Wednesday, 5 March 2025

अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात लवकरच ‘एमआरआय’ मशीन

 अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात 

लवकरच ‘एमआरआय’ मशीन

- वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

 मुंबईदि. ५ : अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात ‘एमआरआय ३ टेस्ला’ मशीन खरेदीसाठी २४.९७ कोटी रुपयांना नवीन प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री स्वास्थ्य योजनेतून लवकरच हे मशीन उपलब्ध करून देण्यात येईलअसे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात ‘एम आर आय ३ टेस्ला’ मशीन खरेदीबाबत विधानसभा सदस्य साजिद पठाण यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

याबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ म्हणाले‘एमआरआय’ मशीन खरेदीसाठी औषध महामंडळमार्फत निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र निविदा प्रक्रियेला प्रतिसाद न मिळाल्यामुळे मशीन खरेदीस विलंब झाला. हाफकिन महामंडळामार्फत खरेदीची व्यवस्था बंद करण्यात आली असून औषधी व वस्तू खरेदी प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे. ‘एमआरआय ३ टेस्ला’ मशीन अद्ययावत तंत्रज्ञानाने युक्त आहे. त्यामुळे अचूक निदान होऊन योग्य उपचार मिळण्यास रुग्णाला मदत होते. राज्यात पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) पद्धतीचा अवलंब करून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सिटी स्कॅनएमआरआय मशीन खरेदी करण्यात येणार आहे.

केंद्र शासनाने एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या ९०० जागा राज्याला दिल्या आहेत. त्यामुळे राज्यातील मंजूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार आहे. परभणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बांधकामासंदर्भात निविदा प्रकिया राबविण्यात येत असून लवकर काम पूर्ण करण्यात येईलअशी माहितीही मंत्री मुश्रीफ यांनी दिली. या प्रश्नाच्या चर्चेमध्ये विधानसभा सदस्य हरिष पिंपळेविजय वडेट्टीवार, डॉ. राहुल पाटीलअजय चौधरी यांनी सहभाग घेतला.

0000

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये कोणतेही बदल नाहीत

 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये कोणतेही बदल नाहीत

महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे विधानपरिषदेत स्पष्टीकरण

 

मुंबईदि. 5 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या पहिल्या शासन निर्णयामध्ये समाविष्ट असलेल्या निकषांमध्ये कोणत्याही प्रकारचे बदल करण्यात आलेले नाहीत. संपूर्ण प्रक्रिया आणि कार्यवाही याच निकषांनुसार पार पडत असल्याचे महिला ब बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

            मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीबाबत सदस्य अनिल परब यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना महिला ब बालविकास मंत्री कु. तटकरे बोलत होत्या. सदस्य सतेज उर्फ बंटी पाटीलअशोक उर्फ भाई जगतापशशिकांत शिंदेचित्रा वाघ यांनी या चर्चेत सहभाग घेतला.

महिला ब बालविकास मंत्री कु. तटकरे म्हणाल्या कीया योजनेच्या अटी शर्तीनुसार लाभार्थी महिलांसाठीची पात्रता व अपात्रता ठरवण्यात आली आहे. त्याच निकषांनुसार अर्जांची छाननी करण्यात येत आहे. कोणत्याही योजनेत लाभार्थ्यांच्या अर्जाची छाननी ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. त्यानुसार ज्या लाभार्थी महिला निकषांची पूर्तता करीत नाहीत त्यांना या योजनेचा आर्थिक लाभ अदा न करण्याच निर्णय घेतला असून त्यानुसार कार्यवाही करण्यात येत आहे. या योजनेंतर्गत 2 कोटी 63 लाख महिलांनी अर्ज नोंदणी केली असून त्यापैकी सद्यस्थितीत 2 कोटी 52 लाख महिल पात्र ठरत आहेत.  

ही योजना 21 ते 65 वयोगटातील महिलांसाठी लागू आहे, त्यामुळे 65 वर्षे पूर्ण करणाऱ्या महिलांचा लाभ दर महिन्याला बंद होतो. यामुळे लाभार्थ्यांची संख्या नियमितपणे बदलत असते. सध्या सुमारे 1.20 लाख महिलांनी वयोमर्यादा ओलांडल्यामुळे त्या योजनेतून बाद झाल्या आहेत. त्याचप्रमाणे, विवाहानंतर इतर राज्यांत स्थायिक झालेल्या महिलांचाही योजनेंतर्गत विचार केला जात नाही. राज्यातील जवळपास अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळत असून, महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आला आहे. यामुळे महिलांकडून सरकारचे अभिनंदन केले जात आहे.

दरम्यान, राज्य सरकार 2100 रुपयांपर्यंत सन्मान निधी वाढवणार असल्याच्या चर्चेबाबत त्यांनी स्पष्ट केले की, राज्याचे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांनी अशी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. अर्थसंकल्पात याबाबत निर्णय घेतला जाईल, मात्र सध्या 2100 रुपयांची घोषणा झालेली नाही

ओबीसी विद्यार्थ्यांसाठी 54 वासतिगृहे सुरु ; मुख्यमंत्र्याकडून इतर मागास बहुजन कल्याण मंत्री

 ओबीसी विद्यार्थ्यांसाठी 54 वासतिगृहे सुरु ;

मुख्यमंत्र्याकडून इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांचे कौतुक

 

मुंबईदि. 5 : ओबीसी विद्यार्थ्यांसाठी राज्यात वर्षभरात 54 वसतीगृहे सुरु करण्यात आली आहेत. तर आणखी 18 वसतीगृहे येत्या जूनअखेर सुरू होतील अशी माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी विधानपरिषदेत दिली. तसेच वर्षभरात 54 ओबीसी वसतीगृह सुरू केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इतर मागास बहुजन कल्याण मंत्री श्री. सावे यांचे सभागृहात अभिनंदन केले.

विधानपरिषदेत सदस्य अभिजीत वंजारी यांनी ओबीसी वसतीगृह आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजने विषयी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या उत्तरावेळी ते बोलत होते.

मंत्री सावे म्हणाले कीराज्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी प्रस्तावित 72 वसतिगृहांपैकी 54 वसतिगृहे सुरू करण्यात आली आहेत. यामध्ये 26 मुलांची आणि 28 मुलींची वसतीगृहे आहेत. उर्वरित वसतीगृहे या शैक्षणिक वर्षांपासून सुरु होतील. याशिवायओबीसी विद्यार्थ्यांना मिळणारे विद्यावेतन थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे. मुंबईआणि महानगर परिरसरातील इमारतीसाठी शासनाने भाडे वाढवून देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे उर्वरित 18 वसतीगृहे येत्या शैक्षणिक वर्षांपासून म्हणजेच जून-जुलैमध्ये सुरू होतील. सर्व वसतीगृहे स्वमालकीची असावीत यासाठीही विभाग प्रयत्नशील आहे. तसेच वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबवण्यात येत आहे. या योजनेचा निधी थेट विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय विभागाने घेतला आहे. यंदाच्या वर्षी बँक खात्यांमधील काही त्रुटीमुळे हा निधी वितरणास वेळ लागला आहे. परंतु पुढील शैक्षणिक वर्षापासून हा निधी वेळेत विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होईलअसेही श्री. सावे यांनी सांगितले.

वरळी येथील शासकीय वसाहत इमारतींच्या संरचनात्मक परीक्षण दुरूस्तीची कामे प्रगतीपथावर

 वरळी येथील शासकीय वसाहत इमारतींच्या

संरचनात्मक परीक्षण दुरूस्तीची कामे प्रगतीपथावर

-         दुग्धविकास विकास मंत्री अतुल सावे

 

मुंबई, दि. 5 : वरळी येथील शासकीय वसाहतीतील इमारतींचे संरचनात्मक परीक्षण कार्यकारी अभियंतासार्वजनिक बांधकाम विभागवरळी यांचेमार्फत करण्यात आले असूनत्यानुसार इमारतींच्या देखभाल दुरूस्तीकरिता व धोकादायक पाण्याची टाकी निष्कासित करण्यात आले आहे. दुरूस्तीची कामे सुरु असल्याचे दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी विधान परिषदेत सांगितले.

विधान परिषद सदस्य सुनिल शिंदेमिलिंद नार्वेकर यांनी वरळी दुग्धशाळा वसाहतीच्या पुनर्विकासाबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.

दुग्धविकास मंत्री श्री. सावे म्हणाले, दुग्धशाळेतील कर्मचाऱ्यांना मोफत घरे देण्याबाबत शासनाचे कोणतेही धोरण नसून वरळी वसाहतीतील इमारती कमकुवत झाल्याने इमारतीतील कर्मचाऱ्यांना पर्यायी सोय म्हणून वरळी येथील उपलब्ध असलेल्या पर्यवेक्षीय तसेच कामगार वसाहतीतील शासकीय निवासस्थाने उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे श्री. सावे यांनी सांगितले.

यावेळी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, सदस्य विक्रम काळे, प्रवीण दरेकर, सुनील शिंदे, भाई जगताप अभिजित वंजारी यांनी चर्चेत सहभाग घेतला

भोकरदनमधील कैलास बोराडेंना झालेली मारहाणीची घटना अमानुष गुन्हेगारांना ‘मकोका’ लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेणार

 भोकरदनमधील कैलास बोराडेंना झालेली मारहाणीची घटना अमानुष

गुन्हेगारांना मकोका’ लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधान परिषदेत माहिती

मुंबईदि. 5 : जालना जिल्ह्यातील भोकरदनमधील कैलास बोराडे यांना झालेल्या मारहाणीची घटना दुर्देवी आणि माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेतील गुन्हेगारांना पाठीशी न घालता त्यांना मकोका’ लावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईलअसे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत सांगितले.

भोकरदनमधील कैलास बोराडे यांना झालेल्या मारहाण प्रकरणी विधान परिषदेत औचित्याच्या मुद्दा सदस्य शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केला होता. त्यावर निवेदन करताना उपमुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. ते म्हणालेयासंदर्भात मी जालनाच्या पोलिस अधीक्षकांशी बोललो आहे. जालन्याचे पालकमंत्री त्या ठिकाणी भेट देणार आहेत. बोराडे यांना झालेली मारहाण अतिशय अमानुष आहे. त्या घटनेचा व्हिडीओ बघितल्यावर अंगावर शहारा येतो इतकी अमानुष पद्धतीने मारहाण झाली आहे.

मारहाणीत जखमी झालेल्या बोराडे यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. त्यानुसार त्याच्यावर आता उपचार सुरू आहेत. मी देखील बोराडे यांच्याशी फोनवरून बोललो होतो. त्यांची विचारपूस केली सरकार तुमच्या पाठीशी असल्याची ग्वाहीही त्यांना दिली. या घटनेतील गुन्हेगारांना अजिबात पाठीशी घालणार नाही. त्यांना मकोका’ लावण्याची प्रक्रिया गृह विभागामार्फत करण्यात येईलअसेही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला चौराहा - एक बहुभाषिक काव्यसंध्या !

 आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला

चौराहा एक बहुभाषिक काव्यसंध्या !

 

मुंबई, दि. ५ : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला चौराहा - एक बहुभाषिक काव्यसंध्या’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात राज्य शासनातील कार्यरत असणाऱ्या वरिष्ठ महिला अधिकारी कविता सादर करणार आहेतअशी माहिती एनसीपीएच्या ग्रंथालय प्रमुख डॉ. सुजाता जाधव यांनी दिली. हा कार्यक्रम ७ मार्च रोजी संध्याकाळी ६.०० वाजता नॅशनल सेंटर फॉर द पर फॉर्मिंग आर्टस् (एनसीपीए) येथे होणार आहे.

कार्यक्रमात मुख्य सचिव सुजाता सौनिककौशल्य विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मासामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधामुख्यमंत्री यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडेउद्योगऊर्जा व कामगार विभागाच्या प्रधान सचिव आय.ए. कुंदननॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टच्या संचालक निधी चौधरी कविता सादर करणार आहेत.

 ‘एनसीपीए’च्या पहिल्या महिला संचालक विजया मेहता यांनी २० वर्षांपूर्वी या कार्यक्रमाची सुरुवात केली असूनही काव्यसंध्या ऐतिहासिक साहित्य उपक्रमाच्या पुनरुज्जीवनाचे प्रतीक ठरणार आहे. ‘एनसीपीए’च्या पेज टू स्टेज या उपक्रमाचा एक भाग म्हणूनसाहित्याला मंचावर सादर करण्याच्या संकल्पनेतून ‘चौराहा’ पुन्हा नव्या रुपात प्रेक्षकांसमोर येत असल्याचे  त्यांनी सांगितले.

जळगाव येथे शिवसृष्टी उभारण्यात येणार

 जळगाव येथे शिवसृष्टी उभारण्यात येणार

पर्यटन मंत्री  शंभूराज देसाई

नाशिक जिल्ह्यामध्ये चार ठिकाणी निफाड पिंपळगाव येवला शिवसृष्टीचे काम सुरू असून छत्रपती शिवाजी महाराज थीम पार्कचे काम जळगाव येथे करण्यात येणार असल्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेमध्ये सांगितले.

मंत्री श्री. देसाई म्हणाले, मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने नाशिक ऐवजी जळगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज थीम पार्क उभारण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्षे झाल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने राज्यातील पाच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाच्या विविध घटनांवर आधारित डिजिटल थीम पार्क उभारण्याचा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असेलेला जिजामातांचा वाडा 350 वर्षापूर्वी जसा होता तसा उभा करण्यात येणार आहे आणि त्याठिकाणीही शिवसृष्टी उभारण्यात येणार आहे. सिंदखेड राजा येथील जिजामातांचे जन्मस्थान विकसित करण्यात येणार आहेउमरठ येथील नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधी परिसराचे सुशोभिकरण करण्यात येणार असल्याचेही मंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.

Featured post

Lakshvedhi