदमअपर जिल्हाधिकारी हरिशचंद पाटीलजिल्हा महिला बाल विकास अधिकारी संजय भोसलेसहआयुक्त राहूल मोरे उपस्थित होते. या बैठकीत डॉ. गोऱ्हे यांनी संबंधित सर्व शासकीय यंत्रणांकडून तातडीने आणि प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या सूचना दिल्या.

 ट्रॅफिकिंगमधून मुक्त झालेल्या मुलींच्या यशोगाथा समाजासमोर आणाव्यातअसेही सुचवण्यात आले. अशा मुलींनी त्यांच्या जीवनात कसे परिवर्तन घडवून आणलेयाचे उदाहरण देताना  उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या कीएक मुलगी जी बचावली गेलीतिला जेव्हा विचारले की तुला काय व्हायचं आहेतेव्हा तिने उत्तर दिलं की मला पोलीस व्हायचंय – ज्याने मला विकलं त्याला पकडण्यासाठी. अशा प्रेरणादायी कथा बदललेल्या नावांसह समाज माध्यमांवरमहिलांच्या बचतगटांततसेच शासकीय कार्यक्रमांतून प्रसिद्ध करण्यात याव्यातअसेही त्यांनी यावेळी सांगितले.

       उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले कीअशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रत्येक संबंधित खात्याने सतत कार्यरत राहणे गरजेचे आहे. बचावलेल्या मुलींचे पुनर्वसनत्यांच्या सुरक्षेची हमीतसेच कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यासाठी यंत्रणांमध्ये समन्वय वाढवणे आवश्यक आहे. प्रत्येक दोन महिन्यांनी विभागीय बैठक घेऊन प्रगतीचा आढावा घेण्यात यावाअसेही त्यांनी सुचवले. जिल्हाधिकाऱ्यांनी १५ जूनपूर्वी सर्व अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असूनया प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर व्यापक कृती आराखड्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या डॅशबोर्डचे,https://dashboardhtedu.maharashtra.gov.in/homeउद्घाटन

 उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या डॅशबोर्डचे

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

 

मुंबईदि. 24 :-  राज्यातील विद्यापीठे व महाविद्यालयांचा अद्ययावत तपशील एका ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने "डॅशबोर्ड" विकसित करण्यात आला आहे. याचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री  चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मंत्रालयात करण्यात आले.

याप्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डीतंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकरउपसचिव प्रताप लुबाळउपसचिव अशोक मांडेउपसचिव संतोष खोरगडे उपस्थित होते. तर सर्व विद्यापीठांचे कुलगुरूउच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

मंत्री श्री.पाटील म्हणालेया डॅशबोर्डमध्ये विद्यापीठांशी संबंधित प्रवेश प्रक्रियानिकालशिष्यवृत्तीवसतिगृहेशुल्क आणि महाविद्यालयांशी संबंधित संलग्नता व शैक्षणिक सुविधा तसेच सार्वजनिक ग्रंथालय यांची माहिती समाविष्ट आहे. या डॅशबोर्डवर 26 सार्वजनिक विद्यापीठे व महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचा समावेश असून भविष्यात राज्यातील सर्व खासगी व सार्वजनिक विद्यापीठांचा समावेश डॅशबोर्डमध्ये करण्यात येणार आहे. हा डॅशबोर्ड उच्च व तंत्र शिक्षण विभागाबरोबरच सर्वसामान्य जनतेसाठीही उपलब्ध आहे.

या डॅशबोर्डमधील माहितीचे विश्लेषण करून शैक्षणिक विषयांबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यास तसेच गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मोलाची मदत होणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना व पालकांना त्यांच्या शैक्षणिक बाबींकरिता खात्रीशीर अद्ययावत माहिती उपलब्ध होणार आहे. या माहितीच्या विश्लेषणासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे नियोजित असल्याची माहिती मंत्री श्री.पाटील यांनी दिली.

डॅशबोर्डवरील अधिक माहिती https://dashboardhtedu.maharashtra.gov.in/home उपलब्ध असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

राज्य कामगार विमा योजनेतील रुग्णालये होणार अत्याधुनिक

 राज्य कामगार विमा योजनेतील रुग्णालये होणार अत्याधुनिक

 सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

 

मुंबईदि. 24 : राज्यातील कामगार विमा योजनेंतर्गत येणाऱ्या सर्व रुग्णालयातील पायाभूत सुविधा आणि यंत्रसामग्री आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात यावाअसे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.

 

राज्य कामगार विमा योजनेच्या मुख्य कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत मंत्री श्री. आबिटकर बोलत होते. या वेळी वैद्यकीय संचालक डॉ. शशी कोळूणूरकरसंचालक (प्रशासन) सोहम वायाळउपसंचालक सचिन देसाई तसेच राज्यातील विविध राज्य विमा रुग्णालयांचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

 

मंत्री श्री.आबिटकर म्हणालेराज्यातील रेशन दुकानदारपतसंस्था व शिक्षक यांनाही कामगार विमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात. तसेच रुग्णालयातील रुग्णसंख्या वाढवण्यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांनी शिबिरे आयोजित करावीत आणि सुविधा वाढवण्याचे प्रयत्न करावेत. याचबरोबर रुग्णालयांचा दर्जा वाढविण्यासाठी नवीन योजना तयार कराव्यात. शासनाकडून साहित्य व यंत्रसामग्री पुरवण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. रिक्त पदे भरण्यासाठीही तातडीने कार्यवाही केली जाईल तसेच डायलिसिससारख्या आधुनिक सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जाणार असूनवैद्यकीय अधिकाऱ्यांनी जबाबदारीने व जलदगतीने काम करावेअसे निर्देशही त्यांनी दिले. कामगारांची नोंदणी करताना येणाऱ्या अडचणी शोधून त्या सोडवण्यासाठी उपाययोजना सुचवण्यात याव्यात व जनजागृतीसाठी उपक्रम राबवावेत.

एक महिन्यानंतर या सूचनांचा पुन्हा आढावा घेतला जाईल. कामात प्रगती न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. रुग्णालयांचा दर्जा वाढवण्यासाठी नवीन योजना तयार करण्यात याव्यात.

Featured post

Lakshvedhi