Wednesday, 5 March 2025

वरळी येथील शासकीय वसाहत इमारतींच्या संरचनात्मक परीक्षण दुरूस्तीची कामे प्रगतीपथावर

 वरळी येथील शासकीय वसाहत इमारतींच्या

संरचनात्मक परीक्षण दुरूस्तीची कामे प्रगतीपथावर

-         दुग्धविकास विकास मंत्री अतुल सावे

 

मुंबई, दि. 5 : वरळी येथील शासकीय वसाहतीतील इमारतींचे संरचनात्मक परीक्षण कार्यकारी अभियंतासार्वजनिक बांधकाम विभागवरळी यांचेमार्फत करण्यात आले असूनत्यानुसार इमारतींच्या देखभाल दुरूस्तीकरिता व धोकादायक पाण्याची टाकी निष्कासित करण्यात आले आहे. दुरूस्तीची कामे सुरु असल्याचे दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी विधान परिषदेत सांगितले.

विधान परिषद सदस्य सुनिल शिंदेमिलिंद नार्वेकर यांनी वरळी दुग्धशाळा वसाहतीच्या पुनर्विकासाबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.

दुग्धविकास मंत्री श्री. सावे म्हणाले, दुग्धशाळेतील कर्मचाऱ्यांना मोफत घरे देण्याबाबत शासनाचे कोणतेही धोरण नसून वरळी वसाहतीतील इमारती कमकुवत झाल्याने इमारतीतील कर्मचाऱ्यांना पर्यायी सोय म्हणून वरळी येथील उपलब्ध असलेल्या पर्यवेक्षीय तसेच कामगार वसाहतीतील शासकीय निवासस्थाने उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे श्री. सावे यांनी सांगितले.

यावेळी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, सदस्य विक्रम काळे, प्रवीण दरेकर, सुनील शिंदे, भाई जगताप अभिजित वंजारी यांनी चर्चेत सहभाग घेतला

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi