Thursday, 6 March 2025

मच्छिमारांना डिझेल परतावा देण्याबाबत शासन सकारात्मक

 मच्छिमारांना डिझेल परतावा देण्याबाबत शासन सकारात्मक

मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे

मुंबईदि. ६ :- मच्छीमारांना आवश्यक मदत करण्यासाठी शासन नेहमीच सकारात्मक आहे. जे मच्छीमार  नियमानुसार मच्छीमारी  व्यवसाय करतात अशा मच्छीमारांना त्यांचा डिझेलचा परतावा शंभर टक्के दिला जाईल. डिसेंबर २०२४ पर्यंत अशा मच्छीमारांना डिझेल परतावा पोटी ११९.९८ कोटीचा निधी वितरित करण्यात आला असल्याची माहिती मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

सदस्य महेश बालदी यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.

मत्स्य व्यवसाय मंत्री श्री. राणे म्हणालेमत्स्यव्यवसाय हा रोजगार देणारा व्यवसाय असून शासन मच्छिमारांच्या समस्या सोडविण्यासाठी ठामपणे पाठीशी उभे आहे. दि. २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत प्रलंबित असलेला डिझेल परतावा देण्यासाठी वित्त विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. याबाबत वित्तमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली असून त्यांनीही डिझेल परतावा देण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल असे सांगितले आहे. मच्छीमारांना डिझेलचा परतावा मिळण्याबाबतची बैठक अधिवेशन काळात विधानसभा अध्यक्ष यांच्या दालनात घेण्यात येईलअसेही श्री. राणे यांनी सांगितले.

००००

बाळगंगा धरण प्रकल्प पुनर्वसन आराखडा अंतिम करण्याची कार्यवाही सुरू देमुंबई, पेण, उरण, पनवेल या भागातील नागरिकांना

 बाळगंगा धरण प्रकल्प

 पुनर्वसन आराखडा अंतिम करण्याची कार्यवाही सुरू

- मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील

 

मुंबईदि. ६ :- बाळगंगा प्रकल्पातील बाधितांची कुटुंबसंख्या निश्चित करून सुधारित पुनर्वसन आराखडा कोकण विभागीय आयुक्त यांच्यामार्फत शासनास प्राप्त झाला आहे. या  आराखड्याची  छाननी करून तो अंतिम करण्याची कार्यवाही शासनस्तरावर सुरू असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाच्या वेळी दिली

रायगड जिल्ह्यातील बाळगंगा प्रकल्प संदर्भात सदस्य रविशेठ पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना श्री. जाधव-पाटील यांनी ही माहिती दिली. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य बाबासाहेब देशमुख यांनी सहभाग घेतला.

मदत व पुनर्वसन मंत्री श्री. जाधव-पाटील यांनी सांगितले की, पुनर्वसन आराखड्यामध्ये  प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसन करावयाच्या ठिकाणी दळण वळणरस्तेनागरी सुविधाघर बांधणी अनुदान या बाबी समाविष्ट करण्यात आल्या आहेत.

बाळगंगा प्रकल्पासाठी भूसंपादन अधिनियम २०१३ नुसार संपादन प्रक्रिया  राबवण्यात आली आहे. जवळपास १३ गावे आणि १७ वाड्यांचे पुनर्वसन होत आहे. बाळागंगा प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी ६६०.८० कोटी निधी उपलब्ध करण्यात आलेला आहे. पैकी ४२६.२६ कोटीचे वाटप झाले आहेत. २३० कोटी रुपये वाटपास उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

मदत व पुनर्वसन मंत्री जाधव-पाटील म्हणाले, नवी मुंबईपेण, उरणपनवेल या भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून या धरण प्रकल्पास शासनाने मंजुरी दिली आहे. काही न्यायालयीन बाबीत्याचबरोबर कुटुंब संख्या निश्चितीबाबतआक्षेप असल्यामुळे धरणाच्या कामास विलंब झाला होता. मात्र या संदर्भात मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जानेवारी २०२५ मध्ये बैठक झाली. या बैठकीमध्ये या धरणाच्या अनुषंगाने जे प्रश्न होतेत्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये  निर्णय घेण्यात आले आहेत. या धरणाच्या निधी उपलब्धतेची जबाबदारी सिडकोवर सोपविण्यात आली असून सिडकोनेही त्यास मान्यता देऊन बोर्ड मीटिंगमध्ये या विषयाला मंजुरी दिली असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री श्री. जाधव-पाटील यांनी सांगितले.

आला उन्हाळा, आरोग्य सांभाळा

 🎾 प्रत्येकाने लिहून ठेवा ही विनंती.


🎾घसा दुखत आहे ?

घसा दुखणे – दूध , हळद व साखर याचे गरमागरम मिश्रण

पिण्याने घसादुखी कमी होते, लवंग चघळण्यानेही घसादुखी

कमी होते.


🎾घसा खवखवणे- बरेच वेळा खवखवण्याचा त्रास आपल्याला

होतेा. अशावेळी घसा खवखवत असल्यास खडी साखर आणि

चिमूटभर कात (विडे करताना घालतात तो ) जिभेवर ठेवून

चघळावा. त्याने खूपच आराम पडतो.

खोकल्याची ढास येत असल्यास- आख्खा सालासकट वेलदोडा

गालात धरावा. अथवा कात व साखर मिश्रण चघळावे.


🎾 कफ

झाला असल्यास विडयाची पाने ठेचून रस काढावा व

मधाबरोबर चाटावा. छाती, पाठ शेकण्यानेही कफ सूटून येतो.


🎾तोंड येणे, तोंडात पुरळ – तोंड येणे म्हणजे जीभ हुळहुळी होणे.

तोंड येण्यामुळे जीभेवर फोड येतात तसेच तिखट अजिबात

जिभेला लागू देत नाही. जीभ लालभडक होते. अशा वेळी दोन

दिवस आहारात फक्त द्रव पदार्थ घ्यावेत. फळांचे रस, दूध, ताक,

सरबत यांसारखे पदार्थ घ्यावेत. तोंड येण्या मागे बिघडलेले पचन

हे मुख्य कारण असते. आणि पोटाला दोन दिवस आराम दिला

की पोट मूळपदावर येते आणि जिभेला आलेली लाली व पुरळ

कमी होण्यासही मदत मिळते.


🎾घशात जळजळ, घसा बसणे- वेलदोडा दाणे व साखर एकत्र चघळणे.

बसलेल्या घशावर कोमट केलेल्या मिठाच्या पाण्याच्या

गुळण्या करण्यानेही घसा दुखणे, बसणे याला उतार पडतो.


🎾 पाय दुखणे

मध्यमवयाच्या महिला, अशक्त मुले आणि मुली तसेच सरसकट

सगळे वृद्ध यांना पायदुखीचा त्रास बरेचदा होताना आपण

पाहातो. यावर पाव चमचा कच्चे तीळ चावून खावेत. महिनाभर

हा उपाय केल्याने पाय दुखणे थांबते.


 🎾पोटदुखी

ओवा व साखर गरम पाण्याबरोबर घेण्याने पोटदुखी कमी होते.

लहान बाळांमधील पोटदुखी पोट शेकण्यानेही कमी होते.

अगदी तान्हे बाळ असेल तर आईने ओवा चावून बाळाच्या बेंबीवर

तोंडानेच वाफारा सोडला तरी पोटदुखी कमी होते. मात्र

गॅसेसमुळे बाळाचे पोट दुखत असेल तर हिंग पाण्यात कालवून

त्याचा लेप बेंबीभोवती दिल्याने आराम पडतो


🎾‬चरबी कमी करा

> शरीरात जास्त चरबी वाढलेली असणाऱ्यांसाठी चरबी कमी करण्याचा खात्रीशीर रामबाण उपाय येथे देत आहोत.

> साहित्य : १०० ग्राम मेथी, ४० ग्राम ओवा, २० ग्राम काळे जीरे हे एका व्यक्तीसाठीचे प्रमाण आहे. यात फरक करू नये. प्रमाण वजन करूनच घ्यावे.

> कृती : वरील तीनही वस्तू लोखंडाच्या कढईत सौम्य तापमानात (साधारण लालसर होईपर्यंत) वेगवेगळ्या भाजून घ्याव्यात. नंतर तीनही वस्तू एकत्र करून मिक्सरमधून पावडर करावी. रात्री झोपताना एक चमचा (टी स्पून) पावडर एक कप कोमट पाण्याबरोबर घ्यावी. पाणी कोमट घेणे आवश्यक आहे.

> हे चूर्ण रोज घेतल्यामुळे शरीरात कुठेही कानाकोपऱ्यात साचलेली घाण मळाद्वारे अथवा लघवीद्वारे बाहेर निघून जाते. तीन महिन्यानंतर शरीरात अनावश्यक साचलेली चरबी किंवा चरबीच्या गाठी आपोआप विरघळायला लागतात. सुरकुतलेली त्वचा ताणली जाते. शरीर सुंदर होते.

> फायदे :

> ०१) जुनाट वातविकार कायमचा जातो.

> ०२) हाडे मजबूत होतात.

> ०३) काम करण्यास स्फूर्ती येते.

> ०४) डोळे तेजस्वी होतात.

> ०५) केसांची वाढ होते.

> ०६) जुनाट वायुविकारापासून कायमची सुटका होते.

> ०७) रक्ताभिसरण चांगले होते.

> ०८) कफ प्रवृत्ती असलेल्यांना तर कायमचा फायदा होतो.

> ०९) हृदयाची कार्यक्षमता वाढते.

> १०) बहिरेपणा दूर होतो.

> ११) बाळंतपणानंतर बेडौल होणारे स्त्रियांचे शरीर सुडौल होते.

> १२) अॅलोपॅथीच्या औषधांमुळे होणारा साईड इफेक्ट कमी करतो.

> १३) दात बळकट होतात व त्यावरील इनॅमल टिकून राहते.

> १४) रक्तवाहिन्या स्वच्छ राहतात म्हणजे रक्त शुद्ध होते व रक्तातील गुणधर्म टिकून राहतात.

> १५) नपुंसकता असेल तर ती दूर होते.

> १६) ज्यांना मुल हवे असेल तर त्यांचे होणारे मुल तेजस्वी होते.

> १७) मलेरिया, कावीळ, टाईफॉइड, कॉलरा इ. रोगांना प्रतिकार करण्याची शक्ती येते.

> १८) त्वचेवर सुरकुत्या लवकर पडत नाहीत. वृद्धापकाळामुळे येणाऱ्या सुरकुत्या पडण्याचा कालावधी लांबतो म्हणजे दीर्घायुष्य लाभते.

> १९) स्त्रियांना तरूणपणी किंवा लग्नानंतर येणारी मरगळ, मेनोपॉजचा त्रास दूर होण्यास मदत मिळते.

> २०) शरीरात पाण्याद्वारे, हवेद्वारे, तापमानामुळे होणारे जुनाट आजार कायमस्वरूपी नष्ट होतात.

> २१) शरीरात वाढलेले कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यास मदत मिळते. हार्टअॅटॅक येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात कमी होते.

> २२) त्वचेचा रंग काळवंडत नाही. त्वचेचे आजार, त्वचा सुकणे, खाज येणे हे बंद होते.

> २३) कोणत्याही वयाची व्यक्ती, स्त्री / पुरूष सर्वांसाठी अतिशय फायदेशीर 


कृपया वाचा आणि लिहुन ठेवा

●●●● उपयोग होईल ●●●●

▪▪..आरोग्य टिप्स..▪▪

१) अम्लपित्त वाढलले असता ऊस खावे अथवा ऊसाचा रस प्यावा त्वरीत पोट साप होते. तसेच ऊस जेवना पुर्वी खाल्यास पित्त वाढ होत नाही.


2) आवाज बसला असता बारीक वस्त्रगाळ केलेला कात दोन घोट पाण्या सोबत घ्यावा त्वरीत घसा साफ होतो. 


3) काविळ झाला असल्यास एक आठवडाभर रोज एक-दोन ऊस चाऊन खावे, किंवा दिवसातून ३/४ ग्लास ऊसाचा रस घेतल्याने रक्त तयार होण्याची क्रिया चालु होउन रूग्न बरा होतो. तसेच ताज्या गुळवेलीचा रस २० ग्रॅम खडीसाखर घालुन घेतल्यास सुध्दा काविळ बरा होतो.


४) सतत कान फुटत आसल्यास ऊसाचे कांडे गरम करून नंतर त्याचा रस काढून दोन- तिन चमचे कानात पिळल्यास कान फुटने कायमचे बंद होते. 


५) केस येण्यासाठी व कोंडा नाहीसा होन्यासाठी :– वडाच्या कवळ्या पारंब्या वाटुन १०० ग्रॅम लगदा करावा त्यात एक लिटर तिळाचे तेल व ५० मि.ली. लिंबरस घालुन मंदाग्नीवर कढवावे. नुसते तेल राहीले असता ते गाळुन घ्यावे हे तेल नियमीत लावल्याने नविन केस यायला सुरूवात होते. व कोंडा सुध्दा नाहिसा होतो. 


६) मुख दुर्गंधी :- तुरटिच्या पाण्याने गुळण्या केल्याने मुख दुर्गंधी तर जातेच व तोडाचे सर्व आजार सुध्दा दुर होतात.


७) दात दुखी :- वडाच्या पारंबिचे दातवन केल्याने दाताचे सर्व आजार बरे होतात. दाताचे किडने थांबते, दाताचे कवच पुन्हा तयार होते. 


८) दमा :- दम्याचा त्रास असनाऱ्या रूग्नाने लवंग तोंडात ठेउन ति नरम झाल्यास खावी, असे एक-एक तासाने एक-एक लवंग खात रहावे दमा कमी कमी होत जाउन १/२ महिन्यात कायमचा नाहिसा होतो. 


९) पोट साफ होण्यासाठी :- लसणच्या ८/१० पाकळ्या वाटुन तुपात तळुन सैधव लावुन दिवसातुन १/२ वेळेस खाल्याने पोट साप होते. तसेच तिळाचे तेल रोज अनशा पोटी २० मिली घेतल्याने पोट साप तर होतेच पण पोटाचे आन्सर सुध्दा बरे होतात. 


१०) पोट दुखी :- आल्याचा रस, लिंबाचा रस व सैधव किंवा पादेलोन घालुन घेतल्याने पोट दुखायचे थांबते. तसेच हे मिश्रन रोज जेवना पुर्वी घेतल्याने अन्न पचन होन्यास मदत होते. हा उपक्रम जर एक वर्ष चालु ठेवला तर घशा पासुन गुद्दव्दारा पर्यत कॅन्सरची बाधा कधीच होनार नाही. 


११) बल्डप्रेशर :- ६/७ लसणाच्या पाकळ्या आर्धा लिटर पाण्याच्या बाटलित टाकुन ति बाटलित हालवावी व नंतर दोन तास ठेवावी व त्या नंतर जेव्हा जेव्हा तहान लागेल तेव्हा हे पाणी प्यावे याने हाय बल्डप्रेशर कमी होउन नॉर्मल होतो.


१२) मुळव्याध :- रोज सकाळी तुळशीची पाने खल्याने मुळव्याध बरा होतो. 


१३) मुतखडा :- पानफुटिचे पान व सोबत एक काळा मिरा असे दिवसातुन तिन वेळा खाल्याने मुतखडा १५ दिवसात गळुन पडतो. 

▪नोट :-▪

 मुतखडा असलेल्या व्यक्तीनी खालील वस्तु खावु नये – 

१) आवळा २) चिकु ३) भेंडी 

४) पालक ५) गोबी ६) काकडी 

७) स्ट्रॉबेरी ८) वाटान्याच्या शेंगा 

९) टोमॅटो १०) काळी द्राक्षे ११) काजु १२) कॉफी पिउ नये १३) मशरूम १४) वांगे. 

कारण यात खूप कॅल्शियम जास्त असते.

▪माहीती संकलन  व प्रसारण ▪ हिन्दवी चँरिटेबल ट्रस्ट 

- इंद्रायणीनगर-भोसरी - पुणे

✅हार्ट अटॅक..???

घाबरू नका..!!!

सहज सुलभ उपाय...!

99 टक्के  ब्लॉकेजेसना काढून टाकणारे पिंपळाचे पान...💚15 पिपळळाची पाने जी  गुलाबी  नसावीत,पण हिरवी, 

कोवळी, चांगली वाढलेली असावीत...प्रत्येक पानांचे

 वरचे टोक व खालचा जाड देठ पानाचा थोडाश्या भागासकट कापून टाका, मग सर्व पंधरा पाने 

स्वच्छ धुवून घ्या. एका भांड्यात ही पाने व एक ग्लास पाणी घालून मंद आचेवर उकळत ठेवा.जेव्हा पाणी(1/3)

एक त्रितीयांश उरेल तेव्हा उकळवणे बंद करा व गाळून घ्या...नंतर थंड जागी ठेवा.झाले आपले औषध तयार...!

 ☕...☕...☕हा काढा 'तीन भागात' प्रत्येक तीन तासांनी

 सकाळपासून घ्यावयाचा आहे.💔हार्ट अटॅक नंतर लागोपाठ पंधरा दिवस अशा प्रकारे पिंपळकाढा घेतल्याने

 ह्रदय पुनः स्वस्थ होते💝 व पुन्हा हा दौरा पडण्याची

 शक्यता राहात नाही...ह्रदय विकारी व्यक्तींनी ह्या ईलाजाचा प्रयोग अवश्य करून पहावा.. यातून कोणताही 

साईड इफेक्ट होत नाही..!

💚पिंपळाच्या पानात ह्रदयाला शक्ति आणि शांती देण्याची अदभूत क्षमता आहे..!💚ह्या पिंपळकाढ्याचे

 तीन डोस सकाळी 8.00वा., 11.00वा., व 2.00वा. म्हणजे दर तीन तासांनी घ्यावयाचे आहेत....💙डोस घेण्यापूर्वी 

पोट रिकामी असता कामा नये. हलका, पाचक नाश्ता किंवा आहार केल्यानंतरच काढ्याचे डोस घ्यावयाचा आहे.

💜सदरच्या पंधरा दिवसांत तळलेले पदार्थ,भात व्यर्ज आहेत...तसेच मांस, अंडी, दारु, धुम्रपान पूर्णतः बंद करावीत... मीठ व तेलकट पदार्थ सेवन करू नये...

💖डाळींब, पपई, आवळा, लसूण, मेथी, सफरचंद,मोसंबी, रात्री भिजवलेले काळे चणे,  गुगूळ,

मनुका,दही, ताक इ. घ्यावे...

"पिंपळकाढा घेऊन तर बघा..!"भगवंताने पिंपळाचे पान 

💚ह्रदयाच्या आकाराचे कां बनविले आहे..?

हे आर्टीकल आपल्या पर्यंत Dr.Devendra Sathe

 यांनी पाठवले आहे..!!!

🌴  आरोग्य वार्ता🌴


 "पाणी पिण्याची योग्य वेळ"

● 3 ग्लास सकाळी झोपेतुन उठल्यानंतर शरीरातील उर्जेला Activateकरतो.

● 1 ग्लास अंघोळ केल्यानंतर -ब्लड प्रेशर त्रास संपवतो.

● 2 ग्लास जेवणाआधी 30 मिनीटे -पचनक्रिया सुधारतो.

● अर्धा ग्लास झोपण्यापुर्वी -हार्ट अटैक पासुन वाचवतो.


जर तुम्ही घरी एकटे असाल, आणि अचानक तुमच्या छातीतदुखायला लागले,हे दुखणे जर तुमच्या डाव्या हातापासून तुमच्या जबड्या पर्यंतजाणवत असेल..तर हा हृदय विकाराचा झटका असू शकतो....जर आजू-बाजूला कोणीच मदत करण्यासाठी नसेलआणि हॉस्पिटल सुद्धा दूर असेल, तर तुम्ही स्वत:ची मदत करूशकता....* जोर-जोरात खोकत रहा. हि प्रक्रिया पुन्हा-पुन्हा करत रहा.* प्रत्येक वेळी खोकन्या आधी दीर्घ श्वास घ्या.* दीर्घ श्वासामुळे फुप्फुशांनाअधिकप्रमाणातऑक्सिजनमिळतो.* अशा वेळी खोकत राहिल्याने   रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीतचालू राहते.मी, आपणांस एक विनंती करू इच्छितो.. कृपया जास्तीत जास्त लोकांना हि पोस्ट शेअर करा.का, कुणास ठाऊक, तुमच्या ह्या एका पोस्टमुळे एखाद्याचे प्राण वाचू शकतात.....!!!

👏👏💥👏👏

आर्थिक गुन्हे रोखण्यासाठी महाराष्ट्र इंटेलिजन्स युनिटची स्थापना

 आर्थिक गुन्हे रोखण्यासाठी महाराष्ट्र इंटेलिजन्स युनिटची स्थापना


- गृह राज्य मंत्री योगेश कदम


 


मुंबई, दि. ६ : राज्यात आर्थिक गुंतवणुकीच्या व्यवहारासाठी येणाऱ्या कंपन्या खऱ्या आहेत की फसव्या हे तपासण्यासाठी व भविष्यात टोरेस कंपनीसारखे आर्थिक गुन्हे होऊ नयेत यासाठी महाराष्ट्र इंटेलिजेन्स युनिटची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानपरिषदेत दिली.


            सदस्य विक्रम काळे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना राज्यमंत्री श्री. कदम बोलत होते. यावेळी चर्चेमध्ये सदस्य मनीषा कायंदे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, शशिकांत शिंदे यांनी सहभाग घेतला.


             टोरेस प्रकरणी पोलीस प्रशासन योग्य कार्यवाही करत असल्याचे सांगून राज्यमंत्री श्री. कदम म्हणाले, याप्रकरणी आतापर्यंत ७ जणांना अटक करण्यात आली असून १६ हजार ७८६ जणांची सुमारे अडीच हजार कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तर याप्रकरणी ४९ कोटी २ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. हे प्रकरण न्याय प्रविष्ठ असून न्यायालयाच्या निर्देशानुसार गुंतवणुकदारांचे पैसे परत करण्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे. या हस्तगत केलेल्या मुद्देमालाचा लिलाव करण्यात येतो आणि त्यातून विहित नियमांनुसार गुंतवणुकदारांना पैसे परत केले जातात. त्यानुसार आर्थिक गुन्हे कायद्यानुसार कारवाई करण्यात येत आहे. उर्वरीत वसुलीसाठी कंपनीच्या सर्व मालमत्ता जप्त करण्यात येतील. तसेच या मालमत्तांमधूनही वसुली न झाल्यास कंपनी संचालकांच्या इतर ठिकाणी असलेल्या मालमत्तांवर कारवाई करण्यात येईल. याप्रकरणी शासन कडक कारवाई करेल अशी माहिती राज्यमंत्री श्री. कदम यांनी दिली.


0000

यवतमाळच्या शिक्षणाधिकाऱ्यांच्या चौकशी प्रकरणी स्थापन समितीच्या अहवालानुसार दोषींवर कारवाई

 यवतमाळच्या शिक्षणाधिकाऱ्यांच्या चौकशी प्रकरणी

स्थापन समितीच्या अहवालानुसार दोषींवर कारवाई

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

 

मुंबईदि. ६ : यवतमाळ जिल्हा परिषदेतील माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी यांची चौकशी करण्यासाठी सहयक शिक्षण आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने आपला अहवाल दिला आहे. या अहवालानुसार जर कोणी दोषी आढळले तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे स्पष्टीकरण शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधानपरिषदेत दिले.

            सदस्य सुधाकर अडबाले यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मंत्री श्री. भुसे बोलत होते. यावेळी सदस्य अभिजीत वंजारीराजेश राठोड यांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला.

            यवतमाळचे शिक्षणाधिकारी त्यांचे काम योग्य पद्धतीन करत नसल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर चौकशीचे आदेश दिल्याचे सांगून मंत्री शालेय श्री. भुसे म्हणाले कीया प्रकरणी चौकशीसाठी प्रथम सहायक शिक्षण आयुक्त यांची समिती नेमण्यात आली होती. त्या समितीने दिलेल्या अहवालात त्रुटी असल्याने पुन्हा नव्याने एक समिती नेमण्यात आली. त्यासमितीने पला अहवाल कालच सादर केला आहे. या अहवालामध्ये जो कोणी दोषी आढळेल त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे श्री. भुसे यांनी सांगितले.

0000

पवित्र पोर्टलच्या माध्यमातून कोणतीही चुकीची भरती नाही

 पवित्र पोर्टलच्या माध्यमातून कोणतीही चुकीची भरती नाही     

- शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

मुंबईदि. ६ : पवित्र पोर्टलच्या माध्यमातून कोणतीही चुकीची भरती झाली नसल्याचे स्पष्टीकरण शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधानपरिषदेत दिले. सदस्य इद्रिस नायकवडी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी चर्चेमध्ये सदस्य शशिकांत शिंदेअभिजीत वंजारी यांनी सहभाग घेतला.

            पवित्र पोर्टलच्या माध्यमातून गुणवत्तेवर अधारित शिक्षकांची भरती होत असल्याचे सांगून शालेय शिक्षण मंत्री श्री.भुसे म्हणाले की,  सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये भाषा विषय शिकवणाऱ्या शिक्षकांची नेमणूक करताना त्यांचे व्यावसायिक शिक्षण म्हणजेच डीएडबीएड हे त्याच भाषेत झाले असल्यासच नियुक्ती देण्यात येते. तसेच पवित्र पोर्टल टप्पा दोनमध्ये नियुक्त केलेल्या शिक्षकांचा विद्यार्थ्यांशी चांगला संवाद निर्माण व्हावा यासाठी त्याच माध्यमातून शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्याची तरतूद करण्यात येत आहे. यामुळे सर्वच विषयांमध्ये शिक्षण घेताना विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये सुसंवाद प्रस्थापित होऊन दर्जेदार शिक्षण देता येईल. यासाठी उमेदवाराचे इ.10 वीचे माध्यम विचारात घेतले जाणार आहे.

            उर्दु आणि कन्नड माध्यमांच्या शाळांमध्ये त्या भाषेत शिक्षण न घेतलेल्या शिक्षकांची नेमणूक झालेली नाही. तर त्या - त्या विषयामध्ये व्यवसायिक शिक्षण घेतलेल्या उमेदवारांचीच नेमणूक करण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांशी आणखी चांगल्या प्रकारे संवाद साधता यावा यासाठी पवित्र पोर्टल दोनमध्ये उमेदवार नियुक्तीच्या तरतूदी करण्यात येत असल्याचेही श्री. भुसे यांनी सांगितले.

समग्र शिक्षा अभियानामधील करार कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत समितीचा अहवाल आल्यानंतर कार्यवाही

 समग्र शिक्षा अभियानामधील करार कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत

समितीचा अहवाल आल्यानंतर कार्यवाही

- शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

 

मुंबई दि. ६ : समग्र शिक्षा अभियानातील ३७८४ कर्मचाऱ्यांबाबत शासनास शिफारस करण्यासाठी अपर मुख्य सचिव (सेवा) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल तीन महिन्यात प्राप्त होईल. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर या कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात येईलअसे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधान परिषदेत सांगितले.

विधान परिषद सदस्य जगन्नाथ अभ्यंकर यांनी समग्र शिक्षा अभियानातील कर्मचाऱ्यांना कायम करणार कायाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री अभिजीत वंजारीज्ञानेश्वर म्हात्रे यांनी सहभाग घेतला.

या प्रश्नाच्या अनुषंगाने अधिक माहिती देताना शालेय शिक्षण मंत्री भुसे म्हणालेसमग्र शिक्षा अभियानात एकूण १६ हजार १०० पदे मंजूर आहेत. त्यापैकी ८२६९ कर्मचारी कार्यरत आहेत. २९८४ कर्मचाऱ्यांची समायोजन तपासणी प्रक्रिया प्रगतीपथावर असून ३७८४ कर्मचाऱ्यांबाबत शासनास शिफारस करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमधील निर्णयानुसार १४ ऑक्टोबर २०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये समिती गठीत करण्यात आली आहे.

शासन सेवेत कायम करण्यासाठी उपोषणास बसलेल्या इतर शिक्षककर्मचाऱ्यांशी चर्चा करावीअशी सूचना सभापती प्रा. राम शिंदे यांनी यावेळी केलीत्यास अनुसरून त्यांच्याशी चर्चा करण्यात येईलअसेही मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.

0000

Featured post

Lakshvedhi