Wednesday, 9 April 2025

डॉ. सी. डी. देशमुख जैवविविधता, वने व उद्यानाचा विकास

 डॉ. सी. डी. देशमुख जैवविविधतावने व उद्यानाचा विकास

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत संबंधित विषयांचा सखोल आढावा घेतला. कोकणचे सुपुत्रथोर अर्थतज्ज्ञ डॉ. चिंतामणराव देशमुख यांच्या कार्याच्या स्मतीप्रित्यर्थ जामगाव येथे उभारण्यात येत असलेल्या जैवविविधता आणि वनउद्यानासाठी निधीची उणीव भासू देणार नाही. सध्या सुरु असलेली कामे तातडीने पूर्ण करावीत. निसर्गपर्यटनाचा प्रस्ताव तात्काळ शासनाकडे पाठवावा. प्रस्तावाची पडताळणी करुन तातडीने मान्यता देण्यात येईल. आवश्यतेनुसार टप्प्याटप्याने निधी उपलब्ध केला जाईल. यासंदर्भातील प्रशासकीय कार्यवाही तातडीने पूर्ण करावीअसे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

रायगड जिल्ह्यात विविध प्रकल्प, विकासकामांना गती देण्यासाठी

 वृत्त क्र. १५००

रायगड जिल्ह्यात विविध प्रकल्पविकासकामांना गती देण्यासाठी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक

मंत्री आदिती तटकरेखासदार सुनील तटकरे यांची विशेष उपस्थिती

 

          जामगावच्या डॉ. सी. डी. देशमुख जैवविविधतावनउद्यानाचा विकास करणार

          मौजे तिसे येथील केदारजननी माता देवस्थानाच्या रोपवे निर्मितीचा प्रस्ताव

          मौजे संभे गावाचे सुरक्षित स्थलांतर व पुनर्वसनाची कार्यवाही तातडीने होणार

          गिरणे येथे खारभूमी संशोधन केंद्राच्या उभारणीचा मार्ग मोकळा

          दिवेआगर येथे स्वदेश दर्शन योजनेतून मत्स्यालयपर्यटक निवारा केंद्र

          पद्मदुर्ग किल्याचा गडकोट किल्लेसंवर्धन योजनेत समावेश करण्याचा प्रस्ताव

          मुरुड किल्ला आणि राजापूरी क्षेत्रातील अडचणी सोडवण्याबाबत चर्चा

 

मुंबईदि. ८ :- रायगड जिल्ह्याच्या रोहा तालुक्यातील जामगाव येथे उभारण्यात येत असलेल्या डॉ. सी. डी. देशमुख जैवविविधतावने व उद्यान प्रकल्पात राखीव वने तसेच निसर्ग पर्यटनस्थळांच्या विकासाचा ८० कोटींचा सुधारित प्रस्ताव तात्काळ सादर करावा. वित्त विभाग प्रस्तावाची पडताळणी करुन त्वरित मान्यता देईल तसेच आवश्यकतेनुसार निधी उपलब्ध केला जाईल. उपलब्ध ३० कोटींच्या निधीतून  सध्या सुरु असलेली कामे तातडीने पूर्ण करावीतअसे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रायगड जिल्ह्यातील विविध विकासकामांना गती देण्यासाठी मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले. 

रायगड जिल्ह्यातील विकासकामांबाबत बैठकीत चर्चा

रायगड जिल्ह्याच्या  रोहा तालुक्यातील जामगाव येथील डॉ. सी. डी. देशमुख जैवविविधतावने व उद्यान प्रकल्पातील विकासकामेरोहा तालुक्यातील मौजे तिसे येथील केदारजननी माता देवस्थानाच्या ठिकाणी रोपवेची उभारणी करणेरोहा तालुक्यातील मौजे संभे या दरडप्रवण गावाचे सुरक्षिततेच्या कारणास्तव पुनर्वसन करणेतळा तालुक्यात गिरणे येथे डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठांतर्गत खारभूमी संशोधन केंद्राची उभारणीश्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथे केंद्र शासन पुरस्कृत स्वदेश दर्शन योजनेतून मत्स्यालयपर्यटक निवारा केंद्राची निर्मितीमुरुड तालुक्यातील पद्मदुर्ग किल्याचा समावेश गडकोट किल्लेसंवर्धन योजनेत करण्यासह मुरुड किल्ला परिसर आणि राजापूरी ग्रामपंचायत क्षेत्रातील अडचणी सोडवण्यासंदर्भात आज एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीला महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेकृषीमंत्री माणिकराव कोकाटेखासदार सुनील तटकरेनियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरासांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगेनगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्तामदत व पुनर्वसन विभागाच्या अपर मुख्य सचिव डॉ. सोनीया सेठी,  वित्त विभागाचे प्रधान सचिव सौरव विजयउपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव डॉ. राजेश देशमुखपर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणेसिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघलकोकणचे विभागीय आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशीरायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे आदींसह शासनाच्या संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

युवा पिढीने योगाचा अंगीकार करून शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपावे

 युवा पिढीने योगाचा अंगीकार करून

शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपावे

- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची ‘अंतर योग फाउंडेशन’ ला सदिच्छा भेट

 

मुंबईदि. 9 : आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत आणि वाढलेल्या स्पर्धेत युवा पिढीला आणि महिलांना ताणतणावाचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर युवा पिढीने योगाचा अंगीकार करून शारीरिक व मानसिक आरोग्य जपावे, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी 'अंतर योग फाउंडेशनला सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी अंतर योग फाउंडेशन उपक्रमांची माहिती घेतली. तसेच फाउंडेशनद्वारे योग आणि मानसिक आरोग्यविषयक सुरू असलेल्या कार्याचे कौतुक केले.

मंत्री पाटील म्हणालेया संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनामहिलांना आणि युवापिढीला योग व आध्यात्मिकतेच्या मार्गाकडे प्रवृत्त करून त्यांना मानसिकदृष्ट्या अधिक सक्षम करणे गरजेचे आहे. आजच्या काळात मानसिक आरोग्य ही महत्त्वाची बाब असूनअशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक बदल घडू शकतो.

यावेळी अंतर योग फाउंडेशनचे संस्थापक व अध्यात्मिक गुरु आचार्य उपेंद्रजी आणि अंतर योग फाउंडेशनचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


२५ पेक्षा जास्त वाहन मालकांची मागणी आल्यास जागेवरच फिटमेंट शुल्काशिवाय 'एचएसआरपी' बसवून मिळणार

 २५ पेक्षा जास्त वाहन मालकांची मागणी आल्यास जागेवरच

फिटमेंट शुल्काशिवाय 'एचएसआरपीबसवून मिळणार

 

मुंबईदि. ९ : उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरपी) उत्पादक निवासस्थानी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी वाहनावर पाटी बसवण्याची सेवा देऊ शकतात. निवासी कल्याण संघटनासोसायटी येथे शिबिर आयोजित करू शकतात. एका ठिकाणी किमान २५ किंवा त्यापेक्षा जास्त वाहन मालकांनी निवासस्थानीव्यवसायाच्या ठिकाणी किंवा निवासी कल्याण संघटनासोसायटीमध्ये वाहनांवर एचएसआरपी बसविण्याची एकत्रित बुकिंग केल्यास कोणतेही अतिरिक्त फिटमेंट शुल्क न आकारता उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्यात येणार आहे.

राज्यात १ एप्रिल २०१९ पूर्वीची नोंदणी केलेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्यात येत आहे. अशा जुन्या वाहनांना ही पाटी बसविण्याकरिता तीन उत्पादकांची परिवहन विभाग मार्फत निवड केली आहे. वाहन मालकांनी वाहनांवर ही पाटी बसविण्यासाठी परिवहन विभागाच्या https://transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्याकरिता शुल्काचा भरणा ऑनलाईन पद्धतीने करावा. ही पाटी बसविण्याकरता वाहन मालकांनी वैयक्तिकरित्या होम फिटमेंट सर्विस या पर्यायाचा वापर केल्यास त्यांना अतिरिक्त शुल्काचा भरणा करावा लागणार आहे.

उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी संचासह बसविण्याचे जीएसटी वगळून शुल्क

दुचाकी वाहने व ट्रॅक्टर ४५० रुपयेतीन चाकी वाहने ५०० रुपयेहलकी वाहनेप्रवासी कारमध्यम व जड वाहने ७४५ रुपये शुल्क अदा करावे लागणार आहे. या शुल्काशिवाय इतर कुठलेही शुल्क अनुज्ञेय नाही. काही फिटमेंट केंद्रामध्ये जुन्या वाहन नोंदणीच्या पाटी काढायचे शुल्क घेतले असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तरी नागरिकांच्या याविषयी काही तक्रारी असल्यास त्यांनी 022- 20826498 या क्रमांकावर आणि hsrpcomplaint.tco@gmail.com या ईमेलवर कराव्यात असे आवाहन सहपरिवहन आयुक्त शैलेश कामत यांनी केले आहे.

जिल्हा दक्षता समितीवरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीसाठी 17 एप्रिलपूर्वी अर्ज करण्याचे आवाहन

 जिल्हा दक्षता समितीवरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीसाठी

17 एप्रिलपूर्वी अर्ज करण्याचे आवाहन

              मुंबईदि. 9 : मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीवरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीसाठी इच्छुक उमेदवारांनी 17 एप्रिल 2025 पूर्वी अर्ज करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त प्रसाद खैरनार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

    मुंबई उपनगर जिल्ह्याकरिता पाच अनुसूचित जातीअनुसूचित जमातीचे अशासकीय सदस्य आणि बिगर मागासवर्गीय संस्थामधील तीन अशासकीय सदस्यांची नियुक्ती करावयाची आहे. तरी इच्छुक असलेल्या व्यक्तीनी अर्ज व अर्जासोबत परिचयपत्र कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत 17 एप्रिल 2025 पूर्वी सहायक आयुक्तसमाज कल्याणमुंबई उपनगरप्रशासकीय इमारत, 4 था मजलाआर.सी. मार्गचेंबूर (पू)मुंबई-71 किंवा acswomumbaisub@gmail.com या ई-मेलवर अर्ज व परिचय पत्र पाठवावे.

              अशासकीय सदस्य पात्रतेचे नियम पुढील प्रमाणे आहेतसदस्य अनुसूचित जातीजमातीचा असावासदस्यास सामाजिक क्षेत्रात कार्य केल्याचा अनुभव असावासदस्यास अनुसूचित जातीजमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम 1989 कायद्याचे ज्ञान असावेविधी शाखेची पदवी (एलएलबी किंवा एलएलएमअसलेले सदस्यांना प्राधान्य राहीलसदस्य मुंबई उपनगर जिल्ह्यात राहणारा असावा. अशासकीय सदस्यावर कोणताही गुन्हा दाखल नसावा. (पृष्ठार्थ पोलीस चारित्र पडताळणी प्रमाणपत्र सादर करावे) असे प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या जीर्णोध्दारच्या कामांना गती द्या

 संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या जीर्णोध्दारच्या कामांना गती द्या

- पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

गोराई जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ विकसित करणार

 

मुंबईदि. 9 : पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या जीर्णोद्धाराकरिता 149 कोटींच्या कामांना गती देण्याच्या सूचना पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.

मंत्रालयात पैठण पर्यटन विकास आराखड्यासंदर्भात पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणेपर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटीलमहाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज सूर्यवंशी यासह पर्यटन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पर्यटन मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या पुनर्विकासासाठी 149 कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता देऊनटप्प्याटप्याने निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तरी या कामाला प्राधान्य देण्यात यावे. महाबळेश्वर येथे होणाऱ्या पर्यटन महोत्सवाची संपूर्ण तयारी काटकरपणे करावी. प्रादेशिक पर्यटन विकास आराखडा अंतर्गत कामे नियोजन पूर्वक करावीत.

गोराई येथे पर्यटन विभागामार्फत करण्यात येणाऱ्या विकास कामांचा सविस्तर आराखडा तयार करावा त्याचप्रमाणे खासगी सल्लागाराकडूनही याबाबतीत सल्ला घ्यावा. राज्यातील पर्यटनाला चालना देणारा प्रकल्प येथे उभारण्यासाठी सर्वतोपरी काम करण्यात यावे अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजना' अधिक प्रभावीपणे राबवावी

 'मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजना' अधिक प्रभावीपणे राबवावी


- रोहयो मंत्री भरत गोगावले


 


मुंबई, दि. ८ : ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी महत्त्वाकांक्षी 'मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजना' अधिक प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी दिले.


मंत्रालयात वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या दालनात आयोजित मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ते योजनेचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी आमदार प्रताप अडसड, नाना पटोले, विनोद अग्रवाल, अभिमन्यू पवार, राजू तोडसाम, राजेंद्र पाटील आदी लोकप्रतिनिधी उपस्थित होते.


मंत्री श्री. गोगावले म्हणाले, योजनेतील कामे वेळेत व दर्जेदार व्हावीत, केंद्र शासनाकडून प्रलंबित निधीसाठी पाठपुरावा करण्यात यावा, तसेच रोहयो अंतर्गत न होणारे रस्त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत. शेतीच्या विकासासाठी आणि शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी योग्य रस्ता सुविधा मिळण्यासाठी ही योजना अत्यंत उपयुक्त आहे. कामांची गुणवत्ता राखत ती वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी विशेष लक्ष द्यावे.


राज्यमंत्री श्री. जयस्वाल म्हणाले, ज्या ठिकाणी मजूर उपलब्ध नाहीत, त्या ठिकाणी कामांसाठी पर्यायी समायोजन करावे. मजूर उपलब्ध नसणे ही अंमलबजावणीतील मोठी अडचण असून, त्यावर तातडीने उपाययोजना करावी. ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा मजबूत करून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.


००००

Featured post

Lakshvedhi