पर्यावरण संवर्धनासाठी कमी कार्बन उत्सर्जनवर भर द्यावा.
- माहिती तंत्रज्ञान मंत्री, ॲड. आशिष शेलार
मुंबई, दि.1 : सक्षम 'SAKSHAM-2024-25' हरित आणि स्वच्छ ऊर्जेद्वारे स्वच्छ वातावरण हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या वापरावर भर द्यावा. तसेच कमी कार्बन उत्सर्जन करणाऱ्या पर्यावरण पूरक व्यवस्थेचा वापर करावा. असे आवाहन माहिती व तंत्रज्ञान मंत्री ॲङ आशिष शेलार यांनी केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राज्यस्तरीय समन्वयक, महाराष्ट्र पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू उद्योग यांच्या वतीने सक्षम 'SAKSHAM-2024-25' हरित आणि स्वच्छ ऊर्जेद्वारे स्वच्छ वातावरण कार्यक्रम झाला. यावेळी, पश्चिम क्षेत्र हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे जनरल मॅनेजर बी.अच्युत कुमार, बीपीसीएलचे महाराष्ट्र आणि गोवाचे महासंचालक अशिष राय, इंडियन ऑइल चे जनरल मॅनेजर अभिजीत एस गिते, गेल इंडियाचे उप जनरल मॅनेजर अनुराग भार्गव, इंडियन ऑइल चे राज्य तेल समन्वयक उमेश कुलकर्णी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲङ आशिष शेलार म्हणाले, आपल्याला दुसऱ्या देशातून खनिज तेल आयात करावे लागते. वाहतूक खर्च वाढल्यामुळे ते अधिक महागते. गॅसवर चालणाऱ्या रिक्षा, टॅक्सी यासारख्या वाहनांतून कार्बनचे उत्सर्जन कमी होते. कार्बन उत्सर्जन कमी झाल्यास वातावणारमध्ये ऑक्सीजनचे प्रमाण योग्य राहील. त्यामुळे आपली सर्वांची प्रकृती चांगली राहिल. सक्षम कार्यक्रम हा आपल्या कुटुंबाला, देशाला सक्षम करणारा पर्यावरण रक्षणाचा कार्यक्रम आहे. कार्बन उर्त्सजन कमी करण्यावर सर्वांनी भर द्यावा असे आवाहनही ॲड.शेलार यांनी केले.
यावेळी माहिती व तंत्रज्ञान मंत्री ॲङ शेलार यांच्या हस्ते शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यासाठी इंधन आणि तेल संवर्धनाकरिता आयोजित गट चर्चा, वादविवाद स्पर्धेतील विजेत्यांना तसेच शिक्षकांना त्यांच्या उत्कृष्ट योगादानाबद्दल पुरस्कृत करण्यात आले.
सक्षम (संरक्षण क्षमता महोत्सव) 2024-25 हा उपक्रम दि.14 ते 28 फेब्रुवारी, 2025 दरम्यान संपूर्ण देशभरात आयोजित केला गेला. या कार्यक्रमाचे घोषवाक्य हरित आणि स्वच्छ अंगिकार करा आणि पर्यावरणास स्वच्छ बनवा हे होते. सक्षम मोहिमेदरम्यान यंत्रणा ओएमसी, शालेय मुले, तरूण, एलपीजी वापरकर्ते, ड्रायव्हर्स, फ्लीट ऑपरेटर, उद्योग कर्मचारी, कामगार, शेतकरी, निवासी संस्था, ग्रामपंचायती, स्वयंसेवी संस्था पर्यंत पोहोचला. तसेच इंधन संवर्धनाचे महत्त्व, फायदे आणि पद्धतीबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी आणि इंधन-कार्यक्रम तंत्रज्ञान आणि पद्धतींचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी विविध इंधन संवर्धन उपक्रम राबविण्यात आले.
शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी गट चर्चा, वादविवाद महाविद्यालयांमध्ये ग्राफिटी, भिंतीचित्र स्पर्धा, इंधन कार्यक्षम ड्रायव्हिंग स्पर्धा, वर्तमानपत्रात लेख, पत्रकार परिषदा आणि टीव्ही/रेडिओवरील टॉक शो, वॉकेथान आणि सायक्लोथॉन, एलपीजीच्या कार्यक्षम आणि सुरक्षित वापराला प्रोत्साहन देणे, शेतकरी, ऑपरेटर, सार्वजनिक क्षेत्रातील कॉर्पोरेट कार्यालये, संस्था/एनजीओ इत्यादीसाठी कार्यशाळा आणि कार्यक्रम, सीएनजी रॅली राबविण्यात आले. इंधन संवर्धनासाठी विविध माध्यमातून महाराष्ट्रभर 500 उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
No comments:
Post a Comment