Saturday, 1 March 2025

आर्थिक सक्षमीकरणातून लाडक्या बहिणींची झेप उद्योजकतेकडे

 आर्थिक सक्षमीकरणातून लाडक्या बहिणींची झेप उद्योजकतेकडे

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

विकसित भारत महिला उद्योजिका संमेलन

            मुंबईदि. 1 : आर्थिक साक्षरतेकडून आर्थिक सक्षमीकरणाकडे महिलांचा प्रवास सुरू असून या प्रवासात झेप फाउंडेशनचे मोलाचे सहकार्य आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या निधीतून बचतगटाच्या माध्यमातून महिला उद्योजकतेकडे वळत आहेत. लाडक्या बहिणी लाडक्या उद्योजिका बनत असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

झेप फाउंडेशनच्यावतीने विकसित भारत महिला उद्योजिका 2025 च्या संमेलनाचे आयोजन वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे करण्यात आले. यावेळी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी, महिला बचत गटाच्या माध्यमातून उद्योग करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला.

            यावेळी मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडेमहाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्या सहव्यवस्थापकीय संचालक फरोग मुकादमउपायुक्त डॉ.प्राची जांभेकरनगरसेविका हर्षिता नार्वेकरवर्ल्ड ट्रेड सेंटरच्या कार्यकारी संचालक रूपा नाईक, ‘झेपच्या संचालिका पौर्णिमा शिरीषकर यांच्यासह बचत गटाच्या महिला आणि समाज कल्याण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

            महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या कीजागतिक महिला दिन हा स्वत:च्या अस्तित्वाची जाणीव करून देणारा आहे. यानिमित्त झेप फाउंडेशनने 500 पेक्षा जास्त बचत गटाच्या महिलांना एकत्रित केले आहे. दोन कोटीपेक्षा जास्त महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत. ग्रामीण भागातील महिलेच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी या योजनेचा लाभ महत्वपूर्ण ठरत आहे. या योजनेच्या माध्यमातून कोट्यवधी महिलांचा आपण आधार होऊ शकतो याचे समाधान लाभले असल्याचे त्यांनी सांगितले.

झेप फाउंडेशनने अशा महिलांना एकत्रित करून त्यांना लघु उद्योगासाठी प्रोत्साहन दिले. महिलांचा सन्मान करताना आम्हाला आनंद होत असल्याचे तटकरे यांनी सांगितले. महिलांचेही कुटुंबातील योगदान वाढावे यासाठी हा प्रयत्न आहे. गरजू महिलांना सहकार्य करण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचेही तटकरे यांनी यावेळी सांगितले.

ज्या महिला शासनाच्या या प्रयत्नांना साथ देत आहेत, चौकटी आणि रूढी परंपरातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करीत आहेत त्यांना आणि ज्या भगिनी त्यांना यासाठी सहकार्य करीत आहेत अशा सर्वांना महिलादिनाच्या शुभेच्छा महिला व बालविकास मंत्री तटकरे यांनी यावेळी दिल्या.

प्रधान सचिव अश्विनी भिडे म्हणाल्या कीजिद्द आणि महत्वाकांक्षा असेल तर महिलाही आपले ध्येय गाठू शकतात. लघु उद्योगात ७० टक्के महिला कार्यरत आहेत. राज्य शासन आणि केंद्र शासन यांच्या विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांनाही उद्यमशील बनवू शकतो. महिलांसाठी आकाश मोकळे आहे त्यांच्या पंखांना बळ देण्याचे काम राज्य शासन करीत असून केवळ महिलांच्या महत्वाकांक्षा आणि जिद्दीने हे साध्य होणार असल्याचे श्रीमती भिडे यांनी यावेळी सांगत महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

पर्यावरण संवर्धनासाठी कमी कार्बन उत्सर्जनवर भर द्यावा.

 पर्यावरण संवर्धनासाठी कमी कार्बन उत्सर्जनवर भर द्यावा.

-       माहिती तंत्रज्ञान मंत्रीॲड. आशिष शेलार

मुंबईदि.1 : सक्षम 'SAKSHAM-2024-25' हरित आणि स्वच्छ ऊर्जेद्वारे स्वच्छ वातावरण हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या वापरावर भर द्यावा. तसेच कमी कार्बन उत्सर्जन करणाऱ्या पर्यावरण पूरक व्यवस्थेचा वापर करावा. असे आवाहन माहिती व तंत्रज्ञान मंत्री ॲङ आशिष शेलार यांनी केले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राज्यस्तरीय समन्वयकमहाराष्ट्र पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू उद्योग यांच्या वतीने सक्षम 'SAKSHAM-2024-25' हरित आणि स्वच्छ ऊर्जेद्वारे स्वच्छ वातावरण कार्यक्रम झाला. यावेळी,  पश्चिम क्षेत्र हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे जनरल मॅनेजर बी.अच्युत कुमारबीपीसीएलचे महाराष्ट्र आणि गोवाचे महासंचालक अशिष रायइंडियन ऑइल चे जनरल मॅनेजर अभिजीत एस गिते,  गेल इंडियाचे उप जनरल मॅनेजर अनुराग भार्गवइंडियन ऑइल चे राज्य तेल समन्वयक उमेश कुलकर्णी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲङ आशिष शेलार म्हणालेआपल्याला दुसऱ्या देशातून खनिज तेल आयात करावे लागते. वाहतूक खर्च वाढल्यामुळे ते अधिक महागते. गॅसवर चालणाऱ्या रिक्षाटॅक्सी यासारख्या वाहनांतून कार्बनचे उत्सर्जन कमी होते. कार्बन उत्सर्जन कमी झाल्यास वातावणारमध्ये ऑक्सीजनचे प्रमाण योग्य राहील. त्यामुळे आपली सर्वांची प्रकृती चांगली राहिल. सक्षम कार्यक्रम हा आपल्या कुटुंबालादेशाला सक्षम करणारा पर्यावरण रक्षणाचा कार्यक्रम आहे. कार्बन उर्त्सजन कमी करण्यावर सर्वांनी भर द्यावा असे आवाहनही ॲड.शेलार यांनी केले.

यावेळी माहिती व तंत्रज्ञान मंत्री ॲङ शेलार यांच्या हस्ते शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यासाठी इंधन आणि तेल संवर्धनाकरिता आयोजित गट चर्चावादविवाद स्पर्धेतील विजेत्यांना तसेच शिक्षकांना त्यांच्या उत्कृष्ट योगादानाबद्दल पुरस्कृत करण्यात आले. 

            सक्षम (संरक्षण क्षमता महोत्सव) 2024-25 हा उपक्रम दि.14 ते 28 फेब्रुवारी, 2025 दरम्यान संपूर्ण देशभरात आयोजित केला गेला. या कार्यक्रमाचे घोषवाक्य हरित आणि स्वच्छ अंगिकार करा आणि पर्यावरणास स्वच्छ बनवा हे होते. सक्षम मोहिमेदरम्यान यंत्रणा ओएमसीशालेय मुलेतरूणएलपीजी वापरकर्तेड्रायव्हर्सफ्लीट ऑपरेटरउद्योग कर्मचारीकामगारशेतकरीनिवासी संस्थाग्रामपंचायतीस्वयंसेवी संस्था पर्यंत पोहोचला. तसेच इंधन संवर्धनाचे महत्त्वफायदे आणि पद्धतीबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी आणि इंधन-कार्यक्रम तंत्रज्ञान आणि पद्धतींचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी विविध इंधन संवर्धन उपक्रम राबविण्यात आले.

            शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी गट चर्चावादविवाद महाविद्यालयांमध्ये ग्राफिटीभिंतीचित्र स्पर्धाइंधन कार्यक्षम ड्रायव्हिंग स्पर्धावर्तमानपत्रात लेखपत्रकार परिषदा आणि टीव्ही/रेडिओवरील टॉक शोवॉकेथान आणि सायक्लोथॉनएलपीजीच्या कार्यक्षम आणि सुरक्षित वापराला प्रोत्साहन देणेशेतकरीऑपरेटरसार्वजनिक क्षेत्रातील कॉर्पोरेट कार्यालयेसंस्था/एनजीओ इत्यादीसाठी कार्यशाळा आणि कार्यक्रमसीएनजी रॅली राबविण्यात आले. इंधन संवर्धनासाठी विविध माध्यमातून महाराष्ट्रभर 500 उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

परिवहन भवनचे 2 मार्चला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन -

 परिवहन भवनचे 2 मार्चला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

 

मुंबईदि.1 :   विभागाचे मुख्यालय असलेल्या " परिवहन भवन " या नव्या इमारतीचे भूमिपूजन 2 मार्च रोजी दुपारी 2 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते होणार आहे. याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

        रस्ते वाहतुकीची नियमन करण्यासाठी 1 मार्च 1940 ला तत्कालीन मुंबई राज्याचा परिवहन विभाग अस्तित्वात आला. त्यामुळे 1 मार्च हा दिवस "परिवहन दिन" म्हणून साजरा केला जातो. या दिवसाची औचित्य साधून या रविवारी सर पोचखानवाला मार्ग वरळीमुंबई येथे मुख्यमंत्र्यांहस्ते 4 मजली प्रशस्त अशा "परिवहन भवन" या इमारतीचे भूमिपूजन होत आहे. सुमारे 12,800 चौरस मीटर बांधकाम क्षेत्र असलेल्या या इमारतीमध्ये एकावेळी 150 चारचाकी वाहने उभी करता येतीलइतकी चार मजल्याची भूमिगत पार्किंग व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे. ही इमारत पुढील अडीच वर्षांत बांधून पूर्ण केली जाणार आहे.

            विशेष म्हणजे राज्याला दरवर्षी 15 हजार कोटी रुपये महसूल मिळवून देणाऱ्या या विभागाच्या मुख्यालयाला स्वतःची इमारत नव्हती. परिवहन विभाग स्थापन झाल्यापासून तब्बल गेली 85 वर्ष या विभागाचे मुख्यालय भाड्याच्या इमारतीमध्ये होते. परिवहन मंत्री म्हणून प्रताप सनाईक यांनी पदभार स्वीकारल्यानंतर परिवहन विभागाच्या पहिल्या बैठकीमध्ये परिवहन विभागाच्या मुख्यालयाची स्वतःची इमारत बांधण्याचा संकल्प सोडला. एवढंच नाही तर त्यांनी सातत्याने पाठपुरावा देखील केला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते "परिवहन भवन" या परिवहन विभागाच्या मुख्यालयाचे येत्या रविवारी भुमिपुजन होत आहे.

शिक्षण आणि तंत्रज्ञानाद्वारे ग्रामीण भागाचा कायापालट शक्य

 शिक्षण आणि तंत्रज्ञानाद्वारे ग्रामीण भागाचा कायापालट शक्य

- उपराष्ट्रपती जगदीप धनखड

·         विकसित भारत केवळ स्वप्न नव्हे तर निश्चित साध्य

·         के.पी.बी हिंदुजा महाविद्यालयाचा अमृत महोत्सव

 

मुंबई दि :- नालंदातक्षशीला विद्यापीठांसारख्या संपन्न विद्याकेंद्रांची देदीप्यमान परंपरा आपल्याला लाभली आहे. ही परंपरा आपण जपली पाहिजे.  शिक्षण आणि तंत्रज्ञान हे समाज परिवर्तन घडविणारे महत्त्वाचे घटक असुन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ग्रामीण जीवनाचा कायापालट घडविण्याचे आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले. 'विकसित भारतहे केवळ स्वप्न नसून निश्चित साध्य असल्याचेही उपराष्ट्रपती धनखड यांनी सांगितले.

यशवंतराव चव्हाण सेंटर येथे के.पी.बी हिंदुजा महाविद्यालयाचा अमृत महोत्सव कार्यक्रम झाला. यावेळी उपराष्ट्रपती यांच्या पत्नी सुदेश धनखडराज्यपाल सी पी राधाकृष्णनअध्यक्ष अशोक हिंदुजाहर्षा हिंदुजापॉल अब्राहमप्राचार्य चंद्रकला जोशी हे उपस्थित होते.

उपराष्ट्रपती जगदीश धनखड म्हणालेआपला देश आर्थिक महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहे. देशातील युवकशक्ती ही आपली मोठी जमेची बाजू आहे. अत्याधुनिक शिक्षण क्षेत्रात आपण अग्रेसर आहोत. नियोजन हा विकासाचा गाभा आहे. शिक्षण आणि तंत्रज्ञान हे समाज परिवर्तन घडविणारे घटक असून भविष्यात उद्योग क्षेत्राने शिक्षण क्षेत्रात गुंतवणूक करून पायाभूत सुविधांबरोबरच दर्जेदार शिक्षणासाठीही योगदान द्यावे. कोणत्याही क्षेत्रातील संशोधन हे समाज उपयोगी असणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी स्व अभ्यासाला अधिक महत्त्व द्यावे कारण शिक्षण ही आजीवन चालणारी प्रक्रिया असल्याचे श्री धनखड यांनी सांगितले.

उपराष्ट्रपती धनखड यांनी हिंदुजा ग्रुपच्या विविध क्षेत्रातील योगदानाबद्दल प्रशंसोद्गगार काढले. श्री धनखड म्हणालेहिंदुजा ग्रुपचे विविध क्षेत्रातील कार्य प्रशंसनीय आणि प्रेरणादायी आहे. शिक्षण संस्था गुरुजनांच्या योगदानामुळे नावारूपाला येतात ही परंपरा हिंदुजा ग्रुपने जपली आहे. समाजसेवेचा वसाही हिंदुजा ग्रुपने जपला आहे.

प्रास्ताविकात अध्यक्ष अशोक हिंदुजा यांनी हिंदुजा ग्रुपच्या विविध क्षेत्रातील कामांची माहिती दिली. हिंदुजा ग्रुप ने सुरुवातीपासूनच समाजसेवा आणि समाज विकासावर भर दिला असून शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रात संस्थेने उल्लेखनीय कार्य केले असल्याचे श्री हिंदुजा यांनी सांगितले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. 'एक पेड मा के नामया उपक्रमाअंतर्गत उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी वृक्षारोपण केले.

000000

तुम्हाला ऐकून आश्चर्य आणि मजा ही वाटेल... पण १९४०-५० च्या दरम्यान *"राॅकेलची (kerosene)"* ची जाहिरात करावी लागे. "कारण राँकेलच्या तुलनेत सरपण स्वस्त पडायचे." त्यांमुळे राँकेलविक्री वाढवण्यासाठी *"बरमाशेल"* कंपनीने *महम्मद रफी* यांच्याकडून जाहिरात गीत गाऊन घेतले. ती जाहिरात फक्त रेडिओवर ऐकवली जायची कारण त्याकाळी फक्त रेडिओ हेच जाहिराती चे मुख्य माध्यम होते. हे जाहिरातगीत ऐका. कानाला सुखावणारे वाटेल.......त्याकाळचे बर्मा सेल कंपनीचे केरोसीन म्हणजे त्याला त्यावेळी "घासलेट" म्हटलं जायचं..😃*


 


पालघर जिल्ह्यात धर्मादाय रुग्णालयासाठी जमीन उपलब्ध करुन देणार

 पालघर जिल्ह्यात धर्मादाय रुग्णालयासाठी 

जमीन उपलब्ध करुन देणार

-         महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 

मुंबईदि. 28 : पालघर जिल्ह्यात आदिवासी समाज मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांना आरोग्य सेवा उपलबध करुन देण्यास शासनाचे प्राधान्य असून जिल्ह्यातील उमरोळीजवळ धर्मादाय रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयाकरिता भाडेपट्यावर जमीन उपलब्ध करुन देण्यात येईलअसे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

शारदा प्रतिष्ठानमुंबई तर्फे डॉ.सचिन खरात यांनी उमरोळी येथे 25 हे.आर. जमीन धर्मादाय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयासाठी उपलब्ध करुन देण्याबाबत विनंती केली. त्याबाबत महसूल मंत्री श्री.बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत यासंदर्भात आढावा घेण्यात आला. महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमारशारदा प्रतिष्ठानचे डॉ.खरात यावेळी उपस्थित होते. आमदार रणजितसिंह नाईक-निंबाळकरकोकण विभागीय आयुक्त विजय सुर्यवंशीपालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडखे दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

महसूल मंत्री श्री.बावनकुळे म्हणालेधर्मादाय रुग्णालय सुरू करण्यास शासनाचे प्राधान्य आहे. पालघर मधील हे रुग्णालय सुरू झाल्यास या माध्यमातून आदिवासी नागरिकांना सुविधा मिळतील. या कार्याला अंत्योदयाचा स्पर्श असणार असून भविष्यात हे रुग्णालय मुख्यमंत्री सहायता निधीस देखील जोडले जाईल. जिल्हा प्रशासनाने जागेसंदर्भात पाहणी करुन तात्काळ पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश महसूल मंत्री श्री.बावनकुळे यांनी दिले.

पेट्रोलपंप उभारणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात 'एक खिडकी'

 पेट्रोलपंप उभारणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात 'एक खिडकी'

- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 

मुंबईदि. २८ : राज्यातील १६६० पेट्रोलपंपांच्या परवानग्या देण्यासाठी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात एक खिडकी सुरू करण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला असल्याचे महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी एक खिडकी सुरू करण्याची महत्त्वपूर्ण सूचना महसूल विभागाला केली आहेअसे सांगून महसूल मंत्री श्री बावनकुळे म्हणाले कीराज्यात याद्वारे मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल. एका अहवालानुसार ३० हजारांवर रोजगानिर्मिती होऊ शकेल. पेट्रोल पंप सुरू करण्याची प्रक्रिया पुढील तीन महिन्यात पूर्ण व्हावी यादृष्टीने परवानगी देताना अत्यावश्यक आणि कमीत कमी अटी शर्ती ठेवण्याबाबत आदर्श कार्यप्रणाली महसूल विभागाने तयार करावी. विभागीय आयुक्तांनी याबाबत तातडीने सूचना पाठवाव्यात.

दोन हजार पेट्रोल पंपांचे नियोजन

राज्यात दोन हजार पेट्रोल पंप वाढविण्याचे नियोजन असून पंप उभारणीमध्ये इंधन कंपन्यांना महसूल विभागाकडील एनएसह पोलीससार्वजनिक बांधकाम विभागातील विविध ‘ना हरकत’ परवानगीच्या अडचणी दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात एक खिडकी सुरू करण्यात येईलअसे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

केंद्र सरकारने १६६० पंप मंजूर केले. हे पंप सुरू झाल्यानंतर सुमारे ३० हजारांवर तरुणांना रोजगार मिळेल. राज्यात साडेतीन ते चार हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. रोजगानिर्मिती व गुंतवणूक याला प्राधान्य असल्यानेएक खिडकी योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे श्री. बावनकुळे यांनी सांगितले.

यावेळी इंधन कंपन्यांच्या अडचणीसमस्यांचा आढावा घेण्यात आला. महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमारसह सचिव अजित देशमुखबीपीसीएल चे सुंदर राघवनराज्य प्रमुख राकेश सिन्हामुख्यमंत्र्यांचे सल्लागार डॉ.आनंद बंगसमन्वयक संतोष निरेंदकरएचपीसीएल चे बी.अच्युत कुमारमुकूंद जवंजाळ आदी उपस्थित होते.

Featured post

Lakshvedhi